🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५४४
📿 संतांचे चरणतीर्थ घेत
1544.
संतांचे चरणतीर्थ घेता । अनुदिनी पातकांची धुणी सहज होय ॥१॥
संतांचे उच्छिष्ट प्रसाद लाधतां । ब्रह्माज्ञान हाता सहज होय ॥२॥
संतांच्या दरुशने साधतीं साधने । तुटतीं बंधनें सहज तेथे ॥३॥
एका जनार्दनी संत कृपादृष्टीं । पाहता सुलभ सृष्टी सहज होय ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५४६
📿 जननिये जिवलगे येवो प
1546.
जननिये जिवलगे येवो पांडुरंगे | शिणलो भेटि दे गे एक वेळा ॥१॥
आहे आहे हे कृपादृष्टी पाहे | येऊनिया राहे हृदयामाजी ॥२॥
वासनेच्या संगे शिणले माझे चित्त | विषयाचे आघात पडती वरी ॥३॥
नाही तुझी सेवा केली मनोधर्मे | संसार संभ्रमे भ्रांत सदा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५४६
📿 जया जैसा हेत । तैसा
1546.
जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ॥१॥
उदारपणे सम देणे । नाही उणें कोणासी ॥२॥
भलतिया भावे संतसेवा । करिता देवा माने ते ॥३॥
एका जनार्दनी त्यांचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५४७
📿 करूनि जतन । कोणा काम
1547.
करूनि जतन । कोणा कामा आले धन ॥१॥
ऐसे जाणत जाणता । का रे होतोसी नेणता ॥धृपद॥
प्रिया पुत्र बंधु । नाही तुज यांशी संबंधु ॥२॥
तुका म्हणे एका । हरीविण नाही सखा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५४८
📿 आह्मी देतो हाका । का
1548.
आह्मी देतो हाका । का रे जालासी तू मुका ॥१॥
न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥धृपद॥
आधी करू चौघाचार । मग सांडू भीडभार ॥२॥
तुका म्हणे शेवटी । तुम्हा आम्हा घालू तुटी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५४९
📿 नव्हे भिडा हे कारण ।
1549.
नव्हे भिडा हे कारण । जाणे करू ऐसे जन ॥१॥
जो जो धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥धृपद॥
चाल जाऊ संतांपुढे । ते हे निवडिती रोकडे ॥२॥
तुका म्हणे तू निर्लज्ज । आम्हा रोकडी गरज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५४९
📿 धन्य तेचि संत भक्त भ
1549.
धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयी अनंत नित्य ज्यांच्या ॥१॥
धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान । चित्त समाधान सर्वकाळ ॥२॥
धन्य ते वैराग्य धन्य उपासना । जयाची वासना पांडुरंगीं ॥३॥
एका जनार्दनी धन्य तेचि संत । नित्य ज्यांचे आर्त नारायणीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५५०
📿 बहु होता भला । परि य
1550.
बहु होता भला । परि या रांडेने नासिला ॥१॥
बहु शिकला रंग चाळे । खरे खोटे इचे वेळे ॥धृपद॥
नव्हते आळविते कोणी । इने केला जगॠणी ॥२॥
ज्याचे त्यासी नेदी देऊ । तुका म्हणे धावे खाऊ ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५५०
📿 तू माझी जननी काय ग स
1550.
तू माझी जननी काय ग साजणी | विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥
डोळे माझे गिणले पाहता वाटोली | अवस्था दाटली हृदयामाजी ॥२॥
मी तुझे पाडस गुंतलो भवपाशी | माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज | क्षुधे पीडिलो मज विसरणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५५१
📿 काय करावे ते आता । ज
1551.
काय करावे ते आता । जाले नयेसे बोलता ॥१॥
नाही दोघाचिये हाती । गाठी घालावी एकांती ॥धृपद॥
होय आपुले काज । तो हे भीड सांडू लाज ॥२॥
तुका म्हणे देवा । आधी निवडू हा गोवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५५२
📿 केली सलगी तोंडपिटी ।
1552.
केली सलगी तोंडपिटी । आम्ही लडिवाळे धाकुटी ॥१॥
न बोलावे ते चि आले । देवा पाहिजे साहिले ॥धृपद॥
अवघ्यांमध्ये एक वेडे । तोचि खेळवितो कोडे ॥२॥
तुका म्हणे मायबापा । मजवरी कोपोनका ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५५२
📿 तू माय माउली म्हणोनि
1552.
तू माय माउली म्हणोनि आस केली | विठ्ठले पाहिली वास तुझी ॥१॥
मज का मोकलिले कवणा निरविले | कठिण कैसे जाले हृदय तुझे ॥२॥
तुजविण जिवलग दुर्जे कोण होईल | ते माझे जाणेल जडभारी ॥३॥
मी दीन अपराधी तुझा सरणागत | तुजविण माझे हित करिल कोण ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५५५
📿 वाढवेळ का लाविला | क
1555.
वाढवेळ का लाविला | कोण्या भवते रे गोंविला ॥१॥
झडकरी या या विठ्ठला | आळविता कंठ सोकला ॥२॥
वाट पाहे दाही दिशा | जिसी धरोनि भरवसा ॥३॥
न कळे का धरिले उदास | मज तो वाटती निरास ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५५६
📿 जिवलग कोण तुजविण होई
1556.
जिवलग कोण तुजविण होईल | जे माझे जाणेल जडभारी ॥१॥
अन्यायी अपराधी तुम्हा शरणागत | तुजविण हित कोण करी ॥२॥
नामा म्हणे आई धावे लवलाही | बुडतो या डोही दंभाचिया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५५६
📿 असोनी उत्तम न करी भज
1556.
असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दान धर्म नेणे ॥१॥
काय त्यांचे कुळ चांडाळ चांडाळ । मानी तो विटाळ यमधर्म ॥२॥
सदा सर्वकाळ्फ़ संतांची करी निंदा । पापांची आपदा भोगी नरक ॥३॥
स्वमुखें आपण सांगे जनार्दन । एका जनार्दन पूजन करी सुखें ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५५७
📿 काय पांडुरंगा सांग म
1557.
काय पांडुरंगा सांग म्या करावे | शरण कोणा जावे तुम्हांविण ॥१॥
वाट पाहतांना भागले लोचन | कठिणच मन केले तुवा ॥२॥
ऐकिली म्या कानी कीर्ति तुझी देवा | उठलासे हेवा त्याचि गुणे ॥३॥
अनाथ अन्यायी काय मी करीन | दयावंत खूण सांगसी तू ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५५७
📿 संता निंदी जो पामर ।
1557.
संता निंदी जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मी ॥१॥
त्यांसी करिता संभाषण । करावे सचैल ते स्नान ॥२॥
तयांसी येऊ न द्यावे घरां । आपण जाऊ नये द्वारा ॥३॥
एका जनार्दनी शरण । त्यांचे न पहावे वदन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५५८
📿 लटिका तो प्रपंच एक ह
1558.
लटिका तो प्रपंच एक हरी साचा । हरीविण आहाच सर्व इंद्रिये ॥१॥
लटिके ते मौन्य भ्रमाचे स्वप्न । हरीविण ध्यान नश्वर आहे ॥धृपद॥
लटिकिया वित्पत्ति हरीविण करिती । हरी नाही चित्ती तो शव जाणा ॥२॥
तुका म्हणे हरी हे धरिसी निर्धारी । तरी तू झडकरी जासी वैकुंठासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५५८
📿 संतांची जो निंदा करि
1558.
संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती ॥१॥
तयाच्या विटाळा घ्यावें प्रायश्चित । आणिक दुजी मात नाही ॥२॥
तयाचे वचन नायकावें कानी । हो का ब्रह्माज्ञानीं पूर्ण ज्ञाता ॥३॥
एका जनार्दनी ऐसे जे पामर । भोगिती अघोर रवरव नरक ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५५९
📿 मयुरध्वज राजा महापाप
1559.
मयुरध्वज राजा महापापी जाण | उभा नारायण जोडी हात ॥१॥
कर्वत आणसि सकळा देखता | कांतिसी तत्वता मांस त्याचे ॥२॥
कपोतणी मागे पारध्याचा वेष | दावी हृषिकेश रूप त्यासी ॥३॥
नामा म्हणे तुझे करणे उचित | का मज प्रचित न ये देवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५६१
📿 लटिके ते ज्ञान लटिके
1561.
लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाही ॥१॥
लटिकाचि दंभ घातला दुकान । चाळविले जन पोटासाठी ॥ध्रु.॥
लटिकेचि केले वेदपारायण । जरि नाही स्फुंदन प्रेम कथे ॥२॥
लटिके ते तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५६१
📿 नांदतसें नाम आकाश पा
1561.
नांदतसें नाम आकाश पाताळीं । सर्व भुमंडळीं व्याप्त असे ॥१॥
पाताळ भेदोनी व्याप्त ठेले पुढे । नाही त्यासी आड कोठे कांही ॥२॥
चौर्याशीं भोगिती दुर्मती पामर । संतांसी साचार शरण न जाती ॥३॥
एका जनार्दनी नाम अविनाश । संतसंगे दोष सर्व जाती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५६२
📿 भूती भगवद्भाव । मात्
1562.
भूती भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥
ऐसी गर्जती पुराणे । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणे । अनुभवे निर्भर ॥धृपद॥
माझे तुझे हा विकार । निरसता एकंकार । न लगे काही फार । विचाराचि करणे ॥२॥
तुका म्हणे दुजे । हे तो नाही सहजे । संकल्पाच्या काजे । आपे आप वाढले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम›
📿 अभंग क्र. १५६२
📿 तुवा येथे यावे की मज
1562.
तुवा येथे यावे की मज तेथे न्यावे | खंती माझ्या जीवे मांडियेली ॥१॥
माझे तुजविण येथे नाही कोणी विचारावे मनी पांडुरंगा ॥२॥
नामा म्हणे वेगी यावे करुणाघना | जातो माझा प्राण तुजलागी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५६३
📿 नेणे फुंको कान । नाह
1563.
नेणे फुंको कान । नाही एकातीचे ज्ञान ॥१॥
तुम्ही आइकाहो संत । माझा सादर वृत्तांत ॥धृपद॥
नाही देखिला तो डोळा । देव दाखवू सकळा ॥२॥
चिंतनाच्या सुखे । तुका म्हणे नेणे दुःखे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५६३
📿 संताची जो निंदी देवा
1563.
संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे ॥१॥
देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ॥२॥
कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्यसदनीं पदवी पावे ॥३॥
एका जनार्दनी गूज सांगे कानी । रहा अनुदिनी संतसंगे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५६४
📿 त्याग तरी ऐसा करा ।
1564.
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावे ॥१॥
मग जैसा तैसा राहे । कव्य पाहे उरले ते ॥धृपद॥
अंतरीचे विषम जाड । येऊ पुढे न दयावे ॥२॥
तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५६७
📿 मान इच्छी तो अपमान प
1567.
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥
एकाचिये अंगी दुजियाचा वास । आशा पुढे नाश शुद्ध करी ॥धृपद॥
अधीक फळासी कोठे पावो शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥
तुका म्हणे राजहंस ढोरा नावे । काय तया घ्यावे अळंकाराचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५६७
📿 हरिप्राप्तीसी उपाय ।
1567.
हरिप्राप्तीसी उपाय । धरावें संतांचे ते पाय ॥१॥
तेणे साधती साधने । तुटतीं भवांचीं बंधनें ॥२॥
संताविण प्राप्ति नाही । ऐशी वेद देत ग्वाही ॥३॥
एका जनार्दनी संत । पूर्ण करिती मनोरथ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५६८
📿 संसारापासूनि कैसे सो
1568.
संसारापासूनि कैसे सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जालो । करिता न सरे अधिक वाढ पाही ।
तृष्णा देशधडी केलो । भक्तीभजनभाव यांसी नाही ठाव । चरणी तुझ्या अंतरलों ।
मागे पुढे रीग न पुरे चि पाहाता । अवघा अवघी वेष्टिलो ॥१॥
आता माझी लाज राखे नारायणा । हीन दीन लीन याचकाची ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५६८
📿 दुजा नाहींजया भाव ।
1568.
दुजा नाहींजया भाव । अवघा देव विठ्ठल ॥१॥
आणिक कांही नाही चंद्र । नाम गोविंद सर्वदा ॥२॥
नाना मंता करिती खंड । छेदिती पाखांड अंतरीचे ॥३॥
एका जनार्दनी तेचि संत । उदार कृपावंत दयाळू ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५६९
📿 नाम घेता उठाउठी । हो
1569.
नाम घेता उठाउठी । होय संसारासी तुटी ॥१॥
ऐसा लाभ बांधा गाठी । विठ्ठलपायी पडे मिठी ॥धृपद॥
नामापरते साधन नाही । जे तू करिशी आणिक काही ॥२॥
हाकारोनि सांगे तुका । नाम घेता राहो नका ॥३॥