🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२१५
📿 ज्ञानदेव माझे सौख्यस
1215.
ज्ञानदेव माझे सौख्यसरोवर | त्यांत जलचर स्वस्थ होतो ॥१॥
दुर्दैव तापाने आटले ते नीर | वर्षी रघुवीर कृपामेघ ॥२॥
|ज्ञानदेवाविण व्याकुळ हे प्राण | तू जगज्जीवन देवा होसी ॥३॥
विठाबाई तू गे जाणसी ना जाण | रक्षी मज कोण दुजे येथे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२१५
📿 अवचट दैवयोगें नाम ये
1215.
अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा प्राण होय ॥१॥
आवडी आदरे उच्चारी जो नाम । वैकुंठ निजधाम तया सुख ॥२॥
एका जनार्दनी नामाची ही थोरी । होतसे बोहरी केली पापा ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१५
📿 देऊनिया आपुले प्रेम
1215.
देऊनिया आपुले प्रेम ।
करी भक्तांचा संभ्रम ॥१॥
आधी निष्काम संपत्ती ।
तया वोपी भुक्ति मुक्ति ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२१६
📿 नामा हे वदता डोळ्या
1216.
नामा हे वदता डोळ्या आले पाणी | पडिला धरणी देवापुढे ॥१॥
नामदेव स्थिती पाहून श्रीपती | विस्मित ते चित्ती स्तब्ध जाले ॥२॥
कशा रीती नाम्या संबोखू मी आता | कठिण अवस्था देव म्हणे ॥३॥
प्रेम उचंबळे ऐकता ही आळ | बुझावी गोपाळ नाम्यालागी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२१६
📿 अमृत ते स्वर्गी निर्
1216.
अमृत ते स्वर्गी निर्जर सेविती । परि चरफडती नामामृत ॥१॥
धन्य ते दैवाचे नाम घेती वाचे । होते पै जन्माचें सार्थक तेणे ॥२॥
न लगे उपवासकरणे अष्टांग । न लगे नानायोग साधने ती ॥३॥
एका जनार्दनी नामामृत सार । उतरले पैलपार वैष्णव जन ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१६
📿 देवाधिदेव मुगुटमणी ।
1216.
देवाधिदेव मुगुटमणी ।
करी टेहणी दासाघरी ॥१॥
शीण त्या होऊ नेदी भाग ।
वोडवी अंग त्या अंगी ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२१७
📿 देव म्हणे नाम्या पाह
1217.
देव म्हणे नाम्या पाहे | ज्ञानदेव मींच आहे ॥१॥
तो आणि मी नाही दुजा | ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥
माझ्या ठायी ठेवी हेत | सोड खंत खंडी द्वैत ॥३॥
नाम्या उमज मानसी | ऐसे म्हणे हृषीकेशी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२१७
📿 कलियुगी नाम तारक । द
1217.
कलियुगी नाम तारक । दुजे होय दुःखदायक ॥१॥
पहा अनुभवो मना । नाम भवनदी नौका जाणा ॥२॥
अठरा वर्ण याती । नामे पावनचि होती ॥३॥
न करा आळस क्षणभरी । एका जनार्दनी निर्धारी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१७
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२१८
📿 ज्ञानदेवापृढे कथा |
1218.
ज्ञानदेवापृढे कथा | करी वारील ह्या व्यथा ॥१॥
आत्मरुपी ज्ञानेश्वर | तोचि ज्ञानाचा सागर ॥२॥
ज्ञानदेवी धरी भाव | स्वये होय तूंचि देव ॥३॥
राम कृष्ण रे गोविंद | जप म्हणे तो मुकूंद ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१८
📿 नरसिंह मेहता गुजराथी
1218.
नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण ।
धरिला अभिमान त्याचा तुम्ही ॥१॥
व्दारकेसी त्याच्या हुंडया भरियेल्या ।
शोभनासी नेल्या वस्त्रे पेटया ॥२॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१९
📿 न पडे विसर ।
1219.
न पडे विसर ।
याचा जया निरंतर ॥१॥
हाही न विसंबे तयासी ।
जवळी राहे अहर्निशी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२२०
📿 तुम्हा न पडे वेच । म
1220.
तुम्हा न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥
फुकासाठी जोडे यश । येथे का करा आळस ॥धृपद॥
कृपेचे भुकेले । होय जीवदान केले ॥२॥
तुका म्हणे शिकविले । माझे ऐकावे विठ्ठले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२२०
📿 नग जो ते सोने लेण्या
1220.
नग जो ते सोने लेण्याजोग होते | मुदी कंकण ते नामे त्यांची ॥१॥
मुशीमाजी जेव्हा गेले ते मुरोन | जालेसे सुवर्ण अभिन्न ते ॥२॥
तैसा ज्ञानदेव भक्त तो मी देव | लौकिक लाघव दासांसाठी ॥३॥
ज्ञानसमाधी हे ताशी रूप नांवा | अंतींचा मेळावा मजमाजी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२२०
📿 असोनि उत्तम कुळीं ।
1220.
असोनि उत्तम कुळीं । नाम नाही ज्याचे कुळीं ॥१॥
जन्मोनी अधम कुळीं । सदा जपे नामावळी ॥२॥
कुळासी तो नाही काज । नाम वदतांचि निज ॥३॥
नाम पावन हे जनी । शरण एका जनार्दनी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२०
📿 न विसंबे त्या घटिका
1220.
न विसंबे त्या घटिका पळ ।
त्याचिपाशी सर्वकाळ ॥१॥
उत्तीर्णत्वालागी हरि ।
त्याची परिचर्या करी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२२१
📿 लोक म्हणती मज देव ।
1221.
लोक म्हणती मज देव । हा तो अधर्म उपाव ॥१॥
आता कळेल ते करी । सीर तुझे हाती सुरी ॥धृपद॥
अधिकार नाही । पूजा करिती तैसा काही ॥२॥
मन जाणे पापा । तुका म्हणे मायबापा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२२१
📿 तेज स्पर्श ज्योती कर
1221.
तेज स्पर्श ज्योती कर्पुरी निघाली | दोन्ही ती निमाली एकदांची ॥१॥
आघाताने नाद घंटेंतून उठे | शेवटी तो मिटे घंटेमाजी ॥२॥
ब्रह्मी माया स्फुरे चैतन्यप्रकाशे | शेवटी ते वसे ब्रह्मरूपी ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक नाम्या ज्ञान | वाटो समाधान तुझ्या जीवा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२२१
📿 यातीसी नाही कारण । न
1221.
यातीसी नाही कारण । नामस्मरण हरीचें ॥१॥
तेणे तराल भवपार । आणिक विचार न करा ॥२॥
मागा पहा अनुभव । तारिले जीव निर्जिव ॥३॥
स्त्रिया शूद्र नारी नर । नामे निर्धारा मुक्तिपद ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२१
📿 नाही कोणा उपेक्षिले
1221.
नाही कोणा उपेक्षिले ।
सकळा सन्माने स्थापिले ।
आपुलिये पदी बैसविले ।
देणे दिधले अपार ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२२२
📿 एका म्हणता भले । आणि
1222.
एका म्हणता भले । आणिका सहजचि निंदिले ॥१॥
काही न करिता सायास । सहज घडले ते दोष ॥धृपद॥
बरे वाईटाचे । नाही मज काही साचे ॥२॥
तुका म्हणे वाणी । खंडोनि राहावे चिंतनी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२२२
📿 उंच नीच नाही नामाचिय
1222.
उंच नीच नाही नामाचियां पुढे जातीचें ते गाढे नाही काम ॥१॥
अनामिकाहुनी असोत चांडाळ । परी नामाचा उच्चार मुखी वसो ॥२॥
यवनादि नीच असोत भलते । परी नाम सर्वदा ते मुखी वसो ॥३॥
एका जनार्दनी नाम वसो मुखी । तेणे तो तिही लोकी सरता होय ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२२
📿 नाही तेचि आणूनि ठेवी
1222.
नाही तेचि आणूनि ठेवी ।
चाड जिवी जे वाटे ॥१॥
समयाचे समया वरी ।
निर्माण करी आणि पुरवी ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२२३
📿 देई भक्तिरस प्रेमा |
1223.
देई भक्तिरस प्रेमा | देवा घाली आम्हा जन्मा ॥१॥
प्रेम येई हाता जरी | जेथे नांदू ती पंढरी ॥२॥
ज्ञानदेवी भेट व्हावी | ज्ञान गोष्ट का सांगावी ॥३॥
नामा न बुझावा जनी | कोण नाचेल कीर्तनी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२३
📿 निज भक्ताची आवडी ।
1223.
निज भक्ताची आवडी ।
सांभाळी त्या घडी घडी ॥१॥
राखोनिया भूक तहान ।
करी त्याचा बहुमान ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२२४
📿 न करा टांचणी । येथे
1224.
न करा टांचणी । येथे काही आडचणी ॥१॥
जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥२॥
आठही प्रहर । बारा मास निरंतर ॥३॥
तुका म्हणे वाणी । वर्जेना हे घेता धणी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२२४
📿 देव कळवळले चित्ती |
1224.
देव कळवळले चित्ती | त्यासी मायेची संमती ॥१॥
मायबापांचा त्या लळा | नामा घेईना का आळा ॥२॥
बाप जगताचा स्वामी | आई प्रत्यक्ष लक्षुमी ॥३॥
नामा थोराचे लेकरू | छंद त्याचा अनिवारु ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२२४
📿 भवसिंधु तराया नाम हे
1224.
भवसिंधु तराया नाम हे नौका । उतार ते लोका सोपा केली ॥१॥
न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥
क्षणीक आयुष्य न घडे जप तपें । नाम गांता सोपे सर्व साधे ॥३॥
मंत्र तंत्र हवन नोहे विधियुक्त । तै होत अपघात शरीराचा ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२४
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२२५
📿 तुझ्या नामाची आवडी ।
1225.
तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझी वेडी ॥१॥
आता न वजो अणिका ठाया । गाऊ गीत लागो पाया ॥धृपद॥
काय वैकुंठ बापुडे । तुझ्या प्रेमासुखापुढे ॥२॥
संतसमागममेळ । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२२५
📿 गरुडासि मग म्हणे पां
1225.
गरुडासि मग म्हणे पांडुरंग | साकल्य हे सांग पुंडलिका ॥१॥
नामदेव कष्टी ज्ञानदेवासाठी | घेऊन या तो भेटी नामयाच्या ॥२॥
संतप्रेम भेटी देव गुज गोष्टी | जाणत्याच्या पोटी सर्व बसे ॥३॥
करी पांडुरंग येई त्याच्या मना | निमित्ताकारणा भक्त शोधी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२५
📿 नीच कामी न धरी लाज ।
1225.
नीच कामी न धरी लाज ।
भक्तकाजकैवारी ॥१॥
सेवकाचा हा शिरोमणी ।
म्हणवी करुनी दास्यत्व ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२२६
📿 शम दम साधन । नामावां
1226.
शम दम साधन । नामावांचुन न करी जाण ॥१॥
नाम गावें नाम गावे । वेळोवेळां नाम गावें ॥२॥
नामावांचुनी साधन नाही । ऐसी वेदशास्तें देती ग्वाही ॥३॥
मज भरंवसा नामाचा । एका जनार्दनी म्हणे वाचा ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२६
📿 नेदी त्या दुसरे ।
1226.
नेदी त्या दुसरे ।
लागी आणिकाचे वारे ॥१॥
युगायुगी त्याचा ।
म्हणवी सोयरा निजाचा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२२७
📿 धनवंतालागी । सर्वमान
1227.
धनवंतालागी । सर्वमान्यता हे जगी ॥१॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥धृपद॥
जव चाले मोठा धंदा । तव बहिण म्हणे दादा ॥२॥
सदा शृंगारभूषणे । कांता लवे बहुमाने ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२२७
📿 एका नामावांचुन । अवघ
1227.
एका नामावांचुन । अवघा शीण भ्रामक ॥१॥
का रे हिंडसी सैरावैरा । तपाचिया गिरिकंदरा ॥२॥
बैससी घालुनि आसन । मना मुळी वाउगें ध्यान ॥३॥
दाविसी ते अवघे सोंग । एका जनार्दनी नाही रंग ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२७
📿 परम कृपावंत हरी ।
1227.
परम कृपावंत हरी ।
दीनोध्दारी तिष्ठतु ॥१॥
भुक्तिमुक्ति घेऊन हाती ।
दयावया प्रति निजदासा ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२२८
📿 ज्ञानदेवा पहाता डोळा
1228.
ज्ञानदेवा पहाता डोळा | नामदेवा हर्ष जाला ॥१॥
घट्ट धरियेले पाय | तू तो जाला सदुगुरुराय ॥२॥
नको करू रे अव्हेर | मज धरू नको दूर ॥३॥
सदा आठवत मना | तुझ्या भक्तीच्या कल्पना ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२२८
📿 दंभ मान ही उपाधी । न
1228.
दंभ मान ही उपाधी । निरसेल आधिव्याधी । नामे जोडे सर्व सिद्धि । धन्य जगी नाम ते ॥१॥
उच्चारिता घडघडा । माया तृष्णा पळती पुढा । ऐसा नामच पोवाडा । ब्रह्मादिका अत्यर्क्य ॥२॥
आगमनिगमांचें ज्ञान । नामे साधे वैराग्य निधान । एका जनार्दनी पावन । नाम जाण निर्धारे ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२८
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२२९
📿 कंठी नामसिक्का । आता
1229.
कंठी नामसिक्का । आता कळिकाळासी धक्का ॥१॥
रोखा माना की सिक्का माना । रोखा सिक्का तत्समाना ॥धृपद॥
रोखा न माना का सिक्का न माना । जतन करा नाक काना ॥२॥
सिक्का न मानी रावण । त्याचे केले निसंतान ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२२९
📿 नाम मुखी गाता विषयां
1229.
नाम मुखी गाता विषयांची वार्ता । नोहेचि सर्वथा गातीयासी ॥१॥
नाम ते पावन नाम ते पावन । नामवांचूनि जाण श्रेष्ठ कोण ॥२॥
एका जनार्दनी नाम ते पावन । त्रिभुवनी मंडन नाम सत्य ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२२९
📿 परम विश्रांति पावली
1229.
परम विश्रांति पावली ।
अवघी येणे सुखी केली ॥१॥
आवडी वंदिती पूजिती ।
दर्शना जे याच्या येती ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२३०
📿 भूती देव म्हणोनि भेट
1230.
भूती देव म्हणोनि भेटतो या जना । नाही हे भावना नरनारी ॥१॥
जाणे भाव पांडुरंग अंतरीचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥धृपद॥
दयेसाठी केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नांव कथा ॥२॥
तुका म्हणे नाही पडत उपवास । फिरतसे आस धरोनिया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२३०
📿 नामस्मरण अहो जना । त
1230.
नामस्मरण अहो जना । तेणे तुटे भवबंधना । येचि देहि येचि काळी । भजीजे रे नाम जाण ॥१॥
ध्रुव अजामेळ गणिका । नाममात्रें तारिले देखा । आणिकाही भक्त देखा । मोक्ष पावले नामे एका ॥२॥
जो जो कोणी प्रेमे भजता । पाविजेल सायुज्यता । ऐशी भाक घे रे आता । जप तप नाम स्मरतां ॥३॥
दीनबंधु दयासिंधु । जेणे केला परमानदु । दृष्ट जना करी भेदु । एका जनार्दनी नित्यानंदु ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३०
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२३१
📿 हारपल्याची नका चित्त
1231.
हारपल्याची नका चित्ती । धरू खंती वायांचं ॥१॥
पावले ते म्हणा देवा । सहज सेवा या नावे ॥धृपद॥
होणार ते ते भोगे घडे । लाभ जोडे संकल्पे ॥२॥
तुका म्हणे मोकळे मन । अवघे पुण्य या नावे ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३१
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२३२
📿 नेसणे आले होते गळ्या
1232.
नेसणे आले होते गळ्या । लोक रळ्या करिती ॥१॥
आपणिया सावरीले । जग भले आपण ॥धृपद॥
संबंध तो तुटला येणे । जागेपणे चेष्टाचा ॥२॥
भलती सेवा होती अंगे । बारस वेगे पडिले ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३२
📿 बहुते आळीकरे ।
1232.
बहुते आळीकरे ।
इने वाढविली लेकुरे ॥१॥
आहे आधिलाचि अभ्यास ।
नव्हे कोणाही उदास ॥२॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३३
📿 भक्त करिती तैसा होय
1233.
भक्त करिती तैसा होय ।
ठेविला ठाय तया स्थळी ॥१॥
पाचारिती भाविती जेथे ।
प्रगटे तेथे रुप धरी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२३४
📿 न लगे द्यावा जीव सहज
1234.
न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा काही ॥१॥
मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥
तुका म्हणे कई होईल स्वहित । निधान जो थीत टाकु पाहे ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 हरिशरणता›
📿 अभंग क्र. १२३४
📿 का हो तुझी गर्वे जात
1234.
का हो तुझी गर्वे जाता | हरी चरणी ठेवा माथा ॥१॥
शंकर घाली लोटांगण | इतरांचा पाड कोण ॥२॥
सृष्टीकर्ता ब्रम्हदेव | तो हा चरणी मागे ठाव ॥३॥
शुक सनकादिक योगी | तेही पायी जडले वेगी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२३४
📿 आपुलें कल्याण इच्छिल
1234.
आपुलें कल्याण इच्छिले जयासी । तेणे या नामासी विसंबू नये ॥१॥
करील परिपुर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशी ॥२॥
भुक्ति आणि मुक्ति वोळगंती सिद्धि । होईल की वृद्धि आत्मनिष्ठा ॥३॥
एका जनार्दनी जपतां हे नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३४
📿 भक्ताघरीचे करीन काम
1234.
भक्ताघरीचे करीन काम ।
त्यांचेच नाम वागवीन ॥१॥
भक्तरुपे विराजलो ।
स्थिरावलो ह्रदयी त्या ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२३५
📿 मोल वेचूनिया धुंडिती
1235.
मोल वेचूनिया धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागो बळे ॥१॥
नसता जवळी हित फार करू । जीव भाव धरू तुझ्या पायी ॥धृपद॥
नेदू भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हासी दातारा व्हावे म्हणून ॥२॥
कीर्ती तुझी करू आमुचे सायास । तू का रे उदास पांडुरंगा ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३५
📿 भक्त देव देवतार्चन ।
1235.
भक्त देव देवतार्चन ।
भक्त माझे पूजाध्यान ॥१॥
भक्ताविणे भजो कोणा ।
म्हणे वैकुंठीचा राणा ॥२॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३६
📿 भक्त व्देषाची उत्तरे
1236.
भक्त व्देषाची उत्तरे ।
ऐकताचि कर्णव्दारे ॥१॥
त्यांचे करी निर्दाळण ।
हरुनिया जीवप्राण ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२३७
📿 तुज मज नाही भेद । के
1237.
तुज मज नाही भेद । केला सहज विनोद ॥१॥
तू माझा आकार । मी तो तूचि निर्धार ॥धृपद॥
मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगे सेवा ॥२॥
मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझे बळ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२३७
📿 जयाचे देखता चरण । तु
1237.
जयाचे देखता चरण । तुटेल जन्म जरा मरण ॥१॥
तो हा चंद्रभागेच्या तीरी । कट धरुनिया करी ॥२॥
नाम घेता आवडी । तुटेल संसाराची बेडी ॥३॥
भाविकांसी पावे । मागे मागे त्यांच्या धांवे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३७
📿 भक्त स्तवने जे जे कर
1237.
भक्त स्तवने जे जे करिती ।
ते जे ऐकोनिया श्रीपती ।
सुखे संतोषोनिया चित्ती ।
दासा देती वरदाने ॥१॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 कुल जन्म वृत्तांत›
📿 अभंग क्र. १२३८
📿 जेऊनिया हाती देवे दि
1238.
जेऊनिया हाती देवे दिधली वाटी | आला उठाउठी नामा घरा ॥१॥
गोणाई म्हणे रे ऐक नामदेवा | नैवेद्य आणावा माझे हाती ॥२॥
तेव्हा नामदेवे हाती दिधली वाटी | पाहू गेली दृष्टी रिकामी ते ॥३॥
काय तुज घरी उणे होते अन्न | नैवेद्य आपण तेथे खावा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२३८
📿 प्रेमयुक्त नाम आदरे
1238.
प्रेमयुक्त नाम आदरे घेता । तेथे नाही सुखदुःखवार्ता ॥१॥
नामी धरुनी आवडी । उच्चारावे घडोघडी ॥२॥
योगयाग तपासाधान । नाम उच्चारिता संपुर्ण ॥३॥
ऐसा नामी निजध्यास । एका जनार्दनी त्याचा दास ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३८
📿 भक्त हाका ऐकावया ।
1238.
भक्त हाका ऐकावया ।
पसरुनिया कान उभा ॥१॥
कोणी गांजीळ एखादा ।
म्हणोनि गदा सांभाळी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२३९
📿 जप तप ध्यान न लगे धा
1239.
जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठल कीर्त्तनामाजी उभा ॥१॥
राहे माझ्या मना दृढ या वचनी । आणिक ते मनी न धरावे ॥धृपद॥
कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनिया ॥२॥
तुका म्हणे मुक्ती हरीदासांच्या घरी । वोळगती चारी ॠद्धीसिद्धि ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 कुल जन्म वृत्तांत›
📿 अभंग क्र. १२३९
📿 आम्ही हाटा जाऊ लवकरी
1239.
आम्ही हाटा जाऊ लवकरी येऊ | नैवेद्य पाठवू नाम्या हाती ॥१॥
दुसऱ्या दिवशी नैवेद्य धाडिला | दामसेठी गेला त्याच्या मागे ॥२॥
जाऊनिया नामा उभा राहे सन्मुख | म्हणे बिठोबास जेवी बापा ॥३॥
देव म्हणे नाम्या बैसावे दारांत | लवकरी जेवितो पाहे आंता ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२३९
📿 मुखी नाम हातें टाळीं
1239.
मुखी नाम हातें टाळीं । साधन कलीं उत्तम हे ॥१॥
न घडे योगयाग तप । नाही संकल्प दुसरा ॥२॥
संतापायीं सदा मन । हृदयी ध्यान मूर्तीचें ॥३॥
एका जनार्दनी सेवा । हीचि देवा उत्तम ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२३९
📿 भक्ताचांचि वोरस देवा
1239.
भक्ताचांचि वोरस देवा
धावे सेवा करु त्यांची ॥१॥
जे जे गोड वाटे मनी ।
ते ते वदनी भरी तया ॥२॥