🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५१०
📿 मज करु दिली नाही सेव
2510.
मज करु दिली नाही सेवा । दाविले देवा देहींचे ॥१॥
जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपुर्ण ॥२॥
भिन्न भिन्न नाही मनी । भरलासे जनी वनी ॥३॥
एका जनार्दनी शरण । सर्वा ठायी व्यापक जाण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५११
📿 त्यागे भोग माझ्या ये
2511.
त्यागे भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करू ॥१॥
आता असो तुझे पायी हे मोटळे । इंद्रिये सकळे काया मन ॥धृपद॥
सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळता भाव जाइल वाया ॥२॥
तुका म्हणे आता नको उजगरा । लपवी दातारा अंगी मज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५११
📿 मानसींच ध्यान मानसीं
2511.
मानसींच ध्यान मानसींच स्नान । मानसींच अर्चन करु आम्ही ॥१॥
न करु साधन लौकिकापुरतें । न पुजूं दैवत आन वाया ॥२॥
मानसेंच तप मानसेंच जप । मानसी पुण्यपाप नाही आम्हा ॥३॥
मानसी तीर्थयात्रा मानसी अनुष्ठान । मानसें धरूं ध्यान जनार्दन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५१४
📿 दिली मान तरी नेघावी
2514.
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आले त्यासी जतन जीवे ॥१॥
समर्थासी असे विचाराची आण । भली पापपुण्य विचारावे ॥धृपद॥
काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडिले अंतर न पाहिजे ॥२॥
तुका म्हणे यश कीर्ती आणि मान । करिता जतन देव जोडे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५१५
📿 विचारिले आधी आपुल्या
2515.
विचारिले आधी आपुल्या मानसी । वांचो येथे कैसी कोण्या द्वारे ॥१॥
तव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धी दिली ऐसी नास नाही ॥धृपद॥
उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री । कोण रीती तीरी पाविजेल ॥२॥
तुका म्हणे दुःखे आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५१६
📿 स्वर्ग मृत्यु पाताळ
2516.
स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाही पराधीनता जिणें आमुचे ॥१॥
नाही त्या यमाचे यातनेंचे भय । पाणी सदा वाहे आमुचे घरी ॥२॥
नाही जरामरण व्याधीचा तो धाक । सुखरुप देख सदा असों ॥३॥
एका जनार्दनी नामाच्या परिपाठ । सुखदुःख गोष्टी स्वप्नीं नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५१७
📿 केले शकुने प्रयाण ।
2517.
केले शकुने प्रयाण । आता मागे फिरे कोण ॥१॥
होय तैसे हो आता । देह बळी काय चिंता ॥धृपद॥
पडिले पालवी । त्याचा धाक वाहे जीवी ॥२॥
तुका म्हणे जीणे । देवा काय हीनपणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५१७
📿 जन्मोजन्मी आम्ही बहु
2517.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । मग या विठ्ठले कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारी झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥
भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसे या देवासी मन माझे ॥३॥
आणिका देवासी नेघे माझे चित्त । गोड गाता गीत विठोबाचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५१८
📿 आळणी ऐसे कळो आले । त
2518.
आळणी ऐसे कळो आले । त्यासी भले मौनचि ॥१॥
नये काही वेचू वाणी । वेडे घाणी सांगाते ॥धृपद॥
वेगळे ते देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥
तुका म्हणे कवतुक केले । किंवा भले दवडिता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५२०
📿 करिता ताडातोडी । वत्
2520.
करिता ताडातोडी । वत्सा माते सोई ओढी ॥१॥
करित्याचा आग्रह उरे । एक एकासाठी झुरे ॥धृपद॥
भुके इच्छी अन्न । ते ही त्यासाठी निर्माण ॥२॥
तुका म्हणे जाती । एक एकाचिये चित्ती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५२१
📿 एक माझी माता दोघेंजण
2521.
एक माझी माता दोघेंजणे पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥
वेद जाणा बंधु दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्ही माझे पोटी ॥२॥
बंधु बहिणींस लग्न ते लाविले । विपरीत झाले सांगवेना ॥३॥
एका जनार्दनी सांगतसे गूढ । नाही तरी गुढ होउनी राहे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५२२
📿 विपरीत अर्थ ऐकता कान
2522.
विपरीत अर्थ ऐकता कानी । पुरुष गाभणी स्त्रीचेनि चिंतनीं ॥१॥
नवल गे माय नवल गे गाय । तीन पोरे व्याला सांगु काय ॥२॥
एक ब्रह्माचारीं कळिलावा मोठा । साठ पोरें व्याला पहा चोहटा ॥३॥
एक मेले गर्भीं असता गे माय । बारा वर्षे लपलें सांगूं मी काय ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५२३
📿 विटोळेंविण पोटा आला
2523.
विटोळेंविण पोटा आला । अवघा संसार मिंधा केला ॥१॥
लग्न लागता आला पोटा । मग सोडिले अंतरपाता ॥२॥
ॐकारेसी बुडाली घडी । लग्न लाविले औटावे घडी ॥३॥
एका जनार्दनी लग्न समरसें । पाहो गेलिया त्या लाविले पिसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५२४
📿 कोणाशी विचार करावा श
2524.
कोणाशी विचार करावा शेंवटी । एवढया लाभे तुटी झाल्यातरे ॥१॥
सांभाळितो शूर आला घावडाव । पुढे दिला पाव न करी मागे ॥धृपद॥
घात तो या नावे येथे अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाय कार्या येतो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५२५
📿 असा जी सोंवळे । आहा
2525.
असा जी सोंवळे । आहा तैसेचि निराळे ॥१॥
आह्मी नयो तुमच्या वाटा । काय लटिकाचि ताठा ॥धृपद॥
चिंतनाचि पुरे । काय सलगी सवे धुरे ॥२॥
तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५२९
📿 नाही तुम्हा काही लाव
2529.
नाही तुम्हा काही लाविले मागणे । कांटाळ्याच्या भेणे त्रासलेती ॥१॥
एखादिये परी टाळावी करकर । हा नका विचार देखो काही ॥धृपद॥
पायाच्या वियोगे प्राणासंवसाटी । ने घवेसी तुटी झाली आता ॥२॥
तुका म्हणे तुम्हा मागेन ते आता । हेचि कृपावंता चरणी वास ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५२९
📿 माये आधी लेक जन्मली
2529.
माये आधी लेक जन्मली । दोघींच्या लग्नाची आयती केली ॥१॥
कोण नोवारा कोण नोवरी । अर्थ पाहता न कळे निर्धारी ॥२॥
बापा आधी लेक जन्मला । लग्नाचा सोहळा बापाचा केला ॥३॥
वरात निघाली नोवरा नोवरी । एका जनार्दनी जाहली नवलपरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५३०
📿 जग अमंगळ । लागे देखत
2530.
जग अमंगळ । लागे देखता विटाळ ॥१॥
धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥धृपद॥
नव्हे माझे मत । साक्षी करूनि सांगे संत ॥२॥
तुका म्हणे जीवे । दावी उमटूनि अनुभवे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५३०
📿 स्वामीसेवका अबोला ।
2530.
स्वामीसेवका अबोला । ऐसा जन्मचि अवघा गेला ॥१॥
जन्मवरी जुने भाते । साधन शिऊं नेदी हातें ॥२॥
काम करु नेदी हाती । उसंत नाहे अहोरातीं ॥३॥
श्रद्धें विण अचाट सांगे । ढळॊं नेदी पुढे मांगें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५३२
📿 आम्ही पापी तू पावन ।
2532.
आम्ही पापी तू पावन । हे तो पूर्वापार जाण ॥१॥
नवे करू नये जुने । सांभाळावे ज्याचे त्याणे ॥धृपद॥
मिरासीचा ठाव । राखी करोनि उपाव ॥२॥
वादे मारी हाका । देवा आइकवीतो तुका ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५३३
📿 पाडावी ते बरी । गाठी
2533.
पाडावी ते बरी । गाठी धुरेसवे खरी ॥१॥
नये मरो लंडीपणे । काय बापुडे ते जिणे ॥धृपद॥
लुटावे भांडार । तरी जया नाही पार ॥२॥
तुका म्हणे नावे । कीर्ती आगळीने ज्यावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५३४
📿 भांडणचि जाले । मग जी
2534.
भांडणचि जाले । मग जीवाचे काय आले ॥१॥
येऊ नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥धृपद॥
करिता सरोबरी । काही न ठेवावी उरी ॥२॥
तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसींच धुरे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५३४
📿 हे सहजवि थोरावले । प
2534.
हे सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झाले । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥
ते माहेरी येवढें चक्र । गगनी हा निर्धार । याचा पाहे पा विचार । चैतन्यामाजीं ॥२॥
तेथे वेदासी बोबडी । अनुभवी पैलथडी । एका जनार्दनी गोडी । नित्य घेतसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५३५
📿 आता आम्ही सहजचि थोर
2535.
आता आम्ही सहजचि थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । परब्रह्मा स्वये ॐकार । परात्पर जगदात्मा ॥१॥
आम्ही सहजचि स्वतः सिद्ध । जागृति सुषुप्ति साध्य । तूर्या त्रिसाक्षीणी बोध । अति अगाध उन्मनी ॥२॥
ते उन्मनी परात्पर । निर्गुण हो निराकार । तुर्या तिचा आकार । एका जनार्दनी सगुणाकार देह झाला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५३७
📿 वचनाचा अनुभव हाती ।
2537.
वचनाचा अनुभव हाती । बोलविती देव मज ॥१॥
परि हे न कळे अभाविका । जडलोका जिवांसी ॥धृपद॥
अनुश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥
तुका म्हणे वरावरी । जातो तरी सांगत ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५३८
📿 रात्रंदिवस जप होती स
2538.
रात्रंदिवस जप होती साठ घटिका । संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥
दीड घटिका पळे दहा निमिष दोन । प्रथम ते स्थान आधारचक्र ॥२॥
साडेसोळाआ घटिका दहा पळे लेखा । निमिषे तीन देखा स्वाधिष्ठानी ॥३॥
दहा पळें देखा घटिका साडेसोळा असती । मणिपुर गणती निमिष चार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५३९
📿 आसन शयन भोजन गोविंदे
2539.
आसन शयन भोजन गोविंदे । भरले आनंदे त्रिभुवन ॥१॥
अवघिया केली काळे तडातोडी । अवसर घडी पुरो नये ॥धृपद॥
वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥
आवडीच्या आले आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४०
📿 जगामध्यें काय हालत ।
2540.
जगामध्यें काय हालत । ते दृष्टीसी नाही भरत । अचळ असोनि चळत । चंचळ म्हणत आहे मुठींत ॥१॥
कैसे बोटानें दाखवु तुला । सावध होई गुरूच्या मुला । हा शब्द अचोज वेगळा अर्थ जाणे सहस्त्रांत विरळा ॥२॥
कांही नसोनि ते दिसत । नाही म्हणता सत्य भासत । आकारीं आकार लपत । वाउगें जाणत्यासी भासत ॥३॥
अहं सोहं कोहं लपाला । उघड दृष्टीरूपा आला । जगी व्यापक नसोनि व्यापला । एका जनार्दनी गुरुपुत्र भला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५४१
📿 जपाचे निमित्त झोपेचा
2541.
जपाचे निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनिया ॥१॥
ऐसी ती भजने अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥धृपद॥
सेवेसी विकिले देहाचिये आसे । तया कोठे असे उरला देव ॥२॥
तुका म्हणे मानदंभ जया चित्ती । तयाची फजीती करू आम्ही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४२
📿 एक पांच तीन नावांचे
2542.
एक पांच तीन नावांचे शेवटी । अठरा हिंपुटी जयासाठी ॥१॥
सात तेरा चौदा घोकितां श्रमले । पंचवीस शिणले परोपरी ॥२॥
तेहतिसां आटणी चाळिसां दाटणीं । एकुणपन्नसांची कहाणी काय तेथे ॥३॥
एकाजनार्दनी एकपणे एक । बावन्नाचा तर्क न चालेचि ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४३
📿 कान्होबा नवल सांगतो
2543.
कान्होबा नवल सांगतो गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥
कोडे रे कोडे कान्होबा तुझे कोडे । जाणती जाणती अर्थ पाहता उघडें॥ध्रृ०॥
वृक्षाग्री नाही मूळ वर शेंडा नाही सरळ । बावन शाखा पल्लव पत्र पुष्प भरले सकळ ॥२॥
एका जनार्दनीक वृक्ष सुढाळ । तयांवरी खेळे एक एकुलतें बाळ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५४४
📿 कळे न कळे ज्या धर्म
2544.
कळे न कळे ज्या धर्म । ऐका सांगतो रे वर्म । माझ्या विठोबाचे नाम । अटटाहासे उच्चारा ॥१॥
तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥धृपद॥
पुसता चुका होतो वाटा । सवे बोळावा गोमटा । मोडो नेदी कांटा । घेऊ साटा चोरासी ॥२॥
तुका म्हणे मोल । न लगे द्यावे वेचा बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४४
📿 पंचभूते नव्हतीं जईं
2544.
पंचभूते नव्हतीं जईं । तै वृक्ष देखिला भाई । अधोभागी शेंडा मूळ पाही । वरी वेंधली तिसी पाय नाही ॥१॥
सांगे तू आमुचे कोडे कान्होबा सांग तू आमुचे कोडे । नाही तरी जाऊ नको पुढें॥धृ०॥
नवलक्ष जया शाखा । पत्रपुष्पें तेचि रेखा । पंचभूतें कोण लेखा । ऐसा वृक्ष देखिला देखा ॥२॥
तयावरी एक सर्पीण । तिने खादले त्रिभुवन । शरण एका जनार्दन । हे योगियांचें लक्षण रे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४५
📿 सगुण निर्गुण नोहे वृ
2545.
सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहता नित्रीं न भासे सादृश्य । देखता देखत होतो अदृश्य ॥१॥
सांग रे कान्होबा हे कोंडे । तुझे तुजपाशी केले उघडें । आम्हा न कळे वाडेंकोडें ॥२॥
एक मुळी वृक्ष देखिला । द्विशाखां तो शोभला । पाहता पत्र पुष्पें न देखिला ॥३॥
ऐसे वृक्ष अपरंपार । एकाजनार्दनी करा विचार । मग चुकेल वेरझार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५४६
📿 हरीच्या दासा सोपे वर
2546.
हरीच्या दासा सोपे वर्म । सर्व धर्म पाउले ॥१॥
कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥धृपद॥
सरती येणे आटाआटी । नाही तुटी लाभाची ॥२॥
तुका म्हणे समाधान । सदा मन आमुचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४६
📿 अलक्ष अगोचर म्हणती व
2546.
अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष । योगी म्हणती पाहिला लक्ष ॥१॥
कान्होबा तुझे कोडे । तुजपुढे केले उघडें । सांगता वेद जाहले वेडे रे ॥२॥
सहा अठरांची मिळणी । छत्तिसांचें घांतलें पाणी । तो वृक्ष देखिला नयनी रे ॥३॥
पंचाण्णवची एक शाखा । एका जनार्दनी वृक्ष देखा । अर्थ पाहता मोक्ष रेखा रे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४७
📿 अहं सोहं वृक्षा तो न
2547.
अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं । याचा शेंडा नाही मा कोठे कोहं ॥१॥
कान्होबा उघद माझेंकोडें । बोल बोलती साबडे । अर्थ करे का रे निवाडे ॥२॥
वृक्ष जाहला मन पवन । वृक्ष तो सहजचि हवन । वृक्षें वेधले चराचर गहन रे ॥३॥
वृक्षे भेदिले आकाश । एका जनार्दनी निरवकाश । वृक्षचि जाहला अलक्ष रे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५४८
📿 संत आले घरा । तो मी
2548.
संत आले घरा । तो मी अभागी दातारा ॥१॥
कासयाने पूजा करू । चरण हृदयीच धरू ॥धृपद॥
काया कुरवंडी । करुन ओंवाळून सांडी ॥२॥
तुका म्हणे भावे । हात जोडी असो ठावे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४८
📿 नीळवर्ण वृक्ष तो अति
2548.
नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहता सावकाश दृष्टी न पडे ॥१॥
भलें कोडे कान्होबा हे तुझे । लय लक्षा न कळे म्हणती माझे आणि तुझे ॥२॥
हो वृक्षांची वोळख धरा बरी । निवृत्ति ज्ञानदेव सोपान अधिकारी ॥३॥
एका जनार्दनी वृक्ष सगुण निर्गुण । जाहला पुंडलिकाकारणे ब्रह्मा सनातन ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५४९
📿 वृक्ष व्याला आकाश पा
2549.
वृक्ष व्याला आकाश पाताळ । वृक्षीं प्रसवलें लोकपाळ । आठ्ठ्यायेंशीं सहस्त्र ऋषिमंडळें ॥१॥
कान्होबा बोलो तुझे कोडे । अर्थ ऐकता ब्रह्मा जोडे । अभक्त होती केवळ वेडे रे ॥२॥
वृक्षाअंगीं पंचभुते । प्रसवला तत्त्वें निरुते । अहं सोहं पाहता ते होते ॥३॥
एका जनार्दनी पाहिला वृक्ष । गुरुकृपें वोळखिला साक्ष । भेदभाव गेला प्रत्यक्ष रे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५५०
📿 निर्गुण निराकार वृक्
2550.
निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्त्वे व्यापक जाहला ॥१॥
कान्होबा हे बोलणें माझे कोडे । पंचाविसांचे ध्यानीं नातुडे रे ॥२॥
साठ ऐशीं शोभती शाखा । नवलक्ष पल्लव भोंवती रे ॥३॥
चौर्यांयशी लक्षांची मिळणी । वृक्षरूपीं एका जनार्दनी देखा रे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५५१
📿 ॐ कार हा वृक्ष विस्त
2551.
ॐ कार हा वृक्ष विस्तारला । चतुःशाखें थोर जाहला ।
पुढे षडंतर शाखें विस्तारला । आठरांचा तया मोहोर आला ॥१॥
उघडें माझे कोडे । जाणती न जाणती ते वेडे ।
पडले विषयांचें सांकडे । तया न कळे हे कोडे रे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५५२
📿 वृक्ष पाहता परतला आग
2552.
वृक्ष पाहता परतला आगम । निगमा न कळे दुर्गम ।
वेदशास्त्रांसी निरुते वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥
माझे सोपे कोंडें । कान्होबा करी तुं निवाडे ।
अर्थ सखोल ब्रह्मांड । भक्तिभाव तयासि उघडे रे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५५३
📿 सोपा वृक्ष फळासी आला
2553.
सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥
वेदा न कळे मूळ शेंडा । शास्त्रे भांडतां पै तोंडा ॥२॥
पुराणे स्तवितां व्याकुळ जाहली । निवांत होऊनियां ठेली ॥३॥
मूळ वृक्ष जनार्दन । एका जनार्दनी विस्तार पूर्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५५४
📿 शिजल्यावरी जाळ । वाय
2554.
शिजल्यावरी जाळ । वाया जायाचे ते मूळ ॥१॥
ऐसा वारावा तो श्रम । अतिशयी नाही काम ॥धृपद॥
सांभाळावे वर्म । उचिताच्या काळे धर्म ॥२॥
तुका म्हणे कळे । ऐसे कारणाचे वेळे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५५४
📿 एक दोन तीन विचार करत
2554.
एक दोन तीन विचार करती । परि न कळे गति त्रिवर्गातें ॥१॥
त्रिरूप सर्व हा मायेचा पसार । त्रिवर्ग साचार भरले जग ॥२॥
त्रिगुणात्मक देह त्रिगुण भार आहे । त्रिमुर्ती सर्व होय कार्यकर्ता ॥३॥
एका जनार्दनी त्रिगुणांवेगळा । आहे तो निराळा विटेवरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५५५
📿 उभा ऐल थडी । तेणे घा
2555.
उभा ऐल थडी । तेणे घालू नये उडी ॥१॥
पुढे गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ॥धृपद॥
दिसते आहारी । नये जाऊ ऐशावरी ॥२॥
अळसाची धाडी । तुका म्हणे बहु नाडी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५५५
📿 चार देह चार अवस्था स
2555.
चार देह चार अवस्था समाधी । कासया उपाधि करिसी बापा ॥१॥
चार वेद जाण युगें प्रमाण । पांचवें विवरण न करी बापा ॥२॥
जनार्दनाचा एक चतुर्थ शोधोनी पांचवें ते स्थानी लीन झाला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५५६
📿 शक्ती द्याव्या देवा
2556.
शक्ती द्याव्या देवा । नाही पार्थीवाची सेवा ॥१॥
मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥धृपद॥
मना पोटी देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥
तुका म्हणे सोसे । लागे लाविल्याचे पिसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५५६
📿 पंचक पंचकाचा पसारा प
2556.
पंचक पंचकाचा पसारा पांचाचा । खेळ बहुरूपियां पांचापासोनी ॥१॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । पंचकप्राण मन पांचांमाजी ॥२॥
इंद्रियपंचक ज्ञान ते पंचक । कर्म ते पंचक जाणे बापा ॥३॥
धर्म तो पंचक स्नान ते पंचक । ध्यान ते पंचक जाणे बापा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५५८
📿 संसाराच्या नावे घालू
2558.
संसाराच्या नावे घालूनिया शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥
हरीभजने हे धवळिले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥धृपद॥
कोणा ही नलगे साधनांचा पाग । करणे केला त्याग देहबुद्धी ॥२॥
तुका म्हणे सुख समाधि हरीकथा । नेणे भव्यकथा गाईल तो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५५९
📿 विश्वासिया नाही लागत
2559.
विश्वासिया नाही लागत सायास । अनायासे रसा अंगा येतो ॥१॥
लेंकराच्या हाते घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥धृपद॥
गौरव त्या मानी आरुषा वचनी । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥
तुका म्हणे आहेस सकळ ही साक्षी । माझा तो कईपक्षी पांडुरंग ॥३॥