देव पुजिती आपुले भक्
2253.
देव पुजिती आपुले भक्ता । मज वाढविले म्हणे उचिता ॥१॥
ऐसा मानी उपकार । देव भक्ति केला थोर ॥२॥
देवाअंगी नाही बळ । भक्त भक्तीनें सबळ ॥३॥
देव एक देशी वसे । भक्त नांदती समरसें ॥४॥
भक्तांची देवा आवडी । उणें पडों नेदी अर्ध घडी ॥५॥
नाही लाज अभिमान देवा । एका जनार्दनी करी सेवा ॥६॥
