संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३१५
📿 माझे जड भारी । आता अ
1315.
माझे जड भारी । आता अवघे तुम्हावरी ॥१॥
जालो अंकित धंकिला । तुमचा मुकलो मागिला ॥धृपद॥
करितो जे काम । माझी सेवा तुझे नाम ॥२॥
तुका पाया लागे । काही नेदी ना न मगे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १३१५
📿 सावध सावध राजाई हो स
1315.
सावध सावध राजाई हो सुखे | नामयाने दुःख निरसिले ॥१॥
संसार सांते या येऊनि भाग्याचा छंद विठ्ठलाचा लागला यासी ॥२॥
याचे नाम ऐसे न दिसे त्रिभुवनी | नायको दुजे कर्णी नाम्या ऐसे ॥३॥
वैष्णवांचे गजर टाळघोष दिडी | उभयता ब्रह्मांडी घोष गेला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३१६
📿 तुम्ही आम्ही भले आता
1316.
तुम्ही आम्ही भले आता । जालो चिंता काशाची ॥१॥
आपुलाले आलो स्थळी । मौन कळी वाढेना ॥धृपद॥
सहज जे मनी होते । ते उचिते घडले ॥२॥
तुका म्हणे नसते अंगा । येत संगा सारिखे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १३१७
📿 शिकवा हो रुक्माई आपु
1317.
शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता | का आम्हा अनाथा कष्टवितो ॥१॥
जन्मोनिया आमुची पुरविली पाठी | मोडिली राहाटी संसाराची ॥२॥
आता आम्ही काय करणे माउलिये | बैसू सावलिये कवणाचिये ॥३॥
माझ्या भ्रतारासी लावियेला चाळा | क्षण जी वेगळा न करी त्यासी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई चा निश्चय›
📿 अभंग क्र. १३१८
📿 अंगोळिये विठा कडियेस
1318.
अंगोळिये विठा कडियेसी नारा | राजाई पंढरपुरा चालियेली ॥१॥
भिवरा संपूर्ण जातसे भरवेली | राजाई बोलली कैसे जाले ॥२॥
एकली मी बाळे काय करू आता | आहा पंढरिनाथा काय केले ॥३॥
एक बांधिले पाठीसी दुजे बांधिले पोटासी | वेणुनादापाशी वाहावत गेली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३१९
📿 तरिच हा जीव संसारी उ
1319.
तरिच हा जीव संसारी उदास । धरिला विश्वास तुम्हा सोई ॥१॥
एके जातीविण नाही कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥धृपद॥
फुटतसे प्राण क्षणांच्या विसरे । हे तो परस्परे सारिखेचि ॥२॥
तुका म्हणे चित्ती राखिला अनुभव । तेणे हा संदेह निवारिला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३२०
📿 किती विवंचना करीतसे
1320.
किती विवंचना करीतसे जीवी । मन धावडवी दाही दिशा ॥१॥
कोणा एका भावे तुम्ही अंगीकार । करावा विचार याच साठी ॥धृपद॥
इतर ते आता लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥२॥
तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावे प्रेमबोधी बुडोनिया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई चा निश्चय›
📿 अभंग क्र. १३२०
📿 राजाई ते पुसे अहो ना
1320.
राजाई ते पुसे अहो नामयाला | करा जेवायला कांही यासी ॥१॥
प्रातःकाळी घरी सारूनि भोजन | आले ते चालून माझे भेटी ॥२॥
नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ति भोजन निश्चिती करू नये ॥३॥
उदईक हरिदिनी उपवास जागरण | ऐकावे कीर्तन चार प्रहर ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाईचे बंधू भेटण्यास आले असता राजाई नामदेवाशी झालेला संवाद›
📿 अभंग क्र. १३२०
📿 राजाई ते पुसे अहो ना
1320.
राजाई ते पुसे अहो नामयाला | करा जेवायला कांही यासी ॥१॥
प्रातःकाळी घरी सारूनि भोजन | आले ते चालून माझे भेटी ॥२॥
नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ति भोजन निश्चिती करू नये ॥३॥
उदईक हरिदिनी उपवास जागरण | ऐकावे कीर्तन चार प्रहर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३२२
📿 आता होइन धरणेकरी । भ
1322.
आता होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन ॥१॥
नाही केली जीवेसाठी । तो का गोष्टी रुचे ते॥धृपद॥
आधी निर्धार तो सार । मग भार सोसेना ॥२॥
तुका म्हणे खाऊ जेऊ । नेदुं होऊ वेगळा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई चा निश्चय›
📿 अभंग क्र. १३२२
📿 वराईची गोणी कळली राज
1322.
वराईची गोणी कळली राजाईसी नामा ब्राह्मणांसी बोलाविती ॥१॥
इतक्यामध्ये होन मडकेंभर काढिले | गोणी ते शिविली होती तैसी ॥२॥
द्विज मेळवुनि आला नामदेव वांटियेले सर्व द्रव्य त्याने ॥३॥
नामा म्हणे द्रव्य ज्याचे त्या दिधले | ऋण ते ठेविले नाही कांही ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाईचे बंधू भेटण्यास आले असता राजाई नामदेवाशी झालेला संवाद›
📿 अभंग क्र. १३२२
📿 वराईची गोणी कळली राज
1322.
वराईची गोणी कळली राजाईसी नामा ब्राह्मणांसी बोलाविती ॥१॥
इतक्यामध्ये होन मडकेंभर काढिले | गोणी ते शिविली होती तैसी ॥२॥
द्विज मेळवुनि आला नामदेव वांटियेले सर्व द्रव्य त्याने ॥३॥
नामा म्हणे द्रव्य ज्याचे त्या दिधले | ऋण ते ठेविले नाही कांही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १३२२
📿 नामपाठे गुण झाले पै
1322.
नामपाठे गुण झाले पै त्रिगुण । अनाम लक्षण नामपाठे ॥१॥
सैरा सैराट धांवे जे वाटा । तयाच्या चेष्टा न चलती तेथे ॥२॥
जनार्दनाचा एका एकपणे बोधिला । जनार्दन वोळला कामधेनु ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३२३
📿 होईल तरि पुसापुसी ।
1323.
होईल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावे ॥१॥
तोवरी मी पुढे काही । आपुले नाही घालीत ॥धृपद॥
जाणेनिया अंतर देव । जेव्हा भेव फेडील ॥२॥
तुका म्हणे धरिल हाती । करील खंती वेगळे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई चा निश्चय›
📿 अभंग क्र. १३२३
📿 'नामा म्हणे स्त्रिये
1323.
'नामा म्हणे स्त्रिये अनुचित केले | का माझ्या शिणविले विठोबाशी ॥१॥
निदेच्या उत्तरी निषेधिले मज वाटली त्या लाज मायबापा ॥२॥
मग तो माझा स्वामी जाला वेषधारी | तुजलागी सुंदरी पुढारला ॥३॥
रत्नजडित मुगुट सत्वर फेडोनि | आलासे वेढोनी शुभ्र शेला ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाईचे बंधू भेटण्यास आले असता राजाई नामदेवाशी झालेला संवाद›
📿 अभंग क्र. १३२३
📿 'नामा म्हणे स्त्रिये
1323.
'नामा म्हणे स्त्रिये अनुचित केले | का माझ्या शिणविले विठोबाशी ॥१॥
निदेच्या उत्तरी निषेधिले मज वाटली त्या लाज मायबापा ॥२॥
मग तो माझा स्वामी जाला वेषधारी | तुजलागी सुंदरी पुढारला ॥३॥
रत्नजडित मुगुट सत्वर फेडोनि | आलासे वेढोनी शुभ्र शेला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १३२३
📿 नामपाठे क्रिया नामपा
1323.
नामपाठे क्रिया नामपाठे कर्म । नामपाठे वर्म हाता येत ॥१॥
तो हा सोपा योग नामपाठ वाचे । न करी सायासांचे वर्म कांही ॥२॥
जनार्दनाचा एका भक्तीसी भुलला । मोकळा मार्ग केला नामपाठे ॥३॥
नामपाठमार्ग-गीताज्ञानेश्वरीपाठ व एकाग्र मनानें अखंड नामोच्चार
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३२४
📿 हा तो नव्हे काही निर
1324.
हा तो नव्हे काही निराशेचा ठाव । भले पोटी वाव राखिलिया ॥१॥
विश्वंभरे विश्व सामावले पोटी । तेथे चि सेवटी आम्ही असो ॥धृपद॥
नेणता चिंतन करितो अंतरी । तेथे अभ्यंतरी उमटेल ॥२॥
तुका म्हणे माझ्या स्वामी अबोलणा । पुरवू खुणे खुणा जाणतसो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई चा निश्चय›
📿 अभंग क्र. १३२४
📿 दोन्ही जोडुनि कर माथ
1324.
दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणी | म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी ॥१॥
मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा अपराध क्षमा करा माझा ॥२॥
अंतरींची खूण कांही सांगा मज | जे तुम्ही हृदयी बीज धरूनि असा ॥३॥
जेणे सुखे तुमचे चित्त निरंतर | आनंदे निर्भर संदा असा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाईचे बंधू भेटण्यास आले असता राजाई नामदेवाशी झालेला संवाद›
📿 अभंग क्र. १३२४
📿 दोन्ही जोडुनि कर माथ
1324.
दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणी | म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी ॥१॥
मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा अपराध क्षमा करा माझा ॥२॥
अंतरींची खूण कांही सांगा मज | जे तुम्ही हृदयी बीज धरूनि असा ॥३॥
जेणे सुखे तुमचे चित्त निरंतर | आनंदे निर्भर संदा असा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३२५
📿 निष्ठुर तो दिसे निरा
1325.
निष्ठुर तो दिसे निराकारपणे । कोवळा सगुणे प्रतिपाळी ॥१॥
केला च करावा केला कइवाड । होईल ते गोड न परते ॥धृपद॥
मथिलिया लागे नवनीत हाता । नासे वितिळता आहाच ते ॥२॥
तुका म्हणे आता मनाशी विचार । करावा तो सार एकचित्ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३२८
📿 नामपाठे वर्म वेदींचे
1328.
नामपाठे वर्म वेदींचे ते कळे । नाम पाठबळें शास्त्रबोध ॥१॥
या दोहींचेंवर्म ज्ञानदेवी जाणा । जपे का रे जना हृदयी सदा ॥२॥
जनार्दनाचा एक विनित हो उनी । आठवितो मनी ज्ञानदेवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३३०
📿 आपुल्या आपण उगवा लिग
1330.
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझे जड करुन घ्याल ॥१॥
उद्धारासी काय उधाराचे काम । वाढवूंचि श्रम नये देवा ॥धृपद॥
करा आता मजसाठी वाड पोट । ठावे नाही तंटे झाले लोकी ॥२॥
तुका म्हणे बाकी झडलियावरी । न पडे वेव्हारी संचिताचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३३०
📿 नामपाठ साधन याहुनी आ
1330.
नामपाठ साधन याहुनी आहे कोण । कासयासी पेणे स्वर्गवास ॥१॥
जन्म देई देवा जन्म देई देवा । गाईन मी देवा नामपाठ ॥२॥
जनार्दनाचा एका बोलतसे वाणी । नामपाठे जनी जनार्दन ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३३१
📿 सर्व संगी विट आला ।
1331.
सर्व संगी विट आला । तू एकला आवडसी ॥१॥
दिली आता पायी मिठी । जगजेठी न सोडी ॥धृपद॥
बहु जालो खेदक्षीण । येणे सीण तो नासे ॥२॥
तुका म्हणे गंगेवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३३२
📿 नामपाठे मोक्ष पाविजे
1332.
नामपाठे मोक्ष पाविजे तत्त्वता । आणिक ते आता साधन नाही ॥१॥
नामपाठ सार नामपाठ सार । न करी विचार आणिक दुजा ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाय । आदरे नाचताहे संतापुढें ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३३३
📿 गोदे कांठी होता आड ।
1333.
गोदे कांठी होता आड । करूनि कोड कवतुके ॥१॥
देखण्यांनी एक केले । आइत्या नेले जिवनापे ॥धृपद॥
राखोनिया होतो ठाव । अल्प जीव लावूनि ॥२॥
तुका म्हणे फिटे धनी । हे सज्जनी विश्रांति ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३३४
📿 न पाहे माघारे आता पर
1334.
न पाहे माघारे आता परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥
सामोरा येऊनि कवळी दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥धृपद॥
सावधान चित्त होईल आधारे । खेळता ही बरे वाटईल ॥२॥
तुका म्हणे कंठ दाटला या सोसे । न पवेचि कैसे जवळी हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३३५
📿 नामपाठ मंत्र सर्वांत
1335.
नामपाठ मंत्र सर्वांत पै श्रेष्ठ । तेणे ते वैंकुठ सरते केले ॥१॥
नामपाठे साधे साधन तत्त्वता । मोक्ष सायुज्यता हाता लागें ॥२॥
जनार्दनाचा एका प्रेमे नाम गाय । उभारुनी बाह्म सांगतसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३३६
📿 नामपाठ करिता आनंद मा
1336.
नामपाठ करिता आनंद मानसें । योगयाग राशी पाया लागे ॥१॥
आनंदे आवडी नामपाठ गाय । उभा तारिता बाह्मा जना ॥२॥
जनार्दनाचा एका सांगे जगाप्राती । नामपाठे विश्रांती होईल जना ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३३७
📿 नामपाठ पसारा घे रे म
1337.
नामपाठ पसारा घे रे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे ॥१॥
नाम ते सोपे नाम ते सोपे । नाम ते सोपे विठ्ठलाचें ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ वाणी । कीर्ति त्रिभुवनी नाममाठें ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३३८
📿 करू तैसे पाठांतर । क
1338.
करू तैसे पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥
जिही केला मूर्तीमंत । ऐसा संतप्रसाद ॥धृपद॥
सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥२॥
तुका म्हणे घेऊ धावा । करू हावा ते जोडी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३३९
📿 अचळ न चळे ऐसे जाले म
1339.
अचळ न चळे ऐसे जाले मन । धरूनि निजखुण राहिलो ते ॥१॥
आवडी बैसली गुणाची अंतरी । करू धणीवरी सेवन ते ॥धृपद॥
एकविध भाव नव्हे अभावना । आणिक या गुणा न मिळवे ॥२॥
तुका म्हणे माझे पडिले आहारी । ध्यान विटेवरी ठाकले ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३३९
📿 नामपाठे ज्ञान नामपाठ
1339.
नामपाठे ज्ञान नामपाठे ध्यान । नामपाठे मन स्थिर होय ॥१॥
जगांत हे सार नामपाठ भक्ती । आणिक विश्रांती नाही नाही ॥२॥
जनार्दनाचा एका अखंड नाम गाय । हर्ष नाचताहे प्रेमे रंगी ॥३॥