🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१७
📿 असे येथीचिया दिने ।
1017.
असे येथीचिया दिने । भाग्यहीन सकळा ॥१॥
भांडवल एवढे गाठी । नाम कंठी धरियेले ॥धृपद॥
आणिक ते दुजे काही । मज नाही यावरी ॥२॥
तुका म्हणे केला कोणे । एवढा नेणे लौकिक ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०१७
📿 चतुर्भुज श्याममूर्ति
1017.
चतुर्भुज श्याममूर्ति | शंखचक्राची आकृती | पीतांबराची दिव्य दीप्ति | पडिली स्रृष्टीवरी ॥१॥
धन्य धन्य ज्ञानदेव |धन्य धन्य तो माधव |मग आरंभिला अनुभव | ज्ञानदेवाचेनि मुखे ॥२॥
देव म्हणे ज्ञानेश्वरा | तू अवतरोनि माजि चराचरा | हरिला महादोषथारा | तुझेनि कवित्वे ॥३॥
तुझे कवित्व माझ्या गोष्टी | जो परिसेल हे सृष्टी |तो येईल माझे भेटी | वैकुंठा पीठी विष्णूच्या ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१७
📿 वेधोनि गेले माझे मन
1017.
वेधोनि गेले माझे मन । हारपलें दुजेंपण ॥१॥
ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥
तयाविण ठाव । रिता कोठे आहे वाव ॥३॥
एका जनार्दनी भरला । सबाह्म अभ्यंतर व्यापिला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१७
📿 जिव्हाग्री ठेविताचि
1017.
जिव्हाग्री ठेविताचि गोड ।
पुरे कोड सकळही ॥१॥
ते या विठोबाचे नाम ।
सर्वदा निष्काम फळदाते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१८
📿 गाये नाचे वाहे टाळी
1018.
गाये नाचे वाहे टाळी । साधन कली उत्तम हे ॥१॥
काय जाणो तरले किती । नांव आइती या बैसा ॥धृपद॥
सायासाचे नाही काम । घेता नाम विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे निर्वाणीचे । शस्त्र साचे हे एक ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०१८
📿 ऐसे आळंकापुर पीठींचे
1018.
ऐसे आळंकापुर पीठींचे | भक्त नांदती दैवाचे | जे का सागर भाग्याचे | ज्ञानउदयो प्रकासिते ॥१॥
मग षोडश उपचारी | पूजा ज्ञानदेव आदरी | दिव्यवाद्ये मंगळतुरी | ओवाळिती पंचारतिया ॥२॥
ज्ञान सोपान निवृत्ती | मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती | ओंवाळिती विष्णूमूर्ती | चतुर्भुज पै ॥३॥
पीतांबरधारी श्याममूर्ति | शंखचक्राची आकृती | उद्धव अक्रूर ढाळिती | चवरे वरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१८
📿 ऐसी जगाची माऊली । दत
1018.
ऐसी जगाची माऊली । दत्तनामे व्यापुनि ठेली ॥१॥
जीवे जिकडे तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥
तया सांकडेंचि नाही । दत्त उभा सर्वा ठायी ॥३॥
घात अघात निवारी । भक्ता बाहे धरी करी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१८
📿 जिही गाईले हरिचे नाम
1018.
जिही गाईले हरिचे नाम ।
आतळो कर्म नेदी त्या ॥१॥
जन्म जरा हरुनी व्याधी ।
बैसवी पदी अपुलीया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१९
📿 सर्वकाळ माझे चित्ती
1019.
सर्वकाळ माझे चित्ती । हेचि खंती राहिली ॥१॥
बैसले ते रूप डोळा । वेळोवेळा आठवे ॥धृपद॥
वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥२॥
तुका म्हणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०१९
📿 नमो काळकौतुहळ । नमो
1019.
नमो काळकौतुहळ । नमो चक्रचालक गोपाळ ।
नमो विश्वप्रतिपाळ । प्रभंजन ॥१॥
नमो शिव शिवेशा । नमो शिवादि विश्वेशा ।
नमो रुपा अष्टदिशा । व्यापका नारायणा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१९
📿 लावण्य मनोहर प्रेमाच
1019.
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥
चरणी घातली मिठी प्रेम दुनावें पोटी । पाहता हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥
मन माझे वेधले परिपुर्ण भरले । एका जनार्दनी सांठविलें हृदयी दत्त ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१९
📿 जेथूनिया येणेचि नाही
1019.
जेथूनिया येणेचि नाही ।
फिरोनिया काही संसारा ॥१॥
तया नांव परमपद ।
लाभती मृग्ध हरिनामे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२०
📿 जैसे दावी तैसा राहे
1020.
जैसे दावी तैसा राहे । तरि का देव दुरी आहे ॥१॥
दुःख पावायाचे मूळ । राहाणी ठाव नाही ताळ ॥धृपद॥
माळामुद्रांवरी । कैचा सोंगे जोडे हरी ॥२॥
तुका म्हणे देखे । ऐसे परीची बहुतेके ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२०
📿 ऐसी स्तुती नमनाची|के
1020.
ऐसी स्तुती नमनाची|केलिया भगवंताची|ऐकता जाली रुची|म्हणे धन्य धन्य राजकीय सख्या॥१॥
कैसी स्तुती परिकर|जपता नामावळी साचार|वेगी तुष्टले हरिहर निज ब्रह्म स्वरूप॥२॥
वैष्णव सभोंवते उभे|तिही जयजयकार प्रतिभे|करूनि रुक्मिणीवल्लभे|तया प्रसाद दिधला॥३॥
मागुता ज्ञानदेव वदे|धन्य धन्य तुझी चरणारविंदें|तेथे रातलिया योगिवृंदें| ते चरण धन्य धन्य॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२०
📿 दत्त माझी माय । आम्ह
1020.
दत्त माझी माय । आम्हा अनाथांची गाय ॥१॥
प्रेमपान्हा पाजी वेगी । गुरुमाउली आम्हालांगी ॥२॥
आम्हा प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥
आमची जीवींची जीवलगी । आम्हांलागीं घे वोसंगीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२०
📿 तरले तो असंख्यात ।
1020.
तरले तो असंख्यात ।
सांगो जाता न लागे अंत ॥१॥
एका हरीच्या नामासाठी ।
भरल्या विमानांच्या कोटी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२१
📿 अवघा तो शकून । हृदयी
1021.
अवघा तो शकून । हृदयी देवाचे चिंतन ॥१॥
येथे नसता वियोग । लाभ उणे काय मग ॥धृपद॥
छंद हरीच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका म्हणे हरीच्या दासा । शुभ काळ अवघ्या दिशा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२१
📿 कर जोडोनिया पुढे | ल
1021.
कर जोडोनिया पुढे | लोटांगण टाकिले गाढे |म्हणे स्तवन करावया मी वेडे | काय जाणे तुझा महिमा ॥१॥
तरी पांडुरंग तू दयाळु | भक्त भाविका कृपाळु |भीमातटी उभा गोपाळु |पुंडलिका कारणे ॥२॥
चंद्रभागा सरोवरी | निरे भीवरेचा तिरी |वाट पाहसी हरी | भक्तसह्या करणे ॥३॥
तरी उदार शूर महिमेचा | खुंटलिया चारी वाचा |तेथ पवाडु मज कैचा | वर्णावया सामर्थ्य ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२१
📿 तरले नामे अनेक तरती
1021.
तरले नामे अनेक तरती ।
वैकुंठा जाती घोषगजरे ॥१॥
ऐसा याचा कीर्तिमहिमा ।
उत्तमा अधमा सारिखाचि ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२२
📿 ब्रम्हरूपाची कर्मे ब
1022.
ब्रम्हरूपाची कर्मे ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥
ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥धृपद॥
नानाभाषामते आळविता बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायी ॥२॥
तुका म्हणे माझे नमन जाणतिया । लागतसे पाया वेळोवेळा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२२
📿 तंव अंतरिक्षी गगनी|
1022.
तंव अंतरिक्षी गगनी| देव बैसोनि विमानी|वर्षताती दिव्य सुमनीं| पांडुरंगावरी॥१॥
विठोबा गुणनिधी| सवे पुंडलिक सुबुद्धि|लघिमा आणिमादी सिद्धी| सवे असती॥२॥
मग नेमिलिया तिथी| कृष्णपक्ष अष्टमी समयी|नाम संकीर्तन संतसंगतीं| तो ब्रह्मप्राप्ति पावला॥३॥
नवमी गजर कथेचा| तरि वैष्णव तोचि साचा|चतुर्भुज होईल हे वाचा| वदोनिया गेले॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२२
📿 आमुचे कुळींचे दैवत ।
1022.
आमुचे कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥
तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥
हेंचि आमुचे व्रत तप । मुखी दत्तनाम जप ॥३॥
तयाविण हे सुटिका । नाही नाही आम्हा देखा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२२
📿 तेचि धन्य तेचि धन्य
1022.
तेचि धन्य तेचि धन्य
सुकृती जन नरदेही ॥१॥
जिही करुनि नामपाठ ।
भरला घोट व्दैताचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२३
📿 नाही सुगंधाची लागत ल
1023.
नाही सुगंधाची लागत लावणी । लावावी ते मनी शुद्ध होता ॥१॥
वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे । कीर्ती मुख त्याचे नारायण ॥धृपद॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयी तव जन सकळ साक्षी ॥२॥
तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाही पुन्हा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२३
📿 ऐसे वदोनि पांडुरंगें
1023.
ऐसे वदोनि पांडुरंगें|समस्तांसी वस्त्रे दिली अंगें|देऊनि भूषणे अनेगें| रत्नमुक्ताफळे अलंकार॥१॥
धन्य जन्मले भूमंडळीं|कीर्तनी नाचती गदारोळी|ते विष्णुसन्निध सर्वकाळीं|ऐसे वनमाळी बोलिले॥२॥
राही रुक्मिणी सत्यभामा| विचारिती पुरुषोत्तमा|बहुत अगाध येथिंचा महिमा| भूमीवरी वैकुंठ॥३॥
म्हणे विठोजी जंववरी धरा| तंववरि समाधि स्थिरा|हरिकीर्तन करिती सैरा| चतुर्भुज होईल॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२३
📿 माझी माता दत्तगुरु ।
1023.
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥
तियेविण मजलागी । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥
दत्त माझा आधार । त्यासी चिंतीं वारंवार ॥३॥
निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२३
📿 धराल तरी धराल चित्ती
1023.
धराल तरी धराल चित्ती ।
संशय निवुत्ती करुनिया ॥१॥
या हो विठोबाच्या नामे ।
साधने दुर्गमे लाजविली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२४
📿 तीर्थाटणे एके तपे हु
1024.
तीर्थाटणे एके तपे हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥
तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पाया एक ॥धृपद॥
अक्षरे आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावे ॥२॥
तुका म्हणे विधिनिषधाचे डोही । पडिले त्या नाही देव कधी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२४
📿 नित्य अनुष्ठान ये ती
1024.
नित्य अनुष्ठान ये तीर्थी| त्याचे पूर्वज उद्धरिती|जे का अन्नदान करिती| ते पावती वैकुंठी ॥१॥
ऐसे तीर्थक्षेत्र सर्वोत्तम| आणिक नाही यांसी सम|शिवपीठ हे मनोरम| अळंकापुरी हे देख॥२॥
न वर्णवे येथिंची थोरी| जेथे साक्षात श्रीहरि|येऊंनिया झडकरी| ज्ञानदेवा समाधि दिधली॥३॥
अनंत पुण्य ज्याचे गांठी| तरीच ज्ञानदेव पडे दिठी|जोडे तप कोट्यानुकोटी| ऐसे धूर्जटी बोलिले॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२४
📿 आत्मज्ञानें बिंबलें
1024.
आत्मज्ञानें बिंबलें हृदयी । दत्त वोळखिला ठायी ॥१॥
पारिखेपणा दुर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥
नामे पवन चराचरें । ते दत्तनाम दोन अक्षरे ॥३॥
एका जनार्दनी छंद । दत्तनामे लागला वेधु ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२४
📿 न कळेचि प्रेम याची ग
1024.
न कळेचि प्रेम याची गोडी ।
धावे तांतडी नाम घेता ॥१॥
भरोनिया मन अंतरी राहे
परताचि नोहे जवळुनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२५
📿 पट्टे ढाळू आम्ही विष
1025.
पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी । लागो नेदू अंगी पापपुण्य ॥१॥
निर्भर अंतरी सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवे ॥धृपद॥
बळिवंत जेणे रचिले सकळ । आम्हा त्याचे बळ अंकितांसी ॥२॥
तुका म्हणे आम्ही देखत चि नाही । देवाविण काही दुसरे ते ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२५
📿 ऐसे तीर्थ सर्वोत्तम|
1025.
ऐसे तीर्थ सर्वोत्तम|सांगतसे पुरुषोत्तम|शंकरादि परमधाम|ब्रह्मनाम वर्णित॥१॥
क्षेत्रमहिमा अति अद्भुत |आदि सिध्देश्वर कुळदैवत|समर्थ महाभागवत| नामे गर्जत सर्वकाळ॥२॥
म्हणे पुंडलिक पूर्वीचे स्थळ| आणि शिवाचे मूळपीठ निर्मळ|तेथे निर्विकल्प सोज्वळ| तप विशाळ जोडिले॥३॥
क्षेत्र पंढरीहुनी अधिक| ऐसे बोलती ब्रह्मादिक|म्हणती धन्य येथिंचे लोक| शुद्ध भाविक प्रेमळ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२५
📿 श्रीगुरुकृपे दत्त वो
1025.
श्रीगुरुकृपे दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्यावरी बैसविला । अभेद पुर्ण चांदवा तेथे दिला । शुद्ध भक्तीनें दत्त पुजियेला ॥१॥
दत्तचरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥धृ.॥
सोहं गुढी तेथे उभारिली । मंत्र उपदेशें देहबुद्धी गेली । पुर्ण निवृत्ति प्रवृत्तिहि धाली । सहज पुर्णनंद पूर्णता जालीं ॥२॥
जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणी । जनी वनी एकात्मता खाणी । एका जनार्दनी रंगलीसे वाणी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२५
📿 नका बोलो शब्द वावगे
1025.
नका बोलो शब्द वावगे विवाद ।
आठवा गोविंद ध्यानी मनी ॥१॥
सकळही तुमचे होईल कल्याण
जरी गाल गाणे विठोबाचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२६
📿 कथेचा उलंघ तो अधम अध
1026.
कथेचा उलंघ तो अधम अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥
कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥धृपद॥
निद्रेचा आदर जागरणी वीट । त्याचे पोटी कीट कुपथ्याचे ॥२॥
तुका म्हणे दोन्ही बुडविली कुळे । ज्याचे तोंड काळे कथेमाजी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२६
📿 परब्रह्म परममूर्ती|
1026.
परब्रह्म परममूर्ती| परमधाम परात्पर कीर्ति|परमप्रियो परंज्योती| श्रुतिस्मृति स्वानुभव॥१॥
अकळ विकळ निरंजन| ज्ञाताज्ञेय विवेकधन|संशय दृश्य निरसन| विश्वप्रिये॥२॥
नलिनीकमलविकाशा| नयनघन विश्वेशा|नमन चरणलेशा| चित्सुखा ॥३॥
चराचर सच्चिदानंदांग| शुद्धस्नान शंकर दिव्यांग|विष्णुमूर्ती पांडुरंग| सगुणरूप भीमातटीं॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२६
📿 स्वानंदे आवडी दत्त प
1026.
स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळा । तंव चराचर अवघे श्रीदत्तची लीला ॥१॥
विस्मयो दाटला आता पाहुं मी कैसे । देखता देखणे अवघे दत्तचि दिसे ॥२॥
असे आणि नसे हा तंव विकल्प जनांत । जनीं जनार्दन निजरुपें दत्त ॥३॥
एका जनार्दनी तेथे अद्वय नित्य । सबाह्म अभ्यंतरी दत्त नांदत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२६
📿 न लगे जागे वनाप्रती
1026.
न लगे जागे वनाप्रती ।
अथवा एकांती बैसणे ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा का वाचे ।
सकळार्थाचे कारण हे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२७
📿 सांडोनीया दो अक्षरा
1027.
सांडोनीया दो अक्षरा । काय करू हा पसारा ।
विधिनिषेधाचा भारा । तेणे दातारा नातुडेसी ॥१॥
म्हणोनि बोबड्या उत्तरी । वाचे जपे निरंतरी ।
नाम तुझे हरी । भवसागरी तारू ते ॥धृपद॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२७
📿 म्हणे विठोजी शंकराचा
1027.
म्हणे विठोजी शंकराचा| प्रत्यक्ष अवतार तुझा साचा|स्तुति केली असे वाचा| विचार स्मयाचा पूर मज॥१॥
वसति सप्तद्वीप नवखंड| त्यामाजी अनंत ब्रह्मांड|रोमरंध्री ज्या अखंड| तो मनुष्यरूपे मेदिनी॥२॥
निवृत्तिनाथ नाना अवतारीं| तुमच्या सेवेसी श्रीहरी|जे जे प्रेरसी कामारी| सांगितले करी उगाचि॥३॥
म्हणे देवाधिदेवा आता| सांगाल ते करू तत्वता|हरू भव र्णवाची चिंता| या त्रैलोक्याची॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२७
📿 मनासी स्थिरता नामे द
1027.
मनासी स्थिरता नामे दत्त वेध । दुजा नाही छंद आणीक कांही ॥१॥
म्हणोनि संकल्प दृढ झाला पायी । दत्तावाचुनी ठायी नोहे कांही ॥२॥
पाहता पाहणें परतले मन । पाहण्याचें विंदान विसरले ॥३॥
एका जनार्दनी परब्रह्मा पुतळा । दत्त देखिला डोळा आत्मदृष्टी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२७
📿 नाना साधने मंत्र तंत
1027.
नाना साधने मंत्र तंत्र ।
उपासना यंत्र अवघड ते ॥१॥
म्हणोनिया हरिचे ।
भाविका सुगम हरिभक्ता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२८
📿 हरीनामाचे करूनि तारू
1028.
हरीनामाचे करूनि तारू । भवसिंधुपार उतरलो ॥१॥
फावले फावले आता । पायी संता विनटलो ॥धृपद॥
हरीनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥
हरीनामाची धनुष्यकांडे । विन्मुख तोंडे कळिकाळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२८
📿 ऐसा निवृत्ती स्थिराव
1028.
ऐसा निवृत्ती स्थिरावला|महाविष्णु संतोषला|मग सोपानदेवे आरंभिला| स्तुतिवाद परियेसा॥१॥
जयजया तू रामकृष्णा| भक्तभाविका हरी तृष्णा|देही दीपक सहिष्णा| रामकृष्ण म्हणतांचि॥२॥
नरहरी नरकेसरी| टाळी वाउनिया गजरीं|टाळ मृदंग झणत्कारी| जयजय कृष्ण म्हणो आम्हीं॥३|एक हरिविण नाही सखा| त्रिभुवनी आत्मा देखा|समाधिसुखविशेखा| चरणरजे डौरवावें॥४॥
धन्य हे भूमिका देश| आपण हरि जगन्निवास|ज्ञानदेवी केला वास| समाधिसुख घेउनी॥५॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२८
📿 माझिया मनींचा फिटलास
1028.
माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनिया देवो दत्तराव ॥१॥
फिटला संकल्प तुटली वासना । आन नाही कल्पना दुजी कांही ॥२॥
एका जनार्दनी दत्त वेगळा जाण । नोहे माझा प्राण क्षणभरी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२८
📿 नाम तारक हे श्रीहरी
1028.
नाम तारक हे श्रीहरी ।
गर्जता तुमचे भव सागरी ॥१॥
ऐसे जाणोन वैष्णवजन ।
करिती नित्यनित्य कीर्तन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०२९
📿 नव्हे हो गुरुत्व मेघ
1029.
नव्हे हो गुरुत्व मेघवृष्टिवाणी । ऐकावी कानी संतजनी ॥१॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥धृपद॥
देहपिंड दान दिला एकसरे । मुळिचे ते खरे टांकसाळ ॥२॥
तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०२९
📿 मुक्ताई म्हणे देवा|
1029.
मुक्ताई म्हणे देवा| तू विसावा सर्वा 'जीवा '|गुण गौरवा अनुभवा| आम्ही जाणो तुज॥१॥
सत्य सत्य जनार्दना| सत्य सत्य नारायणा|सत्य सत्य तू आमुचे धना| जगज्जीवन जगदाकारा॥२॥
तुझेवांचोनि त्रिभुवनीं| दुजा न देखो नायको कानीं|वेदशास्त्रपुराणीं| अगाध महिमा तुझा॥३॥
तू देवा देवोत्तम| योगियांचा विश्राम|शिवाचा ही आत्माराम| ऐसा नेम वेदाचा॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०२९
📿 त्रिगुणात्मक त्रिमूर
1029.
त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥
मन माझे वेधले दत्ताचे चरणी । नाही आन मनी दुजा छंद ॥२॥
परात्पर पहावा हृदयी तैसा ध्यावा । एका जनार्दनी सांठवावा दत्त मनी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०२९
📿 नामचि एक विठोबाचे ।
1029.
नामचि एक विठोबाचे ।
अवघ्या साधनाचे शिरोरत्न ॥१॥
उच्चार मात्र करिता ओठी ।
प्रगटे पोटी हरिरुप ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३०
📿 घटी अलिप्त असे रवि ।
1030.
घटी अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवी । जीवसाक्षीवर्तने ॥१॥
भोग ज्याचे तया अंगी । भिन्न प्रारब्ध जगी । विचित्र ये रंगी । रंगे रंगला गोसावी ॥धृपद॥
देह संकल्पासारिखे । एक एकासी पारिखे । सुख आणि दुःखे । अंगी कर्मे त्रिविध ॥२॥
तुका म्हणे कोडे । न कळे तयासी साकडे । त्याचिया निवाडे । उगवे केले विंदान ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०३०
📿 तंव पुंडलिक पुढारला|
1030.
तंव पुंडलिक पुढारला| कर जोडोनि वदला|म्हणे वेदादिका अबोला| तुझिया रूपाचा॥१॥
तो तू प्रकट श्रीरंगा| भीमातटी पांडुरंगा|येउनि आमुचिया लोभा भक्तजना तारिसी॥२॥
नेणो कोण भक्तपण| नेणो तुमचे महिमान|कोण तप कोण साधन| कोणे जन्मी केले होतें॥३॥
नीरे भिवरेचा संगमीं| चंद्रभागेचा उगमीं|वेणुनाद परब्रह्मीं| गोपाळ गजरे गर्जती॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३०
📿 माझी दत्त माऊली । प्
1030.
माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥
कुर्वाळुनी लावी स्तनीं । नोहे निष्ठुर क्रोध नाही मनी ॥२॥
भक्तांसी न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥
एका जनार्दनी निश्चित । दत्तनामे पावन पतीत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३०
📿 नामचि एक उच्चारिले ।
1030.
नामचि एक उच्चारिले ।
तेही नेले निजधामा ॥१॥
ऐसा याचा कीर्तीघोष ।
वर्णिती शेष निगमादिक ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३१
📿 सद्गदित कंठ दाटो । य
1031.
सद्गदित कंठ दाटो । येणे फुटो हृदय ॥१॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥धृपद॥
नेत्री जळ वाहो सदा । आनंदाचे रोमांच ॥२॥
तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०३१
📿 मग सारोनी संध्यस्नान
1031.
मग सारोनी संध्यस्नान| देवभक्ति विष्णुपूजन|पंक्ति आदरिले आपोशन| मागुती भोजन करिताती॥१॥
धन्य धन्य तू ज्ञानराजा| तू आवडलासि केशिराजा|पंक्ति करोनि द्विजा| वाढितसे रुक्मिणी॥२॥
राही रुक्मिणी सत्यभामा| वाढिती पंचामृत उत्तमा|पुंडलिक बोलावुनि साउमा| ज्ञानदेवा पंक्ति बैसविलें॥३॥
निवृत्ती सोपान मुक्ताबाई| गोपाळ देव्हढे दोन्ही बाहीं|रुक्मिणी सत्यभामा राही| वाढिती अन्ने नानाविधें॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३१
📿 एकाएकी एकला काशीवासा
1031.
एकाएकी एकला काशीवासा गेला । स्वलीला श्रीदत्त स्वये प्रगटला ॥१॥
दत्त देव आला दत्त देव आला । स्वभाव सांडोनी भेटावया चला ॥२॥
मुक्त मंडपामाझारीं निजनाम नगरी । दत्त प्रगटला कीर्तनामाझारी ॥३॥
भेटणें भेटी उठी दत्ता आली भेटी । सांगणें ऐकणे दत्त होऊनि उठी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३१
📿 नामासाठी वोपी शांति
1031.
नामासाठी वोपी शांति ।
बैसवी पंगती संताचिये ॥१॥
ऐसा उदार त्रिभुवनी ।
नाही वाचूनि एका हरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३२
📿 जेथे देखे तेथे उभा ।
1032.
जेथे देखे तेथे उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥
डोळा बैसले बैसले । ध्यान राहोनि संचले ॥धृपद॥
सरसावले मन । केले सोज्वळ लोचन ॥२॥
तुका म्हणे सवे । आता असिजेत देवे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०३२
📿 तंव विनवी ज्ञानदेव|
1032.
तंव विनवी ज्ञानदेव| सकळांचा जाणोनी ठाव|शुद्ध भक्ति प्रेमळ वैष्णव| सर्वभाव सख्य घेतां॥१॥
बैसोनिया एक आसनी | देवभक्त चक्रपाणि|तांबुल घेवोनिया वदनीं| सुखसंतोषे बोलती॥२॥
मग पाचारिला गरूड|भक्त पुंडलिक प्रौढ|भक्त सोपान गम्यगूढ| जाणते भक्त॥३॥
केले प्रयाणासि मुहूर्त| पंढरीस जावयाचे आर्त|संवत्सरा जाऊनि त्वरित| समाधि देऊ सोपाना॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३२
📿 दुर्लभ नरदेह पावला ।
1032.
दुर्लभ नरदेह पावला । प्राणी देवासी विसरला ॥१॥
सुख मानिलें संसारी । जाऊनि पडीला अघोरीं ॥२॥
संसारसिंधुसी तारक । स्वामी दत्तराज एक ॥३॥
त्याचे नाम आठवितां । चुकली भवार्णवाची वार्तां ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३२
📿 नामाचेची घोष ।
1032.
नामाचेची घोष ।
करुनि निर्दाळिले दोष ॥१॥
वाट घेण वाल्हा कोळी ।
अजामेळा पडता जळी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३३
📿 तान्हे तान्ह प्याली
1033.
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥
जेथे ते च नाही जाले । झाडा घेतला विठ्ठले ॥धृपद॥
वास वासनेसी नाही । मन पागुळले पायी ॥२॥
शेष उरला तुका । जीवी जीवा जाला चुका ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०३३
📿 उगवला दिन प्रभात| स्
1033.
उगवला दिन प्रभात| स्नान संध्या सारोनी समस्त|उद्धव कर जोडोनी बोलत| पूर्ण आर्त सर्वांचें॥१॥
अनुपम इचा महिमा| न बोलवे जाहली सीमा|आता चला वेगी़ पुरुषोत्तमा| आपले आश्रमा पंढरीसी॥२॥
गरुड सामोरा तिष्ठत| भक्त भागवत समस्त|मुनी पुंडलिक विनवित| केले दंडवत साष्टांगें॥३॥
म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदि| वाग् स्नेहो वाक्बुद्धी|परंपरा याचि वैखरी| यासी मंत्रोक्त दिधली॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३३
📿 परमर्थीं राखितां भाव
1033.
परमर्थीं राखितां भावो नवल नव्हे पहाहो । भक्त परिग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥
कृपाळु श्रीदत्त कृपाळु श्रीदत्त । अहर्निशी स्वये पाळिती निजभक्त ॥२॥
वत्सालागीं जैसी व्याली धेणु धांवे । निजभक्तांकारणें दता तैसा पावे ॥३॥
भक्त कीर्तने तोषला दत्त संतोषला । हरिजागरीं स्वये सिद्ध प्रगटला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३३
📿 नामापाशी भुक्ति मुक्
1033.
नामापाशी भुक्ति मुक्ति ।
ज्ञान विरक्ति हरिनामी ॥१॥
नामापाशर दयाशांति ।
साधना समाप्ति हरिनामी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३४
📿 पाणिपात्र दिगांबरा ।
1034.
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥
आवश्यक देव मनी । चिंतनीच सादर ॥धृपद॥
भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशी शयन ॥२॥
पाघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०३४
📿 नामयाचा धरूनि हात| क
1034.
नामयाचा धरूनि हात| क्षणक्षणा पंढरिनाथ|ज्ञानदेवाते आठवित| कंठ सद्गदित करोनियां॥१॥
उद्धवासी म्हणे पांडुरंग| या सज्जनाचा न व्हावा वियोग|हे ह्रदय होतसे दोन भाग| जाणार अंतरंग तुम्ही माझें॥२॥
त्याविण गोड मज न वाटे| ऐसे जिवलग कैचे भेटे|जे मनींचा वियोग दुःख तुटे| समाधान वाटे ह्रदयामाजी॥३॥
ज्ञानदेवा ऐसो निधान| नाही धुंडिता त्रिभुवन|न संपडे न देखो जाण| तुझी आण उद्धवा॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३४
📿 लागूनियां पाया जना व
1034.
लागूनियां पाया जना विनवीत । मुखी बोला दत्त वारंवार ॥१॥
तेणे तुम्हा सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥
स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा । तेणे तुं अघोरा पावशील ॥३॥
एका जनार्दनी चित्ती दत्तपायां । दत्तरुप काया झाली त्याची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३४
📿 नामेचि तुमची आळविता
1034.
नामेचि तुमची आळविता ।
न पुरे धणी पंढरीनाथा ॥१॥
याचि सुखे कल्पकोडी ।
जाता वेळ वाटे घडी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३५
📿 विषयी विसर पडिला निः
1035.
विषयी विसर पडिला निःशेष । अंगी ब्रम्हरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥धृपद॥
लाभाचिया सोसे पुढे चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥
तुका म्हणे गंगासागरसंगमी । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०३५
📿 भगवंत म्हणे नामयासी|
1035.
भगवंत म्हणे नामयासी| हे यथार्थ तू बोलसी|परी क्षणक्षणा गुण आठवती मानसी|या ज्ञानदेवाचे॥१॥
भक्त ज्ञानी आणि वैरागी| ज्ञानदेवा ऐसा चहुयुगीं|ना शको न देखो याची लागीं| खंती वाटे बहुत॥२॥
उद्धवे चरणावरी ठेउनि माथा| कांही एक विनंति जगन्नाथा|ते सांगा जी कृपावंता| गुज अंतरींचे स्वामी॥३॥
निवृत्ति ज्ञान सोपानासि| हे बेसविले जी समाधीसी|मुक्ताईची स्थिती केसी| ते ह्रषिकेशी सांगावें॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३५
📿 वेळोवेळां सांग जना ।
1035.
वेळोवेळां सांग जना । मागे दाना सर्वांसी ॥१॥
मंगल श्रीदत्तराज । स्मरा गुरुराज समर्थ ॥२॥
आयुष्य जाय पळ पळ । करा बळ चिंतना ॥३॥
एका जनार्दनी लोका । विसरु नका सांगतो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३५
📿 नामे तारिले पातकी ।
1035.
नामे तारिले पातकी ।
मुक्त झाले मृत्युलोकी ॥१॥
ऐसे बोलियेले वाल्मीक ।
महाभारतीं व्यासादिक ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 नमन
›
📿 अभंग क्र. १०३६
📿 ऐसियांचे चरित्र जो आ
1036.
ऐसियांचे चरित्र जो आवडी आईके| तो या भक्ताबरोबरी तुके|भोगी वैकुंठीची निजसुखें| बोलिले मुखे श्रीविठ्ठल॥१॥
धन्य धन्य ते भक्त| ज्या कारणे श्री भगवंत| ऐसे पवाडे करित| विश्व उद्धरी तेणे करूनि॥२॥
जे भाग्याचे होति| त्यासिच हे होय प्राप्ती|ते मागुते न येति पुनरावृत्ती| गर्भवासा॥३॥
नामा म्हणे नामस्मरण| तुटति प्रप़ंचधरण बंधन|सुख पावती निदान| समचरण देखलिया॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३६
📿 वाचे बोला दत्त दत्त
1036.
वाचे बोला दत्त दत्त । होय सकळ परमार्थ ॥१॥
दत्तरुपीं लागता दृष्टी । दत्तरुप अवघी सृष्टी ॥२॥
दत्तकथा वसे कानी । दत्तमुर्ति ध्यानीं मनी ॥३॥
दत्तालागी आलिंगना । कर समर्थ हे जाणा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३६
📿 नामे दोषी अजामेळ ।
1036.
नामे दोषी अजामेळ ।
परम चांडाळ तारियेला ॥१॥
पुराणी हा महिमा व्यासे ।
वर्णिला उददेशे वाल्मीकेंही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३७
📿 परमार्थी तो न म्हणाव
1037.
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळू नये ॥१॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढता इंधनी वाढविला ॥धृपद॥
पितियाने तैसा वंदावा कुमर । जयाचे अंतर देवे वसे ॥२॥
तुका म्हणे शिरी वाहावे खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी
›
📿 अभंग क्र. १०३७
📿 मंगळमूर्ति सुखधामा |
1037.
मंगळमूर्ति सुखधामा | भक्तांचिया कल्पद्रुमा|निवृत्तीचिया पुरुषोत्तमा | नमो तुज ॥१॥
विद्या सागरा वैरागरा | संकटी माउली ज्ञानेश्वरा |भरित दाटले अंबरा | तो तू योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ | संत श्रोतिया केला सुकाळ |दिधले पुरुषार्थाचे बळ | ते तू केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंद लहरी | ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी |संस्कृत प्राकृत वैखरी | वदविली माझी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३७
📿 धन्य धन्य तेचि नर ।
1037.
धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥
त्याचे होता दरुशन । पतित होताती पावन ॥२॥
तयालागीं शरण जावे । काया वाचा आणि जीवे ॥३॥
शरण एका जनार्दनी । त्याचे पाय आठवी मनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३७
📿 नामेचि पावन केली क्ष
1037.
नामेचि पावन केली क्षिती ।
घोषे निजशांति पातका ॥१॥
जये गावी जये देशी ।
वसती त्यासी सुखलाभ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३८
📿 ऐसा ज्याचा अनुभव । व
1038.
ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वे ॥१॥
देव तया जवळी असे । पाप नासे दर्शणे ॥धृपद॥
कामक्रोधा नाही चाली । भूती जाली समता ॥२॥
तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी
›
📿 अभंग क्र. १०३८
📿 आता पदपदांतराची सेवा
1038.
आता पदपदांतराची सेवा | संपादिली स्वामी केशवा |धन्य आमुचिया दैवा | जोडिला तुम्ही ॥१॥
आत्मविद्या बोलावया कारणे | सुख पावले श्रोते सज्जन |आता जे आरंभिले मने | ते आपण सिद्धि न्यावे ॥२॥
भूवैकुंठ एक पंढरी | त्याहूनि आगळी आळंकापुरी |सिद्धेश्वरा शेजारी | इंद्रायणी ॥३॥
त्रिपुटि पश्चिम मोक्षाची वाट | प्रत्यक्ष कैलास सिद्धपेठ |गोपाळपुरी केली गोष्ट | चौघीजणी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३८
📿 उदार दयाळ गुरुदत्त ।
1038.
उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥
त्याचे चरणी लीन व्हावे । शुद्धभावे करुनी ॥२॥
मुखी स्मरा गुरुदत्ता । नाही दाता दुसरा ॥३॥
पायी करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३८
📿 नाही संदेह करी हा पा
1038.
नाही संदेह करी हा पाठ ।
पावसी वैकुंठ हरि म्हणता ॥१॥
जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु ।
करिता नामोच्चारु वरिष्ठ पदी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०३९
📿 सेवा ते आवडी उच्चारा
1039.
सेवा ते आवडी उच्चारावे नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥
न लगे हालावे चालावे बाहेरी । अवघे चि घरी बैसलिया ॥धृपद॥
देवाची च नामे देवाचिये शिरी । सर्व अळंकारी समर्पावी ॥२॥
तुका म्हणे होय भावे चि संतोषी । वसे नामापाशी आपुलिया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी
›
📿 अभंग क्र. १०३९
📿 अष्टोत्तरशे तीर्थे स
1039.
अष्टोत्तरशे तीर्थे सारी | ओघे आली आळंकापुरी |वाद्ये वाजताती गजरी | कीर्तन लहरी अमृताची ॥१॥
जैसा कस्तुरीचा सुगंधु | अनुभवी न म्हणतीच बद्धु |तसा औटपिठाचा नादु | आठवी गोविंदु आवडीने ॥२॥
बौद्ध अवतार चक्रपाणि | सत्रावी कळा माय रुक्मिणी |जाणत असे अंत:करणी | भक्त इच्छा ॥३॥
भावे विठ्ठले केली गोष्टी | ज्ञानदेवे अपूर्व इच्छिले पोटी |जावे उठाउठी | समुदायेंसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०३९
📿 कलियुगी तारक । स्वाम
1039.
कलियुगी तारक । स्वामी दत्तराज एक ॥१॥
त्याचे नाम नित्य गावें । भवसिंधुसि तरावें ॥२॥
दत्तमूर्ति हृदयी ध्याता । पावे मोक्ष सायुज्यता ॥३॥
दत्त वसे जया मनी । तया दत्त जनी वनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०३९
📿 निजात्मप्राप्तीलागी
1039.
निजात्मप्राप्तीलागी सार ।
हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥
हेचि बीज हेचि गुज ।
हेचि निज निजाचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०४०
📿 ज्ञानियांचे घरी चोजव
1040.
ज्ञानियांचे घरी चोजविता देव । तेथे अहंभाव पाठी लागे ॥१॥
म्हणोनिया अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥धृपद॥
वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकामधी ॥२॥
पाहो गेलो भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथे देखे चेष्टा विपरीत ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी
›
📿 अभंग क्र. १०४०
📿 विठ्ठल रुक्मिणीसहित
1040.
विठ्ठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत | आणिक संत महंत जमा जाले ॥१॥
परिसा भागवत नामा पुंडलिक | पताका सहित उठावले ॥२॥
गंधर्व आणि देव आले सुरगण | चालली विमाने आळंकापुरी ॥२॥
लहान थोर सारे आले ऋषीश्वर | उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०४०
📿 त्रिगुणाविरहित नाम द
1040.
त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गाता वदतांह होय आनंद चित्ता ॥१॥
पालटेल मन संसारभावना । अंती ते चरणा भेटी होय ॥२॥
योगयाग कसवटी वाउगी रहाटी । दत्त म्हणता होटी सव जोडे ॥३॥
एका जनार्दनी वदता दत्त वाचे । अनंत यागांचे पुण्य जोडे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०४०
📿 निवैंतरता सर्वाभूती
1040.
निवैंतरता सर्वाभूती ।
दया शांति आणि करुणा ॥१॥
केली कृपा नारायणे ।
ऐशी चिन्हे उमटता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०४१
📿 पंढरीची वाट पाहे निर
1041.
पंढरीची वाट पाहे निरंतर । निढळावरी कर ठेवूनिया ॥१॥
जातिया निरोप पाठवी माहेरा । का मज सासुरा सांडियेले ॥धृपद॥
पैल कोण दिसे गरुडाचे वारिके । विठ्ठलासारिके चतुर्भुज ॥२॥
तुका म्हणे धीर नाही माझ्या जीवा । भेटसी केधवा पांडुरंगा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी
›
📿 अभंग क्र. १०४१
📿 पंढरीचा पोहा आला आळं
1041.
पंढरीचा पोहा आला आळंका पुरी | पंच कोसावरी साधुजन ॥१॥
पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार | दिंड्या ते बाहेर निघाल्यासे ॥२॥
पताकांचे भार निघाले बाहेर | भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३॥
अवघिया भेटी जाल्या त्या बाहेरी | मग आळंकापुरी येते जाले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०४१
📿 आठवितां दत्तात्रय ।
1041.
आठवितां दत्तात्रय । नासताती तापत्रय ॥१॥
प्राप्त होय ऋद्धिसिद्धि । दत्तनामे ती समाधी ॥२॥
योगयागादि साधन । गुरुभक्त पावे जाण ॥३॥
विवेक वैराग्य शमादी । हस्ती व्यसे निष्कर्मसिद्धि ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०४१
📿 पशु पक्षी श्वापद यात
1041.
पशु पक्षी श्वापद याती ।
भृंग पतंग कीटक जाती ॥१॥
हरीते भजता हरिरुप झाली ।
निजानंदी निमग्न ठेली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०४२
📿 ऐसी जोडी करा राम कंठ
1042.
ऐसी जोडी करा राम कंठी धरा । जेणे चुके फेरा गर्भवास ॥१॥
नाशीवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तेचि फळ ॥धृपद॥
नांव धड करा सहस्र नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरीरामबाणी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी
›
📿 अभंग क्र. १०४२
📿 हरिहरविधाता आले आळंक
1042.
हरिहरविधाता आले आळंकापुरी | इंद्रायणी तीरी एक थाटी ॥१॥
योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर | जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
शून्याचिया पोटी निरंजन गुंफा | ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥३॥
उन्मनी निद्रा लागलीसे फार | स्वरूपी ज्ञानेश्वर जागा जाला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट