संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ३›
📿 अभंग क्र. १३२
📿 राग बिलावल
132.
राग बिलावल
लेता लेता रामनाम रे, लोकड़िया तो लाजो मरै छे ।
हरि मंदिर जाता पांवड़िया रे दूखै, फिर आवै आखो गाम रे ।
झगड़ो धाय त्या दौड़ीने जाय रे, मूकीने घर ना काम रे॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १३२
📿 न देखो सादृश्य हारपे
132.
न देखो सादृश्य हारपे पै दृश्य । उपनिषदांचे पै भाष्य हारपले ॥१॥
ते रूप उघडे कृष्णरूप खेळे । गोपाळांचे लळे पुरविले ॥२॥
न घडे प्रपंच नाही त्या आहाच । सर्वरूपे साच हरि आम्हा ॥३॥
निवृत्तिचे पर कृष्ण हा साचार । सर्व हा आचार कृष्ण आम्हा ॥४॥
133.
येथे दुसरी न सरे आटी । देवो भेटी जावया ॥१॥
तोचि ध्यावा एक चित्ते । करुनि रिते कलेवर ॥२॥
षड्ऊर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥३॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथे वास करी तो ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १३३
📿 माझा नामा मज देंई ।
133.
माझा नामा मज देंई । जीव देईन तुझे पायी ॥1॥
पुंडलिका भुलविले । तैसे माझिया बाळा केले ॥2॥
ते गा न चले मजपाशी । दे गा माझ्या नामयासी ॥3॥
तुझ्यासंगे जे जे गेले । ते त्वा जितेचि मारीले ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३३
📿 जीविंचा जिवलग प्राणा
133.
जीविंचा जिवलग प्राणांचा तो प्राण । धरीन चरण जीवे भावे ॥१॥
आषाढी-कार्तिकी पंढरीची वारी । होईल तया घरी पशुयाती ॥२॥
विठ्ठल नामाचा छंद जया मनी । संसार काचणी तया नाही ॥३॥
चोखा म्हणे नाही दुजा छंद मनी । जागृती स्वप्नी पंढरिराव ॥४॥
134.
येणे बोधे आम्ही असो सर्वकाळ । करु हे निर्मळ हरिकथा ॥१॥
आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे । निधान हे वाचे सांपडले ॥२॥
तरतील कुळे दोन्ही उभयता । गाता आइकता सुखरुप ॥३॥
न चळे हा मंत्र न म्हणे यातीकुळ । नलगे काळ वेळ विचारावी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३४
📿 जे कांही करितो ते वा
134.
जे कांही करितो ते वायाचि जाय । न कळे उपाय साच कांही ॥१॥
धरू आता गोडू लागतसे कडु । तैसा हा उघड माया मोह ॥२॥
नाथिलेंचि सारे मृगजळ प्राणी । काय लाभ हानि पाहतिया ॥३॥
चोखा म्हणे ऐसे वांयाचि सकळ । वाटते नवल मज याचे ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १३४
📿 प्रभु जी तुम दर्शन ब
134.
प्रभु जी तुम दर्शन बिन मोय घड़ी चैन नही आवड़े ॥टेक ॥
अन्न नही भावे नींद न आवे विरह सतावे मोय ।
घायल ज्यू घूमू खड़ी रे म्हारो दर्द न जाने कोय ॥१ ॥
दिन तो खाय गमायो री, रैन गमाई सोय ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विरहावस्था - अभंग ११९ ते १३८›
📿 अभंग क्र. १३४
📿 ऐशीं निर्धारे विरहिण
134.
ऐशीं निर्धारे विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करी । संतसंग घडलिया धन्य संसारी ॥१॥
धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावले सुखधामा ॥धृ.॥
नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामांवांचुनी नेणे साधन । तो विरह न व्हावा पुर्ण ॥२॥
एका जनार्दनी सत्य वचन । विरहविरह गेला मुळीहून । नाम जपता स्थिर झाले मन । विरह गेला त्यागुना ॥३॥
135.
आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलिये ॥१॥
रात्रंदिवस मज पाहिजे जवळी । क्षण त्या निराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांदा आता । रातले अनंता तुका म्हणे ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३५
📿 जे नेणते ना जाणे भले
135.
जे नेणते ना जाणे भले । ते त्वा भुलविले तयासी ॥१॥
धन्य दैवाचा आगळा । काय वर्णू तुझी लीला ॥२॥
माझिया बापाते गिंवसिले । मोकळेंचि उभे केले ॥३॥
कैसा हा तुझा नवलाव । चोखा म्हणे देवांचा तू देव ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १३५
📿 स्वामी सब संसार के ह
135.
स्वामी सब संसार के हो सांचे श्रीभगवान ॥
स्थावर जंगम पावक पाणी धरती बीज समान ।
सबमे महिमा थांरी देखी कुदरत के कुरबान ॥
बिप्र सुदामा को दालद खोयो बाले की पहचान ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विरहावस्था - अभंग ११९ ते १३८›
📿 अभंग क्र. १३५
📿 रात्रदिवस मन रंजलें
135.
रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणी चित्त जडले । विरहाचें दुःख फिटले । धन्य झाले संसारी ॥१॥
विरह गेला सुख झाले वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ.॥
संतसंग घडला धन्य आजी । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झाले आजी ॥२॥
धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १३६
📿 लोलो लागला अंबेचा ।
136.
लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा ॥1॥
आदि ठाणे पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर ॥2॥
गोणाईने नवस केला । देवा पुत्र देंई मला ॥3॥
शुद्ध देखोनिया भाव । पोटी आले नामदेव ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नाममाला > अभंग ११० ते १५५›
📿 अभंग क्र. १३६
📿 नाम पवित्र आणि परिकर
136.
नाम पवित्र आणि परिकरु । कल्पतरुहुनि उदारु ।
ते तु धरी का रे सधरु । तेणे तरसी भव दुस्तरु ॥
नरहरिनाम उच्चरी । तेणे तरसी भवसागरी ॥
जपे न लाहसी तपे न लाहसी । क्रिये षट्कर्मे न पवसी ।
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३६
📿 तुमच्या चरणी जे कांह
136.
तुमच्या चरणी जे कांही आहे । ते सुख पाहे मज द्यावे ॥१॥
सर्वासी विश्रांति तेथे मन ठेवी । ते सुख शांति देई मज देवा ॥२॥
सर्वांभूती दया संतांची ते सेवा हेचि देई देवा दुजे नको ॥३॥
चोखा म्हणे आणिक दुजे नको कांही । जीव तुझे पायी देईन बळी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 इंद्र गर्व परिहार›
📿 अभंग क्र. १३६
📿 सकळिका तेव्हा देवे आ
136.
सकळिका तेव्हा देवे आश्वासिले । इंद्रे हे मांडिले विघ्न येथे ॥१॥
महेंद्राच रंक करीन क्षणांत । पाहे पुरुषार्थ दावीन मी ॥२॥
रक्षिणार यांसी आहे मी गोविंद । उतरीन मद तुझा आता ॥३॥
शरणागता मारी ऐसा कोण थोर । मशक पामर पाहू आता ॥४॥
137.
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न करिता ॥१॥
कसोटी हे असे हाती । सत्य मूर्ती भगवंत ॥२॥
चुकलोंसा दिसे पंथ । गेले संत तो ऐसा ॥३॥
तुका म्हणे सोंग वाया । कारण या अनुभवे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १३७
📿 नामदेवा पुत्र झाला ।
137.
नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ॥1॥
आंगडे टोपडे पेहरण । शेला मुंडासा घेऊन ॥2॥
माझ्या जीवाच्या जीवना ॥ नाम ठेवी नारायणा ॥3॥
जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवू सांगा ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १३७
📿 प्रभुजी थे कहा गया न
137.
प्रभुजी थे कहा गया नेहड़ो लगाय ।
छोड़ गया बिस्वास संगाती प्रेमकी बाती बलाय॥
बिरह समंद मे छोड़ गया छो, नेहकी नाव चलाय ।
मिरा के प्रभु कब र मिलोगे, तुम बिन रह्यो न जाय॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 इंद्र गर्व परिहार›
📿 अभंग क्र. १३७
📿 राहा याचे तळी आनंदे
137.
राहा याचे तळी आनंदे करूनी । मानू नका मनी भय याचे ॥१॥
पाहू किती दिवस पडतो पाऊस । धरीन नि:शेष प्रलयांत ॥२॥
सांगतांचि ऐसे राहाती सकळ । वर्णिताती बळ परस्परे ॥३॥
सौंगडे म्हणती तेव्हा ते समस्त । लावी कीरे हात सकळीक ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १३७
📿 न साहात दुजेपण आपणचि
137.
न साहात दुजेपण आपणचि आत्मखुण । श्रुति जेथे संपूर्ण हरपती ॥१॥
देवरूप श्रीकृष्ण योगिया संजीवन । ते रूप परिपूर्ण आत्माराम ॥२॥
न दिसे वैकुंठी ते योगियांचे ध्यानबीज । तो गोपाळाचे काज हरि करी ॥३॥
निवृत्ति गयनि हरि उच्चारिता माजी घरी । होती मनोरथ पुरी कामसिद्धी॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३८
📿 तुम्हांसी शरण बहुत म
138.
तुम्हांसी शरण बहुत माग आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥
तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥
नाही अधिकार उच्छिष्टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥
चोखा म्हणे मज कांही ते न कळे । नामाचिया बळे काळ कंठी ॥४॥
139.
मुक्त होता परि बळे झाला बद्ध । घेऊनिया छंद माझे माझे ॥१॥
पाप पुण्य अंगी घेतले जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥
तुका म्हणे गेले व्यर्थ वायांविण । जैसा मृग शीण मृगजळी ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत एकनाथ गौळणी›
📿 अभंग क्र. १३९
📿 अधरी धरुनि वेणु । वा
139.
अधरी धरुनि वेणु । वाजविला कुणी नेणु ॥१॥
प्रात:काळी तो वनमाळी । घेऊनि जातो धेनु ॥२॥
उभी मी राहे वाट मी पाहे । केव्हा भेटेल मम कान्हु ॥३॥
एका जनार्दनी वाजविला वेणु । ऐकता मन झाले तल्लीनु ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नाममाला > अभंग ११० ते १५५›
📿 अभंग क्र. १३९
📿 अशौचिया जपो नये । आण
139.
अशौचिया जपो नये । आणिकांते ऐको नये ।
ऐसिया मंत्राते जग बिहे । त्याचे फळणे थोडे परी क्षोभणे बहु ।
तैसा मंत्रराज नव्हे रे ॥
नारायण नाम नारायण नाम । नारायण नाम म्हणका रे रे ।
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३९
📿 तुम्ही आता उपेक्षिता
139.
तुम्ही आता उपेक्षिता । काय चाले माझी सत्ता ॥१॥
तुमच्या उच्छिष्टाचा दास । ऐसा माझा विश्वास ॥२॥
नामा वांचोनि कांही नेणे । हेँचि दृढ धरिले मने ॥३॥
चोखा म्हणोनी पडतो पाया । कृपा करा देवराया ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १३९
📿 प्रभुजी थे कहाँ गया,
139.
प्रभुजी थे कहाँ गया, नेहड़ो लगाय ।
छोड़ गया बिस्वास संगाती प्रेम की बाती बलाय ॥
बिरह समंद मे छोड़ गया छो हकी नाव चलाय ।
मिरा के प्रभु कब रे मिलोगे तुम बिन रह्यो न जाय ॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत एकनाथ गौळणी›
📿 अभंग क्र. १४०
📿 तुझ्या मुरलीचा ध्वनी
140.
तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानी ।
विव्हळ झाले अंतःकरणी । मी घरधंदा विसरले ॥१॥
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥
मुरली नोहे केवळ बाण । तिने हरीला माझा प्राण ।
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १४०
📿 तुम्ही वाढविले तुम्ह
140.
तुम्ही वाढविले तुम्ही पोसियेले । तुम्हींच दाविले जग मज ॥१॥
तुमचा प्रकार तुमचा तुम्ही जाणा । आमुचिया खुणा जाणो आम्ही ॥२॥
तुम्हांसी तो भीड कासयाची देवा । हेचि केशवा सांगा मज ॥३॥
चोखा म्हणे काय बोलू येयावरी । माझा तू कैवारी देवराया ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ३›
📿 अभंग क्र. १४०
📿 घर आवो जी सजन मिठ बो
140.
घर आवो जी सजन मिठ बोला ।
तेरे खातर सब कुछ छोड्या, काजर, तेल तमोला॥
जो नहि आवै रैन बिहावै, छिन माशा छिन तोला ।
'मिरा' के प्रभु गिरिधर नागर, कर धर रही कपोला॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वनक्रीडा - अभंग १३९ ते १४७›
📿 अभंग क्र. १४०
📿 घेऊनि गोधनें जाती यम
140.
घेऊनि गोधनें जाती यमुने तटी । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥
मेळेवोनि गोपाळ मध्ये खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥
नानापरींचे खेळ खेळती गोपाळ । नाचती गदारोल मिळोनी सकळ ॥३॥
एका जनार्दनी खेळे मदनपुतळा । नंदरायाचा कुमरु म्हणतात सांवळा ॥४॥