🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९५४
📿 एकाचिया घाटया टोके ।
954.
एकाचिया घाटया टोके । एका फिके उपचार ॥१॥
ऐसी सवे गोविळया । भाव तया पढियंता ॥धृपद॥
एकाची ते उष्टे खाय । एका जाय ठकूणि ॥२॥
तुका म्हणे बहु सोपे । बहु रूपे अनंता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९५४
📿 अकार उकार मकारां वेग
954.
अकार उकार मकारां वेगळां । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥१॥
अंडज जारज स्वदेज उद्भिजां वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥२॥
प्राण अपान व्यान उदान समान । यांवेगळा जाण शिव एक ॥३॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । यांवेगळा भास शिव एक ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९५५
📿 कोठे नाही अधिकार । ग
955.
कोठे नाही अधिकार । गेले नर वाया ते ॥१॥
ऐका हे सोपे वर्म । न लगे श्रम चिंतना ॥धृपद॥
मृत्युचिये अंगी छाये । उपायेचि खुंटता ॥२॥
तुका म्हणे अवघे जन । येथे मन असो द्या ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९५५
📿 वेदशास्त्री गाईला पु
955.
वेदशास्त्री गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं ॥१॥
तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळोवेळीं ॥२॥
सकळ इंद्रियां झालीं पै विश्रांती । पाहता ती मूर्ती शंकराची ॥३॥
एका जनार्दनी शिव हा भजावा । संसार करावा सुखरुप ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९५६
📿 ज्याणे ज्याणे जैसे ध
956.
ज्याणे ज्याणे जैसे ध्यावे । तैसे व्हावे कृपाळे ॥१॥
सगुणनिर्गुणाचा ठाव । विटे पाव धरियेले ॥धृपद॥
अवघे साकरेचे अंग । नये व्यंग निवडिता ॥२॥
तुका म्हणे जे जे करी । ते ते हरी भोगिता ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९५६
📿 जीवीचे गुज राही रुक्
956.
जीवीचे गुज राही रुक्माईसी पुसे | न धरवे मज हांसे नवल वाटे ॥१॥
काय अभिश्राप आला देवराया | केली आपणया आत्मशुद्धी ॥२॥
हे मज बाई सत्य सांगा वाणी | कवणे चक्रपाणि भुलविले ॥३॥
सूर्य आणि अंधारू वर्ते एके ठायी | हे भूतभविष्य नाही वर्तमान ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९५६
📿 शिव भोळा चक्रवती । त
956.
शिव भोळा चक्रवती । त्याचे पाय माझे चित्ती ॥१॥
वाचे वदता शिवनाम । तया न बाधी क्रोधकाम ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखता प्रत्यक्ष ॥३॥
एका जनार्दनी शिव । निवारी कलिकाळाचा भेव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९५७
📿 स्वरुप सुंदर अति विश
957.
स्वरुप सुंदर अति विशाळ । नेत्री निघती अग्निज्वाळ । हृदयावरी सर्पाची माळ । दुष्ट दुर्जना प्रत्यक्ष काळ ॥१॥
वाचे वदे हरहर शब्द । तेणे निरसे भवबंध ॥धृ.॥
माथा जटा शोभे पिंगटवर्ण । मध्ये गंगा वाहे परिपुर्ण । हृदयी सदा रामध्यान । तयासी पाहता निवे मन ॥२॥
शिव शिव नाम हे तारक । जया ध्याती ब्रह्मादिक । सिद्ध साधक वानिती अनेक । तया ध्याता सुख अलोकिक ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९५८
📿 नामाचे पवाडे बोलती प
958.
नामाचे पवाडे बोलती पुराणे । होऊनि कीर्तन तोचि ठेला ॥१॥
आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र । आवडीचे स्तोत्र सदा घोकी ॥धृपद॥
आगळे हे सार उत्तमा उत्तम । ब्रम्हकर्मा नाम एक तुझे ॥२॥
तिही त्रिभुवनी गमन नारदा । हाती विणा सदा नाम मुखी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९५८
📿 मग नारदाते पुसे सत्य
958.
मग नारदाते पुसे सत्यभामा देवी | विस्मयो माझ्या जीवी अति वाटे ॥१॥
सांडोनिया थोरी देव मुगुटमणी | नाचतो कीर्तनी संतांपुढे ॥२॥
तरी कोणिये जन्माचे काय काय याचे | घेतले नाम्याचे ऋण देवे ॥३॥
एका पुंडलिकाचेनि पांगे येणे हो श्रीरंगे | अह्टावीस युगे उभ्या गेली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९५९
📿 भूतदयापरत्वे जया तया
959.
भूतदयापरत्वे जया तया परी । संत नमस्कारी सर्वभावे ॥१॥
शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथे ॥धृपद॥
हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संता तैसी ॥२॥
सरिता वोहोळ गंगा सागरा समान । लेखी तयाहून अधम नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९५९
📿 कर्मे नित्य नैमित्ती
959.
कर्मे नित्य नैमित्तीक । करावी ती आवश्यक ॥१॥
तेचि होय शिवपुजा । चित्तशुद्धि ते सहजा ॥२॥
मनःस्थिर ते कारण । करा शंकराचे ध्यान ॥३॥
गुरु होऊनि शंकर । ज्ञान उपदेशीं सत्वर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९६०
📿 आणीक मज काही नावडती
960.
आणीक मज काही नावडती मात । एका पंढरिनाथावांचुनिया ॥१॥
त्याचीच कथा आवडे कीर्तन । ते मज श्रवणे गोड लागे ॥२॥
तुका म्हणे संत म्हणोत भलते । विठ्ठलापरते न मनी काही ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९६१
📿 जीवींचे गुजगौप्य सां
961.
जीवींचे गुजगौप्य सांगेन वो तूते | ऐक एकचित्ते मनोधर्मे ॥१॥
आवडते हे माझे भक्त परम सखे | जे सबाह्य सारिखे सप्रेमळ ॥२॥
त्यापरिस थोर नाही मन दुजे | मज त्याचेनि काजे नांवरूप ॥३॥
भक्त सर्वाहोनि पढियंते माझिया हो जीवा | भक्त हा विसावा ज्ञानियांचा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९६१
📿 नित्य शिव शिव आठव ।
961.
नित्य शिव शिव आठव । तुटेल जन्ममरण भेव ॥१॥
दुजे नाही पै साधन । वाचे वादावा इशान ॥२॥
ऋद्धिसिद्धि पाया लागे । हृदयी सदाशिव जागे ॥३॥
शंकर हा जया चित्ती । जवळी तया भुक्ति मुक्ति ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड रुपके›📂 , पांगुळ अभंग ९६१ ते ९६३›
📿 अभंग क्र. ९६२
📿 धर्म अर्थ काम मोक्ष
962.
धर्म अर्थ काम मोक्ष दान मागे श्रीगुरू ।
हस्त पाद शरीर व्यथा पंगु झालो मी पुढारू ।
तिमिर आले पुढे मायामोहो उदारू ।
तेणे मी जात होतो मग सहज भेटला सद्गुरू ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९६२
📿 येथे दुसरी न सरे आटी
962.
येथे दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥
तोचि ध्यावा एक चित्त । करूनि रिते कलेवर ॥धृपद॥
षडउर्मी हृदयात । यांचा अंत पुरवूनि ॥२॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथे वास करी तो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९६२
📿 सहज नाम आठवितां । यम
962.
सहज नाम आठवितां । यमा पडे धाक सर्वथा ॥१॥
ऐसे शिवनाम समर्थ । कळिकाळपायां पडत ॥२॥
शुद्ध भावे आठवितां । मुक्ति होय सायुज्यता ॥३॥
ऐशी आहे वेदवाणी । एका शरण जनार्दनी ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड रुपके›📂 , पांगुळ अभंग ९६१ ते ९६३›
📿 अभंग क्र. ९६३
📿 पूर्वप्राप्ती दैवयोग
963.
पूर्वप्राप्ती दैवयोगे पंगु जालो मी अज्ञान ।
विषय बुंथी घेऊनिया त्याचे केले पोषण ।
चालता धर्म बापा विसरलो गुह्य ज्ञान ।
अवचटे गुरूमार्गे प्रगट ब्रह्मज्ञान ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९६३
📿 मुक्त तो आशंका नाही
963.
मुक्त तो आशंका नाही जया अंगी । बद्ध मोहोसंगी लज्जा चिंता ॥१॥
सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकात दंभ करी ॥२॥
तुका म्हणे लागे थोडाच विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९६३
📿 भक्तांचिया मनासरिसा
963.
भक्तांचिया मनासरिसा । धांव घाली तो विश्वेशा ॥१॥
ऐसी कृपाळु माउली । शिव अनाथाची साउली ॥२॥
नामी जडता सदा मन । आनंदे शिवांचें भजन ॥३॥
एका जनार्दनी प्रेम । शिवनामें निष्काम ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड रुपके›📂 , आंधळा-पांगुळ अभंग ९६४›
📿 अभंग क्र. ९६४
📿 अंध पंगु दृढ जालो मा
964.
अंध पंगु दृढ जालो मायापडळ भ्रांती ।
कर चरण विव्हळ गेले तव भेटले निवृत्ति ।
ज्ञान मज उपदेशिले नेले अज्ञानक्षिती ।
वृक्ष एक तेथे होता त्या तळी बैसविले रीती ॥१॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९६४
📿 शिवनामाची कावड खांदी
964.
शिवनामाची कावड खांदीं । आम्ही घेतली समताबुद्धि ॥१॥
हर हर हर वोळंगा रे भाई । आशा मनिशा तृष्णा सांडुनी पाही ॥२॥
मागे बहुती घेतली खांदीं । ते उतरले पैलपार भवनदी ॥३॥
ज्ञानदेव कावड घेता । सुख समाधान वाटे चित्ता ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९६५
📿 देवा ऐके हे विनंती ।
965.
देवा ऐके हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हेचि सुख आगळे ॥१॥
या या वैष्णवाचे घरी । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धीसिद्धी द्वारी । कर जोडूनि तिष्ठती ॥धृपद॥
नको वैकुंठीचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळी नामाचा ॥२॥
तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघशामा । तुका म्हणे आम्हा । जन्म गोड यासाठी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९६५
📿 ज्ञान वैराग्य कावडी
965.
ज्ञान वैराग्य कावडी खांदी । शांति जीवन तयामधी ॥१॥
शिवनाम तुम्ही घ्या रे । शिवस्मरणी तुम्ही रहा रे ॥२॥
हरिहर कावड घेतली खांदी । भोवती गर्जती संतमांदी ॥३॥
एका जनार्दनी कावड बरी । भक्ति फरारा तयावरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९६६
📿 न पूजी आणिका देवा न
966.
न पूजी आणिका देवा न करी त्यांची सेवा । न मनी त्या केशवाविण दुजे ॥१॥
काय उणे जाले मज तयापायी । ते मी मागो काई कवणासी ॥धृपद॥
आणिकाची कीर्ती नाइके न बोले । चाड या विठ्ठलेंविण नाही ॥२॥
न पाहे लोचनी श्रीमुखावाचूनि । पंढरी सांडूनि न वजे कोठे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९६६
📿 जनार्दने कृपा केली ।
966.
जनार्दने कृपा केली । माझे खांदी कावड दिली ॥१॥
सांगितला सोपा मंत्र । वाचे वदे हरिहर ॥२॥
बहुत साधने न करिता । अनायासें आले होता ॥३॥
पूर्ण कॄपे जनार्दन । एका जनार्दनी निजखुण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९६७
📿 मन हे ओढाळ । सदा करी
967.
मन हे ओढाळ । सदा करी तळमळ ॥१॥
तयालागीं स्थिर करी । चित्ती महादेव धरी ॥२॥
तरी तुज होय सुख । येर अवघे ते दुःख ॥३॥
चित्तींची वासना । जंव नाही गेली जाणा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९६८
📿 कथा करोनिया द्रव्य द
968.
कथा करोनिया द्रव्य देती घेती । तया अधोगति नरकवास ॥१॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥धृपद॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥२॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सापडले हाती यमाचिया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९७०
📿 वेदविहित तुम्ही आइका
970.
वेदविहित तुम्ही आइका हो कर्मे । बोलतो ती वर्मे संतांपुढे ॥१॥
चारी वर्ण जाले एकाचिये अंगी । पापपुण्य भागी विभागिले ॥धृपद॥
प्रथम पाउली पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाही ॥२॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणे भिन्न अग्नी एक ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७०
📿 धन्य धन्य ते जन । जय
970.
धन्य धन्य ते जन । जया शिवाचे भजन ॥१॥
हो का नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥
हास्य विनोद कथा । तेणे मोक्ष प्राप्त सायुज्यता ॥३॥
एका जनार्दनी जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड रुपके›📂 , कूट अभंग ९७१ ते ९९०›
📿 अभंग क्र. ९७१
📿 वडाच्या पानी एक उभवि
971.
वडाच्या पानी एक उभविले देउळ आधी कळसु मग पाया हो ।
देव पुजो गेलो तव देऊळ उडाले पान नाही तेथे वडु रे ॥१॥
चेत जाणा तुम्ही चेत जाणा । टिपरी वडाच्या साई हो ॥२॥
पाषाणाचा देवो पाषाणाचा भक्तु पोहती मृगजळ डोही हो ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९७१
📿 तीर्थांचे जे मूळ व्र
971.
तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळ । ब्रम्ह ते केवळ पंढरिये ॥१॥
ते आह्मी देखिले आपुल्या नयनी । फिटली पारणी डोळियांची ॥धृपद॥
जीवाचे जीवन सुखाचे शेजार । उभे कटी कर ठेवूनिया ॥२॥
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीना लोभपार दुष्टा काळ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७१
📿 शिव ऐसा मंत्र सुलभ स
971.
शिव ऐसा मंत्र सुलभ सोपा रे । जपावा परिकर नित्य नेमे ॥१॥
न बाधिच विघ्न संसाराचे भान । धन्य ते भजन शिवनामें ॥२॥
एका जनार्दनी नाम शिव ईशान । वदता घडे पुण्य कोटी यज्ञ ॥३॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड रुपके›📂 , कूट अभंग ९७१ ते ९९०›
📿 अभंग क्र. ९७२
📿 चिंचेच्या पानी एक शि
972.
चिंचेच्या पानी एक शिवालय उभविले आधी कळसु मग पाया रे ।
देव पुजो गेलो तव देऊळ उडाले प्रसिद्ध सद्गुरूराया रे ॥१॥
संतजना महंतजना तेथील ते गुज गोड रे ।
अनुभव अनुभविता कदाचित सरे पुरेल मनींचे कोड रे ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९७२
📿 वेदाचे हे सार वैराग्
972.
वेदाचे हे सार वैराग्याचे जीवन | चिदाकाशिंची खूण परम गुज ॥१॥
जे शुद्धज्ञान गुह्य मोक्षमुक्ति बीज | सकळ मंत्रराज मंगलनिधी ॥२॥
ते या नामयाचे होते हृदयकमळी | कथा भूमंडळी प्रकट केली ॥३॥
हे हे विठ्ठलनाम साराचे पै सार | कलियुगी उद्धार सकळ जना ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७२
📿 सर्व साधनांचे सार ।
972.
सर्व साधनांचे सार । वाचे उच्चार शिवनाम ॥१॥
न लगे योगाची कसवटी । शिवनाम उच्चार होटीं ॥२॥
घडे जप तप अनुष्ठान । वाचे वदता शिव जाण ॥३॥
एका जनार्दनी सोपे । शिवनामे जाती पापे ॥४॥