🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२४०
📿 काया वाचा आणि मन । ज
1240.
काया वाचा आणि मन । जयाचे ध्यान संतचरणी ॥१॥
तोचि पावन जाहला जगी । दुजे अंगी कांही नेणे ॥२॥
सदा वाचे गाय नाम । न करी काम आणीक तो ॥३॥
एका जनार्दनी देव । नेदी तया दुजा ठाव ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४०
📿 भक्तिांचिया मनोभावा
1240.
भक्तिांचिया मनोभावा ।
सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥१॥
आवडीचा न करा भंग ।
अंतरंग म्हणोनिया ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२४१
📿 हितावरी यावे । कोणी
1241.
हितावरी यावे । कोणी बोलिलो या भावे ॥१॥
नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥धृपद॥
केली अटाअटी । अक्षरांची देवासाठी ॥२॥
तुका म्हणे खिजो । नका जागा येथे निजो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 कुल जन्म वृत्तांत›
📿 अभंग क्र. १२४१
📿 परिसासी लोह लागती ते
1241.
परिसासी लोह लागती ते कनकाची होती | तया मागील ते गती बोलो नये ॥१॥
आड ओहोळ वाहती ते गंगेसी मिळती | तया मागील ते गती बोलो नये ॥२॥
काक विष्टा करिती तेथे पिंपळ होती | तया मागील ते गती बोलो नये ॥३॥
परीद्वारी होती परीसरसे होय सती | तया मागील ते गती बोलो नये ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२४१
📿 निवंत बैसोनि सुखें ग
1241.
निवंत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद काम परते सांडी ॥१॥
हेचि एक खुण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता हाता चढे ॥२॥
लौकिक वेव्हार आहे तैसा पाहे । जो जो होत जाये जे जे वेळ ॥३॥
कर्म धर्म त्तत्त्वतां बीज हे सर्वथा । एका जनार्दनी पुरता योग साधे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४१
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२४२
📿 नाम घेई सदा वाचे । अ
1242.
नाम घेई सदा वाचे । अनंत जन्मांचें दोष जाती ॥१॥
सुलभ सुलभ एक नाम । नाम आराम जपतांची ॥२॥
रानीं वनी बैसता जनी । नाम वदनी तो धन्य ॥३॥
एका जनार्दनी सोपे । हरती पापें जन्माचीं ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४२
📿 भक्ताचिये मनी जैसे ।
1242.
भक्ताचिये मनी जैसे ।
करि हा तैसे वर्तन ॥१॥
नेदी होऊ आज्ञें भंग ।
वोडवी सर्वांग सेवेसी ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 कुल जन्म वृत्तांत›
📿 अभंग क्र. १२४३
📿 कुश्चळ भूमीवरी उगवली
1243.
कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी | अपवित्र तियेसी म्हणो नये ॥१॥
काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ | तया अमंगळ म्हणो नये ॥२॥
दासीचिया पुत्रा राज्यपद आले | उपमा मागील देऊ नये ॥३॥
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी | उपमा जातीची देऊ नये ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४३
📿 भक्ताचिसाठी रुपे धरी
1243.
भक्ताचिसाठी रुपे धरी ।
पवाडे करी असंख्य ॥१॥
भक्तांसी मानी आपुले सखे ।
नेदी पारखे दिसो त्या ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२४४
📿 जयापासोनि सकळ । महीम
1244.
जयापासोनि सकळ । महीमंडळ जाले ॥१॥
तो एक पंढरीचा राणा । नये अनुमाना श्रुतीसी ॥धृपद॥
विवादती जयासाठी । जगजेटी तो विठ्ठल ॥२॥
तुका म्हणे तो आकळ । आहे सकळव्यापक ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 कुल जन्म वृत्तांत›
📿 अभंग क्र. १२४४
📿 काकविष्टेमाजी जन्मे
1244.
काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणो नये ॥१॥
परद्वारीन येती करून जाली सती | मागील त्या स्थिती बोलू नये ॥२॥
विळा होता तो परिसासी लागला | मागिलिया मोला बोलू नये ॥३॥
गाव रस होता तो गंगेसी मिळाला | गंगाजळावाचुनी त्याला बोलू नये ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२४४
📿 नाही कधी वाचे नाम ।
1244.
नाही कधी वाचे नाम । तो अधम न पहाव ॥१॥
होतं त्याचे दरुशन । सचैल स्नान करावे ॥२॥
तयासी ते ऐकता मात । होय घात शरीराचा ॥३॥
ऐसा अधम तो जनी । नामहीन असतो प्राणी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४४
📿 भाव भक्तीचा भुकेला ।
1244.
भाव भक्तीचा भुकेला ।
दास दासांचा अंकिला ।
न वजे दुरी उभा ठेला ।
अवघा झाला त्यांचाचि ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२४५
📿 नाही रूप नाही नांव ।
1245.
नाही रूप नाही नांव । नाही ठाव धराया ॥१॥
जेथे जावे तेथे आहे । विठ्ठल मायबहीण ॥धृपद॥
नाही आकार विकार । चराचर भरलेंसे ॥२॥
नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४५
📿 भाव शुध्द तरी ।
1245.
भाव शुध्द तरी ।
प्रगटे येऊनि अंतरी ॥१॥
उरो नेदी तया भिन्न ।
करी आपणा समान ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 कुल जन्म वृत्तांत›
📿 अभंग क्र. १२४६
📿 माझे जन्मपत्र बाबाजी
1246.
माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे | लिहिले त्याची खूण सारू ऐका ॥१॥
अधिक ब्याण्णव गणित अकराशते | उगवता आदित्य रोहिणीची ॥२॥
शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार | प्रभव संवत्छर शालिवाहन शके ॥३॥
प्रसवली माता मज मळमूत्री | तेव्हा जिव्हेवरी लिहिले देवे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२४६
📿 हेंचि साचे बा साधन ।
1246.
हेंचि साचे बा साधन । मुखी नाम हृदयी ध्यान ॥१॥
येणे तुटे नाना कंद । पीडा रोग भवछंद ॥२॥
नको ते वाउगी खटपट । मन करी एकनिष्ठा ॥३॥
घडे साधन समाधी । तेथे अवघी उपाधी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४६
📿 भाविकाची आवडी देवा ।
1246.
भाविकाची आवडी देवा ।
करी सेवा निज प्रीती ॥१॥
हिंडे तया मागे पुढे ।
नाशी कोडे सकळही ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२४७
📿 एक नाम गाये । तेथे स
1247.
एक नाम गाये । तेथे सदा सुख आहे ॥१॥
नाम गातांचि वदनी । उभा असे चक्रपाणी ॥२॥
नामाचिया हाकें । उडी घाली कवतुके ॥३॥
घात आघात निवारी । उभी राहे सदा द्वारी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४७
📿 म्हणती कामारी ।
1247.
म्हणती कामारी ।
दास्य करी त्यांच्या व्दारी ॥१॥
ऐसा भक्तांसी भुलला ।
नाम गाता आतुडला ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 कुल जन्म वृत्तांत›
📿 अभंग क्र. १२४८
📿 केशवाचे प्रेम नामयां
1248.
केशवाचे प्रेम नामयांचि जाणे | नाम्या हृदयी असणे केशवाते ॥१॥
नामा तो केशव तो नामा | अभिन्नत्व आम्हा केशवासी ॥२॥
नामा म्हणे केशवा दुजेपण नाही | परि प्रेम तुझ्या ठायी ठेवियेले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२४८
📿 पशु आणि पक्षी तरले स
1248.
पशु आणि पक्षी तरले स्मरणे । तो तुम्हा कारणे उपेक्षीना ॥१॥
धरुनि विश्वास आळवावे नाम । सदगद ते प्रेम असो द्यावे ॥२॥
सुखदुःख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांती नाही जगी ॥३॥
एका जनार्दनी नामाचा प्रताप । नुरेची तेथे पाप वोखदासी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४८
📿 मागे पुढे उभा राहे ।
1248.
मागे पुढे उभा राहे ।
भरुनि पाहे डोळे त्या ॥१॥
प्रेमासी दृष्टी लागेल झणे ।
उतरी निंबलोण वरुनिया ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२४९
📿 कोण वेची वाणी । आता
1249.
कोण वेची वाणी । आता क्षुल्लका कारणी ॥१॥
आता हेचि माप करू । विठ्ठल हृदयात धरू ॥धृपद॥
नेंदाविया वृत्ति । आता उठो चि बहुती ॥२॥
उपदेश लोका । करूनी वेडा होतो तुका ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२४९
📿 सेवेंचे कारण मुख्य त
1249.
सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव । इतर ते वाव इंद्रिय बाधा ॥१॥
साधन हेंचि साधी तोडी तू उपाधी । नका ऋद्धिसिद्धि आणिक कांही ॥२॥
नामाचा उच्चार मुख्य हेचि भक्ति । एका जनार्दनी विरक्ति तेणे जोडें ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२४९
📿 मागे ऐकिले पवाडे याच
1249.
मागे ऐकिले पवाडे याचे ।
आजी ते साचे कळो आले ॥१॥
आपुलियाचि स्वानुभवा ।
आले तेव्हा साच कळले ॥२॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२५०
📿 सत्य भोळा देव कृपेचा
1250.
सत्य भोळा देव कृपेचा सागर ।
न मोडी उत्तर संतआज्ञा ॥१॥
भाविकाची सेवा न म्हणे फार थोडी ।
स्वीकारी आवडी आपुलिये ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२५१
📿 ब्राह्मण क्षत्रिय वै
1251.
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । चांडाळादि अधिकार ॥१॥
एका भावे गावें नाम । सोडोनियां क्रोधकाम ॥२॥
आशा मनशा टाका दुरी । मग इच्छा कल्पना काय करी ॥३॥
एका जनार्दनी मन । करा देवासी अर्पण ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२५१
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२५२
📿 तुम्ही काटाळलां तरी
1252.
तुम्ही काटाळलां तरी । आम्हा न सोडणे हरी ॥१॥
जावे कवणिया ठाया । सांगा विनवितो पाया ॥धृपद॥
केली जिवा साठी । आता सुखे लागो पाठी ॥२॥
तुका म्हणे ठाव । न सोडणे हाचि भाव ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२५२
📿 सदा सेवकाचा लाड ।
1252.
सदा सेवकाचा लाड ।
पुरवा करुनिया कोड ॥१॥
जेवि कृपावंत माय ।
तान्हयाच्या धणी धाय ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२५३
📿 येउनि संसारी । मी तो
1253.
येउनि संसारी । मी तो एक जाणे हरी ॥१॥
नेणे आणिक काही धंदा । नित्य ध्यातसे गोविंदा ॥धृपद॥
काम क्रोध लोभस्वार्थ । अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥
तुका म्हणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२५३
📿 भक्त पहावया तांतडी ।
1253.
भक्त पहावया तांतडी ।
नामचि ऐकोनि घाली उडी ।
निजदासाची सांकडी ।
न देखे नाईके सर्वथा ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२५४
📿 सर्व पक्षी हरी साहे
1254.
सर्व पक्षी हरी साहे सखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥
सहजचाली चालता पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥
तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरी वेदात वाहे पाणी ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 कुल जन्म वृत्तांत›
📿 अभंग क्र. १२५४
📿 गरुडपाराजवळी नामदेव
1254.
गरुडपाराजवळी नामदेव आला | सन्मुख देखिला पांडुरंग ॥१॥
मेघ:शाममूर्ती डोळस सांवळी | ते ध्यान हृदयकमंळी धरोनि ठेला ॥२॥
धन्य नामदेव भक्त शिरोमणि | ज्याचा चक्रपाणि वेळाइतू ॥३॥
पूर्ण सहज स्थिती जाला सुखाचा अनुभव | सकळ देहभाव पारुषले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२५४
📿 उपवास पारणे न लगे ।
1254.
उपवास पारणे न लगे । आणिक साधन । नामापरते निधान नाही जगी ॥१॥
म्हणोनि सांडी सांडी काम परतें । वाचेसी आरुतें नाम जपे ॥२॥
नामापरता मंत्र नाही त्रिभुवनी । नाम हे निर्वाणीं तारक जगा ॥३॥
एका जनार्दनी नाम श्रेष्ठाचें श्रेष्ठ । सर्वांही वरिष्ठ नाम एक ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२५४
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२५५
📿 भक्ताचिया घरा आला ।
1255.
भक्ताचिया घरा आला ।
सुख विश्रांति पावला ॥१॥
उपकार ते वेळोवेळा ।
आठवि घननीळ सावळा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२५६
📿 काय पुण्य ऐसे आहे मज
1256.
काय पुण्य ऐसे आहे मजपाशी । तांतडी धावसी पांडुरंगा ॥१॥
काय ऐसा भक्त वाया गेलो थोर । तू मज समोर होसी वेगा ॥धृपद॥
काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तू झडकरी पाचारिशी ॥२॥
कोण मी नावाचा थोर गेलो मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२५६
📿 माता वाट पाहे नामा अ
1256.
माता वाट पाहे नामा अजुनी का नये | देखोन विठ्ठल काय भुलला तेथे ॥१॥
ऐसे मज पाहता हेचि घडे साचे | विंठ्ठली मनः त्याचे गुंतले असे ॥२॥
काय सांगो माय जाल देवळासी | जपतो अहर्निशी विठ्ठल नामा ॥३॥
तहान भूक कांही आथीचना मनी | विठ्ठल विठ्ठल म्हणोनि हाचि छंद ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२५६
📿 हाती चक्र सुदर्शन ।
1256.
हाती चक्र सुदर्शन ।
वागविता न मनी त्याचा शीण ।
आपुल्या भक्तांचे रक्षण ।
आणि निर्दाळण अरीवर्गा ॥१॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२५७
📿 सदा वाचे नामावळी । न
1257.
सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांचे होळी । होत तेणे केली ये ॥१॥
नको ध्यानधारणा आसन । वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मेरुसमान सुकृत ॥२॥
उपमा नव्हे तया नरा । जनार्दन तो निर्धारा । एका जनार्दनी बरा । त्याचा सांगात घडता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२५८
📿 आम्ही मेलो तेव्हा दे
1258.
आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा । आता करू सेवा कोणाची मी ॥१॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदे ॥धृपद॥
बोलतसे जैसे बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥
पाप पुण्य ज्याचे तोचि जाणे काही । संबंध हा नाही आम्हासवे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२५९
📿 लागो नेदी बोल पाया त
1259.
लागो नेदी बोल पाया तुझ्या हरी । जीव जावो परि न करी आण ॥१॥
परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानी ॥२॥
तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२५९
📿 वेदाभ्यास नको सायास
1259.
वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा लेश तेथे नाही ॥१॥
बहुत व्युत्पत्ती सांगती पुराण । व्यर्थ स्मरण नाम नाही ॥२॥
अनंत हे नाम जयापासुनि जाले । ते वर्म चुकले संतसेवा ॥३॥
संतांसी शरण गेलिया वांचुनि । एका जनार्दनी न कळे नाम ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२६१
📿 अरे नामदेवा नव्हेसि
1261.
अरे नामदेवा नव्हेसि लेकरू । जरी जाणसी विचारू संसारिक। १ ।
शिवण्याटिपण्यासी त्वा घातले पाणी । न पाहसी परतोनि घराकडे। २ ।
कैसी तुझी भक्ति या देशावेगळी । संसाराची धुळी केली नाम्या। ३ ।
उदंड पै आम्ही देखियेले भक्त। परि तू आपुर्ले हित न विचारिसी। ४ ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२६१
📿 उत्तम मध्यम चांडाळ ।
1261.
उत्तम मध्यम चांडाळ । अत्यजहि तरलें खळ ॥१॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । नामे पवित्र पै जाहलें ॥२॥
यवन माई तो कुंभार । शिंपी सोनार तरले ॥३॥
एका जनार्दनी सांगूं किती । मागे तरले पुढे तरती ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२६२
📿 कापड घेऊनी जाय बाजार
1262.
कापड घेऊनी जाय बाजारासी | गोणाई नाम्यासी शिकवितसे ॥१॥
लोकांचे हे पुत्र संसार करिती | आमुची फजिती केली नाम्या ॥२॥
नाम्या विठोबाचा संग नव्हे बरा | मैद हा खरा गळाकांटू ॥३॥
याचे संगतीने संसार जाळावा | भोपळा हा घ्यावा भीक मागू ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२६३
📿 ऐसा घेई का रे संन्या
1263.
ऐसा घेई का रे संन्यास । करी संकल्पाचा नाश ॥१॥
मग तू राहे भलते ठायी । जनी वनी खाटे भोई ॥धृपद॥
तोडी जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा ॥२॥
तुका म्हणे नभा । होई आणुचा ही गाभा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२६४
📿 जनिता जीवविता सर्वज्
1264.
जनिता जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळिता | आडणी सांभाळिता चराचरी ॥१॥
एक पांडुरंग दुजा नाही चांग | म्हणुनि याचा संग धरिला माते ॥२॥
माझी तुज कांही करणे नलगे चिंता | मज आहे पोसिता पांडुरंग ॥३॥
हा शरणागतांचा जाणे कळवळा | हा पै कळिकाळा पाहो नेदी ॥४॥