🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 सुखलागी जरी करिसी तळ
1.
सुखलागी जरी करिसी तळमळ । तरी तू पंढरीसी जाय एक वेळ ॥१॥
तेथे अवघाची सुखरुप होसी । जन्मोजन्मींचे श्रम विसरसी ॥२॥
चंद्रभागेसी करिता स्नान । तुझे दोष पळती रानोरान ॥३॥
लोटांगण घालोनि महाद्वारी । कान धरोनि नाच गरुडपारी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत तुलसीदास निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 राम जपो, राम जपो, रा
1.
राम जपो, राम जपो, राम जपो बावरे । घोर भवनीरनिधि नाम निज नावरे ॥१॥
एकहि साधन सब रिद्धिसिद्धि साधि रे । ग्रसे कलिरोग जोग संजम समाधि रे ॥२॥
भलो जो है, पोच जो है, दाहिनो जो नाम रे ॥राम नाम ही सो अंत सबहीको काम रे ॥३॥
जग नभवाटिका रही है फल फुली रे । धुवा कैसे धौर हर देवि तु न भुली रे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत जनाबाई निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 संतभार पंढरींत । कीर
1.
संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथे असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनांत । प्रेमे हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्र्वर । नामयाचे जो जिव्हार ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 सकळ मंगळनिधी । श्रीव
1.
सकळ मंगळनिधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी ॥१॥
म्हण का रे म्हण का रे जना । श्रीविठ्ठलाचे नाम वाचे ॥२॥
पतीत पावन सांचे । श्रीविठ्ठलाचे नाम वाचे ॥३॥
बापरखुमादेविवरु साचे । श्रीविठ्ठलाचे नाम वाचे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 शिवरात्रि कथा धन्य ज
1.
शिवरात्रि कथा धन्य जे ऐकती । इच्छिले पावती सर्व काही ॥१॥
पातकांचा नाश पुण्य वाढे फार । शेखी विश्वंभर कृपा करी ॥२॥
भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान । काळ करी चरण सेवा त्यांची ॥३॥
नामा म्हणे शिव ही अक्षरे दोन्ही । जपावी सज्जनी वारंवार ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 काला अभंग प्रकरण›📂 , काला म्हणजे काय? व कसा करावा?›
📿 अभंग क्र. १
📿 गोपाळ काला व दही ह
गोपाळ काला व दही हंडी उत्सव
दहीहंडी हा सण दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला हा दहीहंडीचा सण साजरा केला जातो. देशभरात दरवर्षी दहीहंडी सण मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्रासह गुजरात, गोव्यात या सणाचा थाटमाट मोठा असतो.गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने गोकुळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 काला अभंग प्रकरण›📂 , काल्याच्या कीर्तनाचे अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 ये दशे चरित्र केले न
१ ये दशे चरित्र केले नारायणे ।
रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रुपे या रुपे अनंते ।
पुढेहि बहुते करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ग्रंथ महात्म्य›📂 ज्ञानेश्वरी महात्म्य›
📿 अभंग क्र. १
📿 वाचावी ज्ञानेश्वरी ।
1.
वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ॥१॥
ज्ञान होय अज्ञानासी । ऐसा वर या टीकेसी ॥२॥
ज्ञान होय मूढा । अति मूर्ख त्या दगडा ॥३॥
वाचील जो कोणी । जनी त्यासी लोटांगणी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण पहिले अभंग ११›
📿 अभंग क्र. १
📿 रुप पाहता लोचनी । सु
1.
रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठली आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्रीकृष्ण जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 कृष्ण जन्माचे अभंग प
1.
कृष्ण जन्माचे अभंग प्रारंभ
पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसी झाले ओझे त्यांचे ॥१॥
दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वा । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
राहियेले यज्ञ मोडिले कीर्तन । पळाले ब्राम्हण दैत्या भेणे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 वामन जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 वामन जन्माचे अभंग प्
1.
वामन जन्माचे अभंग प्रारंभ
बळीराजा दैत्य बहूत मातला । संपत्ती हरिल्या देवांचिया ॥१॥
तया काळी जे जे देव आठविती । प्रार्थना करिती देवदेवा ॥२॥
तया काळी तुवा आदिति उदरी । अवतारधारी बटू झाला ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्री राम जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 राम जन्माचे अभंग प्र
1.
राम जन्माचे अभंग प्रारंभ
कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥
धर्मशास्त्र ऐसे डोहळे पुसावे । त्यांचे पुरवावे मनोरथ ॥२॥
ऐकोनिया ऐसे आनंद मानसी । कैकयी सदनासी जाता झाला ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा›
📿 अभंग क्र. १
📿 दिवट्या छत्री घोडे ।
1.
दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यांत न पडे ॥१॥
आता येथे पंढरिराया । मज गोविसी कासया ॥२॥
मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा ॥३॥
तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धांवा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 पुंडलिक स्तुती महात्म्य›
📿 अभंग क्र. १
📿 देव गुज सांगे पंढरीस
1.
देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे ॥१॥
काया वाचा मन दृढ धरा जीवी । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥
भवसिंधु तारील घ्या रे माझी भाक । साक्ष पुंडलिक करुनि बोले ॥३॥
लटिके जरी असे नामयासी पुसा । आहे त्या भरंवसा नामी माझ्या ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रारब्ध पर अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 जे जे असेल प्रारब्धी
1.
जे जे असेल प्रारब्धी । ते न चुके कर्मकधी ।
होणार्या सारिखी बुद्धी । कर्मरेषा प्रगटे ॥१॥
न कळे पुढील होणार । भूत भविष्य हा विचार ।
कर्म धर्म तदनुसार । भोगणे लागे सर्वर्था ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 संत सदन महिमा›
📿 अभंग क्र. १
📿 संत सदन महिमा अभंग
1.
संत सदन महिमा अभंग
ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला ॥१॥
धन्य धन्य ते संतांचे सदन । जेथे लक्ष्मीसहित शोभा नारायण ॥२॥
सर्व सुखाची सुख राशी । संत चरणी भुक्ति मुक्ति दासी ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 प्रेतयात्रा/ स्मशान
1.
प्रेतयात्रा/ स्मशान यात्रेचे/निर्याणपर अभंग
धन मान बळे नाठविसी देवा । मृत्यू काळी तेंव्हा कोण आहे ॥१॥
यमाचे यमदंड बैसतील माथा । तेंव्हा तुज रक्षिता कोण आहे ॥२ ।
माय बाप बंधू तोवरी सोयरी । इंद्रिये जो वरी वाहताती ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 संत जेणे व्हावे । जग
1.
संत जेणे व्हावे । जग बोलणे साहावे ॥१॥
तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥२॥
थोरपण जेथे वसे । तेथे भूतदया असे ॥
रागे भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 सर्प भारुड›
📿 अभंग क्र. १
📿 स्वरूपमंदिरी होते मी
1.
स्वरूपमंदिरी होते मी एकली । माया सांजवेळ अविद्येचे बिळी ।
माझे तुझे चालता पाउली । मोहो भुजंगे धरिली करांगुळी ॥१॥
लोभसर्प डंखला करू काय । स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय ।
आशालहरी तापला माझा देह । तृप्ति वारा घाली वो गुरुमाय ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 घोंगडी भारुड›
📿 अभंग क्र. १
📿 कान्होबा तुझी घोंगडी
1.
कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसी का दिली वांगली रे ॥धृ॥
स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्त्व गुण विणली रे ।
षडूगुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुन्दरा शोभली रे ॥१॥
काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणली रे ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 संध्या›
📿 अभंग क्र. १
📿 संध्या भारुड
1.
संध्या भारुड
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयी शेजे आला ॥धृ॥
गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
असीपदे एकत्र जेथे होती । स्वानुभव स्नान हे मुक्तास्थिती ॥१॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 कान्होबा भारुड›
📿 अभंग क्र. १
📿 पहिले कोठेच नव्हते क
1.
पहिले कोठेच नव्हते कांही । चंद्र सूर्य तारा नाही ।
अवघे शून्यच होते पाही । कान्होबा ते रे ते रे ते ॥१॥
तेथे एक ढालगज निर्माण झाली । तिने पहा एवढी ख्याती केली ।
इंद्रादिकांस म्हणे बाहुली । अमरपुरी तिची घरकुली । ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरीत प्रवेश करतांनाचे अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 हे नव्हे आजिकालिचे ।
1.
हे नव्हे आजिकालिचे । युगा अठ्ठाविसांचे ।
मज निर्धारिता साचे । हा मृत्युलोकुचि नव्हे ।
हाचि मानी रे निर्धारु । येर सांडी रे विचारु ।
जरी तू पाहासी परात्परु । तरी तू जाये पंढरिये ॥१॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 त्र्यंबकेश्वर महात्म्य›
📿 अभंग क्र. १
📿 सकळही तीर्थेनिवृत्ती
1.
सकळही तीर्थेनिवृत्तीच्या पायी । तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥
आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण । वृत्तींसी मार्जन केले असे ॥२॥
एकार्णव झाला तरंगु बुडाला । तैसा देह झाला एकरूप ॥३॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले नवल पै केले । तारु हरविले मृगजळी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरपूर महात्म्य अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 आधी रचिली पंढरी । मग
1.
आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरपूर महात्म्य संक्षिप्त माहितीसह›
📿 अभंग क्र. १
📿 पंढरपूरचा महिमा सार
पंढरपूरचा महिमा सार
चंद्रभागा.....
वारकरी संप्रदायात चंद्रभागेला खूप महत्व आहे. आधी स्नान चंद्रभागेचे मग भगवंत कथा त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन.. एक वेळेस विठ्ठलाचे दर्शन नाही झाले तरी । चालेल पण चंद्रभागेचे स्नान झाले पाहिजे. एवढे श्रेष्ठत्व चंद्रभागा नदीचे आहे. देवांनी तुकाराम महाराजांना विचारले, काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते मागा... त्यावर तुकोबा म्हणाले, देवा मला काहीही नको. चंद्रभागेचे स्नान घडू दे... एवढे वारकरी संप्रदाय आणि चंद्रभागेचे जवळचे नाते आहे. भगवान शंकर ऋषींना सांगतात कि या भूतलावावरील सर्व तीर्थे रात्री बारा वाजता भक्त पुंडलिकासमोर स्नान करून पवित्र होऊन जातात. सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा. नुसती चंद्रभागा नदी पहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. सर्व दोष घालवण्याची शक्ती चंद्रभागा दर्शनात आहे. यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे.
भक्त पुंडलिक....
वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्य स्थान आहे. भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात. पुंडलिक मंदिरासमोर लोहृदंड तीर्थ आहे कि त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते. त्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते कि गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला तेव्हा इंद्राला भग पडली. त्यातून मुक्त होण्याचा मार्गहि ऋषींनी सांगितला भूतलावार ज्या तीर्थामध्ये लोहरूपी पाषाण तरंगेल त्या तीर्था मध्ये स्नान केल्यानंतर मुक्ती मिळेल. तेव्हा फिरत फिरत इंद्रदेव दंडक अरण्यात आले असता पाषाण लोह्दंड तीर्थामध्ये तरंगला. इंद्राने त्यामध्ये स्नान केले. देव भगातून मुक्त झाला. तो पाषाण म्हणजे दगडी नाव. ती पाहण्यासाठी भाविकांबरोबर देश विदेशातून अभ्यासकही येतात.
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 पंढरपूर आषाढी-कार्तिक वारी महिमा›📂 आषाढी कार्तिकी वारी महिमा›
📿 अभंग क्र. १
📿 संपदा सोहंळा नावडे म
1.
संपदा सोहंळा नावडे मनाला । लागला टाकला पंढरीचा ॥१ ।
जावे पंढरीसी आवडे मानसी । कधी एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व संतांचे हरिपाठ›📂 , हरिपाठ नियम›
📿 अभंग क्र. १
📿 * हरिपाठाचे नियम *
* हरिपाठाचे नियम *
1) आपण स्वतःकिंवा सर्वांनी एकत्र जमून सर्वांना हरिपाठाचे जाहीर आमंत्रण द्यावे.
2) विणेकरी हा माळकरी असावा (वारकरी पोशाखाच) असावा.
3) स्त्री,पुरुष, लहान मुले, मुली, यांना वेगवेगळ्या रांगेत उभे करावे. (वृध्द व्यक्तींना खाली किंवा खुर्चीत बसू द्यावे.)
4) शक्यतो सर्वांच्या अंगात पांढरा वारकरी पोशाख असावा.
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 रविवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १
📿 खेळ मंडियेला वाळवंटी
1.
खेळ मंडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी । एकएका लागती पायी रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळी । पवित्र गाणे नामावळी रे ।
कळिकाळावरी घातली कास । एक एकाहून बळी रे ॥२॥
🙏 संत सोपानदेव काका›📚 संत सोपानदेव अभंग गाथा›📖 संत सोपानदेव गाथा हरिपाठ›📂 संत सोपानदेव हरिपाठ›
📿 अभंग क्र. १
📿 सोपान देवांचा हरिपाठ
1.
सोपान देवांचा हरिपाठ
सोपान देवांचा हरिपाठ ६ अभंगांचा असून – ‘वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे’ हे पहिल्या अभंगाचे दुसरे चरण या हरिपाठाचे धृवपद आहे .
भजन करताना प्रत्येक अभंगा नंतर
वायाची भ्रमसी कारे गुणराशी ।
🙏 संत नरहरी सोनार›📚 संत नरहरी सोनार अभंग गाथा›📖 संत नरहरी सोनार अभंग गाथा संपूर्ण›📂 संत नरहरी सोनार अभंग गाथा एकूण अभंग 34›
📿 अभंग क्र. १
📿 संत नरहरी सोनार अभंग
संत नरहरी सोनार अभंग गाथा
संत नरहरी सोनार अभंग एकूण ३४
१.
नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥
आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसे तैसे ॥ २ ॥
🙏 संत कान्हो पाठक›📚 संत कान्हो पाठक गाथा›📖 संत कान्होपाठक अभंग गाथा›📂 संत कान्हो पाठक एकूण अभंग 6›
📿 अभंग क्र. १
📿 गाये तो गाणु नाचे तो
1.
गाये तो गाणु नाचे तो नाचणु । परिसे तो जाणु भेदवादी ॥१॥
नव्हे तो संतु योगी ना भक्तु । जो लोकांतु डंव करी ॥धृ ॥
पढे तो पढता उपलवी भक्ता । कवित्व करिता ख्याती लागी ॥३॥
पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिके । जंव जीव सात्त्विके विनटेना ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 नामसंकीर्तन महात्म्य›
📿 अभंग क्र. १
📿 गाता विठोबाची कीर्ती
1.
गाता विठोबाची कीर्ती । महापातके जळती ॥1॥
सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥2॥
आठविता पाय त्याचे । मग तुह्या भय कैचे ॥3॥
कायावाचामने भाव । जनी ह्मणे गावा देव ॥4॥