संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५६९
📿 संत उपाधिरहित । नाही
1569.
संत उपाधिरहित । नाही तया दुसरा हेत ॥१॥
सदा मुखी नाम वाचे । तेणे जन्माचें सार्थक ॥२॥
संग नावडे तया कांही । सदा कीर्तनप्रवाहीं ॥३॥
एका जनार्दनी चित्त । ध्यानीं मनी संत आठवीत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५७०
📿 प्राण समर्पीला आम्ही
1570.
प्राण समर्पीला आम्ही । आता उशीर का स्वामी ॥१॥
माझे फेडावे उसणे । भार न मना या ॠणे ॥धृपद॥
जाला कंठस्फोट । जवळी पातलो निकट ॥२॥
तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५७१
📿 येणे मार्गे गेले । त
1571.
येणे मार्गे गेले । त्याचे निसंतान केले ॥१॥
ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥धृपद॥
नागविल्या थाटी । उरो नेदीच लंगोटी ॥२॥
तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५७२
📿 जोवरी तोवरी जंबुक कर
1572.
जोवरी तोवरी जंबुक करि गर्जना । जव त्या पंचानना देखिले नाही ॥१॥
जोवरी तोवरि सिंधु करि गर्जना । जव त्या अगिस्तब्राम्हणा देखिले नाही ॥धृपद॥
जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी । जव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही ॥२॥
जोवरी तोवरी शत्रुत्वाच्या गोष्टी । जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५७२
📿 तुझा विष्णुदास म्हणत
1572.
तुझा विष्णुदास म्हणतात जगी | नाही माझे अंगी प्रेमभाव ॥१॥
तेणे थोर लाज वाटे पंढरिराया| ये माझ्या हृदया एक वेळा ॥२॥
द्वैताद्वैत भाव आहे माझे ठायी | अनुभव नाही स्वरूपाचा ॥३॥
देखावेखी वैसे संतांचे संगती | नाही माझे चित्ती ध्यान तुझे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५७२
📿 दरुशने तरती प्राणी ।
1572.
दरुशने तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची ॥१॥
ठेवितांचि मस्तकी हात । देवाचि करीत तयासी ॥२॥
देउनी नाममात्रा रस । भवरोगास छेदिती ॥३॥
एका जनार्दनी ते संत । कृपावंत दीनालागी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५७४
📿 नेत्र माझे रोडले आठव
1574.
नेत्र माझे रोडले आठवे माहेर | के भेटेन निरंतर बाईयांनो ॥१॥
चतुर्भुज विठ्ठल के देखेन डोळा | भक्तांचा जिव्हाळा जीव माझा ॥२॥
येणे शोके रे वाळलो शरीरीं| आठवतो हरि मी काय सांगू ॥३॥
चारी भुजा उचलोनि क्षेम देईल | के मज नेईल पंढरपुरा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५७४
📿 मुखी नाही निंदा स्तु
1574.
मुखी नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती ॥१॥
राग द्वेष समुळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥
घेणे देणे हा पसारा । नाही जयासी दुसरा ॥३॥
एका जनार्दनी संत । ज्याचे हृदयी भगवंत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५७५
📿 उचिताचा भाग होतो राख
1575.
उचिताचा भाग होतो राखोनिया । दिसती ते वाया गेले कष्ट ॥१॥
वचनाची काही राहेचि ना रुचि । खळाऐसे वाची कुची जाले ॥धृपद॥
विश्वासाने माझे बुडविले घर । करविला धीर येथवरी ॥२॥
तुका म्हणे एकी थार नाही बुड । कैसे तुह्मी कोड पुरविले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५७६
📿 पवित्र तो देह सदा ज्
1576.
पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्वभावे ॥१॥
धन्य ते भाग्याचा तरला संसार । परमार्थाचें घर नाम मुखी ॥२॥
करितसे कथा कीर्तनी आवडी । ब्रह्माज्ञान जोडी तया लाभे ॥३॥
एका जनार्दनी धन्य ते शरीर । परमार्थ संसार एकरुप ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५७८
📿 आम्ही असो निंश्चिंती
1578.
आम्ही असो निंश्चिंतीने । एक्या गुणे तुमचिया ॥१॥
दुराचारी तरले नामे । घेता प्रेम म्हणोनि ॥धृपद॥
नाही तुम्हा धाव घेता । कृपावंता आळस ॥२॥
तुका म्हणे विसरू काही । तुज वो आई विठ्ठले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५७८
📿 ऐसी चाल नाही कोठे नम
1578.
ऐसी चाल नाही कोठे नमस्कारा आधी भेटे ॥१॥
मायबाप निर्विकारी | सखा नांदतो पंढरी ॥२॥
देव भक्तपण | नाही नाही त्यासी आण ॥३॥
नामा म्हणे आधी भेटी | मग चरणा घालीन मिठी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५८०
📿 परपीडक तो आम्हा दावे
1580.
परपीडक तो आम्हा दावेदार । विश्वी विश्वंभर म्हणऊनि ॥१॥
दंडू त्यागू बळे नावलोकु डोळा । राखू तो चांडाळा ऐसा दुरि ॥धृपद॥
अनाचार काही न साहे अवगुण । बहु होय मन कासावीस ॥२॥
तुका म्हणे माझी एकविध सेवा । विन्मूख तो देवा वाळी चित्ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५८०
📿 कार्य कर्ता आणि कारण
1580.
कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥
अंगी गुण आदळतां तिन्ही गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥
ऐसा त्रिगुणावेगळां । एका जनार्दनी पाहे डोळा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५८१
📿 काही न मागे कोणासी ।
1581.
काही न मागे कोणासी । तोचि आवडे देवासी ॥१॥
देव तयासी म्हणावे । त्याचे चरणी लीन व्हावे ॥धृपद॥
भूतदया ज्याचे मनी । त्याचे घरी चक्रपाणी ॥२॥
नाही नाही त्यासमान । तुका म्हणे मी जमान ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५८२
📿 नाम उच्चारिता कंठी ।
1582.
नाम उच्चारिता कंठी । पुढे उभा जगजेठी ॥१॥
ऐसे धरोनिया ध्यान । मने करावे चिंतन ॥धृपद॥
ब्रह्मादिका ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥२॥
तुका म्हणे सार घ्यावे । मने हरीरूप पाहावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५८२
📿 बुद्धिहीन अति करितो
1582.
बुद्धिहीन अति करितो हव्यास | उठती उद्देश नाना मते ॥१॥
एकापुढे एक नासोनिया जाती | सोशिली विपत्ति जन्ममरण ॥२॥
वासनेचे संगे बुडालो मी वाया | चुकवू नको पायासवे भेटी ॥३॥
नामा म्हणे ऐसे गेले बहुतेक | वैकुंठनायका तारी मज ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५८३
📿 असोनि संसारी आपदा ।
1583.
असोनि संसारी आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥१॥
नाही मानसी तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥
असोनिया अंकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥३॥
एका जनार्दनी ऐसे थोडे । लक्षामध्येंअ एक निवडे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५८४
📿 तपासी ते मन करू पाहे
1584.
तपासी ते मन करू पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥
म्हणोनि कीर्तन आवडले मज । सांडोनिया लाज हेचि करी ॥धृपद॥
पाहाता आगमनिगमाचे ठाव । तेथे नाही भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे येथे नाही वो विकार । नाम एक सार विठोबाचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५८४
📿 माझी कोण गति सांग पं
1584.
माझी कोण गति सांग पंढरिनाथा | तारिसी अनाथ की बुडविसी ॥१॥
मनापासोनिया सांग मजप्रती | पुसे काकुळती जीवाचिये ॥२॥
न बोलसी का रे धरिला अबोला | कोणासी विठ्ठला शरण जाऊ ॥३॥
कोणासी सांकडे घालावे हे सांग | नको करू राग दीनावरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५८४
📿 इहलोकी बरा तो परलोकी
1584.
इहलोकी बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरले नाही ॥१॥
परस्त्री देखता नपुंसक वागे । परधन पाहता अंधापरी निघे ॥२॥
वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयी भगवद्भक्ति सदा वाहे ॥३॥
एका जनार्दनी ऐसे विरळे प्राणी । कोटी माजी जनें एक देखो ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५८५
📿 गुरुशिष्यगण । हे तो
1585.
गुरुशिष्यगण । हे तो अधमलक्षण ॥१॥
भूती नारायण खरा । आप तैसाचि दुसरा ॥धृपद॥
न कळता दोरी साप । राहू नेंदावा तो काप ॥२॥
तुका म्हणे गुणदोषी । ऐसे न पडावे सोसी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५८५
📿 नेत्र तान्हेले पाणी
1585.
नेत्र तान्हेले पाणी पाणी | पंढरिचे मायबहिणी ॥१॥
बाळ पालकी करी सोर | माते आला निद्राभर ॥२॥
जागी न होसी गे माये | प्राण जातो करू काये ॥३॥
नामा म्हणे चक्रपाणि | चरणी घातली लोळणी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५८५
📿 न मानी सन्मानाचें को
1585.
न मानी सन्मानाचें कोडे । नाही चाड विषयाची ॥१॥
ऐसे मज शरण येती । तयांचे उणे न पडे कल्पांती ॥२॥
नाही संसाराची चाड । नाही भीड कवणाची ॥३॥
एका त्याचा म्हणवी दास । धरुनी आस जनार्दनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५८६
📿 अंगीकार ज्याचा केला
1586.
अंगीकार ज्याचा केला नारायणे । निंद्य ते हि तेणे वंद्य केले ॥१॥
अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली ॥धृपद॥
ब्रम्हहत्याराशी पातके अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥
तुका म्हणे येथे भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे ते ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५८७
📿 रात्रंदिवस खंती वाटे
1587.
रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवी | अनुदिनी आठवी चरण तुझे ॥१॥
ने रे पांडुरंगा आपुलिया गांवा | तू माझा विसावा जिवलग ॥२॥
मी येक येकट रंकाहूनि रंक | त्रिभुवननायक कीर्ति तुझी ॥३॥
मी तुझे पोसणे दास मे दुर्बळ | तू दीनदयाळ स्वामी माझा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५८८
📿 धनवंता घरी । करी धनच
1588.
धनवंता घरी । करी धनचि चाकरी ॥१॥
होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावेचि घर ॥धृपद॥
रानी वनी द्वीपी । असती ती होती सोपी ॥२॥
तुका म्हणे मोल । देता काही नव्हे खोल ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५८८
📿 मुक्तिची तो नाही चाड
1588.
मुक्तिची तो नाही चाड । ऐसे वाड हरि दास ॥१॥
मोक्षमुक्तिसी कोण पुसे । हे तो सरसे भांडवल ॥२॥
लक्ष्मीसहित देव नांदे । येरा विनोदें काय चाड ॥३॥
एका जनार्दनी दास्य करी । मुक्ति तेथे फुका वरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५८९
📿 हा गे माझा अनुभव । भ
1589.
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥
केला ॠणी नारायणा । नव्हे क्षण वेगळा ॥धृपद॥
घालोनिया भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥
तुका म्हणे वचनासाठी । नाम कंठी धरियेले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५८९
📿 युक्तिप्रयुक्तीचे प्
1589.
युक्तिप्रयुक्तीचे प्रमाण मी नेणे | केशवचरणे ध्यातो मनी ॥१॥
आणिक साधन काय म्या करावे | ब्रह्मादिक देव मौन ठेले ॥२॥
आता मी कायसा करावा आधार चरण निर्धार देवपूजा ॥३॥
नामा म्हणे तुझा अंत नाही पार | काय म्या पामर जाणो आता ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५८९
📿 संतांचा दास तो देवाच
1589.
संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशने त्यांच्या ॥१॥
त्याचिया योगे घडती सर्व । तीर्थ ते पवित्र होती तीर्थे ॥२॥
तयाचियां पदें धरा धन्य म्हणे । ऐसे जे भेदरहित मने तेचि संत ॥३॥
एका जनार्दनी तयाच्या प्रसादे । कर्मे अकर्मा दोंदें निघताती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५९०
📿 देव आहे सुकाळ देशी ।
1590.
देव आहे सुकाळ देशी । अभाग्यासी दुर्भीक्ष ॥१॥
नेणती हा करू साटा । भरले फाटा आडराने ॥धृपद॥
वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥
तुका म्हणे मन मुरे । मग जे उरे तेचि तू ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५९१
📿 खुंटोनिया दोरी आपणिय
1591.
खुंटोनिया दोरी आपणियांपाशी । वावडी आकाशी मोकलिली ॥१॥
आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ते ॠण बुडो नेणे ॥धृपद॥
बीज नेले तेथे येईल अंकुर । जतन ते सारे करायाची ॥२॥
तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा । वेगळे नाही देवा उरो दिले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५९१
📿 तुझे प्रेम माझ्या दा
1591.
तुझे प्रेम माझ्या दाखवी मनाते | मग तुझ्या चरणाते न विसंबे ॥१॥
कासया शिणविसी थोडिया कारणे | काय तुझे उणे होईल देवा ॥२॥
चातकाची तहान पुरवी जळधर | काय त्याची थोरी जाऊ पाहे ॥३॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहोळा | काय त्याच्या कळा न्यून होती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५९३
📿 मजुराचे पोट भरे । दा
1593.
मजुराचे पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥
या रे या रे हातोहाती । काम माती सारावी ॥धृपद॥
रोजकीर्द होतो झाडा । रोकडाचि पर्वत ॥२॥
तुका म्हणे खोल पाया । वेचो काया क्लेशेसी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५९४
📿 स्मशानीच आम्हा न्याह
1594.
स्मशानीच आम्हा न्याहालीचे सुख । या नावे कौतुक तुमची कृपा ॥१॥
नाही तरी वाया अवघे निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥धृपद॥
झाडे झुडे जीव सोइरे पाषाण । होती तई दान तुह्मी केले ॥२॥
तुका म्हणे आता पाहे अनुभव । घेईन हाती जीव पांडुरंगा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५९४
📿 ऐसे माझे मना येते पं
1594.
ऐसे माझे मना येते पंढरीनाथा | न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥
यासि काय करू सांगा जी गोपाळा | का स्नेह लावियेला पूर्वीहुनी ॥२॥
हृदयी चित्तवृत्ति मनेंसि मिळोनी | अवघी तुझ्या चरणी सुरवाडिली ॥३॥
नामा म्हणे केशवा धरिली तुझी सेवा | सुखा अनुभवा अनुभविले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५९४
📿 ज्याचे गेले कामक्रोध
1594.
ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जगी सिद्ध ॥१॥
लोभ मोह नाही ज्याशी । तोचि साधु निश्चयेंसी ॥२॥
गेले मद आणि मत्सर । साधु तोचि निर्विकार ॥३॥
एका जनार्दन साधु । त्याचे चरण नित्य वंदूं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५९५
📿 आमची जोडी ते देवाचे
1595.
आमची जोडी ते देवाचे चरण । करावे चिंतन विठोबाचे ॥१॥
लागेल तरी कोणी घ्यावे धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥धृपद॥
उभारिला कर प्रसिद्ध या जगे । करू केला त्याग मागे पुढे ॥२॥
तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसे देऊ दान एक वेळा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५९५
📿 कोण होईल आत्मज्ञानी
1595.
कोण होईल आत्मज्ञानी | जो वा राहे त्याच्या ध्यानी ॥१॥
मज तो चरणांची आवडी | जन्मोजन्मी मी न सोडी ॥२॥
होईल सिद्धीचा साधक | त्यासी देई स्वर्गसुख ॥३॥
कोण होईल देहातीत | त्यासी करी संगरहित ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५९५
📿 वेधिलें ज्यांचे मन स
1595.
वेधिलें ज्यांचे मन सदा नामस्मरणी । रामनाम ध्वनी मुखी सदा ॥१॥
प्रपंच परमार्थ त्यासी पै सारखा । अद्वैती तो देखा भेद नाही ॥२॥
एका जनार्दनी एकरुप भाव । नाही भेदा ठाव तये ठायी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५९६
📿 ब्रह्म अविनाश आणि आन
1596.
ब्रह्म अविनाश आणि आनंदघन | त्याहुनि चरण गोड तुझे ॥१॥
ते जीवे न सोडी अगा पंढरीनाथा | जाणसी तत्त्वता हृदय माझे ॥२॥
परात्पर वस्तु ध्याईजे अपारापार | त्यांचे हे जिव्हार पाय तुझे ॥३॥
सच्चिदानंदघन जेथे हरपे मन | त्याहूनि चरण गोड तुझे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५९७
📿 नको नको मना गुंतू मा
1597.
नको नको मना गुंतू मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा । सोडविना तेव्हा मायबाप ॥धृपद॥
सोडवीना राजा देशीचा चौधरी । आणीक सोइरी भली भली ॥२॥
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वाचूनिया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १५९७
📿 तुझिया चरणाचे तुटता
1597.
तुझिया चरणाचे तुटता अनुसंधान | जाती माझे प्राण तत्क्षणी ॥१॥
मग हे ब्रह्मज्ञान कोणापे सांगसी | विचारो मानसी केशिराजा ॥२॥
वदनी तुझे नाम होतांचि खंडणा | शतखंडरसना होइल माझी ॥३॥
सांवळे सुंदर रूप तुझे दृष्टी | न देखता उन्मळती नेत्र माझे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५९७
📿 काम क्रोध नाही अंगी
1597.
काम क्रोध नाही अंगी । तोचि नर जन्मला जगी ॥१॥
तयाचे होता दरुशन । तुटे देहाचें बधन ॥२॥
अरुणोदयीं जाण । तम निरसे सहज आपण ॥३॥
एका जनार्दनी शरण । नोहे एकपणावांचून ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५९८
📿 जे जे बोले तैसा चाले
1598.
जे जे बोले तैसा चाले । तोचि वहिले निवांत ॥१॥
अंगी असोनी जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥२॥
निंदा अथवा वंदा । नाही विषय ती बाधा ॥३॥
शांतीचा मांदूस । भरला असे सदोदित ॥४॥