🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२३३
📿 देखिला सांवळा राजा द
2233.
देखिला सांवळा राजा द्वारकेचा । सर्वही सुखाचा ठेवा दिसे ॥१॥
माथा तो मुगुट कुंडले श्रवणी । प्रभा दिनमणी तुच्छ जेथे ॥२॥
कोटी मन्मथांची झाडणी करावी । ऐसी ते बरवी अंगकांती ॥३॥
श्रीमुख शोभले पूर्णचंद्रा ऐसे । देखतांचि दोष सर्व जाती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२३३
📿 उत्तम अन्न देखता दिठ
2233.
उत्तम अन्न देखता दिठी । ठेवी पोटी जतन ते ॥१॥
तान्हुल्याची वाहे चिंता । जेवी माता बाळाते ॥२॥
न कळे तया उत्तम कडु । परी परवडु माता दावी ॥३॥
एका जनार्दनी तैसा देव । घेत धांव भक्ताघरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२३४
📿 जे केली आळी ते अवघी
2234.
जे केली आळी ते अवघी गेली वाया । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥
काय समाधान केले कोण वेळे । कोणे माझे लळे पाळियेले ॥धृपद॥
आभास ही नाही स्वप्नी दुश्चिता । प्रत्यक्ष बोलता कंइचा तो ॥२॥
आता पुढे लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२३४
📿 वत्साचिये लळे जैसी ।
2234.
वत्साचिये लळे जैसी । धेनु अपैशी येत घरां ॥१॥
तैसा भक्तांघरी नारायण । धांवे आपण वोढीनें ॥२॥
मुंगुयांच्या घरां मुळ । धांडी समुळ कोण तो ॥३॥
एका जनार्दनी देव । घेत धांव आपणचि ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२३५
📿 यातीकुळ कांही नाणी त
2235.
यातीकुळ कांही नाणी तो मानसी । धांवें त्यांचे पाठीसी लागवेंगें ॥१॥
आपुलें म्हणविल्या न देखे पारिखें । रक्षी त्या कौर्तुकें आपुले काजा ॥२॥
एका जनार्दनी पहा अनुभव । धांवतसे देव लवलाहे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२३७
📿 काय वहिनीने दिधले आम
2237.
काय वहिनीने दिधले आम्हांसी । दाखवा वेगेसी कृष्ण म्हणे ॥१॥
सोडियेली तेव्हा मुष्टी तंदुळिका । रुक्मीणीनाइका पुढे ठेवी ॥२॥
घेऊनि ते पोहे मुखामाजी टाकी । मागे ते भीमकी धरोनी हात ॥३॥
ब्रम्हदिक देव उभे पोह्यांसाठी । नाही त्या लल्लाटी नामा म्हणे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२३७
📿 बाळाचें छंद जाण । मा
2237.
बाळाचें छंद जाण । माता पुरविती आपण ॥१॥
बोबडे बोलता ते बोल । माते आनंद सखोल ॥२॥
मागे जे ते आपण । आळ पुरवी त्यासी देऊन ॥३॥
एकाजनार्दनी ममत्व ते । नोहे लौकिकापुरतें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२३८
📿 माझे लेखी देव मेला ।
2238.
माझे लेखी देव मेला । असो त्याला असेल ॥१॥
गोष्ट न करी नांव नेघे । गेलो दोघे खंडोनी ॥धृपद॥
स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥
तुका म्हणे निवांत ठेलो । वेचित आलो जीवित्व ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२३९
📿 सुदामा म्हणे अनंता ।
2239.
सुदामा म्हणे अनंता । आम्हा आज्ञा द्यावी आता ॥१॥
जाऊ घरासी सत्वर । येऊनि दीवस झाले चार ॥२॥
सर्व ठेउनी जाता बरे । वाटे मारिती तस्कर ॥३॥
ऐसी ऐकोणी वचने । सर्व काढिली भूषणे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२३९
📿 देवो विसरें देवपण ।
2239.
देवो विसरें देवपण । अपीं वासना भक्तांसीं ॥१॥
भक्त देही सदा वसे । धर्म अर्थ अर्पितसे ॥२॥
जे जे भक्ताची वासना । पुरवी आपण त्याचि क्षणा ॥३॥
एका जनार्दनी अंकित । उभा तेथेंचि तिष्ठत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२४०
📿 संपदा सोहंळा नावडे म
2240.
संपदा सोहंळा नावडे मनाला । करी ते टकळा पंढरीचा ॥१॥
जावे पंढरिसी आवडी मनासी । कधी एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२४०
📿 नाही आमुचे दैवी त्या
2240.
नाही आमुचे दैवी त्याणे कोठोनी द्यावे । व्यर्थ का रुसावे देवावरी ॥१॥
न करिता खेद पुढे वाट चाले । गौरक्षक भेटले तयालागी ॥२॥
पुसतसे त्यासी कोणाचे नगर । ते म्हणती घर सुदाम्याचे ॥३॥
सुदाम्याची तुम्ही हेळणा करिता । तयाच्या संचीता प्राप्त कैचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२४०
📿 जे जे भक्तांची आवडी
2240.
जे जे भक्तांची आवडी । तया संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची ॥१॥
होय तयांचा अंकित । नेणे लहान थोर मात । आपुले आपण पुढे धांवत । न सांगता करी सर्व ॥२॥
एका जनार्दनी कनवाळ । पतितपावन म्हणवी दयाळ । माता स्नेहें परीस सबळ । भक्तांलांगीं स्वये रक्षी ॥३॥
२२४१
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२४१
📿 पंढरीची वारी आहे माझ
2241.
पंढरीची वारी आहे माझे घरी । आणीक न करी तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखी नाम ॥२॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे । बीज कल्पातींचे तुका म्हणे ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 भीष्मप्रतिज्ञा›
📿 अभंग क्र. २२४१
📿 भीष्मप्रतिज्ञा.
2241.
भीष्मप्रतिज्ञा.
मारिले ते वीर माव करि करी । मृषा ते वैखरी केली जगी ॥१॥
पण केला होता न धरी शस्त्रासी । भीष्म तो तयासी स्मरणवंत ॥२॥
महामारी धरी अर्जुन वीरासी । नये सावरासी कांही केल्या ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 भीष्मप्रतिज्ञा›
📿 अभंग क्र. २२४२
📿 करिता ते युद्ध नव दि
2242.
करिता ते युद्ध नव दिवस झाले । संकट पडले पांडवांसी ॥१॥
एक वेळ ऐसी केली मात भारी । नेम दिवस सारी एक बाकी ॥२॥
संग्रामी पांडव करिता विचार । चिंतातूर फार देखोनिया ॥३॥
तेव्हा कृष्ण म्हणे चला अवघे जन । भीष्मा लागोन विचारासी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२४३
📿 आम्हा सकळा देखता । प
2243.
आम्हा सकळा देखता । पुरवी लळे तो सर्वथा ॥१॥
जे जे मागावें तयासी । ते ते देतो निजभक्तांसी ॥२॥
न मने अंकिताचा शीण । राहे द्वारपाळ होऊन ॥३॥
घोडे धूतले रणांगणी । एका शरण जनार्दनी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 रावण मंदोदरी संवाद›
📿 अभंग क्र. २२४४
📿 विनंति करी मंदोदरी ।
2244.
विनंति करी मंदोदरी । परिसा स्वामी दशकंधरि ॥१॥
वांया आणिली जानकी घरी । लाज झाली तिही लोकी ॥२॥
मज पाहाता हे विवसी । क्षय आणिला कुळासी ॥३॥
आभिलाषिता पर सती । हे तो नव्हे राजनीती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२४५
📿 कथा देवाचे ध्यान । क
2245.
कथा देवाचे ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसे पुण्य आणीक नाही सर्वथा ॥१॥
ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥धृपद॥
मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे मना । म्हणता नारायणा क्षणे जळती महा दोष ॥२॥
भावे करिता कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 रावण मंदोदरी संवाद›
📿 अभंग क्र. २२४५
📿 ज्याते ध्यानी ध्याती
2245.
ज्याते ध्यानी ध्याती योगी । तो मज येतो भेटीलागी ॥१॥
तया रामासी विन्मुख होणे । जळो जिणे लाजिरवाणे ॥२॥
व्रते तपे ज्या साधिती । तो मज नित्य ध्यातो चित्ती ॥३॥
जो अगम्य वेद पुराणा । तो मज येतो समरंगणा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२४५
📿 भक्ताचिये काजें । दे
2245.
भक्ताचिये काजें । देव करिता न लाजेक ॥१॥
हा तो पहा अनुभव । उदार पंढरीचा राव ॥२॥
न विचारी यातीकुळ । शुची अथवा चांडाळ ॥३॥
एका जनार्दनी शरण । एका भावे निंबलोण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२४६
📿 कथा त्रिवेणीसंगम देव
2246.
कथा त्रिवेणीसंगम देव भक्ती आणि नाम । तेथींचे उत्तम चरणरज वंदिता ॥१॥
जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरीकथा ॥धृपद॥
तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा ॥२॥
अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णु या सुखा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 रावण मंदोदरी संवाद›
📿 अभंग क्र. २२४६
📿 मंदोदरी करी विनंती ।
2246.
मंदोदरी करी विनंती । परिसा स्वामी लंकापती ॥१॥
सोडा रामाची अंतुरी । जंव तो राम आहे दुरी ॥२॥
उदकी तारिले पाषाण । हा तो प्रताप नव्हे सान ॥३॥
झाला बिभीषण शाहाणा । देखोनी तुमच्या दुश्चिंतपणा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 रावण मंदोदरी संवाद›
📿 अभंग क्र. २२४७
📿 म्हणसी बिभीषण शाहाणा
2247.
म्हणसी बिभीषण शाहाणा । परि तो महा नूर्ख जाणा ॥१॥
काय तो रामासी भेटला । अवघा रामचि नाही झाला ॥२॥
कोण हित केले तेणे । राम नाकळीचि मने ॥३॥
राम द्दष्टी देखतांची । पदवी न घेववे त्याची ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२४७
📿 अंकित अंकिला । देव भ
2247.
अंकित अंकिला । देव भक्तांचा पै जाला ॥१॥
पहा पुंडलीकासाठी । उभा असे वाळूवंटी ॥२॥
युगें अठ्ठावीस जालीं । न बैसे अद्यापि तो खालीं ॥३॥
न बैसोनि उभा असे । एका जनार्दनी भक्तिपिसें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२४८
📿 जळती कीर्तने । दोष प
2248.
जळती कीर्तने । दोष पळतील विघ्ने ॥१॥
हेचि बिळवंत गाढे । आनंद करू दिंडीपुढे ॥धृपद॥
कली पापाची हे मूर्ती । नामखड्ग घेऊ हाती ॥२॥
तुका म्हणे जाऊ । बळे दमामे ही लावू ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२४९
📿 यम सांगे दूता तुम्हा
2249.
यम सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता । जेथे होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊ तया गांवा नामधारकाच्या शिवा । सुदर्शन येवा घरटी फिरे भोवती ॥धृपद॥
चक्र गदा घेउनी हरी उभा असे त्यांचे द्वारी । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥
ते बळयाशिरोमणी हरीभक्ती ये मेदिनी । तुका म्हणे कानी यम सांगे दूतांचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२४९
📿 पार नाही जयाच्या गुण
2249.
पार नाही जयाच्या गुणा । तो उभा श्रीपंढरीचा राणा ॥१॥
नवल गे माय भक्ताचेसाठीं । कटी कर ठेवुनी उभा वाळुवंटीं ॥२॥
न म्हणे तया कोणते बोल । उगा राहिला न बोले बोल ॥३॥
एका जनार्दनी भक्तांची आस । धरुनी उभा तिष्ठे जगदीश ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२५०
📿 कान्हया रे जगजेठी ।
2250.
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एक वेळे ॥१॥
काय मोकलिले वनी । सावजांनी वेढिले ॥धृपद॥
येथवरी होता संग । अंगे अंग लपविले ॥२॥
तुका म्हणे पाहिले मागे । एवढया वेगे अंतरला ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 कमाल›
📿 अभंग क्र. २२५०
📿 संत कमाल.
2250.
संत कमाल.
कबीराचे घरी आले संतजन । रात्र झाली जाण प्रहर एक ॥१॥
उठोनी कबीर संता नमन केले । बैसावया दिले तृणासन ॥२॥
कांतेसी म्हणत संत उपवासी । यासी भोजनासी घालावे हो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२५१
📿 आपुल्या आम्ही पुसिले
2251.
आपुल्या आम्ही पुसिले नाही । तुज काही कारणे ॥१॥
मागे मागे धावत आलो । काही बोलो यासाठी ॥धृपद॥
बहुत दिस होते मनी । घ्यावी धणी एकांती ॥२॥
तुका म्हणे उभा राहे । कान्हो पाहे मजकडे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 मिराबाई›
📿 अभंग क्र. २२५१
📿 संत मीराबाई.
2251.
संत मीराबाई.
राजियाची कन्या नाम मिराबाई । विठोबाचे पायी रत सदा ॥१॥
मायबाप तिचे करिती कृष्णसेवा । आवडीने देवा पूजिताती ॥२॥
सवे मिराबाई जात असे नित्य । वेधलेंसे चित्त कृष्णपायी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 भानुदास›
📿 अभंग क्र. २२५२
📿 संत भानुदास
2252.
संत भानुदास
पंढरीसी यात्रा मिळाली अपार । नाही तो सुंदर पांडुरंग ॥१॥
म्हणती संतजन काय झाला देव । पडलासे संदेह सकळांसी ॥२॥
कांहो उपेक्षिले कृपाळु अनंता । भेट देई संता आपुलिया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२५२
📿 भक्तदशनें देव ते तोष
2252.
भक्तदशनें देव ते तोषती । तेणे आनंद चित्ती देवाचिये ॥१॥
भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तानिंदा होता देवा येतसे क्रोध ॥२॥
भक्त संतोषतां देवासी सुख । एका जनार्दानीं देवा भक्तांचा संतोष ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२५३
📿 देव पुजिती आपुले भक्
2253.
देव पुजिती आपुले भक्ता । मज वाढविले म्हणे उचिता ॥१॥
ऐसा मानी उपकार । देव भक्ति केला थोर ॥२॥
देवाअंगी नाही बळ । भक्त भक्तीनें सबळ ॥३॥
देव एक देशी वसे । भक्त नांदती समरसें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२५४
📿 विषमाची शंका वाटे ।
2254.
विषमाची शंका वाटे । सारिखे भेटे तरी सुख ॥१॥
म्हणऊनि चोरिले जना । आल्या राणा एकांती ॥धृपद॥
दुजियासी कळो नये । जया सोय नाही हे । ॥
तुका म्हणे मोकळे मन । नारायण भोगासी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 संताजी पवार›
📿 अभंग क्र. २२५४
📿 संताजी पवार
2254.
संताजी पवार
रांजण गांवामध्ये संताजी पवार । असे तो सरदार नामांकित ॥१॥
स्वामी काजामध्ये असे तो सावध । भावे हा गोविंद आठवीत ॥२॥
शास्त्र भागवत करिता श्रवण । समजले पूर्ण मनामाजी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२५४
📿 भक्त नीच म्हणोनि उपह
2254.
भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पूर्वज नरका जाती ॥१॥
भक्त समर्थ समर्थ । स्वये बोले वैकुंठनाथ ॥२॥
भक्तासाठीं अवतार । मत्स्य कूर्मादि सुकर ॥३॥
यातिकुळ न पाहे मनी । एका शरण जनार्दनी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 बोधले बाबा›
📿 अभंग क्र. २२५५
📿 संत बोधलेबावा
2255.
संत बोधलेबावा
धामणगांवामध्ये माणकोजी बोधला । आवडे देवाला प्राणाहुनी ॥१॥
विठोबाचे नामी रंगले हे मन । मिळाले जीवन सिंधुमाजी ॥२॥
आवडीने केला त्याणे अंगिकार । कृपेचा सागर पांडुरंग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२५६
📿 कोणी सुना कोणी लेंकी
2256.
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥
अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥धृपद॥
अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥
तुका म्हणे करा सेवा । आले जीवावर तरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२५६
📿 देव भक्तपणें नाही दु
2256.
देव भक्तपणें नाही दुजा भाव । एकरुप ठाव दोही अंगी ॥१॥
दुजेपण नाही दुजेपण नाही । दुजेपण नाही दोही अंगी ॥२॥
एका जनार्दनी देव तेचि भक्त । सब्राह्म नांदत एकरुपी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२५७
📿 येथील जे एक घडी । तय
2257.
येथील जे एक घडी । तये जोडी पार नाही ॥१॥
किती त्यांचा सासुरवास । कैचा रस हा तेथे ॥धृपद॥
अवघे दिवस गेले कामा । ही जन्मा खंडण ॥२॥
तुका म्हणे रतल्या जनी । सोडा झणी कान्होबा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 जनाबाई›
📿 अभंग क्र. २२५७
📿 संत जनाबाई अभंग.
2257.
संत जनाबाई अभंग.
नामयाचे घरी असे दासी जनी । तिने चक्रपाणी वश केला ॥१॥
करिता कामधंदा ध्यानी नारायण । करीत चिंतन अहोरात्न ॥२॥
देखोनिया भाव तिचा पांडुरंग । काम करू लागे जनीलागी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२५७
📿 देव आणि भक्ति एकचि व
2257.
देव आणि भक्ति एकचि विचार । दुजे पाहे तया घडे पातक साचार ॥१॥
देव आणि श्रुति सांगती पुराणे । देव आणि भक्त एकरुपपणें ॥२॥
एका जनार्दनी जया समता दृष्टी । भक्ता पाहता देवा होतसें भेटी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२५८
📿 भक्ताविण देवा । कैंच
2258.
भक्ताविण देवा । कैंचें एकपण सेवा ॥१॥
भक्तांची सेवा देव करी । देव तिष्ठे भक्त द्वारे ॥२॥
भक्तांचे अंकित । लक्ष्मीसह देव होत ॥३॥
एका जनार्दनी भक्त । देवा हृदयी धरीत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२५९
📿 करिती तया वेवसाव आहे
2259.
करिती तया वेवसाव आहे । येथे व्हा रे साहे एक एका ॥१॥
गाता आइकता समान चि घडे । लाभे लाभ जोडे विशेषता ॥धृपद॥
प्रेमाचे भरते भाते घ्यावे अंगी । नटे टाळी रंगी शूरत्वेंसी ॥२॥
तुका म्हणे बहुजन्मांचे खंडण । होईल हा सीण निवारोनि ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 गोरा कुंभार गोरोबा›
📿 अभंग क्र. २२५९
📿 संत गोरोबा कुंभार अभ
2259.
संत गोरोबा कुंभार अभंग
प्रेम अंगी सदा वाचे भगवंत । प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा ॥१॥
असे घराश्रमी करीत व्यवहार । न पडे विसर विठोबाचा ॥२॥
कालवुनी माती तुडवीत गोरा । आठवीत वरा रखूमाईच्या ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२५९
📿 जेथे जेथे भक्त वसे ।
2259.
जेथे जेथे भक्त वसे । तेथे देव नांदे अपैसें ॥१॥
हाचि पहा अनुभव । नका ठाव चळूं देऊं ॥२॥
बैसले ठायी दृढ बैसा । वाचे सहसा विठ्ठल ॥३॥
एका जनार्दनी ठाव । धरिता देव हाती लागे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२६०
📿 जीव जीती जींवना संगे
2260.
जीव जीती जींवना संगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥१॥
जया चित्ती जैसा भाव । तया जविळ तैसा देव ॥धृपद॥
सकळा पाडीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥२॥
तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२६३
📿 नामदुषी त्याचे नको द
2263.
नामदुषी त्याचे नको दरुषण । विष ते वचनवाटे मज ॥१॥
अमंगळ वाणी नाईकावी कानी । निंदेची पोहणी उठे तेंथे ॥धृपद॥
काय साच लभ्य त्याचिये वचनी । कोण त्या पुराणी दिली ग्वाही ॥२॥
काय आड लावू त्याचिया तोंडासी । आता या जिभेंसी काय करू ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 रांका कुभार›
📿 अभंग क्र. २२६३
📿 संत राका कुंभार
2263.
संत राका कुंभार
कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण ॥१॥
पंढरीक्षेत्रांत राहता आनंदे । वाचे गोविंद आळविती ॥२॥
करिती आपुला स्वकर्म व्यवहार । वाचे निरंतर रामनाम ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२६४
📿 येऊनि नरदेहा झाकितील
2264.
येऊनि नरदेहा झाकितील डोळे । बळे चि अंधळे होती लोक ॥१॥
उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनिया ॥धृपद॥
बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढे नाही ऐसा लाभ मग ॥२॥
तुका म्हणे जाऊ सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 नरहरी मेहता›
📿 अभंग क्र. २२६४
📿 संत नरसी मेहता अभंग
2264.
संत नरसी मेहता अभंग
नरसी मेहता होता सावकार । जुनागडी घर महा भक्त ॥१॥
वडील तयाचे करिती व्यापार । गजी सावकार द्रव्य धान्यी ॥२॥
तया कुळी झाला भक्तराज पाही । धन ते सर्वहि धर्म केले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२६५
📿 नव्हे जाखाई जोखाई ।
2265.
नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ॥१॥
बिळया माझा पंढरिराव । जो या देवाचा ही देव ॥धृपद॥
रंडी चंडी शक्ती । मद्यमांस भिक्षती ॥२॥
बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाठी देव ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 नरहरी मेहता›
📿 अभंग क्र. २२६५
📿 स्वति श्रीनगर द्वारक
2265.
स्वति श्रीनगर द्वारकापुरीचे । श्रीरणछोडजीचे सेवेमधे ॥१॥
दासानुदास चरणरज साचार । विनंती अपार लिहितसे ॥२॥
यात्रेकरी याने राखिले रुपये । तीन शते साठ द्यावे यांसी ॥३॥
ऐसे पत्र दिले हुंडी ते लिहून । नगरीचे बाम्हण पाचारिले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५›
📿 अभंग क्र. २२६५
📿 श्रीकृष्ण - उद्धव प्
2265.
श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५
द्वारकेमाजी श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥
सर्व देवाचा तुं देव । ईश्वर न कळे तुझी माव । शिवणे सर्व ऋषी गणगंधर्व । परी तु नाकळा सर्वथा ॥२॥
तुम्ही बैसोनि एकांती । काय करिता श्रीपती । हे होते पुसणे माझे चित्ती बहु दिवस श्रीहरीं ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 नरहरी मेहता›
📿 अभंग क्र. २२६६
📿 चालली ते यात्रा गेली
2266.
चालली ते यात्रा गेली द्वारकेसी । करूनि स्नानासी नगरामध्ये ॥१॥
पहावया घर दुकान हुंडीचे । न दिसे हो साचे तत्क्षणी ॥२॥
सायंकाळ पडला सांपडेना कोठे । प्राणासी संकट देणे आले ॥३॥
देश दूर झाला नसे खर्ची कांही । देहपात पाही करीन आता ॥४॥