🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४९४
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3494.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
दासो पाछे दौरे राम । सोवे खडा आपे मुकाम ॥१॥
प्रेमरसडी बांधी गले । खैंच चले तब मोही उधर ॥धृपद॥
आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आगे बाट बतावे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४९५
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3495.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥धृ॥
इतन गोते काहे खाता । जब तू आपणा भूल न होता ॥१॥
अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४९९
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3499.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
भले रे भाई जिन्हे किया चीज । अछा नहि मिलत बीज ॥१॥
फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥धृपद॥
तीरथ बरत फिर पाया जोग । नहि तलमल तुटति भवरोग ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५०१
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3501.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
राम कहो जीवना फल सो ही । हरीभजनसु विलंब न पाई ॥१॥
कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥धृपद॥
कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५०२
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3502.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
काहे भुला धनसंपत्तीघोरे । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥१॥
राजे लोक सब कहे तू आपना । जब काल नही पाया ठाना ॥धृपद॥
माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६›
📿 अभंग क्र. ३५०२
📿 साधन कासया श्रम ते क
3502.
साधन कासया श्रम ते करावे । निवृत्तिनाम गावें सदोदित ॥१॥
तीर्थयात्रा कांही नाम मुखें गाईं । निवृत्तिनामे डोहीं बुडी दे का ॥२॥
एका जनार्दनी निवृत्ति नाम सार । करी रे उच्चार वेळोवेळा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५०३
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3503.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
कहे रोवे आगले मरना । गंव्हार तू भुला आपना ॥१॥
केते मालुम नहि पडे । नव्हे बडे गये सो ॥धृपद॥
बाप भाई लेखा नहि । पाछे तू हि चलनार ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५०४
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3504.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछू दास तुह्मारा ॥धृपद॥
तनजोबनकी कोन बराई । ब्याधपीडादि स काटहि खाई ॥१॥
कीर्त बधाऊ तो नाम न मेरा । काहे झुटा पछतऊ घेरा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६›
📿 अभंग क्र. ३५०४
📿 माझ्या मना तू करी पा
3504.
माझ्या मना तू करी पा विचार । नाम निरंतर निवृत्ति जपे ॥१॥
जपतां नामावळी आळस न करी । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणे ॥२॥
सुखरुप तू होसील साचार । गर्भाचा उदगार खुंटे साचा ॥३॥
एका जनार्दनी सांगे निर्धार । निवृत्ति उच्चार नाम करी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६›
📿 अभंग क्र. ३५०६
📿 त्र्यंबक शिखरीं जीवन
3506.
त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप ॥१॥
सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पै वाचे । सार्थक देहाचें येणे करुनी ॥२॥
अखंड नामोच्चार समाधी सोहळा । आणिक न ये डोळा आड कांही ॥३॥
एका जनार्दनी म्हणावा आपुला । आसनी शयनी त्याला विसरु नका ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५१०
📿 (तुकोबाचा पत्नीस उपद
3510.
(तुकोबाचा पत्नीस उपदेश)
कोण येते घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाही धंदा ॥१॥
देवासाठी जाले ब्रम्हांड सोइरे । कोवळ्या उत्तरे काय वेचे ॥धृपद॥
माने पाचारिता नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाठी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५११
📿 (तुकोबाचा पत्नीस उपद
3511.
(तुकोबाचा पत्नीस उपदेश)
देव पाहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत ॥१॥
दिन शुध्द सोम सकाळी पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥धृपद॥
द्विजा पाचारुनी शुद्ध करी मन । देई वो हे दान यथाविधी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५११
📿 मोक्ष मुक्ति ऋध्दिसि
3511.
मोक्ष मुक्ति ऋध्दिसिध्दि । पाहता समाधी ज्ञानदेवा ॥१॥
ऐसा लाभ सांगे देव । ऐके नामदेव आवडी ॥२॥
दरुशने नासे व्याधी पीडा । ऐसा सवंगडा ज्ञानदेव ॥३॥
एका जनार्दनी मापारी । नाचतसे अलंकापुरीं ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५१२
📿 जोडोनियां दोन्ही हात
3512.
जोडोनियां दोन्ही हात । जगी जाणवितों मात ॥१॥
एकदा जा रे अलंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥
आवडी सांगा जीवींचें आर्त । माउली पुरविती जाणोनी ॥३॥
ज्ञानराज माझी माउली । एका जनार्दनाची साउली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५१३
📿 (तुकोबाचा पत्नीस उपद
3513.
(तुकोबाचा पत्नीस उपदेश)
गुरुकृपे मज बोलविले देवे । होईल हे घ्यावे हित काही ॥१॥
सत्य देवे माझा केला अंगीकार । आणीक विचार नाही दुजा ॥धृपद॥
होईन बळकट घालूनिया कास । हाचि उपदेश तुज आता ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५१४
📿 (कवित्वाचा निषेध व त
3514.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
भूतबाधा आम्हा घरी । हे तो आश्चर्य गा हरी ॥१॥
जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥धृपद॥
जागरणाचे फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५१४
📿 कृपाळू उदार माझा ज्ञ
3514.
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावे शरण जाता भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनी पाय वंदितसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५१५
📿 (कवित्वाचा निषेध व त
3515.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
नाही जो वेचलो जिवाचिया त्यागे । तोवरी वाउगे काय बोलो ॥१॥
जाणिवले आता करी ये उद्देश । जोडो किंवा नाश तुमची जीवे ॥धृपद॥
ठायीचेचि आले होते ऐसे मना । जावे ऐसे वना दृढ जाले ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५१६
📿 (कवित्वाचा निषेध व त
3516.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
करू कवित्व काय आता नाही लाज । मज भक्तराज हांसतील ॥१॥
आता आला एका निवाड्याचा दिस । सत्याविण रस विरसला ॥धृपद॥
अनुभवाविण कोण करी पाप । रितेचि संकल्प लाज लावी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५१७
📿 (कवित्वाचा निषेध व त
3517.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
नाही आइकत तुम्ही माझे बोल । कासया हे फोल उपणू भूस ॥१॥
येसी ते करीन बैसलिया ठाया । तूचि बुझावया जवळी देवा ॥धृपद॥
करावे ते केले सकळ उपाय । आता पाहो काय अझुनि वास ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५१७
📿 ज्ञानदेव चतुरक्षरीं
3517.
ज्ञानदेव चतुरक्षरीं जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ।
ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हे ज्याची आज्ञा ॥१॥
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो । वासुदेव होतो अखंड वदनी वदे तो॥
ध्रु०॥नररुपें विष्णु अवतरला हा भगवान । नदी नद वापी कूप पाहता उदक नव्हे भिन्न ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५१८
📿 (कवित्वाचा निषेध व त
3518.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
नोंहे तुम्हा जरी । येवढे कारण मुरारी ॥१॥
मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥धृपद॥
स्वामींचे ते सांडे । पुत्र होता काळतोंडे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५१९
📿 (कवित्वाचा निषेध व त
3519.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
केल्यापुरती आळी । काही होते टाळाटाळी ॥१॥
सत्यसंकल्पाचे फळ । होता न दिसेचि बळ ॥धृपद॥
दळणांच्या ओव्या । रित्या खर्या मापे घ्याव्या ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५२१
📿 (कवित्वाचा निषेध व त
3521.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
बोलता वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळो आले ॥१॥
मागतिले नये अरुचीने हाता । नाही वरी सत्ता आदराचीअ ॥धृपद॥
समाधानासाठी लाविलासे कान । चोरलेसे मन दिसतसा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५२१
📿 समाधि घेतली आळंदी ।
3521.
समाधि घेतली आळंदी । भोंवतीं शोभे सिध्द मांदी ॥१॥
सन्मुख पुढे अजानवृक्ष । देव येती तेथे साक्ष ॥२॥
कीर्तन गजरी । नामघोष चराचरी ॥३॥
ऐसा सोहळा आनंद । एका जनार्दनी नाही भेद ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५२२
📿 (कवित्वाचा निषेध व त
3522.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
काशासाठी बैसो करूनिया हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥
काय आले एका जिवाच्या उद्धारे । पावशी उच्चारे काय हो ते ॥धृपद॥
नेदी पट परी अन्ने तो न मरी । आपुलिये थोरीसाठी राजा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५२३
📿 माझा मज नाही । आला उ
3523.
माझा मज नाही । आला उबेग तो काही ॥१॥
तुमच्या नामाची जतन । नव्हता थोर वाटे सीण ॥धृपद॥
न पडावी निंदा । कानी स्वामींची गोविंदा ॥२॥
तुका म्हणे लाज । आम्हा स्वामीचे ते काज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५२३
📿 अहो दयाळे ज्ञानाबाईं
3523.
अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझे तुझ्या पायी ॥१॥
इंद्रायणीचे तटीं । ज्ञानाबाईं वो गोमटी ॥२॥
सकळ मेळा हो सिध्दांचा । ज्ञानाबाई अनुग्रहाचा ॥३॥
पूर्व पश्चिम देवस्थान । मध्ये ज्ञानाबाई आपण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५२५
📿 आदिनाथ शंकरे केला उप
3525.
आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केले ॥१॥
तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार जगालागीं ॥२॥
निवृत्तिने गुज सांगितले ज्ञानदेवा । होता जो ठेवा गुह्य कांही ॥३॥
ज्ञानदेव केले ठेवणें प्रगट । एका जनार्दनी नीट मार्ग सोपा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५२६
📿 पडले मायावर्तीं शुध्
3526.
पडले मायावर्तीं शुध्दि नाही जया । म्हणोनि अवतार तया धरणे लागे ॥१॥
धन्य गुरु माझा निवृत्ति दयाळ । दाखविले सोज्वळ पद जेणे ॥२॥
केला उपकार तारिले हे दीन । ज्ञानांज्ञानांजन घालूनिया ॥३॥
नेणती जाणती पडली जी भुलीं । तया शुध्दि केली त्रिअक्षरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५२७
📿 अवतार शिवाचा । निवृत
3527.
अवतार शिवाचा । निवृत्ति साचा जप करा ॥१॥
श्रीविष्णूचा अवतार । स्वामी माझा ज्ञानेश्वर ॥२॥
सोपानदेव तो निर्धार । ब्रह्मयाचा अवतार ॥३॥
मुक्ताईचे चरणी । शरण एका जनार्दनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५२८
📿 सांगा दास नव्हे तुमच
3528.
सांगा दास नव्हे तुमचा मी कैसा । ऐसे पंढरीशा विचारूनि ॥१॥
कोणासाठी केली प्रपंचाची होळी । या पाया वेगळी मायबापा ॥धृपद॥
नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजू हीर उफराटे ॥२॥
तुका म्हणे आम्हा अहिक्य परत्री । नाही कुळगोत्री तुज विण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५२८
📿 आणिक एक चमत्कार । जे
3528.
आणिक एक चमत्कार । जेव्हा उद्वस अलंकापूर । तेव्हा रंकांसी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥
वाणी होउनी आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही केले ॥२॥
ऐसे हे कौतुक । आश्चर्य मानती लोक । एका जनार्दनाचा रंक । चरणारविंदींचा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५३०
📿 स्तुती तरि करू काय क
3530.
स्तुती तरि करू काय कोणापासी । कीर्ती तरि कैसी वाखाणावी ॥१॥
खोटया तव नाही अनुवादाचे काम । उरला भ्रम वरी बरा ॥धृपद॥
म्हणवावे त्याची खुण नाही हाती । अवकळा फजिती सावकाश ॥२॥
तुका म्हणे हेंगे तुमचे माझे तोंड । होऊनिया लंड आळवितो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३›
📿 अभंग क्र. ३५३०
📿 उदार भक्त उदार भक्त
3530.
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥
केला भगवदगीते अर्थ । ऐसे समर्थ तिही लोकी ॥२॥
बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवाते उपदेशिती ॥३॥
एका जनार्दनी समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५३१
📿 काहीच न लगे आदि अवसा
3531.
काहीच न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसा ॥१॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ती झाली पुढे ॥धृपद॥
बोलिले वचन हारपले नभी । उतरलो तो उभी आहो तैसी ॥२॥
तुका म्हणे काही न करावेसे झाले । थकितचि ठेले वित्त उगे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५३४
📿 (कोरड्या कविता उदकात
3534.
(कोरड्या कविता उदकातुन काढणे त्याबद्दल देवाची क्षमा याचना)
तू कृपाळू माउली आम्हा दीनांची साउली । न सवंरित आली बाळवेशे जवळी ॥१॥
माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण । निवविले मन आळिंगन देऊनी ॥धृपद॥
कृपा केली जना हाती पायी ठाव दिला संती । कळो नये चित्ती दुःख कैसे आहे ते ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीसोपानदेवांची स्तुति - अभंग ३५३४ ते ३५३९›
📿 अभंग क्र. ३५३४
📿 श्रीसोपानदेवांची स्त
3534.
श्रीसोपानदेवांची स्तुति - अभंग ३५३४ ते ३५३९
नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥
संवत्सर ग्राम कर्हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥
जग तारावया हरिलीला केली । प्रसिध्द ती झाली सोपानदेवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५३५
📿 (कोरड्या कविता उदकात
3535.
(कोरड्या कविता उदकातुन काढणे त्याबद्दल देवाची क्षमा याचना)
कापो कोणी माझी मान सुखे पीडोत दुर्जन । तुज होय सीण ते मी न करी सर्वथा ॥१॥
चुकी झाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभे करोनिया जळा माजी वह्या राखविल्या ॥धृपद॥
नाही केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५३६
📿 (कोरड्या कविता उदकात
3536.
(कोरड्या कविता उदकातुन काढणे त्याबद्दल देवाची क्षमा याचना)
काय जाणे मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥
उताविळ झालो आधी मतिमंद हीनबुद्धि । परि तू कृपानिधी नाही केला अव्हेर ॥धृपद॥
तू देवाचा ही देव अवघ्या ब्रम्हांडाचा जीव । आम्हा दासा कीव का भाकणे लागली ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीसोपानदेवांची स्तुति - अभंग ३५३४ ते ३५३९›
📿 अभंग क्र. ३५३६
📿 आनंद समाधि संत भक्त
3536.
आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरी ॥१॥
गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केले सुरवरी ॥२॥
पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । सोपानदेवा भेटी येती देव ॥३॥
तो सुखसोहळा वर्णावया पार । नोहेचि निर्धार माझी मती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५३७
📿 (कोरड्या कविता उदकात
3537.
(कोरड्या कविता उदकातुन काढणे त्याबद्दल देवाची क्षमा याचना)
नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्या केला हरी एवढा तुम्हा आकांत ॥१॥
वांटलासी दोही ठायी मजपाशी आणि डोही । लागो दिला नाही येथे तेथे आघात ॥धृपद॥
जीव घेती मायबापे थोड्या अन्यायाच्या कोपे । हे तो नव्हे सोपे साहो त्वांचि जाणीतले ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीसोपानदेवांची स्तुति - अभंग ३५३४ ते ३५३९›
📿 अभंग क्र. ३५३८
📿 सोपानदेव नाम पावन पर
3538.
सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाही ॥१॥
माझ्या मना तू करी का रे लाहो । सोपानदेव ध्यावो ह्रदयामाजीं ॥२॥
ब्रह्मा अवतार नाम हे सोपान । केलेंसे पावन चराचर ॥३॥
एका जनार्दनी सोपानाच्या पायी । ठेवितसे डोई काया वाचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५३९
📿 (कोरड्या कविता उदकात
3539.
(कोरड्या कविता उदकातुन काढणे त्याबद्दल देवाची क्षमा याचना)
मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगो काई । आता मज पायी ठाव देई विठ्ठले ॥१॥
पुरे पुरे हा संसार कर्म बळिवंत दुस्तर । राहो नेदी स्थिर एके ठायी निश्चळ ॥धृपद॥
अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग । धरू जाता संग तव तो होतो बाधक ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीसोपानदेवांची स्तुति - अभंग ३५३४ ते ३५३९›
📿 अभंग क्र. ३५३९
📿 मति माझी लागो सोपनाच
3539.
मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥
आणीक न करी दुजा नेम धर्म । सर्व सोपे वर्मं सोपानदेवा ॥२॥
वेदशास्त्रे भांडती ज्यालागीं कोडे । ते असे उघडे संवत्सर ग्रामीं ॥३॥
प्रत्यक्ष विष्णुमूर्ति श्रीविठ्ठल देव । समाधीचा गौरव करीतसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५४०
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3540.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
कोणा मुखे ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥
मग मी न धरी आस मागील बोभाट । वेगी धरिन वाट माहेराची ॥धृपद॥
निलाजिरे चित्त करि तळमळ । केधवा देखती मूळ आले डोळे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५४१
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3541.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
का माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणे ॥१॥
कैसा कंठूनिया राहो संवसार । काय एक धीर देऊ मना ॥धृपद॥
नाही निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसा काही ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीमुक्ताईची स्तुति - अभंग ३५४० ते ३५४५›
📿 अभंग क्र. ३५४१
📿 योगियांचें ध्यान पै
3541.
योगियांचें ध्यान पै विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥
नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥
अहं सोह कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणा ॥३॥
अनुग्रह कृपेचा मजलागी तो द्यावा । एका जनार्दनी करावा कृपापात्र ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५४२
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3542.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काही माझे कळो आले गुणदोष । म्हणऊनी उदास धरिले ऐसे ॥१॥
नाही तरी येथे न घडे अनुचित । नाही ऐसी रीत तया घरी ॥धृपद॥
कळावे ते मना आपुलिया सवे । ठायीचेहे घ्यावे विचारूनी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५४३
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3543.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
नव्हे धीर काही पाठवू निरोप । आला तरी कोप येऊ सुखे ॥१॥
कोपोनिया तरी देईल उत्तर । जैसे तैसे पर फिरावूनि ॥धृपद॥
नाही तया तरी काय एक पोर । मज तो माहेर आणीक नाही ॥२॥