संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६८
📿 पूर्वी तुझी कांही के
1368.
पूर्वी तुझी कांही केली होती सेवा | उपयोगा देवा आली आजी ॥१॥
अनंता जन्मींचे फळले अनुष्ठान | पाहिले चरण विठो तुझे ॥२॥
न जाणो माझ्या येतील पाठोपाठी | घालतील मोठी भीड तुज ॥३॥
त्यासी चाल तुम्ही अगत्य उदारा | माते का न मारा आपुले हाते ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३६८
📿 नाम नारसिंह नाम नारस
1368.
नाम नारसिंह नाम नारसिंह । भक्तांसी तो सम सर्वकाळ ॥१॥
जपे तो प्रल्हाद आवडी ते नाम । पावला सर्वोत्तम तयालागीं ॥२॥
जनार्दनाचा एका रुप ते पाहुनी । नारसिंहचरणीं मिठी घाली ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६९
📿 हातात नरोटी जीण वस्त
1369.
हातात नरोटी जीण वस्त्र भार म्हणसी सवदागर संत माझे ॥१॥
परळ भोपळा गृहामाजी संपत्ति | भूषण का श्रीपती सांगतसा ॥२॥
भणंगाचे घरा नित्यची राजपट | सांगसी अचाट ब्रीद त्यांचे ॥३॥
कैकाडयाचे वानी करिती गुडगुड मजला है गूढ उमजेना ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३६९
📿 वंदें तू अच्युत सर्व
1369.
वंदें तू अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि जाय ॥१॥
करी का रे नेम धरी का रे प्रेम । अच्युताचें नाम वंदे सदा ॥२॥
जनार्दनाचा एका अच्युत पै झाला । सप्रेमे रंगला प्रेमे रंगी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३७०
📿 निष्ठुर मी जालो अतिव
1370.
निष्ठुर मी जालो अतिवादागुणे । हे का नारायणे नेणिजेल ॥१॥
सांडियेली तुम्ही गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हाती ॥धृपद॥
सांपडूनि संदी केली जीवेसाठी । घ्यावयासि तुटी कारण हे ॥२॥
तुका म्हणे तुज काय म्हणो उणे । नाही अभिमाने चाड देवा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३७०
📿 म्हणती घेतल्या आम्ही
1370.
म्हणती घेतल्या आम्ही धनाचिया कोडी | खर्चायला कवडी धार नसे ॥१॥
रडती पडती येरांवरी येर | आनंदाला पार नाही म्हणती ॥२॥
काय गुणे देव रिझाला त्यावरी | नेसाया फटकुरी जन्म गेला ॥३॥
पाहोन दरिद्र जालो कासाविस | केवळ परीस ते पांढरेच ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३७०
📿 नाम जनार्दन रुप जनार
1370.
नाम जनार्दन रुप जनार्दन । ध्यान जनार्दन सर्व मज ॥१॥
माय जनार्दन बाप जनार्दन । जन जनार्दन सर्व मज ॥२॥
जनार्दनाचा एका जनार्दन देखा । जनी वनी सखा जनार्दन ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३७१
📿 माझे माझ्या हाता आले
1371.
माझे माझ्या हाता आले । आता भले सकळ ॥१॥
कशासाठी विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥धृपद॥
जाली तया दुःखे तुटी । मागिल पोटी नसावे ॥२॥
तुका म्हणे शुद्धकुळ । तेथे मळ कशाचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३७१
📿 पांचा सातांचा आहे ये
1371.
पांचा सातांचा आहे येक जागा मेळा | देताती कवळा येकयेका ॥१॥
करू पाहाता मज जिताची विटंबना | म्हणोनी नारायेणा पळोनी आलो ॥२॥
पाहिला तयाचा मानस आदर जमा केला केर जाळावया ॥३॥
त्यांच्या धार्के मार्गे आलो रे अनंता | येत तुझ्या चित्ता बरे त्यांचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३७१
📿 नाम उपेंद्र सर्व देव
1371.
नाम उपेंद्र सर्व देवांचा तो इंद्र । शुभ काळ वक्त्र जप सदा ॥१॥
ते नाम सोपे जपे का रे वाचे । अहर्निशी साचे नाम जप ॥२॥
जनार्दनाचा एका एकाभावे नटला । हृदयी सांठ विला जनार्दन ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३७२
📿 समर्थपणे हे करा संपा
1372.
समर्थपणे हे करा संपादणी । नसतेचि मनी धरिल्याची ॥१॥
दुसऱ्याचे येथे नाही चालो येत । तरि मी निवांत पाय पाहे ॥धृपद॥
खोटियाचे खरे खरियाचे खोटे । मानले गोमटे तुम्हासी ते ॥२॥
तुका म्हणे तुम्हा सवे करिता वाद । होईजे ते निंद्य जनी देवा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३७२
📿 आहे त्यांचे मनी कराव
1372.
आहे त्यांचे मनी करावे आगमन | घेतील मागुन तुजपाशी ॥१॥
त्यावेळी तुम्ही व्हाल जी बेभान | द्याल जी काढोन संतापासी ॥२॥
खादल्या जेविल्याचे राखावे स्मरण | तुला माझी आण पांडुरंगा ॥३॥
चालविला लळा पुरविली आवड | भाता का ग न जालो ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३७३
📿 तुम्हा आम्हासवे न पड
1373.
तुम्हा आम्हासवे न पडावी गाठी । आलेति जगजेठी कळो आता ॥१॥
किती म्हणो आता वाईटा वाईट । शिवो नये वीट आल्यावरी ॥धृपद॥
बोलिल्याची आता हेचि परचित । भीड भार थीत उडवीली ॥२॥
तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणे ते किती कोठे देवा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३७३
📿 वटारोनि डोळे पाहती आ
1373.
वटारोनि डोळे पाहती आकाश | मज त्याचा भास कळो नेदी ॥१॥
भाजा भाजा म्हणोनि उठली एकसरा | मग म्या बाहेरा गमन केले ॥२॥
आता यांजवरी द्याल त्यांचे हाती | होऊ पाहाती माती जीवित्वाची ॥३॥
अभयाचे दान द्यावे वा श्रीहरी | दुर्बळ बाहेरी घालू नये ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३७४
📿 सकळ सत्ताधारी । व्हा
1374.
सकळ सत्ताधारी । व्हावे ऐसे काय हरी ॥१॥
परि या कृपेच्या वोरसे । कुढावया चेचि पिसे ॥धृपद॥
अंगे सर्वोत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥२॥
तुका म्हणे दाता । तरि हा जीव दान देता ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३७४
📿 संतांसी विन्मुख जाला
1374.
संतांसी विन्मुख जालासी गव्हारा | नाही आता थारा इहपरलोकी ॥१॥
नाही वेडया संतांचा अंगवळा | झोंप बैसली डोळा अज्ञानाची ॥२॥
भ्रांतीने तुझी पुरविली पाठी | सज्जनाच्या गोष्टी कडू जाल्या ॥३॥
हाता आला लाभ गमाविला सारा | भुललासी गव्हारा भ्रमभूली ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १३७५
📿 झाला नामपाठ झाला नाम
1375.
झाला नामपाठ झाला नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी झाली ॥१॥
आवडी आदरे नामपाठ गाये । हरिकृपा होय तयावारी ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठे निका । तोडियेली शाखा अद्वैताची ॥३॥
किर्तनमहिमा
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३७७
📿 राजा करी तैसे दाम ।
1377.
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥
कारण ते सत्ता शिरी । कोण करी अव्हेर ॥धृपद॥
वाहिले ते सुने खांदी । चाले पदी बैसविले ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरे । करुणाकरे रक्षीले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३७८
📿 आम्ही देव तुम्ही देव
1378.
आम्ही देव तुम्ही देव । मध्ये भेव अधीक ॥१॥
कैवाडाच्या धावा लागे । मागे मागे विठ्ठले ॥धृपद॥
भेडसाविले हाके नादे । वोळखी भेदे मोडिली ॥२॥
तुका म्हणे उभा राहे । मागे पाहे परतोनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १३७८
📿 कीर्तनाची मर्यादा कै
1378.
कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उद्धवासी ॥१॥
गावें नाचावें साबडें । न घालावेंकोडें त्या कांही ॥२॥
मिळेल तरीं खावें अन्न । अथवा पर्णे ती भक्षुन ॥३॥
जाईल तरी जावो प्राण । परी न सांडोवे कीर्तन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३७९
📿 हीन शुर बुद्धीपासी ।
1379.
हीन शुर बुद्धीपासी । आकृतीसी भेद नाही ॥१॥
एक दांडी एक खांदी । पदी पदी भोगणे ॥धृपद॥
एकाऐसे एक नाही । भिन्न पाही प्रकृती ॥२॥
तुका म्हणे भूमी खंडे । पीक दंडे जेथे ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १३७९
📿 उद्धवा तू करी कीर्तन
1379.
उद्धवा तू करी कीर्तन । अनन्यभावें माझे भजन । नको आणीक साधन । यापरतें सर्वथा ॥१॥
धरी प्रेम सदा वाचे । कीर्तनरंगीं तू नाचे । मी तू पण साचे । अंगी न धरी कांही ॥२॥
भोळे भोळे जन । गाती अनुदिनी कीर्तन । तेथे अधिष्ठान । माझे जाण सर्वथा ॥३॥
नको चुकू तया ठायी । वसे सर्वदा मीही । एका जनार्दनी पाही । किर्तनी वसे सर्वदा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३८०
📿 काय बोलो सांगा । याउ
1380.
काय बोलो सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥
काही आधारावाचून । पुढे न चले वचन ॥धृपद॥
वाढे ऐसा रस । काही करावा सौरस ॥२॥
भक्तीभाग्यसीमा । द्यावा जोडोनिया प्रेमा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३८१
📿 आहाच तो मोड वाळलियाम
1381.
आहाच तो मोड वाळलियामधी । अधीराची बुद्धि तेणे न्याये ॥१॥
म्हणऊनि संग न करी दुसरे । चित्त मळीन द्वारे दोड पडे ॥धृपद॥
विषासाठी सर्पा भयाभीत लोक । हे तो सकळीक जाणतसा ॥२॥
तुका म्हणे काचे राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गुरु करण्याविषयी विठ्ठलाचा नामदेवास उपदेश›
📿 अभंग क्र. १३८१
📿 सर्व काळी परमात्मा आ
1381.
सर्व काळी परमात्मा आहे सर्व देशी भावना हे अहर्निशी दृढ धरी ॥१॥
संतसमुदाय मिळती जेथे जेथे जाये तेथे तेथे लोटांगणी ॥२॥
चिंता न करी नाम्या येणे तरसी जाण तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३८३
📿 आळी करावी ते कळते बा
1383.
आळी करावी ते कळते बाळका । बुझवावे हे का नेणा तुम्ही ॥१॥
निवाड तो तेथे असे पायापाशी । तुम्हा आम्हाविशी एकेठायी ॥धृपद॥
आणीक तो आम्ही न देखोंसे जाले । जाणावे शिणले भागलेंसे ॥२॥
तुका म्हणे तुम्हा लागते सांगावे । अंतरीचे ठावे काय नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १३८४
📿 गरुड हनुमंतादि आपण ।
1384.
गरुड हनुमंतादि आपण । सामोरा येत जगज्जीवन ॥१॥
आवडी कीर्तना ऐशी । लक्ष्मी तेथे प्रत्यक्ष दासी ॥२॥
मोक्षादिकां नव्हे वाड । येरा कोण वाहे काबाड ॥३॥
एका जनार्दनी भुलला । उघडा कीर्तनी रंगला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३८५
📿 नाही लोपो येत गुण ।
1385.
नाही लोपो येत गुण । वेधी आणीका चंदन ॥१॥
न संगता पड ताळा । रूप दर्पणी सकळा ॥धृपद॥
सारविले वरी । आहाच ते क्षणभरी ॥२॥
तुका म्हणे वोहळे । सागराच्या ऐसे व्हावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री विसोबा खेचर यांचा नामदेवास बोध›
📿 अभंग क्र. १३८५
📿 जरी म्हणसी देव देखिल
1385.
जरी म्हणसी देव देखिला तरी हा बोल भला नव्हे नाम्या ॥१॥
जोंबरी मी माझे न तुटे | तब आत्माराम कैसेंनि भेटे ॥२॥
खेचर साह्याने मी कांही नेणे | जीवा या जीव इतुले मी जाणे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३८६
📿 वचने चि व्हावे आपण उ
1386.
वचने चि व्हावे आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥
सत्यसंकल्पाची फळे बीजाऐसी । शुद्ध नाही नासी पावो येत ॥धृपद॥
वंचिलिया काय येतसे उपेगा । शरीर हे नरकाचे चि आळे ॥२॥
तुका म्हणे जीव जिता थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री विसोबा खेचर यांचा नामदेवास बोध›
📿 अभंग क्र. १३८६
📿 सड ना सांजावण खुंटा
1386.
सड ना सांजावण खुंटा ना दावे ।गाये ना वांसरू काय तेथे व्हावे ॥ १ ॥
आपेगाय आपण । आपण दोहे आपण प्रकाश ॥ २ ॥
खेचर विसा दोहे सांच ही गाई । लेकी नाहींतेथे कैंचा घरजांवई ॥ ३ ॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३८७
📿 उखते आयुष्य जायांचे
1387.
उखते आयुष्य जायांचे कलेवर । अवघे वोडंबर विषयांचे ॥१॥
कोणासी हा लागे पुसणे विचार । मनचि सादर करू आता ॥धृपद॥
उत्पत्ति प्रळय पडिले दळण । पाकाचे भोजन बीज वाढे ॥२॥
तुका म्हणे जाऊ अभयाच्या ठाया । रिघो देवराया शरण वेगी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री विसोबा खेचर यांचा नामदेवास बोध›
📿 अभंग क्र. १३८७
📿 मेणि जळकी जळेंविण पू
1387.
मेणि जळकी जळेंविण पूर | नख न बुडे परी नाही उतार ॥१॥
येथे आहे तो बुडे नाही तरे | लटिक्याचे खरे मानिसी काई ॥२॥
म्हणे खेचर विसा तू जालासी पिसा दृश्याची हे आशा सांडी नाम्या ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री विसोबा खेचर यांचा नामदेवास बोध›
📿 अभंग क्र. १३८८
📿 सुखाचे सुखरूप घेउनी
1388.
सुखाचे सुखरूप घेउनी जा तरी विठ्ठल नामे भरी तिन्ही लोक ॥१॥
आशापाश याही वासना पोखी | विठ्ठलनामा शेखी घेऊनी राहे ॥२॥
न लगती सायास करणे काया क्लेश आपण वैकुंठ येईल सवे ॥३॥
नाठवी संसार नाठवी देहभाव| रोहिणीची माव नकळे काय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३८९
📿 लटिक्याचे वाणी वचनाच
1389.
लटिक्याचे वाणी वचनाचा संवाद । नाही कोणा वाद रुचो येत ॥१॥
अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापी वेळा न साधिली ॥धृपद॥
अनावर अंगी प्रबळ अवगुण । तांतडीने मन लाहो साधी ॥२॥
तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडता ताळा घडतसे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३९०
📿 नये स्तवू काचे होते
1390.
नये स्तवू काचे होते क्रियानष्ट । फुंदाचे ते कष्ट भंगा मूळ ॥१॥
नाही परमार्थ साधत लौकिके । धरुन होतो फिके अंगा आले ॥धृपद॥
पारखिया पुढे नये घालू तोंड । तुटी लाभा खंड होतो माना ॥२॥
तुका म्हणे तरी मिरवते परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री विसोबा खेचर यांचा नामदेवास बोध›
📿 अभंग क्र. १३९०
📿 श्रवणी सांगितली मात
1390.
श्रवणी सांगितली मात मस्तकी ठेवियेला हात पदपिडाविवर्जित केला नामा ॥१॥
खेचरु विसा प्रेमाचा पिसा तेणे नामा कैसा उपदेशिला ॥२॥
तया सांगितले गुज | आता पाल्हाळी तुज काय चाड ॥३॥
मंग खेचरू म्हणे मज ज्ञान हेंचि गुरु | तेणे अगोचरु म्हणे केला नामा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३९१
📿 कोण्या काळे येईल मना
1391.
कोण्या काळे येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥
माझा करणे अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥धृपद॥
लागलीये तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारी ॥२॥
मुखाची च पाहे वास । मागे दास सांभाळी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १३९१
📿 तेजाचे तेजस रुपाचे र
1391.
तेजाचे तेजस रुपाचे रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥१॥
पाहता चित्त निवे मनाचे उन्मन । ते समचरण विटेवरी ॥२॥
आदि अंत नाही पाहता प्रकार । तो हा सर्वेश्वर भीमातटीं ॥३॥
योगी चिंतिती अखंडता मनी । ते उभे असे रंगणीं वैष्णवांचें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १३९२
📿 नाभीकमळीं चतुरानन ।
1392.
नाभीकमळीं चतुरानन । न कळे तया महिमान । तो साबडे कीर्तन । तेथे नाचे सर्वदा ॥१॥
नातुडे जो सदा ध्यानीं । योगयाग यज्ञहवनीं । अष्टांग योग करिता साधनी । न लाभेचि सर्वथा ॥२॥
भागले वेद गीती गाता । श्रमलीं शास्त्रे वेवादतां । पुराणे तो सर्वथा । तया न कळे महिमान ॥३॥
तो उभा भीमातीरीं । भक्त करुणाकर श्रीहरी । एका जनार्दनी विनंति करी । वास देई हृदयी ॥४॥