🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६१३
📿 संतसंगती न करावा वास
2613.
संतसंगती न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥
मग तया दोषा नाही परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥
तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरी धरून राहे रूप ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६१४
📿 जे ज्याचे जेवण । तेच
2614.
जे ज्याचे जेवण । तेचि याचकासी दान ॥१॥
आता जाऊ चोजवीत । जेथे वसतील संत ॥धृपद॥
होती धाली पोटे । मागे उरली उच्छिष्टे ॥२॥
तुका म्हणे धाव । पुढे खुंटईल हाव ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६१५
📿 धरावा तो बरा । ठाव व
2615.
धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥१॥
निजलिया जागविती । निज पुरवूनि देती ॥धृपद॥
एक वेवसाव । त्यांचा संग त्याचा जीव ॥२॥
हिते कळे हित । ग्वाही एक एका चित्त ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८›
📿 अभंग क्र. २६१५
📿 वेदपाठक - अभंग २६१५
2615.
वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८
वेदविधि कांही न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥
दशग्रंथी ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥
सर्व ब्रह्मरुप ऐसे बोले वेद । तेथे वादावाद उरला नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८›
📿 अभंग क्र. २६१६
📿 वेद बोलिला जो जो गुण
2616.
वेद बोलिला जो जो गुण । तो तो नव्हेची पठण ॥१॥
वेदें सांगितले न करी । ब्रह्माद्वेषीं दुराचारी ॥२॥
न करा सुरापान । कन्या-गो-विक्रय जाण ॥३॥
ऐसे वेदाची मर्यादा । न कळेचि मतिमंदा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६१८
📿 आता तळमळ । केली पाहि
2618.
आता तळमळ । केली पाहिजे शीतळ ॥१॥
पाहा करील ते देव । पायी ठेवुनिया भाव ॥धृपद॥
तोचि अन्नदाता । नाही आणिकाची सत्ता ॥२॥
तुका म्हणे दासा । नुपेक्षील हा भरवसा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८›
📿 अभंग क्र. २६१८
📿 वेदशास्त्र वक्ता अति
2618.
वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धान्त बोलता उरीं ठेवी कांही ।
लयलक्ष ध्यान मुद्रा दावी आपुलें ठायी । वेडे वेडे चार करिता मोक्ष न ये हाता ॥१॥
तो खूण वेगळी विरळा जाणे एक । जाणीव ग्रासोनी त्यासी बाणे देख ॥धृ.॥
अष्टांग योग जाणे मंत्र तंत्र कळा । प्रबोध भक्तीनें वश्य सिद्धि सकळा ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२०
📿 माझ्या इंद्रियांसी ल
2620.
माझ्या इंद्रियांसी लागले भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥१॥
करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुष्काळ पडिला थोर ॥धृपद॥
गुण गाय मुख आइकती कान । आमचे कारण तैसे नव्हे ॥२॥
दरुषणे फिटे नेत्रांचा पाग । जेथे ज्याचा भाग घेईल ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५›
📿 अभंग क्र. २६२०
📿 भांडाचें तोंड भांड प
2620.
भांडाचें तोंड भांड पुराण । वरी शिमग्याचा सण ॥१॥
काय उणें मग भांडा । बोलती वाउगें ते तोंडा ॥२॥
वेद शास्त्र नीति नाही । सैरावैरा बोलणें पाही ॥३॥
एका जनार्दनी पाषांड । म्हणोनि फोडो त्याचे तोंड ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२१
📿 सिद्धीचा दास नव्हे श
2621.
सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥१॥
सर्व सुख असे माझिये मानसी । राहिले तयासी नाश नाही ॥धृपद॥
तेणे पुण्य पाप न देखे लोचनी । आणिका वाचूनि पांडुरंगा ॥२॥
न करी मी आस साधनी सायास । भक्तीप्रेमरस सांडूनिया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५›
📿 अभंग क्र. २६२१
📿 सांगे ब्रह्माज्ञान ग
2621.
सांगे ब्रह्माज्ञान गोष्टी । माते पाहता होती कष्टी ॥१॥
काय ज्ञान ते जाळावें । वदन तयाचे ते न पाहावें ॥२॥
करी कथा सांगे पुराण । वाया मिरवी थोरपण ॥३॥
जन्मला जिचें कुशीं । तिसी म्हणे अवदसा ऐसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२२
📿 जन्मा येऊनि तया लाभ
2622.
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥
संसारदुःखे नासिली तेणे । उत्तम हे केणे नामघोष ॥धृपद॥
धन्य तेचि संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव ठाकियेला ॥२॥
प्रेमदाते तेच पतितपावन । धन्य दरुषन होय त्याला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५›
📿 अभंग क्र. २६२२
📿 आवाडीने माता बोले बा
2622.
आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥
सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥
बैसोनी बाजारीं सांगे ज्ञान गोष्टी । मातेसी करंटी म्हणे नष्ट ॥३॥
एका जनार्दनी ते जन अधम । चौर्याशीं लक्ष जन्म भोगिताती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२३
📿 काय दिवस गेले अवघे च
2623.
काय दिवस गेले अवघे चि वराडे । ते आले साकडे कथेमाजी ॥१॥
क्षण एके ठायी मन स्थिर नाही । अराणूक कइ होईल पुढे ॥धृपद॥
कथेचे विसर दोषामूळे होय । तरणोपाय कैचा मग ॥२॥
काय ते सांचवुनि उरले हे मागे । घटिका एक संगे काय गेले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५›
📿 अभंग क्र. २६२३
📿 सांगे बहु सोपया गोष्
2623.
सांगे बहु सोपया गोष्टी । करू नेणो तो हातवटी ॥१॥
ऐसे याचे नको ज्ञान । ज्ञान नोहें ते पतन ॥२॥
सांगे लोका उपदेश । आपण नेणे तो सायास ॥३॥
शरण एका जनार्दनी । त्याची अमंगळ वाणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२४
📿 शुद्धाशुद्ध निवडे कै
2624.
शुद्धाशुद्ध निवडे कैसे । चर्म मास भिन्न नाही ॥१॥
काही अधिक नाही उणे । कवण्या गुणे देवासी ॥धृपद॥
उदक भिन्न असे काई । वोहोळ बावी सरिता नई ॥२॥
सूर्य तेजे निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५›
📿 अभंग क्र. २६२४
📿 सांडोनी आचार करती अन
2624.
सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार न कळे ज्यांसी ॥१॥
वाहाती भार वेदाचा आधार । शास्त्रांचा संभार सांगताती ॥२॥
पुराण व्युप्तत्ती वाउग्या त्या कथा । सांगती सर्वथा हितपर ॥३॥
एका जनार्दनी अनुभवावांचुनीं । कोरडी ती कहाणी ब्रह्माज्ञान ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२५
📿 न धरी प्रतिष्ठा कोणा
2625.
न धरी प्रतिष्ठा कोणाचीहि यम । म्हणता का रे राम लाजा झणी ॥१॥
सापडे हातीचे सोडवील काळा । तो का वेळोवेळा नये वाचे ॥धृपद॥
कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥
तुका म्हणे हित तो म्हणा विठ्ठल । न म्हणेल तो भोगील कळेल ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५›
📿 अभंग क्र. २६२५
📿 येवढा मंत्र सोपा सां
2625.
येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासी । का रे प्रपंचासी गुंतुनीं पडसी ॥१॥
वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल । अंतरींचे बोल सर्व वाया ॥२॥
वृंदावनाचे परी वर वर रेखा । तैसे पढतमूर्खा वेद गोष्टी ॥३॥
एका जनार्दनी प्रपंच टाकुनीं । परमार्थ साधनी रिघे वहिला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२६
📿 म्हणविता हरी न म्हणे
2626.
म्हणविता हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥
आयुष्यधन त्याचे नेले यमदूती । भुलविला निश्चिंती कामरंगे ॥धृपद॥
नावडे ती कथा देऊळासी जाता । प्रियधनसुता लक्ष तेथे ॥२॥
कोण नेतो तया घटिका दिवसा एका । का रे म्हणे तुका नागविसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५›
📿 अभंग क्र. २६२७
📿 त्यागूनियां स्त्री स
2627.
त्यागूनियां स्त्री संन्यासी जे होती । पतना ते जाती अंतकाळीं ॥१॥
घेउनी संन्यास ध्यान पै स्त्रियांचे । गुंतलासे आशे वाया जाये ॥२॥
नारायण नामी नाही पै आचार । सर्व अनाचार स्त्रीतें लक्षी ॥३॥
एका जनार्दनी संन्यास लक्षण । गीतेमाजीं कृष्ण बोलियेला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२८
📿 कळो आले तुझे जिणे ।
2628.
कळो आले तुझे जिणे । देवा तू माझे पोसणे ॥१॥
वाट पाहासी आमुची । सत्ता सतत कईची ॥धृपद॥
बोलाविता यावे रूपा । सदा निर्गुणीचि लपा ॥२॥
तुका म्हणे तू परदेशी । येथे आम्हा अंगे जिसी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६२९
📿 आता येथे लाजे नाही त
2629.
आता येथे लाजे नाही तुझे काम । जाय मज राम आठवू दे ॥१॥
तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलो या अंकित दुर्जनाचा ॥धृपद॥
माझे केले मज पारिखे माहेर । नष्ट तु साचार चाळविले ॥२॥
सुखासाठी एक वाहियेले खांदी । तेणे बहु मांदी मेळविली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६३०
📿 आजिवरी होतो तुझे सत्
2630.
आजिवरी होतो तुझे सत्ते खाली । तोवरी त्वा केली विटंबणा ॥१॥
आता तुज राहो नेदी या देशांत । ऐसा म्या समर्थ केला धणी ॥धृपद॥
सापे रिग केला कोठे बाळपणी । होतीसी पापिणी काय जाणो ॥२॥
तुका म्हणे म्या हा बुडविला वेव्हार । तुझेचि ढोपर सोलावया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५›
📿 अभंग क्र. २६३१
📿 षडवैरियांचा करावा आध
2631.
षडवैरियांचा करावा आधी नाश । मग सुखें संन्यास घ्यावा जगी ॥१॥
आशा मनीषा यांचा तोडोनियां पाश । मग मुखे संन्यास घ्यावा आधी ॥२॥
एका जनार्दनी संकल्पाचा त्याग । सुखें संन्यास मग घ्यावा आधी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६३२
📿 का रे तुम्ही निर्मळ
2632.
का रे तुम्ही निर्मळ हरीगुण गाना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जाना ॥१॥
काय गणिकेच्या याती अधिकार मोठा । पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठा ॥धृपद॥
ऐसे नेणो मागे किती अनंत अपार । पंच महादोषी त्यांच्या पातका नाही थार ॥२॥
पुत्राचिया लोभे नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचे पुण्य ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५›
📿 अभंग क्र. २६३२
📿 संन्यासी करी गृहस्था
2632.
संन्यासी करी गृहस्थाश्रम । तेथे तया अधर्म वोढवला ॥१॥
करपात्रीं भिक्षा हाचि त्याचा धर्म । न करिता अधर्म स्वये जोडे ॥२॥
नाश करावे षड्वैरी नेमे । तया संन्यास कर्मे म्हणिजेती ॥३॥
एका जनार्दनी गृहस्थाची बरा । फजिती बाजारा उभ्या होय ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५›
📿 अभंग क्र. २६३३
📿 नुपजे अनुताप ज्ञान ।
2633.
नुपजे अनुताप ज्ञान । काय घेउनी विज्ञान ॥१॥
अनुतापाविण । व्यर्थ संन्यास ग्रहण ॥२॥
संन्यास घेतलिया पाठी । काम नुपजावा पोटी ॥३॥
ऐसे संन्यास लक्षण । एका जनार्दनी खुण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६३४
📿 नाही भ्यालो तरी पावल
2634.
नाही भ्यालो तरी पावलो या ठाया । तुम्हा आळवाया जविळके ॥१॥
सत्ताबळे आता मागेन भोजन । केले ते चिंतन आजिवरी ॥धृपद॥
नवनीतासाठी खादला हा जीव । थोड्यासाठी कीव कोण करी ॥२॥
तुका म्हणे ताक न लगे हे घाटे । पांडुरंगा खोटे चाळवण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६३५
📿 सारीन ते आता एकाचि भ
2635.
सारीन ते आता एकाचि भोजने । वारीन मागणे वेळोवेळा ॥१॥
शेवटींचा घास गोड करी माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥धृपद॥
वंचू नये आता काहीच प्रकार । धाकल्याचे थोर झाल्यावरी ॥२॥
तुका म्हणे पोटी बहु झाला वाव । काही नेदी ठावे उरो मागे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६३६
📿 पोट धाले मग न लगे पं
2636.
पोट धाले मग न लगे पंगती । झालिया निश्चिंती खेळ गोड ॥१॥
आपुलिया हाते देई वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥धृपद॥
घराचा विसर होईल आनंद । नाचेन मी छंदे प्रेमाचिया ॥२॥
तुका म्हणे तोचिवरी करकर । मग हे उत्तर खंडईल ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६३७
📿 बोलविसी तरी । तुझ्या
2637.
बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरी ॥१॥
काही कोड कवतुके । हाती द्यावया भातुके ॥धृपद॥
बोलविसी तैसे । करीन सेवक सरिसे ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे चळण तुज सेवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६३८
📿 दिला जीवभाव । तेव्हा
2638.
दिला जीवभाव । तेव्हा सांडिला म्या ठाव ॥१॥
आता वर्ते तुझी सत्ता । येथे सकळ अनंता ॥धृपद॥
माझीया मरणे । तुम्ही बैसविले ठाणे ॥२॥
तुका म्हणे काही । मी हे माझे येथे नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१›
📿 अभंग क्र. २६३८
📿 आष्टांग साधन मौनी जट
2638.
आष्टांग साधन मौनी जटाधारी । एक चरणावरी करती तप ॥१॥
वायु ते आहार असती दिंगबर । परि न कळे विचार देव कोठे ॥२॥
कैशी तया भ्रांती असोनी देव जवळा । रिगती साधन कळा हुडाकिती ॥३॥
एका जनार्दनी तया नाही सुख । संतांवांचुनी देख मार्ग न लागें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१›
📿 अभंग क्र. २६३९
📿 विसरुनी विठोबासी । भ
2639.
विसरुनी विठोबासी । भरले हव्यासी साधन ॥१॥
काय त्यांचा कले मंत्र । कोण पवित्र म्हणे तया ॥२॥
दाविती वरी वरी भक्ति । अंतरी युक्ति वेगळीच ॥३॥
एका जनार्दनी जप । वाउगें तप करितो ते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६४०
📿 आता द्यावे अभयदान ।
2640.
आता द्यावे अभयदान । जीवन ये कृपेचे ॥१॥
उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकी ॥धृपद॥
नाभी नाभी या उत्तरे । करुणाकरे शांतवीजे ॥२॥
तुका म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१›
📿 अभंग क्र. २६४१
📿 जीवाचे जीवन जनी जनार
2641.
जीवाचे जीवन जनी जनार्दन 2641
जीवाचे जीवन जनी जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देही ॥१॥
वाउगी का वाया शिणती बापुडीं । काय तया जोडी हाती लागे ॥२॥
पंचाग्रि साधन अथवा धूम्रपान । तेणे काय संपूर्ण हरी जोडे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६४२
📿 बहुजन्मे सोस केला ।
2642.
बहुजन्मे सोस केला । त्याचा झाला परिणाम ॥१॥
विठ्ठलसे नाम कंठी । आवडी पोटी संचिते ॥धृपद॥
येथुन तेथवरी आता । न लगे चिंता करावी ॥२॥
तुका म्हणे धाले मन । हेचि दान शकुनाचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४›
📿 अभंग क्र. २६४३
📿 तीर्थी - अभंग २६४३ त
2643.
तीर्थी - अभंग २६४३ ते २६४४
तीर्था जाती उदंड । त्याचे 2643
तीर्था जाती उदंड । त्याचे पाठीमागें तोंड ॥१॥
मन वासना ठेउनी घरी । तीर्थां नेली भांडखोरी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६४४
📿 तुम्हासी हे अवघे ठाव
2644.
तुम्हासी हे अवघे ठावे । किती द्यावे स्मरण ॥१॥
का बा तुम्ही ऐसे नेणे । निष्ठुर पणे टाळितसा ॥धृपद॥
आळविता मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥
तुका म्हणे जगदीशा । काय असा निजले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४›
📿 अभंग क्र. २६४४
📿 केले तुवा काय जाऊनिय
2644.
केले तुवा काय जाऊनिया तीर्था । सर्वदा विषयार्था भुललासी ॥१॥
मनींची ती पापें नाही धोवियेली । वृत्ति हे लाविली संसारींच ॥२॥
तीर्थस्नानें अंग तरी शुद्ध केले । नाही धोवियेलें अंतरासी ॥३॥
वरी दिससी शुद्ध अंतरी मलीन । तोवरीं हे स्नान व्यर्थ होय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६४५
📿 नेले सळेंबळे । चित्त
2645.
नेले सळेंबळे । चित्तावित्ताचे गांठोळे ॥१॥
साह्य झाली घरिच्या घरी । होता ठायींच कुठोरी ॥धृपद॥
मी पातलो या भावा । कपट ते नेणे देवा ॥२॥
तुका म्हणे उघडे केले । माझे माझ्या हाते नेले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६४६
📿 झाला हा डांगोरा । मु
2646.
झाला हा डांगोरा । मुखी लहानही थोरा ॥१॥
नागविलो जनाचारी । कोणी बैसो नेदी दारी ॥धृपद॥
संचिताचा ठेवा । आता आला तैसा घ्यावा ॥२॥
तुका म्हणे देवे । केले आता हे बरवे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६४७
📿 किती चौघाचारे । येथे
2647.
किती चौघाचारे । येथे गोविली वेव्हारे ॥१॥
असे बांधविले गळे । होऊ न सकती निराळे ॥धृपद॥
आपले आपण । केले का नाही जतन ॥२॥
तुका म्हणे खंडदंडे । येरझारी लपती लंडे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुक्त - अभंग २६४७›
📿 अभंग क्र. २६४७
📿 मुक्त - अभंग २६४७
2647.
मुक्त - अभंग २६४७
आम्ही मुक्त म्हणोनि विचरती महीं । मुक्त ही पदवी नाही अंगी ॥१॥
सैर धांवे मन नाही पै अटक । मुक्तज्ञान मौक्तिक वाया जाय ॥२॥
भूतमात्रीं द्रोही करिती नानापरी । वेदशास्त्र निर्धारी ठाउकें नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४›
📿 अभंग क्र. २६४८
📿 वैराग्य - अभंग २६४८
2648.
वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४
काय ते वैराग्य बोकडाचे परी । भलतीया भरीं पडतसे ॥१॥
काय ती समाधी कुकुटाचे परी । पुढेंचि उकरी लाभ तेणे ॥२॥
बैसोनी आसनी वाउगें ते ध्यान । सदां लक्ष्मी मान आपुलाची ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६४९
📿 ठेवूनि इमान राहिलो च
2649.
ठेवूनि इमान राहिलो चरणी । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥
आम्हासी भांडार करणे जतन । आले गेले कोण उंच निच ॥धृपद॥
करूनि सांभाळी राहिलो निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥
तुका म्हणे योग्यायोग्य हे विनीत । देवा नाही येथे चित्त देणे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६५०
📿 आता नव्हे गोड करिता
2650.
आता नव्हे गोड करिता संसार । आणीक संचार झाला माजी ॥१॥
ब्रम्हरसे गेले भरूनिया अंग । आधील तो रंग पालटला ॥धृपद॥
रसनेचिये रुची कंठी नारायण । बैसोनिया मन निवविले ॥२॥
तुका म्हणे आता बैसलो ठाकणी । इच्छेची ते धणी पुरईल ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४›
📿 अभंग क्र. २६५१
📿 मुखी वसे ब्रह्माज्ञा
2651.
मुखी वसे ब्रह्माज्ञान । चित्ती चिंती धनमान ॥१॥
ऐसे ठक जे पतित । तया साधन स्वहित ॥२॥
स्त्रीसंगी सदा सक्त । वदनी गोष्टी परमार्थ ॥३॥
एका जनार्दनी तया । देव भेटेल कासया ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६५२
📿 पडिली हे रूढि जगा पर
2652.
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥१॥
मरणाची का रे नाही आठवण । संचिताचे धन लोभ हेवा ॥धृपद॥
देहाचे भय ते काळाचे भातुके । ग्रासूनि ते एके ठेविलेसे ॥२॥
तुका म्हणे काही उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊ नका ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६५३
📿 हित नाही ठावे जननी ज
2653.
हित नाही ठावे जननी जनका । दाविला लौकीकचार तीही ॥१॥
अंधळ्याचे काठी लागले अंधळे । घात एक वेळे पुढे मागे ॥धृ॥
न धरावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥
तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहाती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६५४
📿 जेथे पाहे तेथे कांडि
2654.
जेथे पाहे तेथे कांडिती भूस । चिपाडे चोखूनि पाहाती रस ॥१॥
काय सांगो देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कीव ॥धृपद॥
वैकुंठीचे मोटळे लटिकेचि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥२॥
तुका म्हणे का उगेचि खोल । जवळी दाखवी आपणा बोल ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६५५
📿 जाणिवेच्या भारे चेंप
2655.
जाणिवेच्या भारे चेंपला उर । सदा बुरबुर सरेचि ना ॥१॥
किती याचे ऐको कानी । मारिले घाणी नाळकरी ॥धृपद॥
मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥२॥
तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करू तरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोसावी - अभंग २६५५ ते २६६०›
📿 अभंग क्र. २६५७
📿 आम्ही जाहालों गोसावी
2657.
आम्ही जाहालों गोसावी । आमची विभूत चालवावी ॥१॥
भांग भुरका हे साधन । शिष्य मिळाले चहुकोन ॥२॥
हे तो सोंगाचे साधन । राजी नाही जनार्दन ॥३॥
एका जनार्दनी भाव । भाव तेथे वसे देव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोसावी - अभंग २६५५ ते २६६०›
📿 अभंग क्र. २६५८
📿 आम्ही योग साधियेला ।
2658.
आम्ही योग साधियेला । भांग भुरका तो आणला ॥१॥
योग कळे तया मूढा । साधन काय ते दगडा ॥२॥
आंत काळा बाहेर काळा । माप नाही अमंगळा ॥३॥
एका जनार्दनी ते पामर । साधन साधिती ते खर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६६०
📿 दूरि तोचि होतो आपुले
2660.
दूरि तोचि होतो आपुले आशंके । नव्हते ठाउके मूळ भेद ॥१॥
आता जेथे तेथे येइन सांगाते । लपाया पुरते उरो नेदी ॥धृपद॥
मिथ्या मोहो मज लाविला उशीर । तरी हे अंतर झाले होते ॥२॥
तुका म्हणे का रे दाखविसी भिन्न । लटिकाचि सीण लपंडाई ॥३॥