संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. १७
📿 एक पाहातसा एकांची दह
17.
एक पाहातसा एकांची दहने । सावध त्या गुणे का रे नव्हा ॥१॥
मारा हाक देवा भय अट्टाहासे । जंव काळा ऐसे झाले नाही ॥२॥
मरणाची तंब गांठोडी पदरी । जिणे तोचिवरी माप भरे ॥३॥
तुका म्हणे धिग वाहती मारग । अंगा आले मग हालो नेदी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. १७
📿 एक आपण साधू झाले । य
17.
एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले ॥१॥
उठे विकार ब्रम्ही मूळ । अवघे मायेचे गाबाळ ॥२॥
माया समुळ नुरे जेंव्हा । विश्व ब्रम्ह होईल तेंव्हा ॥३॥
ऐसा उमज आदी अंती । मग सुखी व्हावे संती ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १७
📿 सखी पुसे सखीयेसी । य
17.
सखी पुसे सखीयेसी । युगे झाली अठ्ठावीसी ।
उभा ऐकिला संतांमुखी । अद्यापी वर ।
कटावरी कर । भीवरा तीर वाळुवंटी संत सभा सभा ॥१॥
देव कांहो विटेवरी उभा उभा ॥धृ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. १७
📿 केलासे कुढावा जगी थो
17.
केलासे कुढावा जगी थोरपण । पतितपावन नाम सोपे ॥१॥
ते हे अगुणाचे रूप ते गोजिरे । पाहा हो साजिरे भीमातीरी ॥२॥
बाळ गोपाळाचे खेळतसे मेंळी । नाचे गदारोळी आनंदाने ॥३॥
चोखा म्हणे माझे मनाचे मोहन । विश्रांतीचे स्थान भाविकांसी ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १७
📿 किती हे मरती किती हे
17.
किती हे मरती किती हे रडती । कि तिक हांसती आपआपणा ॥१॥
पाहता विचार काय हे खरे । खोट्या लागी झुरे प्राणी देखा ॥२॥
मरती ते काय रडती ते काय । हांसती ते काय कवण कवणा ॥३॥
कवण तो मेला कवण तो राहिला । हांसती रडती कवणाला न कळे कांही ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १७
📿 नाही मज आशा आणिक कोण
17.
नाही मज आशा आणिक कोणाची । स्तुति मानवाची करूनी काय ॥१॥
काय हे देतील नाशिवंत सारे । यांचे या विचारो यांसी न पुरे ॥२॥
ऐसे ज्याचे देणे कल्पांती न सरे । तेंचि एक बरे आम्हांलागी ॥३॥
जो भक्तांचा विसावा वैकुंठनिवासी । तो पंढरीसी उभा विटे ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १›
📿 अभंग क्र. १७
📿 हे री मै तो प्रेम-दि
17.
हे री मै तो प्रेम-दिवानी मेरो दरद न जाणै कोय ।
घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय ।
जौहरि की गति जौहरी जाणै, की जिन जौहर होय ।
सूली ऊपर सेज हमारी, सोवण किस बिध होय ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. १७
📿 कर कटावरी तुळसीच्या
17.
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसे रूप हरी दावी डोळा ॥धृपद॥
कटी पीतांबर कास मिरवली । दाखवी वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसी तेचि रूप ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १७
📿 उठा उठा हो विठोबा झड
17.
उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेर । जडमुढ पाषाण यांचा करा उध्दार ॥
झडकरी उठोनिया कृपादृष्टीत्वा पाहावे । आपुले प्रेमसुख आम्हा भक्तासी द्यावे ॥
तोडुुनी भ्रांतीचे पडळ शुध्दबुध्द करावे । कायाकाशी पूर्णवासी स्नान धाडावे ॥
प्रयाग प्रयागी पिंड देऊनी दान' । सावध होऊनी करी गा हरिभजन ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १७
📿 हरिविण व्यर्थ आचार स
17.
हरिविण व्यर्थ आचार समर्थ । हरि हेचि हेत अरे जना ॥१॥
ते रुप पंढरी पुंडलिक संगे । एका नामे पांग पाश तोडी ॥२॥
सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण । वेद मते खुण ऐसी असे ॥३॥
निवृतिचा देव सर्व हा गोविंद । नाही भिन्न भेद विश्वी इथे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १८
📿 नामे सदा शुद्धी प्रा
18.
नामे सदा शुद्धी प्राणिया होतसे । नामापाशी असे भुक्ति मुक्ती ॥१॥
नामा ऐसे सोपे नाही त्रिभुवनी । नाम संजीवनी साधकासी ॥२॥
नामे भक्ती वाढे नामे कीर्ति वाढे । नामे सदा चढे मोक्ष हाता ॥३॥
यज्ञ दान तप नामे आली हाता । नामे सर्व सत्ता प्राप्त होय ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्रीकृष्ण जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. १८
📿 फिराविली दोनी । कन्य
18.
फिराविली दोनी । कन्या आणि चक्रपाणि ॥१॥
झाला आनंदि आनंद । अवतरले गोविंद ॥२॥
तुटली बंधने । वसुदेव देवकीची दर्शने ॥३॥
गोकुळासी आले । ब्रम्हा अव्यक्त चांगंले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 दत्त जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. १८
📿 तीन शिरे सहा हात । त
18.
तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ॥१॥
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ॥२॥
माथा शोभे जटाभार । अंगी विभूति सुंदर ॥३॥
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. १८
📿 मरणाही आधी राहिलो मर
18.
मरणाही आधी राहिलो मरोनी । मग केले मनी होते तैसे ॥१॥
आता तुम्ही पाहा आमुचे नवल । नका वेचू बोल वांयांविण ॥२॥
तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसे संग सरी तुम्हा आम्हा ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. १८
📿 जन हे सुखाचे दिल्या
18.
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे । अंत हे काळीचे नाही कोणी ॥१॥
झाल्या हीन शक्ति नाकडोळे गळती । सांडोनिया पळती रांडापोरे ॥२॥
बाईल म्हणे खर मरता तरी बरे ॥नासिले हे घर थुंकोनिया ॥३॥
तुका म्हणे माझी नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनिया ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. १८
📿 ब्रम्ह जैसे तैशा परी
18.
ब्रम्ह जैसे तैशा परी । आम्हा वडील भुते सारी ॥१॥
हात आपुला आपणा लागे । त्याचा करू नये खेद ॥२॥
जीभ दातांनी चाविली । कोणे बत्तीसी पाडिली ? ॥३॥
थोडे दुखावले मने । पुढे उदंड शहाणे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरपूर महात्म्य अभंग›
📿 अभंग क्र. १८
📿 उदंड पाहिले उदंड ऐकि
18.
उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥२॥
ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ॥३॥
तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे । पंढरी निर्माण केली देवे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १८
📿 विठ्ठल विठ्ठल मंत्र
18.
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥
भाग्यवंता छंद मनी । कोडे कानी ऐकती ॥धृ॥
विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळे न धरावी ॥२॥
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्ती तो धन्य ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 गुरुवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १८
📿 गेले दिगंबर ईश्वर वि
18.
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजी ॥१॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी । आता ऐसे कोणी होणे नाही ॥२॥
सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेचि साधन निवृत्तीचे ॥३॥
परब्रम्ह डोळा दावू ऐसे म्हणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १८
📿 किती किती बोलू देवा
18.
किती किती बोलू देवा । किती करू आता हेवा ॥१॥
बहु चाळवणा तू होसी । नाही का रे म्हणे मजसी ॥२॥
आता न धरी तुमची भीड । मज नाही दुजी चाड ॥३॥
किती बोलू देवा । आता राग न धरावा ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १८
📿 कोण भाग्य तया सेना न
18.
कोण भाग्य तया सेना न्हावियाचे । नीच काम त्याचे स्वये करी ॥१॥
घेउनी धोकटी हजामत करी । आरसा दावी करी बादशहासी ॥२॥
कसाबाचे घरी विकितसे मांस । राका मेहल्यास हुंडी भरी ॥३॥
बंका म्हणे ज्याचे पुराणी पवाडे । तो भक्त सांकडे वारीतसे ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १८
📿 परमार्थ साधावा बोलती
18.
परमार्थ साधावा बोलती या गोष्टी । पुरी न ये हातवटी कांही त्यांची ॥१॥
शुध्द भक्तिभाव नामाचे चिंतन । हेचि मुख्य कारण परमार्था ॥२॥
निंदा दोष स्तुति मान अपमान । वमनासमान लेखा आधी ॥३॥
परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ । मानावा अढळ परमार्थी ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १८
📿 उठा उठा हो विठोबा आत
18.
उठा उठा हो विठोबा आता उजेड जाहला । सांभाळा आपुली बाळे तु बापा विठ्ठला ॥
दिन उगवला बाळे भुकेली जाहली । दयाळू माऊली सकळा भोजन घाली ॥
सकळांसी सांभाळूनी घ्यावे त्वां अन्न । दयाळू होऊनी लावी आपूले ध्यान ॥
बोधला म्हणे देवा मी तो बाळ अज्ञान अखंड । मग देई तुझे नाम स्मरण ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १८
📿 भाग्याचेनि भाग्य उदो
18.
भाग्याचेनि भाग्य उदो पै दैवयोगे । ते पुंडलिका संगे भीमा तटी ॥१॥
ध्यान मनन एक करिता सम्यक । होय एका एक एक तत्व ॥२॥
उदो अस्तु मेळे ब्रह्म न मैळे । भोगिती सोहळे प्रेम भक्त ॥३॥
निवृत्ति निवांत विठ्ठल सतत । ना घे दुजी मात हरिविण ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १९
📿 कान्होबा तुझी घोंगडी
19.
कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसी का दिली वांगली रे ॥धृ॥
स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्त्व गुण विणली रे ।
षडूगुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुन्दरा शोभली रे ॥१॥
काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणली रे ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. १९
📿 ऐसे बहुत काळ लोटलिया
19.
ऐसे बहुत काळ लोटलियावरी । पुण्याची सामोग्री हारपली ॥१॥
मरोनिया जन्म हरणाचा पावला । पतिव्रता झाल्या कुरंगिणी ॥२॥
प्रारब्धाचा भोग सुटेना कोणासी । केली जैसी तैसी घ्यावी फळे ॥३॥
नामा म्हणे देव कृपा करील जरी । सुटेना तोंवरी भोग खरा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण दुसरे अभंग ८›
📿 अभंग क्र. १९
📿 नको ब्रम्हज्ञान आत्म
19.
नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥
दावी रूप मज गोपिका रमणा । ठेऊ दे चरणा वारी माथा ॥२॥
पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवे निंबलोण उतरीन ॥३॥
पुसता सांगेन हित गुज मत । बैसोनी एकांत सुख गोष्टी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. १९
📿 मरणाहाती सुटली काया
19.
मरणाहाती सुटली काया । विचारे या निश्चये ॥१॥
नासोनिया गेली खंती । सहजस्थिति भोगाची ॥२॥
न देखेंसे झाले श्रम । आले वर्म हाता हे ॥३॥
तुका म्हणे कैची कीव । कोठे जीव निराळा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. १९
📿 सुख सागर आपण व्हावे
19.
सुख सागर आपण व्हावे । जग बोधे निववावे ॥१॥
बोधा करू नये अंतर । साधु नाही आपपर ॥२॥
जीव जीवासी पै द्यावा । मग करू नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्ती धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १९
📿 विठ्ठल टाळ विठ्ठल दि
19.
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥धृ॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥