🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४०२
📿 उतरलो पार । सत्य झाल
402.
उतरलो पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥
तुझे नाम धरिले कंठी । केली संसारासी तुटी ॥धृपद॥
आता नव्हे बाधा । कोणेविशी काही कदा ॥२॥
तुका म्हणे काही । आता उरले ऐसे नाही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ४०२
📿 धन्य पंढरीचे सकळही ज
402.
धन्य पंढरीचे सकळही जन|जिही सख्य केले विठ्ठलपायी ॥१॥
विठ्ठल हा ध्यानी विठ्ठल हा मनी|विठ्ठल चिंतनी रात्रंदिवस॥२॥
विठ्ठलेविण जया न गमे एक घडी|सर्वस्वे आवडी विठ्ठलाची॥३॥
विठ्ठलची माता विठ्ठलचि पिता|भगिनी आणि भ्राता विठ्ठल ज्यांचा॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ४०३
📿 पंढरीचे जन अवघे पावन
403.
पंढरीचे जन अवघे पावन|ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥
विठ्ठलनामे घेणे विठ्ठलनामे देणें|विठ्ठलनामे करणे सकळ काम ॥२॥
विठ्ठलनामे क्रिया विठ्ठलनामे कर्म|हाचि प्रिय धर्म जया चित्ता ॥३॥
सभराभरित विठ्ठल मागे पुढे|जिकडे जाती तिकडे विठ्ठलचि ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४०४
📿 नाही निर्मळ जीवन । क
404.
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥
तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥धृपद॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥
वांझा न होती लेकुरे । काय करावे भ्रातारे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४०५
📿 नवा नवसांची । झालो त
405.
नवा नवसांची । झालो तुह्मासी वाणीची ॥१॥
कोण तुझे नाम घेते । देवा पिंडदान देते ॥धृपद॥
कोण होते मागे पुढे । दुजे बोलाया रोकडे ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतोसि वोसंगा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४०६
📿 एका बीजा केला नास ।
406.
एका बीजा केला नास । मग भोगिले कणीस ॥१॥
कळे सकळा हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥धृपद॥
लाभ नाही फुकासाठी । केल्यावीण जीवासाठी ॥२॥
तुका म्हणे रणी । जीव देता लाभ दुणी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ४०६
📿 अनंत तीर्थांचे माहेर
406.
अनंत तीर्थांचे माहेर|अनंत रूपांचे हे सार|अनंता अनंत अपार| तो हा कटी कर ठेवूनि उभा॥१॥
धन्य धन्य पांडुरंग|सकळ दोषा होय भंग|पूर्वज उद्धरती सांग| पंढरपूर देखिलिया॥२॥
निरा भिवरा पडता दृष्टी|स्नान करिता शुद्ध सृष्टी|अंती तो वैकुंठप्राप्ति|ऐसे परमेष्टि बोलिला॥३॥
तेथे एक शीत दिधल्या अन्न|कोटी कुळांचे होय उद्धरण|कोटि याग केले पूर्ण| ऐसे महिमान ये तीर्थींचे॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ४०६
📿 अविनाश क्षेत्र पंढरी
406.
अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वर्ता नये मना ॥१॥
सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथे उभा पाहे पांडुरंग ॥२॥
आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाही पै तत्त्वतं यया तीर्थो ॥३॥
करावे ते स्नान पुंडलीक वंदन । देखावें चरण विठोबाचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४०७
📿 आयुष्य गेले वायाविण
407.
आयुष्य गेले वायाविण । थोर झाली नागवण ॥१॥
आता धावाधाव करी । काय पाहातोसि हरी ॥धृपद॥
माझे तुझे याचि गती । दिवस गेले तोंडी माती ॥२॥
मन वाव घेऊ नेदी । बुडवू पाहे भवनदी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ४०७
📿 ऐसे तीर्थ कोणी दाखवा
407.
ऐसे तीर्थ कोणी दाखवा गोमटें|जेथे प्रत्यक्ष भेटे परब्रह्म॥१॥
कोठे ऐसे क्षेत्र आहे त्रिभुवनींसकळा शिरोमणि चंद्रभागा॥२॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवावें|देखतांचि सुख पावे मन॥३॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवा साजिरें|सदा प्रेमपुरे वोसंडत॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ४०७
📿 भाविकांसी नित्य नवें
407.
भाविकांसी नित्य नवें हे सोपारे । पंढरी उच्चार करिता वाचे ॥१॥
हो कं अनामिक अथवा शुद्ध वर्ण । ज्ञातीसी कारण नाही देवा ॥२॥
एका जनार्दनी भलती ज्ञाती असो । परी पांडुरंग वसो हृदयमाजीं ॥३॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ४०८
📿 शेषाचे शिखरी विराट न
408.
शेषाचे शिखरी विराट नगरी नांदे मही सुंदरी ।
ते गर्भी मकरी सुधामृत-झरी चंद्रावती दूसरी॥
तीच्या पैलतिरी उभा विटवर ब्रह्मांड संस्था भरी ।
ऐसी पुण्यपुरी नसेल दुसरी ते पंढरी भूवरी॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४०८
📿 सोसोनि विपत्ती । जोड
408.
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हाती ॥१॥
त्याचा हाचि उपकार । अंती आम्हाशी वेव्हार ॥धृपद॥
नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणते देव ॥२॥
तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ४०८
📿 पिकली पंढरी पिटिला ध
408.
पिकली पंढरी पिटिला धांडोरा । केणे आले घरा सभागियांच्या ॥१॥
चंद्रभागे तीरीं उतरले बंदर । आले सवदागर साधुसंत ॥२॥
वैष्णव मिळोनि केला असे सांठा । न घेतो करंटा अभागीया ॥३॥
एका जनार्दनी आले गिर्हाईक । वस्तु अमोलिक सांठविली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४०९
📿 आपुले मागता । काय ना
409.
आपुले मागता । काय नाही आम्हा सत्ता ॥१॥
परि या लौकिकाकारणे । उरी ठेविली बोलणे ॥धृपद॥
येचि आता घडी । करू बैसो तेची फडी ॥२॥
तुका म्हणे करितो तुला । ठाव नाहीसे विठ्ठला ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ४०९
📿 सांडूनि पंढरी जासी आ
409.
सांडूनि पंढरी जासी आणिका तीर्था|लाज तुझ्या चित्ता कैशी नये ॥१॥
त्रिभुवनींची तीर्थे जाली ती मळीन|व्हावया पावन आली येथे ॥२॥
एवढा ब्रह्मानंद कैंचा आणिका ठायीं|जो या आहे पायी विठोबाच्या ॥३॥
काळ मृत्यु दोन्ही घालोनि पायांतळीं|वाजविल्या टाळी कीर्तनसंगे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ४०९
📿 सप्तपुर्यांमांजी पं
409.
सप्तपुर्यांमांजी पंढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ॥१॥
देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचे म्हणता ॥२॥
आणिक कांही नको यापरतें साधन । विठ्ठल निधान टाकुनियां ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठला वांचुनी । आन नेणे मनी दुजे कांही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४१०
📿 असो आता किती । तुज य
410.
असो आता किती । तुज यावे काकुलती ॥१॥
माझे प्रारब्ध हे गाढे । तू बापुडे तयापुढे ॥धृपद॥
सोडवीन आता । ब्रीदे तुझे पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे बळी । गांढयाचे कान पिळी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४११
📿 काय नोहे केले । एका
411.
काय नोहे केले । एका चिंतिता विठ्ठले ॥१॥
सर्व साधनांचे सार । भवसिंधु उतरी पार ॥धृपद॥
योगायाग तपे । केली तयाने अमुपे ॥२॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्री अक्षरी सोपा ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 ईतर संतांच्या आरत्या›
📿 अभंग क्र. ४१२
📿 गण गण गणात बोते । हे
412.
गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।
या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवित रहा याते ।
हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राचि योग्यता याते ।
हे संजिवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४१२
📿 हो का दुराचारी । वाच
412.
हो का दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥
त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेसहित ॥धृपद॥
नसो भाव चित्ती । हरीचे गुण गाता गीती ॥२॥
करी अनाचार । वाचे हरीनामउच्चार ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ४१२
📿 पंढरीची युगसंख्या
412.
पंढरीची युगसंख्या
कृत त्रेता द्वापार कली |ऐसा चौयुगांचा मेळी |ते महायुग शब्द आढळी| वेदांतशास्त्री ॥१॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांतर |तैसीच रात्र एक सहस्त्र |तीसा दिवसांचा प्रखर | एक मास ॥२॥
ऐसे बारा मास| त्याचे एक वरुष |शतभरी आयुष्य| ब्रह्मयाचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ४१२
📿 तयाचे संगती अपार । व
412.
तयाचे संगती अपार । विश्रांती घर पंढरी ॥१॥
म्हणोनि वारकारी भावे । जाती हावें पंढरीसी ॥२॥
योगयाईं जो न संपडे । तो पुंडलिका पुढे उभा असे ॥३॥
शोभे चंद्रभागा उत्तम । धन्य जन्म जाती तेथे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 ईतर संतांच्या आरत्या›
📿 अभंग क्र. ४१४
📿 नृसिंह सरस्वति आरती
414.
नृसिंह सरस्वति आरती १
कृष्णापंचगंगासंगम निजस्थान । चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन ।
तेथे भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरूपे तया दिधले दर्शन ॥१॥
जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता । नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥धृ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ४१४
📿 आधी रचिली पंढरी | मग
414.
आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेंव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी | धन्य पंढरी गोमटी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 ईतर संतांच्या आरत्या›
📿 अभंग क्र. ४१५
📿 श्रीस्वामीसमर्थ आरती
415.
श्रीस्वामीसमर्थ आरती
जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था । आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा ॥धृ॥
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी । जगदुद्धारासाठी राया तू फिरसी ।
भक्तवत्सल खरा तू एक होसी । म्हणुनि शरण आलो तुझे चरणासी ॥१॥