🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२६२
📿 सुखे संसारा हा करी ।
3262.
सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी ॥१॥
दुःखरूप हा संसार । रामनामे सुख साचार ॥२॥
रामनामाचें स्मरण । नाश पावे जन्ममरण ॥३॥
जयापाशीं नाम असे । नारायण तेथे वसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२६३
📿 भोळे भाविक हे जुनाट
3263.
भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसे केले भक्तिभावे ॥१॥
म्हणउनि चिंता नाही आम्हा दासा । न भ्यो गर्भवासा जन्म घेता ॥धृपद॥
आपुलिया इच्छा करू गदारोळ । भोगू सर्वकाळ सर्व सुखे ॥२॥
तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात । नाही विसंबत येर येरा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२६४
📿 नाही बळयोग अभ्यास कर
3264.
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥
तुझिये भेटीचे प्रेम अंतरंगी । नाही बळ अंगी भजनाचे ॥धृपद॥
काय पांडुरंगा करू बा विचार । झुरते अंतर भेटावया ॥२॥
तुका म्हणे सांगा वडिलपणे बुद्धी । तुजविण दयानिधी पुसो कोणा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२६४
📿 नित्य ध्याता हरिचे च
3264.
नित्य ध्याता हरिचे चरण । करी भक्त दुःखहरण ॥१॥
चरणरज पवित्रता । सदा घ्यावेंचि माथा ॥२॥
लागला पाषाणा चरण । ती स्त्रीची जाली पावन ॥३॥
ऐसे चरणींचे मान । शरण एका जनार्दन ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२६५
📿 स्वगोत्र परगोत्र यां
3265.
स्वगोत्र परगोत्र यांचा भरंवसा । मानूं नये सहसा अरे मूढा ॥१॥
वेदींचे वचन वेदी ते प्रमाण । एक नारायण सार जप ॥२॥
शास्त्रांचा प्रभाव शास्त्रिकांसी ठावा । उघड जपावा राममंत्र ॥३॥
न करी आळस नको पडों भरीं । एका जनार्दनी हरी स्मरे देही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२६६
📿 बहुता जन्मा अंती जन्
3266.
बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा । देव तू सोइरा करी आता ॥१॥
करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडी परता ॥धृपद॥
सांडि कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥
पंढरीस जावे सर्व सुख घ्यावे । रूप ते पाहावे विटेवरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२६७
📿 पवित्र ते कुळ पावन त
3267.
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास घेती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेंनि पावन तिन्ही लोक ॥धृपद॥
वर्णअभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥३॥
अंत्यजादि योनि तरल्या हरीभजने । तयाची पुराणे भाट झाली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२६७
📿 गोविंद गोपाळ वदता वा
3267.
गोविंद गोपाळ वदता वाचे । पायी यमदूताचें भय नाही ॥१॥
नित्य जया ध्यान गोविंद स्मरण । संसारबंधन तया नाही ॥२॥
उठता बैसतां खेळतां हासतां । गोविंद गीती गाता मोक्ष जोडे ॥३॥
गोविंदाचे नाम सदा ती समाधी । एका जनार्दनी उपाधी तुटली त्याची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२६९
📿 मानू काही आम्ही आपुल
3269.
मानू काही आम्ही आपुलिया इच्छा । ना तरि सरसा रंकरावो ॥१॥
आपुल्या उदास आहो देहभावी । मग लज्जाजीवी चाड नाही ॥धृपद॥
तुका म्हणे आम्ही खेळो सहजलीळे । म्हणोनी निराळे सुख दुःखचा ॥२॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२६९
📿 वेरझार खुंटे नाम वदत
3269.
वेरझार खुंटे नाम वदता वाचे । आणिक सायासाचें न करी कोड ॥१॥
तुटे रे बंधन नोहेंचि पतन । वाचे जनार्दन जप करी ॥२॥
एका जनार्दनी वाचे जपे नाम । आणिक दुर्गम साधन नको ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२७१
📿 निरंजनी आम्ही बांधिय
3271.
निरंजनी आम्ही बांधियेले घर । निराकारी निरंतर राहिलोंसे ॥१॥
निराभासी पूर्ण झालो समरस । खंड ऐक्यास पावलो आम्ही ॥२॥
तुका म्हणे आता नाही अहंकार । झालो तदाकार नित्य शुद्ध ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२७२
📿 उत्तम पुरुषाचे उत्तम
3272.
उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण । जेथे भेद शून्य मावळला ॥१॥
भेदशुन्य जाला बोध स्थिरावला । विवेक प्रगटला ज्ञानोदय ॥२॥
जिकडे पाहे तिकडे उत्तम दरुशन । दया शांति पूर्ण क्षमा अंगी ॥३॥
एका जनार्दनी उत्तम हे पाप्ती । जेथे मावळती द्वैताद्वैत ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२७३
📿 जेथे सत्त्वाचें प्रा
3273.
जेथे सत्त्वाचें प्राधान्य । जेथे सात्विकाचे आचरण । तो परलोक साधुन । साधूनी गेला ॥१॥
जेथे राजाचें प्राधान्य । त्याचे लोभी वसे मन । ज्ञान सांगे मुख्य करून । परि निष्ठा नाही ॥२॥
जेथे प्राधान्य तामस । तो द्वेषी आणि कर्कस । ज्ञान सांगे अपरोक्ष । परी अंतईं कठीण ॥३॥
जेथे प्राधान्य तूर्या । तेथे सत्त्व शांति दया । विवेक वैराग्य करूनियां । सर्वासीं भजे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२७४
📿 नाही शब्दाधीन वर्म आ
3274.
नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्री मंत्री अनुभव तो ॥१॥
हर्षामर्षा अंगी आदळती लाटा । कामक्रोधे तटा सांडियेले ॥धृपद॥
न सरे ते भक्ति विठोबाचे पायी । उपरति नाही जेथे चित्ता ॥२॥
तुका म्हणे सुख देहनिरसने । चिंतने चिंतन तद्रूपता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२७४
📿 म्हणा तुम्ही विष्णुद
3274.
म्हणा तुम्ही विष्णुदास । तेणे पुरे तुमची आस । काळा पडे त्रास । नामस्मरणें करूनी ॥१॥
उघडा मंत्र विठ्ठल हरी । सदा वाचे जो उच्चारी । होतसे बोहरी । पातकांसी तात्काळ ॥२॥
न लगे कांही साधन । वाचे म्हणा रामकृष्ण । एका जनार्दनी शरण । कायावाचामनेंसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२७८
📿 कायावाचामने छंद । धर
3278.
कायावाचामने छंद । धरा गोविंद ह्रुदयीं ॥१॥
नका जाऊ लिगाडामागें । ऐसे सांगे वेदशास्त्र ॥२॥
पुराण पठण यज्ञयाग । नोहे भाग कलीमाजी ॥३॥
एका जनार्दनी नाम सार । उतरील पार भवसागरीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२७९
📿 सातादिवसांचा जरी झाल
3279.
सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरी कीर्तनासी टाकु नये ॥१॥
फुटो हा मस्तक तुटो हे शरीर । परी नामाचा गजर सोडू नये ॥धृपद॥
शरीराचे होत दोनी तेही भाग । परि कीर्तनाचा रंग सांडो नये ॥२॥
तुका म्हणे ऐसा नामी झाला निर्धार । तेथे निरंतर देव वसे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२८०
📿 पहिली माझी ओवी ओवीन
3280.
पहिली माझी ओवी ओवीन जगन्न । गाईन पवित्र पांडुरंग ॥१॥
दुसरी माझी ओवी दुजे नाही कोठे । जनी वनी भेटे पांडुरंग ॥धृपद॥
तिसरी माझी ओवी तिला नाही ठाव । अवघाची देव जनी वनी ॥२॥
चवथी माझी ओवी वैरिले दळण । गाईन निधान पांडुरंग ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२८०
📿 शरणागत आलिया नुपेक्ष
3280.
शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता आहे माझ्या ॥१॥
सर्व भावे जावे नाम वाचे गावें । जिवलगा भेटावे विठोबासी ॥२॥
साधुसंत गाती आनंदें नाचती । क्षेम तयाप्रति द्यावे सुखें ॥३॥
एका जनार्दनी पाहता विठ्ठल । जन्ममरण निवारेल हेळामात्रें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२८१
📿 व्यापूनियां भरला देव
3281.
व्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठे पा ॥१॥
तयाचे करा रे चिंतन । मग तुम्हा न पडे न्यून ॥२॥
वाचे वदा विठ्ठल साचा । सोइरा साचा अंतकाळी ॥३॥
मागे पुढे उभा असे । एका जनार्दनी दिसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२८२
📿 घ्या रे भाई घ्या रे
3282.
घ्या रे भाई घ्या रे भाई । कोणी काही थोडे बहु ॥१॥
येच हाटी येच हाटी । बांधा गाठी पारखून ॥धृपद॥
वेच आहे बेच आहे । सरले पाहे मग खोटे ॥२॥
उघडे दुकान उघडे दुकान । रात्री झाली कोण सोडी मग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२८४
📿 जैसी तैसी तरि वाणी ।
3284.
जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥
लेकरांच्या स्नेहे गोड । करी कोड त्या गुणे ॥धृपद॥
मागे पुढे रिघे पोटी । साहे खेटी करी ते ॥२॥
तुका विनवी पांडुरंगा । ऐसे पैंगा आहे हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२८४
📿 जनार्दन पाया धरूनिया
3284.
जनार्दन पाया धरूनियां राहे । संसार तो काय करील तुझे ॥१॥
स्वरूपाचें ज्ञान नोहे अनायासें । ज्याचे श्रुति पिसे लागलेंसे ॥२॥
जाणीव नेणीव सांडोनिया मागे । शरण रिघे वेगे एका जनार्दनी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२८७
📿 होउनी उदास । मागा प्
3287.
होउनी उदास । मागा प्रेम सावकाश ॥१॥
उभा विटेवरी उदित । देता न पाहे चित्त वित्त ॥२॥
जे जे पाहिजे जयालागीं । ते ते देतो त्या प्रसंगी ॥३॥
न म्हणे उत्तम चांडाळ । ऐसा भक्तीचा भुकाळ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२८९
📿 किती सांगो तरी नाईकत
3289.
किती सांगो तरी नाईकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील ॥१॥
नका नका करू रांडेची संगती । नेईल अधोगती घाली यम ॥धृपद॥
तुका म्हणे जरी देवी नाही चाड । हाणोनि थोबाड फोडी काळ ॥२॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९०
📿 पिकलिया सेंद कडुपण ग
3290.
पिकलिया सेंद कडुपण गेले । तैसे आम्हा केले पांडुरंगे ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥धृपद॥
आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे । संसारी जन्मीजे याचि लागी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९१
📿 कारणा कारण वारीयेले
3291.
कारणा कारण वारीयेले जेथे । जातो तेणे पंथे संतसंगे ॥१॥
संती हे पईल लाविले निशाण । ते खुण पाहोन नाम गर्जे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे । पाडुरग भेटे भरंवसेनी ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९३
📿 सिंदळीचे चित्त परपुर
3293.
सिंदळीचे चित्त परपुरुषावारी । पति चुरमुरी रात्रंदिवस ॥१॥
ऐसे ते वोंगळी जाय हो नरका । तिच्या दोषे देखा पती जाय ॥धृपद॥
आपण बुडती पती बुडविती । दोन्ही कुळे नेती अधःपाता ॥२॥
तुका म्हणे तिची न करावी संगती । होईल फजिती मागे पुढे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४›
📿 अभंग क्र. ३२९३
📿 उद्धवास बोध - अभंग ३
3293.
उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४
शहाणा तो जाण रे । उद्धवा आत्मत्वें पाहे रे । नेणता तो जाण रे । उद्धवा देहबुद्धीस वाहे रे ॥१॥
उद्धव म्हणे कान्होबा सांग रे । गोडा गोडा गोष्टी स्वभाव रे । निज गोडा गोष्टी ऐकता । चित्त चैतन्य फांवे रे ॥२॥
सज्ञान तोची रे उद्धवा । ज्याची जाणीव विरे । अज्ञान तोची रे उद्धवा । ज्ञानग्र्वें हुंबरे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९४
📿 मायबाप सवे नये धनवित
3294.
मायबाप सवे नये धनवित्त । करावे संचित भोगावे ते ॥१॥
म्हणवुनि लाभ काय तो विचारी । नको चालीवरी चित्त ठेवू ॥धृपद॥
आयुष्य शेवटी सांडूनि जाणार । नव्हेचि साचार शरीर हे ॥२॥
तुका म्हणे काळे लावियेले माप । जमा धरी पापपुण्याचीही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९५
📿 मोटळे हाटी सोडिल्या
3295.
मोटळे हाटी सोडिल्या गाठी । विकर्या घातले कण ।
ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिले । सारूनि लिगाड दान ।
खरे माप हाती घेऊनि बैसलो । मानिती तेचि चौघे जन ।
खरे वित्त तेथे आले चोजवीत । गिर्हाइक संतजन ॥१॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३२९५
📿 मनास उपदेश - अभंग ३२
3295.
मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३
मन एके ठायी । राहे ऐसे करी कांही ॥१॥ सर्व साधनांचे सार । मनी करावा विचार ॥२॥
एकाग्र ते मन । करूनि करावे भजन ॥३॥ मन जिंकावें पा आधी । तेणे तुटेल उपाधी ॥४॥ एका जनार्दनी मन । दृढ ठेवावे बांधुन ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९६
📿 आम्हा काही आम्हा काह
3296.
आम्हा काही आम्हा काही । आता नाही या बोले ॥१॥
मोल सांगा मोल सांगा । घेणे तीही गा पुसावे ॥धृपद॥
कैसे घडे कैसे घडे । बडबड तुज मज ॥२॥
मुद्दले साठी मुद्दले साठी । लाभ पोटी त्यामध्ये ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३२९६
📿 मने करूनि विश्वास ।
3296.
मने करूनि विश्वास । संतचरणी व्हा रे दास ॥१॥ आणीक न लगे साधन । मन आवरुनी करी भजन ॥२॥ मन धरी मृष्टीमाजीं । वाव तूम न शिणे सहजीं ॥३॥ मन दृढ देवापायीं । एका जनार्दनी पाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९७
📿 काय मागावे कवणासी ।
3297.
काय मागावे कवणासी । ज्यासी मागो तो मजपाशी ॥१॥
जरी मागो पद इंद्राचे । तरी शाश्वत नाही त्याचे ॥धृपद॥
जरी मागो धृवपद । तरी त्यासी येथील छंद ॥२॥
स्वर्गभोग मागो पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३२९७
📿 मने कल्पोनियां केली
3297.
मने कल्पोनियां केली विटंबना । हिंडविले रानां वासनेच्या ॥१॥ तैसे नका करू वाउगे चिंतन । मन आकळुन कार्य करा ॥२॥ मनाचे आकलन करावे पा आधी । वाउगी उपाधी तुटतसे ॥३॥ एका जनार्दनी आवरुनी मन । मग करी भजन सुखरूप ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९८
📿 रुसलो आह्मी आपुलिया
3298.
रुसलो आह्मी आपुलिया संवसारा । तेथे जनाचारा काय पाड ॥१॥
आम्हा इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाही या दुसरे देवाविण ॥धृपद॥
दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथे ॥२॥
उपाधिवचन नाइकती कान । त्रासले हे मन बहु माझे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३२९८
📿 नका धावूं तुम्ही सैर
3298.
नका धावूं तुम्ही सैरा । मना मागे या सत्वरा ॥१॥ मन करा पै आधीन । तेणे जोडे संतचरण ॥२॥ मन आहे महापापी । लावावें ते हरिरुपी ॥३॥ मन स्थिर करूनी निश्चये । एका जनार्दनी पाहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२९९
📿 सांडुनि सुखाचा वाटा
3299.
सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥
का रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुठा जाऊन ॥धृपद॥
येथे मिळतो दही भात । नाही वैकुंठी ते मात ॥२॥
तुका म्हणे मुक्ती नलगे । राहेन संतांचिये संगे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३२९९
📿 करिता अनुष्ठान । मन
3299.
करिता अनुष्ठान । मन धांवे सहज जाण ॥१॥ मंत्र जंत्र यंत्र भेद । मने केला वादावाद ॥२॥
आधी मनाते जिंकावें । सहज रूप मग पहावे ॥३॥ मन करे आधीन आधी । एका जनार्दनी तुटे व्याधी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३००
📿 मन करूनिया सावध । वा
3300.
मन करूनिया सावध । वाचे स्मरे तू गोविंद ॥१॥ तेणे साधे सर्व काज । सकळ साधनांचे निज ॥२॥ मन धरी एकमुष्टी । वाचे जपे नाम गोष्टी ॥३॥ मन धांवे भलतीकडे । साधन वाया जाय कोडे ॥४॥ मन आवरुनी साधन । तेणे पावसी निजखुण ॥५॥ खूण संतांवांचुनी । एक जनार्दनी ध्यानी ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३०१
📿 आग्रहा नावे पाप । यो
3301.
आग्रहा नावे पाप । योगी सारावे संकल्प ॥१॥
सहजा ऐसे भांडवल । असोनि का सारा बोल ॥धृपद॥
तै न भेटे ते काय । मना अंगींचे उपाय ॥२॥
तुका म्हणे धरी सोय । वासनेची फोडा डोय ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३०१
📿 न करी सायास आणिक संक
3301.
न करी सायास आणिक संकल्प । वायांचि विकल्प न धरी मनी ॥१॥
मनाचे जे मन करी ते स्वाधीन । तेणे नारायण कृपा करी ॥२॥
एका जनार्दनी टाकूनि कल्पना । श्रीसंतचरणा शरण जाई ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३०४
📿 बाळ काय जाणे जीवनउपा
3304.
बाळ काय जाणे जीवनउपाय । वाहे मायबाप सर्व चिंता ॥१॥
आइते भोजन खेळणे अंतरी । अंकिताच्या शिरी भार नाही ॥धृ॥
आपुले शरीर रक्षिता न कळे । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥
तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । आमुची ते सत्ता तयावरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३०५
📿 काय करतील केली नित्य
3305.
काय करतील केली नित्य पापे । वसे नाम ज्यापे विठोबाचे ॥१॥
तृणी हुताशन लागला ते रासी । जळतील तैसी क्षणमात्रे ॥धृपद॥
विष्णुमूर्तीपाद पाहता चरण । तेथे कर्म कोण राहू शके ॥२॥
तुका म्हणे नाम जाळी महादोष । जेथे होय घोष कीर्तनाचा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३०६
📿 माकडा दिसती कंवटी ना
3306.
माकडा दिसती कंवटी नारळे । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥१॥
एका रस एका तोंडी पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥धृपद॥
सुनियांसी क्षीर चारील्या ओकवी । भोक्ता तो पोसवी धणीवरी ॥२॥
तुका म्हणे मूर्ख वागविती भार । नेतील ते सार परीक्षक ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३१०
📿 लावूनि कोलित । माझा
3310.
लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥
ऐसे बहुतांचे संधी । सापडला खोळेमधी ॥धृपद॥
पाहातील उणे । तेथे देती अनुमोदने ॥२॥
तुका म्हणे रिघ । पुढे नाही झाले धींद ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३११
📿 ऐसी एका अटी । रीती स
3311.
ऐसी एका अटी । रीती सिणती करंटी ॥१॥
साच आपुल्या पुरते । करून न घेती का हिते ॥धृपद॥
का ही वेचितील वाणी । निरर्थक चि कारणी ॥२॥
तुका म्हणे देवा । काही समर्पूनि सेवा ॥३॥