वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 231. सुदामचरित्र

नाही आमुचे दैवी त्या

🙏 4. संत नामदेव · ABH-083975 · अभंग क्र. २२४०

2240.
नाही आमुचे दैवी त्याणे कोठोनी द्यावे । व्यर्थ का रुसावे देवावरी ॥१॥
न करिता खेद पुढे वाट चाले । गौरक्षक भेटले तयालागी ॥२॥
पुसतसे त्यासी कोणाचे नगर । ते म्हणती घर सुदाम्याचे ॥३॥
सुदाम्याची तुम्ही हेळणा करिता । तयाच्या संचीता प्राप्त कैचे ॥४॥
मानुनी असार नगरद्वारा गेला । प्रचीती तयाला नयेचि ते ॥५॥
जेव्हा वेत्नधारी मजुरा करिती । चरणासी लागती सुदाम्याच्या ॥६॥
सुदामदेव तेव्हा मंदिरासी गेला । मग ओंवाळिला सुंदरीने ॥७॥
समाधानी झाला सुदामा ब्राम्हण । करारे कीर्तन नामा म्हणे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग