वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 75. श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५

श्रीकृष्ण - उद्धव प्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087761 · अभंग क्र. २२६५

2265.
श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५

द्वारकेमाजी श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥
सर्व देवाचा तुं देव । ईश्वर न कळे तुझी माव । शिवणे सर्व ऋषी गणगंधर्व । परी तु नाकळा सर्वथा ॥२॥
तुम्ही बैसोनि एकांती । काय करिता श्रीपती । हे होते पुसणे माझे चित्ती बहु दिवस श्रीहरीं ॥३॥
एकोनी उद्धवाची मात । तया बोले जगन्नाथ । एका जनार्दनी विनवीत । सावधान परियेसा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग