🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८६२
📿 काय उरली ते करू विनव
2862.
काय उरली ते करू विनवणी । वेचलो वचनी पांडुरंगा ॥१॥
अव्हेरलो आता कैचे नामरूप । आदर निरोप तरि तो नाही ॥धृपद॥
माझा मायबाप ये गेलो सलगी । तो हे तुम्हा जगी सोयरिका ॥२॥
तुका म्हणे आता जोडोनिया हात । करी दंडवत ठायिंचा ठायी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८६४
📿 प्रीतीचा तो कळवळा ।
2864.
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥
बहु नेदी रडो माता । दुश्चित होता धीर नव्हे ॥धृपद॥
वरी वरी तोंडापुरते । मोहोरी ते कळतसे ॥२॥
जाणोनिया नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८६४
📿 बरवी ती पूजा । जेणे
2864.
बरवी ती पूजा । जेणे पावे अधोक्षजा ॥१॥
मुखी नाम वाहे टाळी । पूजा केली उत्तम हे ॥२॥
तुळशीमाळा गोपिचंद । पूजा छंद हाची मनी ॥३॥
व्रत करी एकादशी । जागरण निशी सर्वदा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८६५
📿 देवपुजा करी आदरे । अ
2865.
देवपुजा करी आदरे । अतीत आलिया न बोले सामोरें ॥१॥
कासया पूजन दांभिक । तेणे देवा नोहे सुख ॥२॥
अतीतासी देणे पूजा । तेणे संतोषें पावे पूजा ॥३॥
एका जनार्दनी पूजा । ऐसी न करी गरुडध्वजा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८६६
📿 तुम्हासी न कळे सांगा
2866.
तुम्हासी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवू मी ॥१॥
आहे तेथे सत्ता ठेविले स्थापूनि । प्रमाणेंचि वाणी वदे आज्ञा ॥धृपद॥
कृपा झाली मग न लगे अंगसंग । निजध्यासे रंग चढता राहे ॥२॥
तुका म्हणे मागे बोलिलो ते वाव । आता हाचि भाव दृढ झाला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८६७
📿 आवडी न पुरे मायबापाप
2867.
आवडी न पुरे मायबापापासी । घडो का येविसी सकईल ॥१॥
होईल नेमले आपुलिया काळे । आलीयाचे बळे आग्रहो उरे ॥धृपद॥
जाणविले तेथे थोडे एक वेळा । सकळ ही कळा सर्वोत्तमी ॥२॥
तुका म्हणे निवेदिले गुह्य गुज । आता तुझी तुज सकळ चिंत्ता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८६८
📿 झाले आता साठे । कासय
2868.
झाले आता साठे । कासयाचे लहान मोठे ॥१॥
एक एका पडिलो हाती । झाली तेव्हांची निश्चिंती ॥धृपद॥
नाही फिरो येत मागे । झाले साक्षीचिया अंगे ॥२॥
तुका म्हणे देवा । आता येथे नाही हेवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८६८
📿 आपुली पूजा आपण करावी
2868.
आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटीं नाही ॥१॥
कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ॥२॥
एका जनार्दनी ज्ञानाज्ञाने । पुजावें श्रीचरण विठोबाचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८६९
📿 वोखटा तरी मी विटलो द
2869.
वोखटा तरी मी विटलो देहासी । पुरे आता जैसी जोडी पुन्हा ॥१॥
किती मरमर सोसावी पुढती । राहिलो संगती विठोबाचे ॥धृपद॥
आता कोण याचा करील आदर । जावो कलेवर विटंबोनि ॥२॥
तुका म्हणे आता सांडि तेचि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८७०
📿 हृदयींच स्नान हृदयीं
2870.
हृदयींच स्नान हृदयींच ध्यान । हृदयींच भजन सर्वकाळ ॥१॥
हृदयींच दान हृदयींच धर्म । ह्रुदयींच नेम सर्व जोडे ॥२॥
हृदयींच कथा पुराण श्रवण । हृदयींच चिंतन सर्व सदा ॥३॥
हृदयींचा दिसे एक जनार्दनी । हृदयींच एकपणीं बिंबलासे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८७१
📿 हृदयींचे देव हृदयींच
2871.
हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥
ह्रुदयींच ध्यान हृदयी जे मन । हृदयी ते आसन देव वसे ॥२॥
ह्रुदयीं ते भुक्ति ह्रुदयीं ते मुक्ति । हृदयी सर्वस्थिती देव जाणो ॥३॥
एका जनार्दनी हृदयींच पाहाल । ते सुख घ्याल हृदयामाजीं ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८७२
📿 हृदयस्थ जया नाही ठाव
2872.
हृदयस्थ जया नाही ठावा देव । पूजा करती वाव सर्वभावे ॥१॥
जाणावा अंतरी मानावा हृदयी । पहावा सर्वांतरीं परमात्मा ॥२॥
एका जनार्दनी व्यापक सर्वांठायीं । भरुनीं उरला ठाई जेथे तेथे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८७३
📿 काय करू पोरा लागली च
2873.
काय करू पोरा लागली चट । धरी वाट देउळाची ॥१॥
सांगितले नेघे कानी । दुजे मनी विठ्ठल ॥धृपद॥
काम घरी न करी धंदा । येथे सदा दुश्चित ॥२॥
आमचे कुळी नव्हते ऐसे । हेंच पिसे निवडले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८७३
📿 देवासी तो पुरे एक प्
2873.
देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥
मनापासूनियां करिता कीर्तन । आनंदें नर्तन गाता गीत ॥२॥
रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ बाधा तेणे नोहे ॥३॥
एका जनार्दनी हाचि पै विश्वास । सर्वभावे दास होईन त्याचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८७५
📿 नव्हती हे उसणे बोल ।
2875.
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥
अनुभव तो वरावरी । नाही दुरी वेगळा ॥धृपद॥
पाहिजे ते आले रुची । काचाकुची काशाची ॥२॥
तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८७८
📿 शिकल्या शब्दाचे उत्प
2878.
शिकल्या शब्दाचे उत्पादितो ज्ञान । दर्पणींचे धन उपर वाया ॥१॥
अनुभव कइ होईन भोगिता । साकडे ते आता हेचि आले ॥धृपद॥
गाये नाचे करी शरीराचे धर्म । बीजनाम वर्म तुमचे दान ॥२॥
तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सद्धि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८७९
📿 सिकविला तैसा पढो जाण
2879.
सिकविला तैसा पढो जाणे पुसा । कैची साच दशा तैसी अंगी ।
स्वप्नींच्या सुखे नाही होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥
कासया हा केला जिव्हे अळंकार । पायासी अंतर दिसतसे ॥धृपद॥
दर्पणींचे धन हाती ना पदरी । डोळा दिसे परी सत्याचिये ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८८०
📿 अनुभव तो नाही तुमच्य
2880.
अनुभव तो नाही तुमच्या दर्शनी । अइकिले काने वदे वाणी ।
जेविल्याचा कैसा अनुभव अंतरी । म्हणता मांडे पुरी काय होते ॥१॥
नाही नाही गेली तळमळ दातारा । का जी हरीहरा चाळविले ॥धृपद॥
पत्री कुशळता भेटी अनादर । काय ते उत्तर येईल मानू ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८८१
📿 केले तरी आता साचची क
2881.
केले तरी आता साचची करावे । विचारिले द्यावे कृपादान ॥१॥
संकल्पासी नाही बोलिला विकल्प । तुम्हा पाप पुण्य कळे देवा ॥धृ॥
उदार विख्यात तुम्ही भूमंडळी । ऐसी ब्रीदावळी गर्जतसे ॥२॥
तुका म्हणे अहो रखुमाईच्या वरा । उपरोध धरा माझा आता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८८१
📿 चार मुद्रा आणि समाधी
2881.
चार मुद्रा आणि समाधी त्या चारी । दिसती चक्राकारी स्वरुप हे ॥१॥
चहू समाधीचें पाही हे देखणे । विकळतां तेणेंक सहजीं व्हावी ॥२॥
जिकडे पाहता तिकडे स्वरूपचि दिसे । तयामाजी ठसे आणिक बिंब ॥३॥
मसूरप्रमाण शून्य महा ते कारण । गुरुमुखें खूण जाणावी पै ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८८२
📿 अहो पुरुषोत्तमा । तु
2882.
अहो पुरुषोत्तमा । तुम्हा काशाची उपमा ॥१॥
सतत तो नाही बुद्धी । नाळविता नाही शुद्धि ॥धृपद॥
जागविले तरी । तुम्हा व्यक्ती येणे हरी ॥२॥
तुका म्हणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८८२
📿 कैसे झाले देवदर्शन ।
2882.
कैसे झाले देवदर्शन । देवा पाहता आहे कोण ॥१॥
डोळा उघडॊनियां पाहे । पैल देव दिसताहे ॥२॥
पैल देव तो मी भक्त । दोहींसी कोण आहे देखत ॥३॥
एका जनार्दनी पाहे । पाहणें पाहता देवाचि आहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८८४
📿 चिंतनाची जोडी । हाचि
2884.
चिंतनाची जोडी । हाचि लाभ घडोघडी ॥१॥
तुम्ही वसूनि अंतरी । मज जागवा निर्धारी ॥धृपद॥
जेथे जेथे जाय मन । आड घाला सुदर्शन ॥२॥
तुका म्हणे भोजे । मग मी नाचेंन निर्ल्लज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८८४
📿 स्वाहिताकारणें विचार
2884.
स्वाहिताकारणें विचार न कळे । संध्येंचें हे मुळ आम्ही जाणो ॥१॥
अर्ध बिंबीं सूर्य धरूं माध्यान्हासी । अस्तु जाता त्यासी अर्घ्य देतो ॥२॥
नासिकेचें अग्र सुषुम्ना विंदान । करी प्राणायाम वेगळाची ॥३॥
साहीं चक्र जप वर्णदळीं संकल्प । पूजा तर्पणयुक्त मंत्र सहज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८८६
📿 जडलो तो आता पायी । ह
2886.
जडलो तो आता पायी । होऊ काई वेगळा ॥१॥
तुम्ही संती कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥धृपद॥
सांभाळिलो मायबापा । केलो तापावेगळा ॥२॥
वोरसे या जीव धाला । तुका ठेला मौन्यचि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८८७
📿 काळावरी सत्ता । ऐशा
2887.
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥
तो मी हीना हूनि सांडे । देवे दुऱ्हे काळतोंडे ॥धृपद॥
मानूनी भरवसा । होतो दासा मी ऐसा ॥२॥
तुका म्हणे मान । गेलो वाढवू थोरपण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २८८९
📿 नाशिवंत देह जाणार जा
2889.
नाशिवंत देह जाणार जाणार । हा तो निराधार स्वप्नत ॥१॥
अभ्रींची छाया क्षणिक साचार । तैसा हा प्रकार नाशिवंत ॥२॥
मृगजळाचें जीवन क्षणिक निर्धार । तैसा हा विचार व्यर्क्थ सर्व ॥३॥
एका जनार्दनी नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी प्राणी करती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८९०
📿 नेदावी सलगी न करावा
2890.
नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥
सर्प शांतिरूप न म्हणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥
तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन । करावे वचन न घडे ते ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८९१
📿 अभयदान मज देई वो दात
2891.
अभयदान मज देई वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥
देहभाव तुझ्या ठेवियेला पायी । आणीक मी काही दुजे नेणे ॥धृपद॥
सेवाभक्तिहीन नेणता पतित । आता माझे हित तुझ्या पायी ॥२॥
तुका म्हणे तुझे नाम दिनानाथ । ते मज उचित करी आता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८९२
📿 करावा वर्षाव । तृषाक
2892.
करावा वर्षाव । तृषाक्रांत झाला जीव ॥१॥
पाहे आकाशाची वास । जाणता तू जगदिश ॥धृपद॥
संयोगे विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥
तुका म्हणे फळे । चरणांबुजे ते सकळ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८९३
📿 करी ऐसी धावाधावी । च
2893.
करी ऐसी धावाधावी । चित्त लावी चरणापे ॥१॥
मग तो माझा मायबाप । घेईल ताप हिरूनी ॥धृपद॥
बहुतांच्या मते गोवा । होऊ जीवा नेदावा ॥२॥
तुका म्हणे करुणाबोले । धीर विठ्ठले निघेना ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २८९३
📿 फुले झडे तंव फळ सोसे
2893.
फुले झडे तंव फळ सोसे । तया पाठी तेंहीं नासे ॥१॥
एक मागे एक पुढे । मरण विसरले बापुडे ॥२॥
शेजारीं निमाले कोणाचे खांदी । लपों गेला सापें खादली मांदी ॥३॥
मरण ऐकता परता पळे । पळे तोही मसणीं जळे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८९४
📿 काय तुज कैसे जाणवेगा
2894.
काय तुज कैसे जाणवेगा देवा । आणावे अनुभवा कैशा परी ॥१॥
सगुण निर्गुण थोर की लहान । न कळे अनुमान मज तुझे ॥धृपद॥
कोण तो निर्धार करू हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥२॥
तुका म्हणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८९६
📿 हारपोनि गेली निशी ।
2896.
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखो ॥१॥
नारायणी वसले घर । निरंतर आनंद ॥धृपद॥
अवघा रुधविला ठाव । नेला वाव मी माझे ॥२॥
तुका म्हणे एके ठावी । असू नाही क्षणभिन्न ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २८९६
📿 उगम संगम प्रवास गती
2896.
उगम संगम प्रवास गती । ऐसी त्रिविध देहस्थिती ॥१॥
बाळत्व तारुण्य वृद्धत्व । ऐसे देहाचें विविधत्व ॥२॥
जरामरण नाश पावे । ऐसा देह व्यर्थ जाये ॥३॥
ऐसियाचा भरंवसा । एका जनार्दनी ठसा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २८९७
📿 एक एक योनी कोटी कोटी
2897.
एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेह थारा अवचटा ॥१॥
मांडिलासे खेळ मांडिलासे खेळ । मांडियेला खेळ नरदेहीं ॥२॥
स्त्री पुत्र नातु बाहुले असती । नाचवितो पती त्रैलोक्याचा ॥३॥
एका जनार्दनी मांडियेला खेळ । त्रैलोक्य सकळ बाहुलें त्याचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८९८
📿 अनुभव ऐसा । मज लागला
2898.
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥
पाठी बैसली शेजारी । नव्हे शांत कोणे परी ॥धृपद॥
कोठे न लगे जावे । काही घालावया ठावे ॥२॥
तुका म्हणे कोटि । दुःखाच्याच तये पोटी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २८९८
📿 चौर्यांयशी लक्ष योन
2898.
चौर्यांयशी लक्ष योनी फिरतां
चौर्यांयशी लक्ष योनी फिरता । अवचट नरदेह आला होता ॥१॥
करी याचे समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥
सोडविता तुज कोणी । नाही नाही त्रिभुवनी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८९९
📿 पाठीवरी भार । जातो व
2899.
पाठीवरी भार । जातो वाहूनिया खर ॥१॥
संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्या काया ॥धृपद॥
मोटचौफळ । अंती उच्छिष्टाचे बळ ॥२॥
न संडी मारग । येथे न चोरूनि अंग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९००
📿 मागे पुढे झालो लाटा
2900.
मागे पुढे झालो लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥
नाही कोठे रिते अंग । नित्य रंग नवाचि ॥धृपद॥
पोसिंद्याचे पडिलो हाती । वोझे माती चुकली ॥२॥
जोगावलो पोटी खर । पाठी भार वरी नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९००
📿 ऐसे वेरझारी कोटी कोट
2900.
ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । वरी त्या पामरा समजेना ॥१॥
माझे माझे म्हणोनि झोंबतसे बळे । केलेंसे वाटोळे नरदेहा ॥२॥
फजितीचा जन्म मरावे जन्मावें । हे किती सांगावे मूढ जना ॥३॥
एका जनार्दनी माझे माहे टाकुनीं । वैष्णव कीर्तनी नाचे सुखें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९०१
📿 किती किती जन्म किती
2901.
किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती ॥१॥
न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण धरा चित्ती ॥२॥
किती किती विषय भोगिती वासना । यमाचे सदना जावयासी ॥३॥
एका जनार्दनी न करी विचार । नरक तो अघोर भोगिताती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९०३
📿 भय होते आम्हीपणे । प
2903.
भय होते आम्हीपणे । पाठी येणे घातले ॥१॥
अवघा आपुलाचि देश । काळा लेश उरेचि ना ॥धृपद॥
समर्थाचे नाम घेता । मग चिंता काशाची ॥२॥
तुका म्हणे नारायणे । केले जिणे सुखाचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९०४
📿 मारू नये सर्प संतांच
2904.
मारू नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणे ॥१॥
एक सूत्र जीवशिवी आइक्यता । रोम उपडिता अंग कापे ॥धृपद॥
नाही साहो येत दुखाची ते जाती । परपीडा भूती साम्य झाली ॥२॥
तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नावे चित्त सुखी तेणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९०४
📿 माझे माझे म्हणोनि कर
2904.
माझे माझे म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिले फलकट ॥१॥
तनांचे बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥
स्वजन स्वगोत्र सारे करती विचार । काढा काढा म्हणती जाला भूमीभार ॥३॥
देहाची जनकें केवळ मातापिता । गेला गेला म्हणती तोचि देह असता ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९०५
📿 विषम वाटे दुरवरी । च
2905.
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाही उरली भयाची ॥१॥
मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हाती गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्योग ॥धृपद॥
होता पहिला अभ्यास । समयी घालावया कास । तेव्हा लटिके दोष । योगे अनुतापाच्या ॥२॥
तुका म्हणे आहे । बुद्धी केलियाने साहे । जवळीच पाहे । देव वाट स्मरणाची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९०५
📿 आयुष्य भविष्य हे तंव
2905.
आयुष्य भविष्य हे तंव कवणा हाती । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥
आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळी सांभळीत ॥२॥
गुंतुनीं संसारी पडती अघोरी । न चुकेची फेरी येता जाता ॥३॥
एका जनार्दनी संतकृपेंविण । कोण वारी शीण जन्मामृत्यु ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९०६
📿 आता कोठे धावे मन । त
2906.
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंदु ॥धृपद॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठल घोगे खरे माप ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९०६
📿 नरदेहीं आयुष्य शत ते
2906.
नरदेहीं आयुष्य शत ते प्रमाण । अर्ध रात्र जाण जाय मध्ये ॥१॥
बाळत्व तारुण्य जरामय जाया । संपलें गणना होती त्याची ॥२॥
एका जनार्दनी राहिले भजन । सवेंचि मरण पावला वेगी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९०९
📿 अद्वय चिद्वय झालेचि
2909.
अद्वय चिद्वय झालेचि कारण । धरिले नारायणे भक्तिसुख ॥१॥
अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाही ॥धृपद॥
शून्य निरसुनी राहिले निर्मळ । ते दिसे केवळ विटेवरी ॥२॥
सुखे घ्यावे नाम वदनाही वाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९१०
📿 जंव देहाते देखती तंव
2910.
जंव देहाते देखती तंव माझे म्हणती । निमालीया रांडा पोरें रडतीं ॥१॥
पहा कैसा अनुभव लौकिकाचा । देह निमाला की न कळे साचा ॥२॥
जीव आत्मा न मरे कोणे काळी । निमाला देह चतुष्टयाची होळी ॥३॥
एका जनार्दनी देहा देखती मरण । गेला आला नाही तो तैसाचि जाण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९११
📿 सकल गुणे संपन्न । एक
2911.
सकल गुणे संपन्न । एक देवाचे लक्षण ॥१॥
वरकड कोठे काही कोठे काही । एक आहे एक नाही ॥धृपद॥
षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक । भगवंती जाण ॥२॥
तुका म्हणे जेंजे बोला । तेंते साजे या विठ्ठला ॥३॥