संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १
📿 संत माणकोजी महाराज ब
1.
संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
अगा पंढरीनाथा तू आमचे माहेर । पाहे निरंतर वाट तुझी ॥१॥
तुझीये भेटीचे आर्त माझे चित्ती । रखुमाईचा पती पांडुरंग ॥२॥
तुच आमचे वित्त तूच आमचे गोत । तू सर्व संपत्ती जोडी माझी ॥३॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 पारायण कसे करावे? पूर्वतयारीसह›
📿 अभंग क्र. १
📿 पारायण कसे करावे? पू
1.
२. पारायण कसे करावे? पूर्वतयारीसह
श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज ५ ते १०० ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्य फलप्राप्तीसाठी आहे.
पूर्ण श्रद्धेने व भक्तीभावाने, तसेच नाथांना शरण जाऊन केलेल पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात
पारायणाची पूर्वतयारी
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 पारायण कसे करावे? पूर्वतयारीसह›
📿 अभंग क्र. १
📿 पारायण कसे करावे? पू
1.
२. पारायण कसे करावे? पूर्वतयारीसह
श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज ५ ते १०० ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्य फलप्राप्तीसाठी आहे.
पूर्ण श्रद्धेने व भक्तीभावाने, तसेच नाथांना शरण जाऊन केलेल पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात
३. पारायणाची पूर्वतयारी
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 स्त्रियांनी पारायण करावे का?›
📿 अभंग क्र. १
📿 स्त्रियांनी पारायण क
1.
5. स्त्रियांनी पारायण करावे का?
'श्री नवनाथ भक्तिसार' ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का? असा प्रश्न पुष्कळदा विचारला जातो. याचे कारण, श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये अशी स्पष्ट आज्ञा प्रसिद्ध दत्तावतार श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी महाराज यांनी आपल्या 'स्त्रीशिक्षा' या ग्रंथात दिली आहे. याचे कारण या ग्रंथात वेदाक्षरे आलेली आहेत, असे ते सांगतात.
परंतु 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथात कुठेही वेदाक्षरे नसल्यामुळे हा ग्रंथ पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही वाचण्यास काहीच हरकत नाही. त्यायोगे त्यांचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 पारायणकाळात कोणते नियम पाळावेत?›
📿 अभंग क्र. १
📿 पारायणकाळात कोणते नि
1.
6. पारायणकाळात कोणते नियम पाळावेत?
'श्री नवनाथ भक्तिसार' या ग्रंथाचे पारायण करताना पाठकाने काही महत्वाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, तरच त्याला पारायणाचे अनुभव येतील.
हे नियम पुढीलप्रमाणेः
१) वाचन स्नानोत्तर, अंगाला भस्मलेपन करूनच करावे. भस्म कपाळावर, दोन्ही दंडांवर, हृदयावर व गुडघ्यांना लावावे व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ 'ॐ नमः शिवाय' एवढेच म्हणावे.
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 रोज किती अध्याय वाचावेत?›
📿 अभंग क्र. १
📿 रोज किती अध्याय वाचा
1.
4. रोज किती अध्याय वाचावेत?
पारायणकाळात रोज किती अध्याय वाचावेत या विषयी मतभेद आहेत. परंतु सर्वसाधारणतः पुढील प्रकारे वाचन केल्यास एकाच दिवशी जास्त वाचन करण्याचा ताण पडत नाही.
पहिल्या दिवशी १ ते ६ अध्याय
दुसऱ्या दिवशी ७ ते १२ अध्याय
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 रोज किती अध्याय वाचावेत?›
📿 अभंग क्र. १
📿 रोज किती अध्याय वाचा
1.
4. रोज किती अध्याय वाचावेत?
पारायणकाळात रोज किती अध्याय वाचावेत या विषयी मतभेद आहेत. परंतु सर्वसाधारणतः पुढील प्रकारे वाचन केल्यास एकाच दिवशी जास्त वाचन करण्याचा ताण पडत नाही.
पहिल्या दिवशी १ ते ६ अध्याय
दुसऱ्या दिवशी ७ ते १२ अध्याय
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 प्रस्तावना›
📿 अभंग क्र. १
📿 प्रस्तावना
1.
१. प्रस्तावना
धुंडिसुत मालू कवी विरचित श्री नवनाथ भक्तिसार हा ओवीबद्ध ग्रंथ नाथपंथाचा प्रमाणग्रंथ मानला जातो. मालू कवी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे. नी हा ग्रंथ इ. स. १८१९-२० च्या दरम्यान लिहून पूर्ण केला. प्रस्तुत ग्रंथात ४० अध्याय असून ओवीसंख्या ७६०० आहे.
या ग्रंथात नवनारायणांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेने धारण केलेल्या नवनाथांच्या कथा आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरुन कवी नारायणाने मच्छिंद्र हे नांव धारण केले, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर, प्रबुद्धाने कानिफ, पिप्पलायनाने चरपट, आविहोंत्राने नागेश, द्रुमिलाने भरतनाथ, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली यात मच्छिंद्रनाथ हे प्रमुख नाथ. जात पंथ यांच्या पलीकडे जाऊन या नवनाथांनी आपल्या चमत्कारांनी जनसामान्यांना आकर्षित करून नाथपंथाचा प्रसार केला. त्यांच्या दिव्य चरित्रामुळे घोर तप, अनन्य गुरुभक्ती, अपूर्व भक्तीभाव, ब्रम्हचर्याचे नैश्ठीक पालन या सद्गुणांच्या जोरावर आपल्याला कोणतीही अशक्यप्राय गोष्ट प्राप्त करून घेता येवू शकते हि गोष्ट आपणास पटते.
ज्ञानेश्वरी च्या खालोखाल चिंतन, मनन व पारायण यांसाठी नवनाथ भक्तिसारहा ग्रंथ सुपरिचित आहे. गोरक्ष किमयागार या अप्राप्य ग्रंथाच्या आधाराने धुंडिसुत मालू यांनी हा अद्भुत ग्रंथ सिद्ध केला आहे. या ग्रंथाचे पारायण वेगवेगळ्या पद्दतीने केले जाते. बरेच लोक या ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यात करतात. तर बरेच भाविक या ग्रंथाचे दैनिक पारायण करतात. या ठिकाणी आम्ही नवनाथ भक्तिसार पोथीतील सर्व ४० आध्याय त्यांच्या सुलभ मराठी सारांशा सह देत आहोत
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 आचार (पारायणासाठी)›
📿 अभंग क्र. १
📿 आचार (पारायणासाठी)
1.
10. आचार (पारायणासाठी)
आचारः प्रथमो धर्मः
ओघानेच आले म्हणून शरीर व मन:शुद्धीच्या संदर्भात आणखी दोन शब्द सांगावेसे वाटतात.
आमचा हिंदुधर्म हा आचारप्रधान आहे. 'आचारः प्रथमो धर्मः' हे वाक्य सर्वांच्या परिचयाचेच आहे. हा आचार शरीराच्या व मनाच्या शुद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मन:शुद्धी ही शरीरशुद्धीवर अवलंबून आहे व शरीरशुद्धीसाठी अन्नशुद्धी महत्वाची आहे. 'आहारशुद्धो सत्त्वशुद्धिः' असे शास्त्रवचन आहे. परंतु शुद्धी म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे हे विसरता कामा नये. या शुद्धीत स्वच्छतेबरोबरच पवित्रता अपेक्षित आहे. साबणाने शरीर स्वच्छ होईल परंतु पवित्र होणार नाही. खर्या पवित्रतेसाठी आचार, विचार, उच्चार व आहार शुद्ध ठेवणे आवश्यक आहे, व यासाठी प्राणायाम, उपासना व शुद्ध सात्त्विक आहार या गोष्टी महत्वाच्या आहेत. यायोगे प्राण व मानसद्रव्याची शुद्धी झाली तर ज्ञानेश्वरीच्या ६ व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे शरीरातील पंचभूतांपैकी पृथ्वी व आप या तत्त्वांचे अंश कमी होतात व शरीर हलके होऊन योग्याला आकाशगमनादी सिद्धी प्राप्त होते.
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 संकल्प (अंत्यंत गरजेचा )›
📿 अभंग क्र. १
📿 संकल्प (अंत्यंत गरजे
1.
४. संकल्प (अंत्यंत गरजेचा )
असो. या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे. (रोहिणी, उत्तरा, अश्विनी, पुष्, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात.
या नंतर उजव्या तळहातावर उदक (पाणी) घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे. कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते. परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते. त्यामुळे फलाची प्राप्ती होत नाही.
हा संकल्प पुढीलप्राणे उच्चारावा-
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 संकल्प (अंत्यंत गरजेचा )›
📿 अभंग क्र. १
📿 संकल्प (अंत्यंत गरजे
1.
3. संकल्प (अंत्यंत गरजेचा )
असो. या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे. (रोहिणी, उत्तरा, अश्विनी, पुष्, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात.
या नंतर उजव्या तळहातावर उदक (पाणी) घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे. कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते. परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते. त्यामुळे फलाची प्राप्ती होत नाही.
हा संकल्प पुढीलप्राणे उच्चारावा-
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 ग्रंथ लेखक :- धुंडीसुत मालू कवी›
📿 अभंग क्र. १
📿 ग्रंथ लेखक :- धुंडीस
1.
14. ग्रंथ लेखक :- धुंडीसुत मालू कवी
कविवर्य धुंडीसुत मालू कवी यांचे संपूर्ण प्रामाणिक जीवनचरित्र
१. मूळ घराणे आणि जन्म (१३ वे ते १८ वे शतक)
• संत परंपरेशी नाते: मालू कवी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारकरी संत संतशिरोमणी श्री नरहरी सोनार यांचे १० वे थेट वंशज आहेत. [1, 2]
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 A1१. नवनाथांची जागृत स्थाने›
📿 अभंग क्र. १
📿 नवनाथांची जागृत स्थ
नवनाथांची जागृत स्थाने
(नाथभक्तां च्या माहिती करीता “आदरणीय मुकंद दादा अंधारे”अमृतमहोत्सव गौरवांकामधे सौ.सुवर्णा मु. अंधारे यानी संकलित केलेली माहिती या ठिकाणी देत आहोत. मुकंद दादा अंधारे यांच्याबद्दल अधिक माहिती करीता http://navnathkimaya.co.in वर लॉग इन करा )
‘जे पिंडी ते ब्रम्हांडी ‘ ह्या मुलभूत संकल्पनेवर आधारलेल्या नाथ संप्रदायात यात्रा,वारी आदींना महत्व नसले तरी ह्या संप्रदायातील इष्ट दैवतांच्या ओढीने सामान्य भाविक भेटी साठी सदैव उत्सुक असतो. ह्या संबधाने पाहिल्यास श्री नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथात नवनारायणांचे नवनाथांच्या स्वरूपातील अवतार कार्याच्या समाप्तीनंतर ज्या ठिकाणी वास केला त्या स्थानांची माहिती वाचावयास मिळते .
अध्याय ४० श्री नवनाथ भक्तिसार
शके सतराशे दहापर्यंत | प्रकटरूपे मिरवले नाथ | मग येउनी आपुले स्थानात | गुप्तरूपे राहिले ||९४||
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 A1०. अध्याय वाचतानाची फलश्रुती›
📿 अभंग क्र. १
📿 अध्याय वाचतानाची फलश
1.
0. अध्याय वाचतानाची फलश्रुती
बहुतेक पोथीग्रंथात अखेरच्या अध्यायात प्रत्येक अध्यायाच्या वाचनाची फलश्रुती दिलेली आढळते. तशी ती 'श्रीनवनाथ भक्तिसार' ग्रंथातही अखेरच्या म्हणजे चाळीसाव्या अध्यायात दिलेली आहे.
आपण ती थोडक्यात पाहू-
अध्याय पहिला - याच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही घरातील समंध बाधा त्रासून निघून जाते.
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 नवनाथ आरती संग्रह›
📿 अभंग क्र. १
📿 आरती 1
1.
आरती 1
नवादेवा पासून जन्म नावांचा । मच्छिन्द्राचा जोर झाला तपाचा ।
बारा वर्ष तप मच्छिंद्राने केले । दत्त शिव शंकर प्रसन्न झाले ।।१।।
जय देव जय देव जय नवनाथा । जय नवनाथा जय नवनाथा ।
🙏 संस्कृत ग्रंथ›📚 सार्थ पंचदशी (विद्यारण्यतीर्थ)›📖 प्रस्तावना›📂 पंचदशीच्या लेखकांचा परिचय›
📿 अभंग क्र. १
📿 पंचदशीच्या लेखकांचा
पंचदशीच्या लेखकांचा परिचय –
पूर्वीचे ग्रंथकर्ते स्वतः विषयी फार कमी लिहीत असत व त्यांच्याविषयी लेखनही कमीच असे. जे होते, तेही काळाच्या ओघात किती नष्ट झाले असेल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाच्या संदर्भातील सनावळ्या अंदाजाने जुळवून काही कालनिर्णय करावे लागतात. ग्रंथाच्या वाचकाला लेखकाविषयी आदरयुक्त कुतूहल असणे स्वाभाविक व स्वागतार्ह असले तरी ते कुतूहल शमण्याची साधने फारच तुटपुंजी आहेत. तथापि उपलब्ध माहिती संक्षेपाने देण्याचा प्रयत्न केला आहे.
यवनांची दक्षिणेकडील सैनिकी आक्रमणे व जुलमी धर्मपरिवर्तने ऐन भरात असतांना, संन्यस्त वृत्तीने राहिलेल्या माधवाचार्यांनी (भावी विद्यारण्य) स्वतःचे श्रीभुवनेश्वरीच्या मंदिरात चाललेले तप थांबवून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. विजयनगरच्या पराभूत साम्राज्यातील हरिहर नावाच्या पराक्रमी पुरुषाला गादीवर बसवून पुन्हा राज्याची घडी नीट बसवून दिली. पुढे ते इ. स. १३८० मध्ये शृंगेरी मठाचे पीठस्थ शंकराचार्य झाले व त्यांनी 'विद्यारण्यतीर्थ' हे नाव घेतले. त्यावेळी त्यांचे वय ८५ वर्षांचे होते. त्या वयात त्यांनी पंचदशी हा महान ग्रंथ लिहावयास घेतला पण सहा प्रकरणे लिहून झाल्यावर त्यांनी देह ठेवला. पुढील ९ प्रकरणे त्यांचे श्रीगुरू श्रीभारतीतीर्थ ह्यांनी लिहून ग्रंथ पूर्ण केला अशी आख्यायिका आहे. विद्यारण्यस्वामींच्या नावाने सुमारे सोळा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यातील वैयासिक न्यायमाला, विवरणप्रमेय, जीवन्मुक्तीविवेक इत्यादी ग्रंथ अधिक प्रसिद्ध आहेत.
इ. स. १२९५ मध्ये जन्म व १३८६ मध्ये समाधी असा निष्कर्ष श्रीविद्यारण्यस्वामींच्या संदर्भात पं. द. वा. जोग ह्यांनी काढला आहे.
🙏 संस्कृत ग्रंथ›📚 सार्थ पंचदशी (विद्यारण्यतीर्थ)›📖 पंचदशी परिच्छेद एकूण १५›📂 षष्ठः परिच्छेदः - चित्रदीपः›
📿 अभंग क्र. १
📿 ॥ पञ्चदशी ॥
॥ पञ्चदशी ॥
6 षष्ठः परिच्छेदः - चित्रदीपः
या प्रकरणास ''चित्रदीप'' असे नांव ठेवण्यांचे कारण हेंच की येथे आत्म्याच्या चार अवस्था चित्रपटाच्या दृष्टांताने चांगल्या स्पष्ट करून दाखविल्या आहेत. चित्रपट म्हणजे धुवट कापडावर खळ लावून त्याजवरून मनुष्य, पशु पक्षी, पर्वत, वृक्ष व नद्या वगैरे सृष्टीचे चित्र - काढून तयार केलेला एक नकाशा होय.
यथा चित्रपटे दृष्टमवस्थानां चतुष्टयम् ।
परमात्मनि विज्ञेयं तथावस्थाचतुष्टयम् ॥१॥
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ४८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४८ वा
भगवंतांचे कुब्जा अणि अक्रूराच्या घरी जाणे -
श्रीशुक म्हणतात
- सर्वांचे आत्मा व सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्ण, त्यांना भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी तिच्या घरी गेले. बहुमोल सामग्रीने कुब्जेचे घर भरलेले होते. शृंगाराला उपयोगी अशी पुष्कळ सामग्री तेथे रचलेली होती. ठिकठिकाणी मोत्यांच्या झालरी आणि पताका लावलेल्या होत्या. चांदवे लावलेले होते. शय्या अंथरलेल्या होत्या आणि बसण्यासाठी आसने ठेवली होती. धुपाचा सुगंध दरवळत होता. दिवे प्रकाशत होते. फुलांचे हार आणि सुगंधी द्रव्ये ठेवलेली होती. भगवंत आपल्या घरी आलेले पाहून कुब्जा लगबगीने आपल्या आसनावरून उठून उभी राहिली आणि आपल्या सख्यांसह पुढे होऊन तिने भगवंतांना उत्तम आसन वगैरे देऊन त्यांची पूजा केली. त्याचप्रमाणे उद्धवाची सुद्धा तिने योग्य पद्धतीने पूजा केली. परंतु तो सन्मानासाठी तिने दिलेल्या आसनाला केवळ स्पर्श करून जमिनीवरच बसला. श्रीकृष्णही लोकरीतीचे अनुकरण करीत लगेच तिच्या बहुमूल्य शय्येवर जाऊन बसले. तेव्हा कुब्जेने स्नान करून उटणे, रेशमी वस्त्रे, अलंकार, पुष्पहार, गंध, विडा, सुधासव इत्यादींनी स्वतःला खूप सजविले, आणि लज्जायुक्त स्मितहास्य व हावभाव करीत विलासपूर्ण नजरेने पाहात पाहात ती भगवंतांच्याकडे आली. मिलनाची पहिलीच वेळ असल्याने कुब्जा संकोचाने थोडीशी थबकली. तेव्हा श्रीकृष्णांनी तिला आपल्याजवळ बोलाविले आणि कंकणांनी सुशोभित असा तिचा हात धरून तिला पलंगावर बसवून घेऊन ते तिच्याशी रममाण झाले. या जन्मामध्ये कुब्जेने भगवंतांना फक्त सुगंधी उटणे अर्पण केले होते. त्या एका शुभकर्माचे हे फळ होते. भगवान श्रीकृष्णांचे चरण कुब्जेने आपले कामसंतप्त हृदय, वक्षःस्थळ आणि डोळ्यांवर ठेवून घेऊन त्यांचा दिव्य सुगंध ती घेऊ लागली. अशाप्रकारे तिने आपली सर्व व्यथा नाहीशी करून घेतली. आनंदमूर्ती प्रियतम श्यामसुंदरांना आपल्या दोन्ही हातांनी गाढ आलिंगन देऊन कुब्जेने प्रदीर्घ कालापासूनचा आपला विरहताप शांत केला. कुब्जेने फक्त सुगंधी उटणे दिले होते. तेवढ्यानेच तिला मोक्ष देण्यास समर्थ व मिळण्यास कठीण अशा भगवंतांची प्राप्ती झाली. परंतु त्या अभागिनीने मात्र हेच मागितले. "हे प्रियकरा ! आपण काही दिवस येथेच राहून माझ्याबरोबर रमावे. कारण हे कमलनयना ! माझ्याच्याने आपली संगत सोडवत नाही." सर्वेश्वर श्रीकृष्णांनी तिच्या म्हणण्याला मान देऊन वस्त्रालंकारांनी तिची संभावना केली व तिला इच्छिलेला वर देऊन, उद्धवाबरोबर ते आपल्या संपन्न घरी परतले. आराधना करण्यासही अत्यंत कठीण अशा सर्वदेवाधिदेव विष्णूंना प्रसन्न करून घेऊन जो कोणी त्यांना तुच्छ विषयसुख मागतो, तो निश्चितच मूर्ख होय. (१-११)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २९ वा
रासलीलेचा प्रारंभ -
श्रीशुक म्हणतात
- शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती. मोगरा वगैरे सुगंधी फुले उमलली होती. ते पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय करून, रासक्रीडा करण्याचा संकल्प केला. त्याचवेळी, फार दिवसांनी भेटलेल्या पईने प्रियेच्या मुखाला केशर वगैरे लावून तिचा विरहताप दूर करावा, त्याप्रमाणे चंद्रमा पूर्वदिशेचे मुख आपल्या शीतल किरणरूप करांनी उदयकालीन रंगाने तांबूस करीत व चराचराचा ताप हरीत उदयाला आला. (१-२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ४६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४६ वा
उद्धवाचे व्रजगमन -
श्रीशुकदेव म्हणतात- उद्धव हा एक वृष्णींचा श्रेष्ठ मंत्री होता. तो साक्षात बृहस्पतींचा शिष्य असून अतिशय बुद्धिमान होता. तसाच तो श्रीकृष्णांचा प्रिय मित्रही होता. शरणागतांची सर्व दुःखे नाहीशी करणारे भगवान श्रीकृष्ण एके दिवशी आपला अनन्य प्रिय भक्त उद्धव याचा हात हातात घेऊन म्हणाले. " हे सौम्य उद्धवा ! तू व्रजामध्ये जा. तेथे जाऊन माझ्या माता-पित्यांना आनंदित कर. तसेच माझा विरह झाल्याने गोपींना जे दुःख झाले, ते त्यांना माझा निरोप सांगून दूर कर. गोपींचे मन-प्राण नित्य माझ्यामध्येच लागून राहिलेले आहेत. त्यांचे जीवन, त्यांचे सर्वस्व, मीच आहे. माझ्यासाठी त्यांनी आपले पती, पुत्र इत्यादींना सोडले आहे. त्यांनी मनानेसुद्धा मलाच आपला प्रियतम मानले आहे. ज्यांनी माझ्यासाठी लौकिक पारलौकिक धर्म सोडून दिले, त्यांचे पालन-पोषण मी करतो. प्रिय उद्धवा ! त्या गोपींचा परम प्रियतम मी येथे दूर आल्यामुळे माझे स्मरण होऊन त्यांची शुद्ध हरपते. माझ्या विरहामुळे माझ्या भेटीची उत्कंठा वाढून त्या व्याकूळ होत असतात. तन्मय झालेल्या माझ्या गोपी , "मी येईन" , असे सांगितल्यामुळेच अत्यंत कष्टाने कसेबसे आपले प्राण धरून आहेत. (१-६)
श्रीशुक म्हणतात
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय १०›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १० वा
यमलार्जुनांचा उद्धार -
राजाने विचारले - भगवन ! आपण मला हे सांगा की, नलकूबर आणि मणिग्रीव यांना शाप का मिळाला ? त्यांनी असे कोणते निंद्यकर्म केले होते की, ज्यामुळे देवर्षींनाही क्रोध आला होता ? (१)
श्रीशुकाचार्य म्हणाले - नलकूबर आणि मणिग्रीव हे दोघे कुबेराचे पुत्र होते. ते रुद्राचे गण असूनही त्यांचा गर्व वाढतच गेला. एके दिवशी ते दोघेजण मंदाकिनी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या रमणीय उपवनामध्ये वारुणी मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले होते. नशेमुळे त्यांचे डोळे भिरभिरत होते. पुष्कळ स्त्रिया त्यांच्याबरोबर गाणे-बाजावणे करीत होत्या आणि ते फुलांनी लहडलेल्या वनामध्ये त्यांच्याबरोबर विहार करीत होते. त्यावेळी कमळांच्या ताटव्यांनी शोभणार्या गंगेमध्ये स्त्रियांसह शिरून, हत्तिणींसह हत्ती जसे जलक्रीडा करतात, त्याप्रमाणेच ते जलक्रीडा करू लागले.
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ४१›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४१ वा
श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश -
श्रीशुकाचार्य म्हणतात
-अक्रूर अशी स्तुती करीत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावे, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्यरूपाचे दर्शन घडविले आणि पुन्हा ते आवरून घेतले. भगवंतांचे ते दिव्यरूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगबगीने सर्व आवश्यक नित्यकर्मे पार पाडून चकित अवस्थेत रथाकडे परतला. श्रीकृष्णांनी त्याला विचारले, "काका ! आपण पृथ्वी, आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्भूत वस्तू पाहिलीत काय ? कारण आपल्याकडे पाहिल्यावर असेच वाटते." (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २८ वा
नंदांना वरुणलोकातून सोडवून आणणे -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- नंदांनी एकादशीला उपवास करून भगवंतांची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचे स्नान करण्यासाठी यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. ही असुरांची वेळ आहे, हे लक्षात न आल्यामुळे ते रात्रीच्या वेळीच यमुनेच्या पाण्यात उतरले. त्यावेळी वरुणाचा सेवक असलेल्या एका असुराने त्यांना पकडले आणि वरुणाकडे नेले. नंदबाबा न आढळल्याने गोप "कृष्णा ! बलरामा !" अशा हाका मारून ’नंदमहाराज कुठे दिसत नाहीत,’ असे म्हणून रडू लागले. हे राजा ! श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांचे रडणे ऐकले आणि आपल्या वडिलांना वरुणाकडे नेल्याचे त्यांना समजले, तेव्हा ते वरुणाकडे गेले. कारण प्रभू स्वकीयांना अभय देणारे आहेत ना ! श्रीकृष्ण आपल्याकडे आलेले पाहताच त्यांच्या दर्शनाने अत्यानंद झालेल्या पश्चिम दिक्पाल वरुणाने त्यांची भव्य पूजा केली आणि म्हटले - (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ५०›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५० वा
जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- अस्ती आणि प्राप्ती अशा कंसाच्या दोन राण्या होत्या. पतीच्या मृत्युने दुःखी झालेल्या त्या वडिलांच्या घरी गेल्या. मगधराज जरासंध हे त्यांचे वडील. त्यांनी दुःखी अंतःकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचे कारण सांगितले.
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय १७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १७ वा
कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव -
राजाने विचारले - नागांचे निवासथान रमणकद्वीप कालिया नागाने का सोडले होते ? आणि त्याने एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला होता ? (१)
श्रीशुक म्हणतात
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३९ वा
श्रीकृष्ण-बलरामांचे मथुरागमन -
श्रीशुक म्हणतात
- रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तर्हेने आदरातिथ्य केले. तो आरामात पलंगावर बसला. येताना वाटेत ज्या ज्या इच्छा त्याने मनात बाळगल्या होत्या, त्या सर्व पूर्ण झाल्या. राजा ! लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही, असे काय आहे? तरीसुद्धा भगवत्परायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीत. (१-२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २४ वा
इंद्रयज्ञ निवारण -
श्रीशुकदेव म्हणतात - भगवान श्रीकृष्ण बलरामांच्यासह वृंदावनामध्येच राहात होते. एके दिवशी त्यांनी पाहिले की, सर्व गोप इंद्रयज्ञ करण्याची तयारी करीत आहेत. भगवान श्रीकृष्ण सर्वांचे अंतर्यामी आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना ते माहीत होते, तरीसुद्धा विनम्रभावाने त्यांनी नंदबाबा इत्यादि वृद्ध गोपांना विचारले, "तात ! ही कोणत्या यज्ञाची गडबड चालू आहे ? त्याचे फळ काय आहे ? कोणाला उद्देशून आणि कोणत्या साधनांनी हा यज्ञ केला जाणार आहे ? आपण मला सांगाल का ? बाबा ! हे ऐकण्याची मला अतिशय उत्कंठा आहे. जे संत पुरुष सर्वांना आपल्या आत्मा मानतात, ज्यांच्या दृष्टीत आपला आणि परका असा भेद नसतो, म्हणून ज्याला कोणी मित्र, शत्रू वा तिर्हाईत नसतो, त्याच्यापासून लपवून ठेवावी अशी कोणतीच गोष्ट नसते. परंतु असे नसेल, तर मात्र कोणतेही रहस्य शत्रूप्रमाणेच तिर्हाइतालाही सांगता कामा नये. मित्र तर स्वतःसारखाच असतो. म्हणून त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. हा संसारी मनुष्य समजून किंवा न समजता अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करतो. त्यांपैकी समजून करणार्यांची कर्मे जशी सफल होतात, तशी न समजता करण्यार्यांची होत नाहीत. तर आपण जो यज्ञ करणार आहात, तो विचारपूर्वक आहे, की रूढी म्हणून आहे, हे मी जाणू इच्छितो. आपण मला सयुक्तिक सांगा." (१-७)
नंद म्हणाले, "देवराज इंद्र ही पर्जन्यदेवता आहे. मेघ हे त्याचे स्वतःचेच रूप आहे. सर्व प्राण्यांना तृप्त करणारे आणि जीवनदान देणारे जे पाणी, त्याचा ते वर्षाव करतात. बाळा, आम्ही यज्ञ करून पूजा करीत असतो. यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहते, त्याच अन्नाने सर्वजण धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी आपला जीवन-निर्वाह चालवितात. मनुष्यांच्या प्रयत्नांना फळ देणारा पाऊसच होय. कुलपरंपरेने चालत आलेला हा धर्म जो मनुष्य काम, लोभ, भय किंवा द्वेष या भावनेने सोडून देतो, त्याचे कधी कल्याण होत नाही." (८-११)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २ रा
भगवंतांचा गर्भ प्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती -
श्रीशुकदेव म्हणतात - बलवान कंसाने जरासंधाच्या साहाय्याने प्रलंबासुर, बकासुर, चाणूर, तृणावर्त, अघासुर, मुष्टिक, अरिष्टासुर, द्विविद, पूतना, केशी, धेनुक बाणासुर, भौमासुर इत्यादि पुष्कळसे दैत्य व राजे यांना हाताशी धरून तो यादवांचा संहार करू लागला. (१-२)
तेव्हा ते भयभीत होऊन कुरू, पंचाल, केकय, शाल्व, विदर्भ, निषध, विदेह आणि कौशल या देशांत जाऊन राहिले. काही नातलग वरवर त्याच्या मनासारखे वागून त्याची सेवा करीत राहिले. कंसाने जेव्हा एक-एक करून देवकीची सहा मुले मारली, तेव्हा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना अनंत असेही म्हणतात, ते आले. त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भितीने दुःखही झाले. (३-५)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ४०›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४० वा
अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती -
अक्रूर म्हणाला- प्रभो ! आपण प्रकृती इत्यादी सर्व कारणांचे कारण आहात. आपणच अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात. तसेच ज्यांनी या जगाची निर्मिती केली, त्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती आपल्याच नाभिकमलातून झाली. मी आपल्याला नमस्कार करतो. पृथ्वी, जल, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व, प्रकृती, पुरुष, मन, इंद्रिये, सर्व इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या अधिष्ठानभूत देवता हेच सर्व चराचर जगाला कारण आहेत. पण हे सगळे आपलेच अंगस्वरूप आहेत. प्रकृती इत्यादी सर्व पदार्थ अचेतन असल्यामुळे आत्मस्वरूप अशा तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत; ब्रह्मदेवसुद्धा प्रकृतीच्या गुणांनी युक्त आहेत. म्हणून तेसुद्धा आपले गुणांच्या पलीकडे असलेले स्वरूप जाणत नाहीत. साधू, योगी, अध्यात्म, अधिभूत व अधिदैव यांचे साक्षी महापुरुष व नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपलीच उपासना करतात. काही कर्मकांडी ब्राह्मण वेदमंत्रांनी अनेक देवतावाचक नावे आणि अनेक रूपे असलेले यज्ञ करतात आणि त्याद्वारा आपलीच उपासना करतात. काही ज्ञानी सर्व कर्मांचा त्याग करून शांत भावात स्थिर राहातात आणि समाधीने ज्ञानस्वरूप अशा आपलीच आराधना करतात. आणखी काही शुद्धचित्त वैष्णव आपणच सांगितलेल्या पांचरात्र इत्यादी विधींनी आपल्याशी तन्मय होऊन आपल्या ’चतुर्व्युह’ इत्यादी अनेक किंवा ’नारायण’ या एकाच स्वरूपाची पूजा करतात. भगवन ! दुसरे काही लोक शैवपंथानुसार आचार्यभेदामुळे अनेक अवांतर भेद असलेल्या शिवस्वरूप अशा आपलीच पूजा करतात. हे प्रभो ! जे लोक दुसर्या देवतांची भक्ती करतात आणि त्या देवतांना आपल्यापेक्षा भिन्न समजतात, ते सर्वजणसुद्धा वास्तविक आपलीच आराधना करतात. कारण आपणच सर्व देवतांच्या रूपांमध्ये आहात आणि सर्वेश्वरसुद्धा आहात. हे प्रभो ! जशा पर्वतात उगम पावणार्या नद्या पावसाच्या पाण्याने भरून सर्व बाजूंनी समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे उपासनामार्ग शेवटी आपल्यालाच येऊन मिळतात. (१-१०)
प्रभो ! सत्त्व, रज आणि तम हे आपल्या प्रकृतीचे तीन गुण आहेत. ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूंपर्यंतचे सर्व चराचर जीव त्या तीन गुणांनीच ओतप्रोत भरलेले आहेत. परंतु आपण सर्वस्वरूप असूनही त्या गुणांनी लिप्त झालेले नाहीत. आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात. तीन गुणांचा प्रवाह अज्ञानमूलक असून तो देवता, मनुष्य, पशु-पक्षी इत्यादी सर्व योनींमध्ये व्याप्त आहे. मी आपणांस नमस्कार करतो. अग्नी आपले मुख, पृथ्वी चरण, सूर्य आणि चंद्र नेत्र, आकाश नाभी, दिशा कान, स्वर्ग मस्तक, देवेंद्र भुजा, समुद्र उदर आणि वायू आपल्या प्राणशक्तीच्या रूपामध्ये उपासनेसाठी कल्पिलेला आहे. वृक्ष आणि वनस्पती हे रोम, मेघ डोक्यावरील केस, पर्वत आपली हाडे व नखे, दिवस व रात्र पापण्यांची उघडझाप, प्रजापती जननेंद्रिय आणि पाऊस हेच आपले वीर्य आहे. हे अविनाशी भगवन ! जसे पाण्यामध्ये पुष्कळसे जलचर जीव आणि औंदुंबराच्या फळामध्ये लहान-लहान कीटक असतात. त्याचप्रमाणे उपासनेसाठी स्वीकारलेल्या आपल्या मनोमय पुरुषरूपामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंनी भरलेले असे लोक आणि त्यांचे लोकपाल कल्पिलेले आहेत. प्रभो ! आपण लीला करण्यासाठी पृथ्वीवर जी जी रूपे धारण करता, ते सर्व अवतार, लोकांचा शोक-मोह धुऊन टाकतात आणि नंतर तेच लोक मोठ्या आनंदाने आपल्या यशाचे गायन करीत असतात. आपण वेद, ऋषी, वनस्पती यांचे रक्षण आणि सत्यव्रताला ज्ञान देण्यासाठी म्हणून मत्स्यरूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केला होता. त्या मत्स्यरूपाला मी नमस्कार करतो. आपणच मधु आणि कैटभ नावाच्या असुरांचा संहार करण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला होता. मी आपल्या त्या रूपालासुद्धा नमस्कार करतो. आपणच ते विशाल कूर्माचे रूप धारण करून मंदराचलाला धारण केले होते. आपल्याला मी नमस्कार करतो. आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्यासाठी वराहरूपाचा स्वीकार केला होता. आपणास माझा नमस्कार असो. प्रल्हादासारख्या साधुजनांचे भय मिटविणार्या हे प्रभो ! आपल्या त्या अलौकिक नृसिंह रूपाला मी नमस्कार करतो. आपण वामनरूप घेऊन आपल्या पायाने तीन लोक व्यापले होते. मी आपणास नमस्कार करीत आहे. धर्माचे उल्लंघन करणार्या गर्विष्ठ क्षत्रियरूपी वनाला तोडणार्या परशुरामाला मी नमस्कार करतो. रावणाचा नाश करणार्या श्रीरामांना मी नमस्कार करतो. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्युहरूपात असणार्या भागवंतांच्या देवाला मी नमस्कार करतो. दैत्य आणि दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध असे बुद्धरूप घेणार्या आपणास मी नमस्कार करीत आहे. पृथ्वीवरील क्षत्रिय जेव्हा म्लेंच्छांप्रमाणे वर्तन करू लागतील, तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कल्किरूप घेणार्या आपणास मी नमस्कार करतो. (११-२२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३ रा
भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्र होते, आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह आणि तारे उच्चस्थितीत होते, त्यावेळी भगवान् प्रगट झाले. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ४४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४४ वा
चाणूर, मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार -
श्रीशुक म्हणतात
- श्रीकृष्णांनी चाणूरादिकांना मारण्याचे निश्चित ठरवून स्वतः चाणूराला आणि बलराम मुष्टिकाला जाऊन भिडले. एकमेकांना जिंकण्याच्या हेतूने त्यांनी हातांना हात बांधले आणि पायांत पाय अडकवून ताकदीने ते आपापल्याकडे दुसर्यांना ओढू लागले. त्यांनी कोपरापासूनच्या हातांना हात, गुडघ्यांना गुडघे, डोक्यांना डोकी आणि छातींना छाती टेकवून ते एकमेकांवर आघात करू लागले. गरगर फिरवणे, लांब ढकलणे, मिठीत घेणे, खाली पाडणे, पुढे जाणे, मागे येणे इत्यादी प्रकारांनी ते एकमेकांवर डावपेच करू लागले. तसेच वर उठवणे, उचलणे, चाल करून जाणे किंवा स्तब्ध उभे राहाणे, अशा रीतीने ते शरीरांना इजा पोहोचवू लागले. (१-५)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३६ वा
अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजामध्ये प्रवेश करीत होते, त्याचवेळी अरिष्टसुर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन तेथे आला. त्याचे वशिंड आणि शरीर प्रचंड होते. तो खुरांनी जमीन उकरीत व तिला थरथर कापवीत गोठ्यात आला. तो मोठ्याने हंबरत होता आणि खुरांनी जमीन उकरीत होता. तो शेपूट उंचावून शिंगांनी तट इत्यादी ढासळवीत चालला होता. मधून मधून तो मुतत आणि शेण टाकत होता. तो डोळे रोखून पाहात होता. हे राजा ! त्याच्या प्रचंड हंबरण्याने भयभीत झालेल्या स्त्रिया आणि गाई यांचे गर्भपात होत. त्याच्या वशिंडाला पर्वत समजून ढग त्यावर येऊन थांबत. राजा ! त्या तीक्ष्ण शिंगांच्या बैलाला पाहून गोपी आणि गोप सर्वजण भयभीत झाले. गुरे तर इतकी घबरली की, गोठे सोडून ती पळू लागली. सर्व व्रजवासी त्यावेळी "कृष्णा ! कृष्णा ! आम्हांला वाचव." असा आक्रोश करीत श्रीकृष्णांना शरण आले. गोकुळ भयाने व्याकुळ झाले आहे, हे भगवंतांनीही पाहिले. "भिऊ नका" असे म्हणून श्रीकृष्णांनी सर्वांना धीर दिला आणि वृषासुराला युद्धाचे आव्हान दिले, "अरे मूर्खा ! महादुष्टा ! या गाई आणि गवळ्यांना भिववून काय होणार? तुझ्यासारख्या नीच दुष्टांच्या ताकदीचा गर्व नाहीसा करणारा हा मी इथे आहे" असे म्हणून भगवंतांनी दंड थोपटले आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणून आपल्या एका मित्राच्या खांद्यावर हात टाकून ते उभे राहिले. या आव्हानामुळे संतापून तो खुरांनी जोराने जमीन उकरीत श्रीकृष्णांच्या अंगावर धावला. त्यावेळी त्याने उंचावलेल्या त्याच्या शेपटाच्या धक्क्याने आकाशातील ढग गरगर फिरू लागले. त्याने आपली तीक्ष्ण शिंगे समोर धरली. लाल-लाल डोळ्यांनी श्रीकृष्णांकडे तिरप्या नजरेने रोखून पाहात तो त्यांच्यावर इतक्या वेगाने तुटून पडला की, जणू इंद्राने सोडेलेले वज्रच ! भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी त्याची दोन्ही शिंगे पकडली आणि जसा एक हत्ती दुसर्या हत्तीला मागे रेटतो, त्याप्रमाणे त्यांनी त्याला अठरा हात मागे रेटून जमिनीवर पाडले. भगवंतांनी त्याला याप्रमाणे ढकलल्यानंतर लगेच उठून संतापाने दीर्घ श्वास सोडीत पुन्हा त्याने त्यांच्यावर चढाई केली. त्यावेळी त्याचे सर्व शरीर घामाने डबडबले होते. तो अंगावर येत असलेला पाहून भगवंतांनी त्याची शिंगे पकडली आणि त्याला जमिनीवर पाडले. नंतर त्याला पायांनी दाबून ओला कपडा पिळावा, तसा त्याला पिळला. यानंतर त्याचे शिंग उखडून त्यानेच टोचून टोचून त्याला मारले. त्यामुळे तो तेथेच निपचित पडून राहिला. नंतर तोंडातून रक्त ओकीत आणि विष्ठ-मूत्र सोडीत तो दैत्य पाय झटकू लागला. त्याची बुबुळे उलटी झाली आणि अतिशय कष्टाने त्याने आपले प्राण सोडले. तेव्हा देव भगवंतांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले. श्रीकृष्णांनी जेव्हा बैलाच्या रूपाने आलेल्या अरिष्टसुराला मारले, तेव्हा सर्व गोप त्यांची प्रशंसा करू लागले. नंतर बलरामांसह त्यांनी वाड्यात प्रवेश केला आणि त्यांना पाहून गोपींचे नेत्र आनंदाने भरून गेले. (१-१५)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय १›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १ ला
भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन,
वसुदेव-देवकीविवाह आणि कंसाकडून देवकीपुत्रांची हत्या -
राजा परिक्षिताने विचारले - भगवन ! आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार, दोन्ही वंशांच्या राजांची अद्भुत चरित्रे, तसेच धर्मप्रेमी यदूंचेसुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले. आता त्याच वंशात, आपला अंश असलेल्या श्रीबलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान् श्रीकृष्णांचे चरित्र आम्हांला ऐकवावे. प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या, त्या विस्ताराने आम्हांला सांगा. अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात, जे भवरोगावरील औषध आहे, जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारे आहे अशा भगवंतांच्या गुणवर्णनाला, आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल ? युद्धात देवांनासुद्धा जिंकणारे भीष्मादि अतिरथीरूपी प्रचंड मासे ज्यात होते, असा कौरवसेनेचा अपार सागर, माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने, वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडावे, इत्यक्या सहजतेने पार केला. कौरव आणि पांडव या दोन्ही वंशांचे बीज, असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळून गेले होते, त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली. तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले. हे विद्वन ! सर्व शरीर धारण करणार्याच्या आत आत्मरूपाने राहून अमृततत्वाचे आणि बाहेर कालरूपाने राहून मृत्यूचे दान करणार्या आणि मनुष्यरूपाने प्रगट होणार्या त्यांच्या लीलांचे आपण वर्णन करावे. (१-७)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ७›
📿 अभंग क्र. १
📿 स्कंध १० वा - अध्याय
स्कंध १० वा - अध्याय ७ वा श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७ वा
छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार -
राजाने म्हटले - गुरुवर्य ! सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी जे जे अवतार धारण करून पुष्कळशा मनोहर आणि श्रवणीय लीला केल्या; ज्यांचे श्रवण केल्याने प्रेम वाढते आणि विषयांची आशा नाहीशी होते, मनुष्याचे अंतःकरण तत्काळ शुद्ध होते. भगवंतांविषयी भक्ती आणि त्यांच्या भक्तांशी मैत्री जडते, त्या मनोहर लीलांचे आपल्याला योग्य वाटल्यास वर्णन करावे. भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यलोकी प्रगट होऊन मनुष्य स्वभावाचे अनुकरण करीत ज्या बाललीला केल्या, त्याही अद्भुत असतील. तरी आपण त्यासुद्धा मला सांगाव्यात. (१-३)
श्रीशुकदेव म्हणतात - एकदा भगवान श्रीकृष्णांचा कूस बदलण्याचा अभिषेक-उत्सव साजरा केला जात होता. त्याच दिवशी त्यांचे जन्मनक्षत्रही होते. त्यामुळे घरात पुष्कळ स्त्रियांची गर्दी झालेली होती. गाणे बजावणे चालले होते. ब्रह्माणांचा मंत्रघोष चालू होता. त्यावेळी यशोदेने मुलाला अभिषेक केला. नंदराणीने ब्राह्मणांचा मोठा सन्मान केला. त्यांना अन्न, वस्त्रे, पुष्पमाळा, गाई इत्यादि प्रिय वस्तू देऊन उत्तम प्रकारे ब्राह्मणपूजन केले. तेव्हा त्यांनी मंगल स्नान घातलेल्या त्या बाळाला आशीर्वाद दिले. नंतर लाडक्याच्या डोळ्यांवर झोप आली आहे, असे पाहून तिने हळूवारपणे अंथरुणावर झोपविले. थोड्याच वेळात जाग येऊन तो स्तनपान करण्यासाठी रडू लागला. त्यावेळी यशोदा उत्सवासाठी आलेल्या गोपगोपींचे स्वागत करण्यात गुंतली होती; त्यामुळे तिला त्याचे रडणे ऐकू आले नाही. तेव्हा रडत रडतच श्रीकृष्ण आपले पाय झटकू लागला. बाळ श्रीकृष्णाला एका छकड्याखाली झोपवले होते. त्याचे पालवीसारखे लाल चिमुकले पाय आपटताच तो छकडा उलटला. त्याच्यावर दूध, दही वगैरे पदार्थ घालून ठेवलेली भांडी होती, ती इकडे तिकडे विखरून गेली. तसेच त्या छकड्याची चाके, कणा, जोखड मोडून अस्ताव्यस्त होऊन पडली. उत्सवासाठी आलेल्या स्त्रिया, यशोदा, रोहिणी आणि नंद वगैरे गोप ही विचित्र घटना पाहून घाबरून गेले. ते म्हणू लागले, "अरे हा छकडा आपोआप कसा काय उलटला बुवा !" त्यांना याचे कोणतेच कारण कळले नाही. तेव्हा तेथे असलेली मुले गोप-गोपींना म्हणाली, "या कृष्णानेच रडताना आपल्या पायाने ठोकरून हा उलटविला, यात शंका नाही." परंतु त्या गोपांनी ’ती पोरांची बडबड’ मानून त्यावर विश्वास ठेवला नाही. कारण त्या मुलाचा असामान्य पराक्रम त्यांना माहीत नव्हता. (४-१०)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ६ वा
पूतना उद्धार -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- नंद मथुरेहून निघाले तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे नाही; म्हणून संकट येईल, या भितीने ते मनोमन भगवंतांना शरण गेले. पूतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती. ल्हान मुलांना मारणे एवढे एकच तिचे काम होते. कंसाच्या आज्ञेवरून ती नगरे, गावे आणि गवळ्यांच्या वस्त्यांमधून लहान मुले मारण्यासाठी फिरत असे. जेथील लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये राक्षसांची भिती घालविणार्या भक्तवत्सल भगवंतांचे स्मरण करीत नाहीत, तेथेच राक्षसांचे फावते. आकाशमार्गाने जाऊ शकणारी ती पूतना इच्छेनुसार रूप धारण करीत होती. एके दिवशी नंदांच्या गोकुळाजवळ येऊन मायेने स्वतःला एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळात शिरली. तिने अंबाड्यावर मोगर्याची वेणी माळली होती. सुंदर वस्त्रे परिधान केली होती. जेव्हा तिची कर्णफुले हालत असत, तेव्हा त्यांच्या चमकण्याने तोंडावर आलेले तिचे कुरळे केस शोभिवंत दिसत होते. तिचे नितंब आणि स्तन उभार होते, तर कंबर बारीक होती. आपले मधुर हास्य आणि कटाक्षांनी ती व्रजवासियांचे चित्त वेधून घेत होती. हातात कमळ घेऊन येणार्या त्या रूपवती रमणीला पाहून गोपींना वाटले की, जणू स्वतः लक्ष्मीच आपल्या पतीचे दर्शन घेण्यासाठी आली आहे. (१-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २१›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २१ वा
वेणुगीत -
श्रीशुकदेव म्हणतात - शरद ऋतूमुळे जेथील पाणी निर्मळ झाले होते आणि जलाशयात उमललेल्या कमळांचा सुगंध असलेला वारा वाहात होता, अशा वृंदावनात श्रीकृष्णांनी गाई व गोपाळांसह प्रवेश केला. तेथील फुलांनी बहरलेल्या वनराईत धुंद भ्रमर गुणगुणत होते आणि पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते. त्यामुळे तेथील सरोवरे, नद्या आणि पर्वत नादमय झाले होते, श्रीकृष्णांनी बलराम आणि गोपालांबरोबर तेथे गाई चारीत असताना वेणू वाजविण्यास सुरुवात केली. ते वेणुगीत भगवंतांच्या विषयी प्रेमभाव जागृत करणारे होते. ते ऐकून काही गोपी सख्यांना श्रीकृष्णांच्या मागे त्यांच्याविषयी सांगू लागल्या. हे राजा ! श्रीकृष्णांच्या लीला आठवून त्यांचे त्यांनी वर्णन करण्यास सुरुवात केली खरी; पण उत्कट प्रेमाने मन व्याकूळ झाल्यामुळे त्यांचे बोलणेच खुंटले. (त्या सांगू लागल्या,) गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनात आले पहा ! त्यांच्या मस्तकारव मोरपंख आहे आणि कानांवर कण्हेरीचे गुच्छ आहेत. त्यांनी सोन्यासारखा पीतांबर परिधान केला असून गळ्यामध्ये वैजयंती माळा घातली आहे. त्यांचे रूप श्रेष्ठ नटासारखे किती सुंदर आहे बरे ! बासरीची छिद्रे ते आपल्या अधरामृताने भरत आहेत. गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. हे वृंदावन त्यांच्या चरणांमुळे अधिकच रमणीय झाले आहे.
परीक्षिता !
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय १५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १५ वा
धेनुकसुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव -
श्रीशुकदेव म्हणतात - नंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केले. आता ते गाई चरावयास पात्र ठरले. ते मित्रांसह गाई चारीत वृंदावनात जात आणि ते आपल्या चरणांनी अत्यंत पवित्र करीत. हे वन गुरांच्या चार्याने भरलेले व फुलांनी लहडलेले होते. पुढे गाई, त्यांच्या पाठीमागे बासरी वाजवीत श्यामसुंदर, त्यांच्यामागे बलराम आणि त्यापाठोपाठ श्रीकृष्णांच्या यशाचे गायन करणारे गोपाळ असे सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनात गेले. तेथे कोठे भ्रमर मधुर जुंजारव करीत होते, कोठे हरिणांचे कळप होते, तर कोठे पक्षी किलबिलाट करीत होते. तसेच कोठे कोठे महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवरे होती. त्यांतील कमळांच्या सुगंधाने सुवासित झालेला वारा तेथे वाहात होता. ती रमणीयता पाहून भगवंतांनी तेथे विहार करण्याचे ठरविले. फुला-फळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहेत, असे पाहून आनंदाने स्मित हास्य करीत श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले - (१-४)
श्रीकृष्ण म्हणाले - "हे देवश्रेष्ठा ! देव ज्यांनी पूजा करतात, त्या चरणकमळांना हे वृक्ष फुले आणि फळे घेऊन आपल्या शेंड्यांनी नमस्कार करीत आहेत. असेही असेल की, ज्या पापामुळे त्यांना वृक्ष जन्म घ्यावा लागला, ते पाप दूर करण्यासाठीच ते असे करीत असावेत. हे पुण्यशील आदिपुरुषा ! तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवून राहात असलास, तरी तुझे श्रेष्ठ भक्त मुनिगण तूच आपली इष्टदेवता आहे, हे ओळखून बहुतेक भ्रमरांच्या रूपामध्ये तुझ्या त्रिभुवनपावन यशाचे गायन करीत तुझे भजन करतात. ते आपल्याला कधीही सोडू इच्छित नाहीत. हे स्तुत्य बंधो ! तू आपल्या घरी आल्याचे गोपिकांप्रमाणे या हरिणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत. या कोकिळा मधुर कुहुरवाने आपले स्वागत करीत आहेत ! घरी आलेल्या अतिथींचे स्वागत करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच असतो. अतिथिधर्म पाळणारे हे वनवासी धन्य होत. येथील भूमी आज गवत झुडुपांसह तुझ्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झाली आहे. येथील वृक्ष वेली तुझ्या हस्तांचा स्पर्श झाल्याने स्वतःला धन्य मानीत आहेत. तुझ्या दयार्द्र दृष्टिक्षेपामुळे नद्या, पर्वत, पशु-पक्षी कृतार्थ होत आहेत आणि व्रजातील गोपी लक्ष्मीलाही स्पृहणीय अशा तुझ्या वक्षःस्थळाच्या स्पर्शाने कृत्कृत्य झाल्या आहेत. (५-८)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३८ वा
अक्रूराचे व्रजगमन -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- महाबुद्धिमान अक्रूरसुद्धा त्या रात्री मथुरेत राहून सकाळी रथात बसून नंदांच्या गोकुळाकडे निघाला. भाग्यवान अक्रूराची कमलनयन भगवंतांच्या ठिकाणी परम भक्ती होती. त्यामुळे गोकुळात जाताना तो असा विचार करू लागला. "मी असे कोणते शुभ कर्म केले होते, अशी कोणती दीर्घ तपश्चर्या केली होती किंवा कोणत्या सत्पात्र व्यक्तीला असे कोणते दान दिले होते की, ज्याचे फळ म्हणून आज मला भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणार ! विषयासक्त अशा मला भगवंतांचे दर्शन अतिशय दुर्लभ वाटते. जसे शूद्र जातीतील माणसाला वेदपठण दुर्लभ असते. परंतु तसेच काही नाही. मला अधमालासुद्धा भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होईलच; जसे काळरूप नदीतून वाहात जाणारा एखादा एखादेवेळी संसार पार करू शकतो. आज माझी सारी पापे नष्ट झाली. आज माझा जन्म सफळ झाला; कारण योग्यांच्यासुद्धा ध्यानाचा विषय असणार्या भगवंतांच्या चरणकमलांना मी आज प्रत्यक्ष नमस्कार करणार आहे. अहो ! कंसाने आज माझ्यावर मोठीच कृपा केली आहे. त्याने पाठविल्यानेच मी या भूतलावर अवतीर्ण झालेल्या स्वतः भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेईन. त्यांच्या नखमंडलाच्या केवळ कांतीचे ध्यान करूनही पूर्वीचे ऋषी या अज्ञानरूप अपार अंधकारराशीला पार करू शकले. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव ज्यांची उपासना करतात, लक्ष्मीदेवी आणि प्रेमी भक्तांसह मोठमोठे ज्ञानी लोकसुद्धा ज्यांची आराधना करतात, जे गाई चारण्यासठी गोपालांबरोबर वनामध्ये भ्रमण करतात आणि जे गोपींच्या वक्षःस्थळावर लागलेल्या केशराने रंगून जातात, त्या श्रीचरणांचे आज मला दर्शन होणार ! त्या मुकुंदांचे गाल व नाक देखणे आहे. त्यांचे लालसर कमलासारखे नेत्र स्मितपूर्वक पाहतात. त्यांचे ते कुरळ्या केसांनी शोभणारे मुखकमल मला आज खात्रीने पाहायला मिळणार ! कारण आज ही हरणे माझ्या उजव्या बाजूने जात आहेत. पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वेच्छेने मनुष्यावतार घेतला आहे. सौंदर्याच्या खाणीचेच आज मला दर्शन होणार ! सहजपणे माझ्या दृष्टीला मिळणारा हा लाभ नव्हे का? जे अहंकार न बाळगता या कार्यकारणरूप जगाचे फक्त द्रष्टे आहेत, त्यांच्या ठिकाणी असणार्या स्वरूपसाक्षात्कार अज्ञानामुळे वाटणारा भेदभ्रम मुळीच असत नाही. ते आपल्या योगमायेनेच केवळ संकल्प करून प्राण, इंद्रिये, बुद्धी इत्यादींसह आपल्या स्वरूपभूत जीवांची निर्मिती करतात आणि त्यांच्याबरोबर गोकुळातील घराघरांतून निरनिराळ्या प्रकारच्या लीला करीत असल्यासारखे भासतात. सर्व पापांचा नाश करणारे त्यांचे परम मंगल गुण, कर्म आणि जन्म यांनी युक्त असलेली वाणीच जगाला जीवन देते, सौंदर्य देते आणि पवित्र करते. परंतु, जी वाणी हे वर्णन करीत नाही, ती प्रेताच्या साजशृंगारासारखीच व्यर्थ होय. तेच भगवान स्वतः यदुवंशामध्ये आपणच घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणार्या श्रेष्ठ देवतांचे कल्याण करण्यासाठी अवतीर्ण झाले आहेत. तेच भगवान आपली कीर्ती पसरवीत आज व्रजामध्ये निवास करीत आहेत. सर्व देवसुद्धा त्यांच्या संपूर्ण मंगलमय यशाचे गान करीत असतात. ते महापुरुषांचे आश्रय आणि गुरू आहेत. त्यांचे सौंदर्य तिन्ही लोकांना मोहित करणारे आहे. दृष्टी असणार्यांचा ते परम आनंद आहेत; लक्ष्मीलासुद्धा हवेहवेसे वाटणारे रूप धारण केले आहे. त्यांचे मला आज खात्रीने दर्शन होणार ! कारण आज सकाळपासूनच मला शुभशकुन होत आहेत. (१-१४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५ वा
गोकुळात भगवंतांचा जन्म महोत्सव -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- उदार नंदमहाराजांना मुलगा झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाला. त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार परिधान केले. नंतर वेदवेत्त्या ब्राह्मणांना बोलावून पुण्याहवाचन करवून आपल्या पुत्राचा जातकर्म-संस्कार केला. त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधिपूर्वक पूजा केली. त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकारांनी सुशोभित दोन लाख गाई दान दिला. तसेच रत्ने आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे सात ढीग दान दिले. कालगतीने (नवीन पाणी, अशुद्ध भूमी इ.), स्नानाने (शरीर इ.) तपश्चर्येने (इंद्रिये इ.) संस्कारांनी (गर्भ इ.) यज्ञाने (ब्राह्मण इ.) दानाने (धन, धान्य इ.) आणि संतोषाने (मन इ.) द्रव्ये शुद्ध होतात. आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होते. त्यावेळी ब्राह्मण, मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक, वंशाचे वर्णन करणारे व स्तुतिपाठक स्तुती करू लागले. गायक गाऊ लागले. भेरी आणि दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गोकुळातील सर्व घरांची दारे, अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतले गेले. त्यामध्ये सुगंधीत द्रव्ये शिंपडली गेली. त्यांना ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगी-बेरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजविले गेले. गाई, बैल आणि वासरांच्या अंगांना हळद तेलाचा लेप दिला गेला आणि त्यांना गेरूने रंगविले. तसेच मोरपंख, फुलांचे हार, तर्हेतर्हेची सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविले गेले. राजा ! सर्व गोप बहुमूल्य वस्त्रे, अलंकार, अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराणे घेऊन नंदांच्या घरी आले. (१-८)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३७ वा
केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती -
श्रीशुक म्हणतात
- कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठविले होते, तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने, मनोवेगाने दौडत नंदांच्या व्रजामध्ये आला. तो आपल्या टापांनी जमीन उकरत होता. त्याच्या मानेवरील आयाळीच्या झटकण्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखुरली जाऊ लागली. त्याच्या प्रचंड खिंकाळण्याने सर्वजण भयभीत झाले होते. त्याचे डोळे अतिशय विशाल होते. तोंड म्हणजे जणू काही वृक्षाची ढोलच ! मान अवाढव्य होती. प्रचंड काळ्या ढगांसारखे शरीर होते. श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो व्रजाचा थरकाप उडवीत आला. भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की, त्याच्या खिंकाळण्याने आपले गोकुळ भयभीत झाले आहे. आणि त्याच्या शेपटीच्या केसांच्या फटकार्यांनी ढग अस्ताव्यस्त होत आहे. तसेच तो लढण्यासाठी आपला शोधही घेत आहे. तेव्हा ते आपणहून समोर आहे आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी त्याला आव्हान दिले. भगवंत समोर आलेले पाहून तो आणखी चिडला आणि तोंड पसरून त्यांच्याकडे असा धावला की जणू आकाशालाच पिऊन टाकील. त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता. त्याच्यावर विजय मिळवणे तर कठीण होतेच, परंतु त्याला पकडणे सुद्धा सोपे नव्हते. भगवंतांच्याकडे जाऊन त्याने त्यांच्यावर लाथा झाडल्या. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३०›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३० वा
श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था -
श्रीशुक म्हणतात
- भगवान अचानकपणे अंतर्धान पावले, तेव्हा गजराजाविना हत्तिणी जशा दुःखी होतात, तशा व्रजयुवती ते दिसत नाहीत, असे पाहून दुःखाने व्याकूळ झाल्या. श्रीकृष्णांची चाल, प्रेमपूर्ण स्मितहास्य, विलासयुक्त नेत्रकटाक्ष, मनोरम प्रेमालाप, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला आणि हावभाव यांनी त्यांचे चित्त वेधून घेतले होते. त्यामुळे श्रीकृष्णमय झालेल्या गोपी त्यांच्या वेगवेगळ्या कृतींचे अनुकरण करू लागल्या. आपल्या प्रियतमाच्या चालण्याची लकब, हास्य, पाहणे, बोलणे इत्यादि बाबतीत त्या गोपी त्यांच्या सारख्याच होऊन गेल्या, त्यांच्या शरीरांमध्ये तीच हालचाल, त्याच भाव-भावना उतरल्या. त्या स्वतःला संपूर्णपणे विसरून श्रीकृष्णस्वरूप झाल्या आणि त्यांच्याच लीलाविलासाचे अनुकरण करीत "मीच श्रीकृष्ण आहे" असे म्हणू लागल्या. त्या सर्वजणी एकत्र येऊन उच्च स्वरात त्यांच्याच गुणांचे गायन करीत वेड्यासारख्या एका वनातून दुसर्या वनात त्यांना शोधू लागल्या. श्रीकृष्ण सर्व जड चेतन पदार्थांमध्ये आकाशाप्रमाणे आत-बाहेर व्यापलेले असूनही गोपी मात्र वनस्पतींना त्यांचा ठावठिकाणा विचारू लागल्या. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २०›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २० वा
वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन -
श्रीशुकदेव म्हणतात - गोपाळांनी घरी आल्यावर घरातील स्त्रियांना श्रीकृष्ण आणि बलरामांची प्रलंबाला मारणे, आपल्याला वणव्यातून सोडवणे इत्यादि अलौकिक कृत्ये सांगितली. वृद्ध गोप आणि गोपी ते ऐकून आश्चर्यचकित झाल्या. ते सर्वजण मानू लागले की, "श्रीकृष्ण आणि बलरामाच्या वेषात आपल्याकडे आलेले हे कोणी मोठे देव आहेत." (१-२)
यानंतर वर्षा ऋतू सुरू झाला. या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांची अधिक वाढ होते. त्यावेळी सूर्य आणि चंद्र यांच्याभोवती वारंवार खळी दिसू लागली. ढग इत्यादिंमुळे आकाश क्षुब्ध दिसू लागले. काळ्या दाट धगांमुळे व गडगडाट करणार्या विजांनी व्यापलेल्या आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे झाकोळून जातात. त्यामुळे आकाश, गुणांनी झाल्या गेलेल्या जीव नामक ब्रह्माप्रमाणे दिसू लागते. (सत्त्वगुणी वीज, रजोगुणी गडगडाट व तमोगुणी ढग आणि ब्रह्मस्वरूप आकाश अशी ही उपमा आहे.) राजाप्रमाणे सूर्याने पृथ्वीरूप प्रजेकडून आठ महिनेपर्यंत पाण्याच्या रूपाने जो कर वसूल केला होता, तो वेळ आल्यावर सूर्य आपल्या किरणरूपी हातांनी पुन्हा वाटू लागला. जसे दयाळू लोक दुःखी लोकांसाठी आपले प्राणसुद्धा समर्पित करतात. त्याप्रमाणे विजा असलेले ढग वेगवान वार्याच्या प्रेरणेने प्राण्यांना तृप्त करणारे आपले जीवन (पाणी) देऊ लागले. (३-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३४ वा
सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- एकदा गोपाल शिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी जत्रा पाहण्याच्या कुतूहलाने बैलगाड्यांत बसून अंबिकावनात गेले. राजन ! तेथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि भगवान शंकरांचे व भगवती अंबिकादेवीचे भक्तीभावाने अनेक प्रकारच्या पूजासाहित्याने पूजन केले. तेथे त्यांनी आदरपूर्वक गाई, सोने, वस्त्रे, मध आणि मधुर अन्न भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न व्हावेत, म्हणून ब्राह्मणांना दान दिले. नंदसुनंद इत्यादी गोपांनी त्यादिवशी शिवरात्रीचा उपवास होता, म्हणून फक्त पाणी पिऊन ते रात्रीच्या वेळी सरस्वती नदीच्या तीरावर झोपी गेले. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ४५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४५ वा
श्रीकृष्ण-बलरामांचे उपनयन आणि गुरुकुलप्रवेश -
श्रीशुक म्हणतात
- श्रीकृष्णांच्या लक्षात आले की माता-पित्यांना माझ्या भगवद्भवाचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे यांना पुत्रस्नेहाचे सुख मिळणार नाही, असा विचार करून त्यांनी, लोकांना मोहित करणारी आपली योगमाया त्यांच्यावर पसरली. यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण थोरल्या बंधूसह आई-वडिलांकडे गेले आणि आदरपूर्वक विनम्रपणे "आई ! बाबा !" अशी हाक मारून त्यांना आनंदित करीत म्हणू लागले. "बाबा ! आई ! आम्ही आपले पुत्र असून आणि आमच्यासाठी आपण नेहमी उत्कंठित असूनसुद्धा आपण आमच्या बाल्य, पौगंड आणि किशोर या अवस्थांचे सुख आमच्याकडून मिळवू शकला नाहीत. आम्हांलासुद्धा दुर्दैवाने आपल्या जवळ राहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले नाही. त्यामुळे आईवडिलांच्या घरी असणार्या मुलांना लाड करून घेण्याचे जे सुख मिळते, ते आम्हांला मिळू शकले नाही. माता-पिताच या शरीराला जन्म देऊन त्याचे लालनपालन करतात. तेव्हा कुठे ते शरीर पुरुषार्थप्राप्तीचे साधन बनते. म्हणून एखाद्याने शंभर वर्षे जिवंत राहून जरी माता-पित्यांची सेवा केली, तरी तो त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. सामर्थ्य असूनही जो पुत्र आपल्या आई-वडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करीत नाही, त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचे मांस खाऊ घालतात. सामर्थ्य असूनही जो मनुष्य आपले म्हातारे माता-पिता, पतिव्रता पत्नी, लहान मुले, गुरु, ब्राह्मण आणि शरणागत यांचे पालनपोषण करीत नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. आपली सेवा न करण्यामुळे आमचे इतके दिवस वाया गेले. कारण नेहमी कंसाच्या भीतीने आम्ही आपली सेवा करण्यास असमर्थ होतो. आई ! बाबा ! आपण दोघांनी तुमची सेवा न करणार्या आम्हांला क्षमा करावी. दुष्ट कंसाने आपल्याला अतिशय कष्ट दिले. परंतु आम्ही परतंत्र असल्यामुळे आपली काही सेवा करू शकलो नाही." (१-९)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २६ वा
श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदांशी वार्तालाप -
श्रीशुक म्हणतात
- श्रीकृष्णांची अशी अलौकिक कृत्ये पाहून गोपांना अतिशय आश्चर्य वाटले. त्यांच्या शक्तीची त्यांना कल्पना नसल्यामुळे ते एकत्र येऊन म्हणू लागले, "या मुळाची ही कृत्ये अतिशय आश्चर्यजनक आहेत. आमच्यासारख्या खेडवळ लोकांमध्ये याने जन्म घेणे ही त्याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. त्याला हे कसे योग्य आहे ? जसे हत्तीने सोंडेने कमळ उपटून वर धरावे, तसा या सात वर्षांच्या बालकाने एकाच हाताने गिरिराज उखळून सहजपणे कसा काय हातावर तोलला ? जेव्या हा पाळण्यात होता, त्यावेळी भयंकर राक्षसी पूतना आली असता याने डोळे मिटूनच, काळाने शरीराचे आयुष्य प्यावे, तसे तिच्या स्तनातील दूध प्राणांसह प्राशन केले. जेव्हा हा फक्त तीन महिन्यांचा होता आणि छ्कड्याखाली झोपा होता, तेव्हा रडत-रडतच हा वर पाय हालवत असता त्याच्या ठोकरण्याने तो छकडा उलटून पडला. जेव्हा तृणावर्त दैत्याने वावटळीच्या रूपाने, हा बसला असतानाच याला उचलून आकाशात नेले होते, तेव्हा हा फक्त एक वर्षाचा होता. त्यावेळी याने त्या तृणावर्त दैत्याचा गळा घोटून त्याला ठार मारले. एकदा लोणी चोरल्यामुळे आईने त्याला उखळाला बांधले होते, तेव्हा याने दोन्ही अर्जुन वृक्षांच्यामधून रांगत जाता जाता ते वृक्ष उखडून टाकले. गोपाल आणि बलराम यांच्यासह हा जेव्हा वासरे चारण्यासाठी वनामध्ये गेला होता, तेव्हा याला मारण्यासाठी एक दैत्य बगळ्याच्या रूपाने आला आणि याने दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही जबडे पकडून त्याला गवताच्या काडीप्रमाणे चिरून टाकले. जेव्हा याला मारण्याच्या हेतूने एक दैत्य वासराच्या रूपामध्ये वासरांच्या कळपात घुसला होता, त्यावेळी याने त्या दैत्याला मारून कवठांच्या झाडावर आपटून ती झाडेही उखडून टाकली. याने बलरामासह गाढव्या रूपात राहणार्या धेनुकासुराला व त्याच्या बांधवांना मारून टाकले आणि पिकलेल्या फळांनी परिपूर्ण असे ताडवन सर्वांसाठी उपयोगी बनविले. यानेच बलशाली बलरामाकडून क्रूर प्रंबासुराला मारले. तसेच दावानलातून गुरांची आणि गोपालांची सुटका केली. यमुनेच्या डोहात वास्तव्य करणार्या विषारी कालियाचे गर्वाहरण करून बळजबरीने त्याला डोहातून हाकलून लावले आणि यमुनेचे पाणी विषरहित केले. नंदबाबा ! तुमच्या मुलावर आम्हा सर्व व्रजवासियांचे अत्यंत प्रेम आहे आणि याचेसुद्धा आमच्यावर स्वाभाविक प्रेम आहे. याचे कारण काय ? कुठे हा सात वर्षांचा बालक आणि कुठे ते एवढा मोठा पर्वत उचलून धरणे ! व्रजराज ! म्हणूनच तुमच्या या पुत्रासंबंधी आम्हांला काही कळेनासे झाले आहे (१-१४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ४२›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४२ वा
कुब्जेवर कृपा, धनुष्यभंग आणि कंसाची भीती -
श्रीशुकदेव म्हणतात- यानंतर श्रीकृष्ण जेव्हा राजमार्गावरून पुढे चालले होते, तेव्हा त्यांनी एका युवतीला पाहिले. ती दिसायला सुंदर होती, परंतु शरीराने कुबडी होती. ती हातामध्ये उटण्यांचा डबा घेऊन चालली होती. भक्तांना आनंद देणारे श्रीकृष्ण हसत हसत तिला म्हणाले- "हे सुंदरी ! तू कोण आहेस ? हे उटणे कोणासाठी घेऊन चालली आहेस ? हे आम्हांला नीट सांग. बाई ग ! ही सुगंधी उटी तू आम्हांला दे. त्यामुळे लवकरच तुझे कल्याण होईल." (१-२)
सैरंध्री म्हणाली- " हे परम सुंदरा ! मी कंसाची त्रिविका नावाची उटणे लावणारी आवडती दासी आहे. माझे उटणे भोजराज कंसाला अतिशय आवडते; परंतु आपणा दोघांखेरीज याला पात्र असा दुसरा कोण आहे बरे !" भगवंतांचे सौंदर्य, कोमलता, मधुरता, मंद हास्य, प्रेमालाप आणि पाहाणे यांमुळे प्रभावित होऊन तिने ते उटणे त्या दोन्ही भावांना भरपूर लावले. (३-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३१›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३१ वा
गोपी गीत -
गोपी गाऊ लागल्या - प्रियतम ! तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे. म्हणूनच तर लक्ष्मी कायमची येथे येऊन राहिली आहे; प्रियतमा ! पहा ! ज्यांनी तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केले आहेत, त्या गोपी दिशादिशांमध्ये तुम्हांला शोधीत आहेत. हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी ! आम्ही वेतन न घेणार्या तुमच्या दासी आहोत. शरत्कालीन जलाशयामध्ये सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरवणार्या नेत्रांनी तुम्ही आम्हांला घायाळ केले आहे. आमचे मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर ! नेत्रांनी मारणे हा वध नाही काय ? हे पुरुषोत्तमा ! यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू, अजगराच्या रूपाने खाणारा अघासुर, इंद्राने केलेला वर्षाव, तुफान, विजा, दावानल, वत्सासुर आणि व्योमासुर इत्यादींनी उत्पन्न केलेल्या सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही वारंवार आमचे रक्षण केले आहे. तुम्ही केवळ यशोदनंदनच नाही, तर सर्व प्राण्यांच्या अंतरांत राहाणारे त्यांचे साक्षी आहात, हे सखया ! ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही यदुवंशात अवतीर्ण झाला आहात. (१-४)
हे यदुवंशशिरोमणे ! जे लोक जन्म-मृत्युरूप संसाराच्या चक्राला भिऊन तुमच्या चरणांना शरण येतात, त्यांना निर्भय करणारे, सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचे पाणिग्रहण करणारे आपले करकमल, हे नाथ ! आमच्या मस्तकावर ठेवा. व्रजवासियांचे दुःख दूर करणारे हे वीरश्रेष्ठ ! ज्यांच्या स्मिताने भक्तांचा गर्व मावळतो, अशा आमच्या प्रिय सख्या ! या तुमच्या दासींचा स्वीकार करा. आपले सुंदर मुखकमळ आम्हा अबलांना दाखवा. शरणागतांची पापे नाहीशी करणारे, गुरांच्या मागून जाणारे, लक्ष्मीचे निवासस्थान, कालियाच्या फणांवर ठेवलेले असे तुमचे चरणकमल तुम्ही आमच्या वक्षःस्थळावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा. हे कमलनयना ! सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त, विद्वानांनाही मोहविणार्या तुमच्या गोड वाणीने या तुमच्या दासीही मोहित होत असतात. हे वीरा ! आपल्या अधरामृताने आम्हांला तृप्त करा. प्रभो ! तुमच्या कथासुद्धा अमृतस्वरूपच आहेत. विरहाने व्याकूळ झालेल्यांचे ते जीवनसर्वस्व आहे. त्या सगळे पाप-ताप मिटवून श्रवणानेसुद्धा कल्याण करतात. तुमच्या त्या सुंदर कथांचे जे विस्ताराने वर्णन करतात, तेच वास्तविक सर्वांत मोठे दानशूर होत ! हे प्रियतमा ! तुमचे प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष तसेच तुमच्या लीलांचे ध्यान हे सुद्धा अत्यंत मंगलदायक आहे. पण तुम्ही एकांतात ज्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या, त्या आठवून हे कपटनाटकसूत्रधारा ! आमच्या मनाची कालवाकालव होत आहे. (५-१०)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय १२›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १२ वा
अघासुराचा उद्धार -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- एके दिवशी नंदनंदनाने वनातच भोजन करण्याच्या विचाराने सकाळी उठून तुतारीच्या मधुर आवाजाने बरोबरीच्या गवळ्यांच्या मुलांना जागविले आणि वासरांना पुढे करून तो व्रजमंडलातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याच्यावर प्रेम करणारी हजारो मुले सुंदर शिंकी, वेताच्या काठ्या, तुतार्या आणि बासर्या घेऊन तसेच आपली हजारो वासरे बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने घरातून बाहेर पडली. श्रीकृष्णाच्या असंख्य वासरांत आपापली वासरे मिसळून त्यांना चारीत ठिकठिकाणी बाललीला करीत ते चालू लागले. त्या मुलांची जरी काचा, गुंजा, रत्ने आणि सोन्याचे दागिने आंगावर घातले होते, तरीसुद्धा त्यांनी वृंदावनातील फळे, पालवी, रंगी-बेरंगी फुले, मोरपंख तसेच गेरूसारख्या रंगीत मातीनेही स्वतःला सजविले होते. कोणी एखाद्याचे शिंके चोरून घेई, तर कोणी कोणाची काठी किंवा बासरी ! जेव्हा त्याच्या मालकाला हे कळे, तेव्हा ते घेणारा दुसर्याकडे लांब फेकीत असे, दुसरा तिसर्याकडे आणि तिसरा आणखी लांब चौथ्याकडे. नंतर ते हसत हसत ज्याचे त्याला देत. श्रीकृष्ण जरा वनाची शोभा पहात थोडा जरी पुढे निघून गेला तर "अगोदर मी त्याला शिवणार ! अगोदर मी शिवणार !" असे म्हणत सर्वजण त्याच्याकडे पळत जात आणि त्याला शिवून आनंदमग्न होऊन जात. कोणी बासरी वाजवीत, तर कोणी शिंगे फुंकीत, कोणी कोणी भ्रामरांच्याबरोबर गुणगुणत तर कोणी कोकिळांच्यासारखे "कुहु-कुहु" करीत. काही मुले आकाशात उडणार्या पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावत, तर काहीजण हंसांच्या बरोबर त्यांच्यासारख्या सुंदर गतीने चालत. काहीजण बगळ्यांच्या जवळ त्यांच्यासारखेच डोळे मिटत बसत, तर काहीजण मोरांना नाचताना पाहून त्यांच्याचसारखे नाचत. काहीजण वानरांचे शेपूट धरून ओढीत तर दुसरे त्यांच्याबरोबरीने झाडांवर चढत. काहीजण त्यांच्यासारख्या माकडचेष्टा करीत तर दुसरे काही त्यांच्या बरोबरीने एका डहाळीवरून दुसर्या डहाळीवर उड्या मारीत. काही मुले नदीच्या प्रवाहात बेडकांबरोबर पोहोत त्यांना मागे टाकून पुढे जात, कोणी पाण्यात आपली प्रतिबिंबे पाहून त्यांना हसत; तर काहीजण आपल्याच आवाजाच्या प्रतिध्वनीला नावे ठेवत. श्रीकृष्ण ज्ञानी संतांच्यासाठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव आहेत, दास्य करणार्या भक्तांचे ते आराध्यदैवत आहेत, आणि मायेने मोहित झालेल्या लोकांच्या दृष्टीने मनुष्य-बालक आहेत. त्याच भगवंतांच्याबरोबर ते पुण्यात्मे बालक खेळत होते. पुष्कळ जन्म श्रम करून जितेंद्रिय योग्यांनाही ज्यांच्या चरणकमलांची धूळ मिळणेही शक्य नाही, तेच भगवान व्रजवासी गवळ्यांना आपणहून दर्शन देत आहेत, त्यांच्या भाग्याचा महिमा काय वर्णावा ? (१-१२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २२›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २२ वा
वस्त्रहरण -
श्रीशुकदेव म्हणतात - हेमंत ऋतूतील मार्गशीर्ष महिन्यात नंदांच्या व्रजातील कुमारी हविष्यान्न खाऊन कात्यायनी व्रत करू लागल्या. राजा ! त्या अरुणोदय होत असतानाच यमुनेच्या पाण्यात स्नान करीत आणि तीरावर देवीची वाळूची मूर्ती तयार करून, सुगंधी चंदन, फुलांचे हार, निरनिराळ्या अन्नांचे नैवेद्य, धूप-दीप, लहान मोठ्या भेटवस्तू, पाने, फळे, तांदूळ इत्यादिंनी तिची पूजा करीत. त्याचबरोबर, "हे कात्यायनी ! हे महामाये ! हे महायोगिनी ! हे सर्वांच्या एकमात्र स्वामिनी ! नंदनंदनांना आमचा पती कर. देवी ! आम्ही तुला नमस्कार करतो." या मंत्राचा जप करीत त्या कुमारिका, देवीची आराधना करीत. ज्यांचे मन श्रीकृष्णांना समर्पित झाले होते, अशा त्या कुमारींनी नंदनंदन पती व्हावेत म्हणून एक महिनाभर भद्रकालीदेवीची अतिशय चांगल्या रीतीने पूजा केली. दररोज उषःकालीच त्या एकमेकींना हाका मारीत आणि एकेमेकींच्या हातात हात घालून उच्च स्वरात भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत यमुनाजलात स्नान करण्यासाठी जात. (१-६)
दररोजप्रमाणे एके दिवशी सर्व मुली यमुनेच्या तटावर आपापली वस्त्रे ठेवून श्रीकृष्णांचे गुणगान करीत आनंदाने जलक्रीडा करू लागल्या. योगेश्वरांचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण गोपींचे मनोगत जाणून ते सफल करण्यासाठी आपल्या मित्रांसह यमुनाकाठी गेले. ते त्या मुलींची वस्त्रे उचलून लगबगीने एका कदंबाच्या झाडावर चढले. त्यांच्या बरोबरीचे गोपाळ खदखदा हसू लागले आणि स्वतः श्रीकृष्णसुद्धा त्यांची थट्टा करीत म्हणाले, "कुमारींनो ! येथे येऊन तुम्ही आपापली वस्त्रे खुशाल घेऊन जा. मी खरेच सांगतो, कारण व्रत करून तुम्ही खंगलात, म्हणून मी तुमची थट्टा नाही करीत. मी यापूर्वी कधीच खोटे बोललो नाही. हे माझे मित्र जाणतातच. सुंदरींनो ! तुम्ही एकेकट्या येऊन आपापले वस्त्र घेऊन जा किंवा सगळ्या जणी एकदम या." (७-११)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ३५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३५ वा
युगलगीत -
श्रीशुक म्हणतात
- श्रीकृष्ण वनात जात, तेव्हा गोपींचे चित्तसुद्धा त्यांच्याबरोबरच जात असे. श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत त्या आपले दिवस कष्टाने घालवीत. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय १८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १८ वा
प्रलंबासुर उद्धार -
श्रीशुकदेव म्हणतात - नंतर आनंदित झालेल्या स्वजनांसह त्यांच्या तोंडून आपल्या कीर्तीचे गोडवे ऐकत, श्रीकृष्णांनी गाईगुरांनी शोभणार्या व्रजात प्रवेश केला. अशा प्रकारे योगमायेने गोपाळ झालेले राम-कृष्ण व्रजामध्ये लीला करीत होते. असाच एकदा ऐन उन्हाळा होता. प्राण्यांना हा तसा विशेष आवडत नाही. परंतु वृंदावनातील स्वाभाविक गुणांमुळे तेथे वसंत ऋतूच वाटत होता. कारण तेथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम निवास करीत होते ना ! तेथे रातकिड्यांचा कर्कश आवाज, झर्यांच्या खळखळाटामध्ये झाकला गेला होता. त्या निर्झरांतून सदैव पाण्याचे तुषार उडत असत. त्यामुळे ते वन हिरव्यागार वनराईने शोभिवंत झाले होते. (१-४)
नदी, सरोवरे व झर्यांच्या लाटांना स्पर्श करून जो वारा वाहात होता, त्यात पांढर्या, लाल, निळ्या कमळांचे पराग मिसळत होते. त्यामुळे हिरवळीने भरलेल्या त्या वनात राहणार्या लोकांना वणवा किंवा सूर्य यांच्या उष्णतेचा मुळीच त्रास नव्हता. नदीमध्ये भरपूर पाणी असे. तिच्या लाटा तटांवर येऊन थडकत. त्यामुळे आसपासच्या जमिनी ओलसर राहात आणि सूर्याचे विषासारखे प्रकर किरणसुद्धा तेथील जमिनी आणि हिरवेगार गवत सुकवू शकत नसत. त्या वनामध्ये फुले विपुल असल्याने तेथे सौंदर्य ओसंडत होते. कुठे रंगीबेरंगी पक्षी किलबिलाट करीत, तर कुठे हरिणे चीत्कार करीत. कुठे मोर केकारव करीत, तर कुठे भ्रमर गुंजारव करीत. कुठे कोकिळा कुहू कुहू गात तर कुठे सारस पक्षी कूजन करीत. त्या वनात श्रीकृष्ण आणि बलराम यांनी क्रीडा करण्याचे ठरविले. म्हणून गोधन घेऊन बासरी वाजवीत ते त्या वनात शिरले. (५-८)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय १९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १९ वा
गाई आणि गोपांचा वणव्यातून बचाव -
श्रीशुकदेव म्हणतात, एकदा गोपाळ खेळांमध्ये गुंग झाले असता त्यांची गुरे स्वच्छंदपणे चरत गवताच्या लोभाने घनदात जंगलात शिरली. त्यांची गुरे एका वनातून दुसर्या वनात जाता जाता उन्हाने तहान लागून व्याकूळ झाली आणि हंबरत हंबरत मुंज नावाच्या गवताने भरलेल्या वनात शिरली. श्रीकृष्ण, बलराम आदि गोपाळांना जेव्हा शोधूनही जनावरांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही, तेव्हा त्यांना खेळण्याचा पश्चात्ताप झाला. आपल्या उपजीविकेचे साधनच नाहीसे झाल्याने ते बेचैन झाले. नंतर त्यांनी गाईंच्या पावलांनी तुडवलेले व दातांनी ओरबाडलेले गवत आणि जमिनीवर उमटलेल्या खुरांच्या खुणांच्या आधारे, त्यांचा शोध घेण्यासाठी ते निघाले. जाता जाता त्यांना आढळले की, त्यांची गुरे मुंजारण्यामध्ये वाट चुकली असून हंबरडा फोडीत आहेत. तेव्हा त्यांना त्यांनी तेथून वळवले. त्यावेळी ते अतिशय थकले होते. शिवाय त्यांना फार तहानसुद्धा लागली होती. भगवान श्रीकृष्ण आपल्या मेघगंभीर वाणीने, गाईंना नावांनी हाका मारू लागले. आपल्या नावाचा आवाज ऐकताच गाई अतिशय आनंदित होऊन हुंकार देऊ लागल्या. (१-६)
तेवढ्यात त्या वनाला सगळीकडे अचानक, जी वनवासी जीवांचा काळच अशी आग लागली. त्याचबरोबर वारे वाहू लागल्याने आग भडकली आणि आपल्या भयंकर लोळांनी चराचराला भस्मसात करू लागली. जेव्हा गोपाळांनी आणि गुरांनी पाहिले की, वणवा चारी बाजूनी आपल्याकडेच येत आहे, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले; आणि मृत्यूच्या भयाने घाबरलेले जीव ज्याप्रमाणे भगवंतांना शरण जातात, त्याचप्रमाणे ते श्रीकृष्ण आणि बलरामांना शरण जाऊन म्हणाले. "महावीर श्रीकृष्णा ! श्रीकृष्णा ! परम प्रतापी बलरामा ! आम्ही आपणास शरण आलो आहोत. या दावानलात आम्ही होरपळून जाणार ! तुम्ही आम्हांला वाचवा. श्रीकृष्णा ! आमचे सर्व काही तूच आहेस. मग आमचा नाश कसा होणार ! हे सर्व धर्म जाणणार्या शामसुंदरा ! तूच आमचा रक्षणकर्ता. आम्हांला फक्त तुझाच आधार." (७-१०)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २७ वा
श्रीकृष्णांना अभिषेक -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकुळाचे रक्षण केले, तेव्हा त्यांच्याकडे गोलोकातून कामधेनू आणि स्वर्गातून इंद्र आला. भगवंतांची अवहेलना केल्यामुळे इंद्र अतिशय लज्जित झाला होता. म्हणून त्याने एकांत स्थानी भगवम्तांकडे जाऊअ आपल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या मुकुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पाहून - ऐकून आपणच तिन्ही लोकांचा स्वामी असल्याचा इंद्राचा गर्व नाहीसा झाला. आता तो हात जोडून त्यांची स्तुती करू लागला. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ४७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४७ वा
उद्धव व गोपिंचा संवाद आणि भ्रमरगीत -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिले. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. ताज्या कमलदलाप्रमाणे प्रसन्न नेत्र होते. त्याने पीतांबर धारण केला होता. त्याच्या गळ्यात कमळांची माळ व कानांमध्ये रत्नजडित कुंडले झगमगत होती आणि मुखकमल प्रफुल्लित होते. गोपी आपापसात म्हणू लागल्या, "हा पुरुष अतिशय देखणा आहे. परंतु हा आहे कोण ? कोठून आला ? कोणाचा दूत आहे ? याने श्रीकृष्णांसारखी वेषभूषा धारण केली आहे ?" हे सर्व जाणून घेण्यासाठी गोपी उत्सुक झाल्या आणि पवित्रकीर्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रित असणार्या उद्धवाला चारी बाजूंनी घेरून पवित्र स्मित करीत उभ्या राहिल्या. हा रमारमणांचा संदेश घेऊन आला आहे, असे जेव्हा त्यांना समजले, तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे, लज्जेने स्मित हास्य करीत त्याच्याकडे पाहून मधुर भाषणाने त्याचा चांगला सत्कार केला आणि एकांतात तो आसनावर बसल्यावर त्याला त्यांनी विचारले, "उद्धवा ! आपण यदुनाथांचे दूत आहात. आपल्या स्वामींनी, त्यांच्या माता-पित्यांना खुशाली कळविण्यासाठी आपल्याला येथे पाठविले आहे, हे आम्हांला कळले. नाहीतर, आता या गोकुळात त्यांना आठवण यावी, अशी दुसरी वस्तू आम्हांला दिसत नाही. बांधवांवरचे प्रेम मुनीलासुद्धा सोडणे कठीण असते. मातापित्यांखेरीज इतरांबरोबर प्रेम-संबंधाचे जे सोंग आणले जाते, ते स्वार्थासाठीच असते. जसे भ्रमरांचे फुलांवर प्रेम असते तसेच पुरुषांचे स्त्रियांवरील प्रेम. धन संपलेल्या माणसाला गणिका, रक्षण करु न शकणार्या राजाला प्रजा, शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला आणि दक्षिणा मिळाली की ऋत्विज यजमानाला सोडून देतात. पक्षी फळे नसलेल्या झाडाला, भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला, पशू जळलेल्या जंगलाला आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातात. गोपींचे मन, वाणी आणि शरीर श्रीकृष्णांमध्येच तल्लीन झालेले होते. श्रीकृष्णांचा दूत म्हणून जेव्हा उद्धव व्रजभूमीमध्ये आला तेव्हा त्या लोकव्यवहार विसरल्या आणि श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोर अवस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या होत्या, त्या सर्वांची आठवण कर-करून त्या लीलांचे गायन करु लागल्या. शिवाय संकोच सोडून रडूही लागल्या. एका गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचे स्मरण झाले. त्यावेळी एक भ्रमराला गुणगुणताना पाहून तिल वाटले की, आपली मनधरणी करण्यासाठी प्रियतमाने याला दूत म्हणून पाठविले आहे. ती त्याला म्हणाली. (१-११)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय ९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ९ वा
श्रीकृष्णाला उखळाला बांधणे -
श्रीशुकदेव म्हणतात - एकदा नंदराणी यशोदा घरच्या दासींना दुसर्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती. आतापर्यंत भगवंतांच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले, त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचे गायनही करीत असे. (१-२)
यशोदा जेव्हा दही घुसळत होती, तेव्हा स्थूल कमरेवर ती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कमरपट्टा धारण केला होता. पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध पाझरत होते आणि ते हलत होते. रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शिणले होते. हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुले हलत होती. चेहर्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते. वेणीत घातलेली मोगर्याचे फुले गळून पडत होती. (३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय २३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २३ वा
यज्ञपत्न्यांवर कृपा -
गोपाळ म्हणाले - हे पराक्रमी बलरामा ! हे दुष्टनाशना श्यामसुंदरा ! आम्हांला खूप भूक लागली आहे. ती शमविण्यासाठी काही उपाय करा. (१)
श्रीशुकदेव म्हणतात - गोपाळांनी जेव्हा देवकीनंदन भगवंतांना अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी मथुरेतील आपल्या भक्त ब्राह्मण पत्नींवर कृपा करण्यासाठी म्हटले. (२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १० वा, पूर्वार्ध. अध्याय ४९›📂 भागवत स्कंध १०, अध्याय १४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १४ वा
ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती -
ब्रह्मदेव म्हणाले
- प्रभो ! केवळ आपणच स्तुती करण्यास योग्य आहात. आपले हे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल आहे; त्यावर विजेप्रमाणे झगमगणारा पीतांबर शोघून दिसत आहे, गुंजांची कर्णभूषणे आणि मोरपंखांचा मुगुट यामुळे आपले मुख सुंदर दिसत आहे. आपल्या वक्षःस्थळावर वनमाला रुळत आहे, हातामध्ये घास, बगलेत वेताची काठी आणि शिंग व कमरेला खोचलेली बासरी सुरेख दिसत आहे. गोपालबालक असणार्या आपले चरण सुकुमार आहेत. मी आपल्याला नमस्कार करीत आहे. हे देवा ! भक्तांच्या इच्छेनुसार धारण केले जाणारे हे स्वरूप मला अनुगृहीत करण्यासाठीच आपण प्रगट केले आहे. हे पांचभौतिक नाही. तरीही याचा महिमा कोणीही जाणू शकत नाही. तर मग साक्षात आत्मानंदानुभव स्वरूप अशा आपला महिमा कोणी चित्त एकाग्र करूनसुद्धा कसा जाणू शकेल. प्रभो ! जे लोक ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न न करता केवळ आपापल्या ठिकाणीच राहून, संतांनी वर्णिलेल्या आपल्या कथांचे, शरीराने, वाणीने आणि मनाने विनम्रपणे सेवन करतात, किंबहुना तेच आपले जीवन मानतात, त्यांनी त्रैलोक्यात अजिंक्य अशा आपल्याला बहुधा जिंकल्यासारखेच असते. हे भगवन् ! कल्याणाचा उगम असणारी आपली भक्ती सोडून जे लोक केवळ ज्ञानप्राप्तीसाठी श्रम करतात, त्यांना फक्त क्लेशच क्लेश हाती लागतात, अन्य काही नाही. जसे भुसा कुटणार्यांना फक्त श्रमच होतात, तांदूळ मिळत नाहीत. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय १७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १७ वा
भगवंतांचे प्रगट होऊन अदितीला वर देणे -
श्रीशुक म्हणतात - राजा, आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे अदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले. बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली. तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्णरूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले. तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्यासमोर प्रगट झाले. परीक्षिता, त्यांनी पीतांबर परिधान केला होता. त्यांना चार हात होते आणि हातात शंख, चक्र, गदा घेतली होती. भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून अदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेमविह्वल होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले. नंतर उठून, हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. तिच्याच्याने बोलवेना. तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते. दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापू लागले, त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली. परीक्षिता, आपल्या प्रेमपूर्ण नेत्रांनी देवी अदिती, लक्ष्मीपती, विश्वपती, यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहात होती. अंतर मोठ्या प्रेमाने, गदगद वाणीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करू लागली. (१-७)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय १३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १३ वा
आगामी सात मन्वंतरांचे वर्णन -
श्रीशुक म्हणतात - विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वन्तराचा सातवा मनू होय. त्याच्या मुलांविषयी ऐक. हे राजा, वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू, नभग, धृष्ट, शर्याती, नरिष्यंत नाभाग, दिष्ट, करूष, पृषध्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत. राजा, या मन्वन्तरात आदित्य, वसू, रुद्र, विश्वेदेव, मरुद्गण, अश्विनीकुमार आणि ऋभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज हे सप्तर्षी आहेत. या मन्वन्तरामध्ये सुद्धा कश्यपापासून अदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने, भगवान विष्णूंनी अवतार घेतला. (१-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय २३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २३ वा
बलीचे बंधनातून सुटून सुतललोकात जाणे -
श्रीशुक म्हणतात - सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले, तेव्हा साधूंना आदरणीय अशा महानुभाव दैत्यराजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला. हात जोडून गद्गद वाणीने तो भगवंतांना म्हणू लागला - (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय ८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ८ वा
समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे -
श्रीशुक म्हणतात - शंकरांनी विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली. नंतर समुद्रातून कामधेनू प्रगट झाली. हे राजा, ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती. म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविणार्या यज्ञासाठी उपयोगी पडेल, असे पवित्र हविर्द्रव्य मिळविण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले. नंतर उच्चैःश्रवा नावाचा घोडा निघाला. तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता. तो घेण्यासाठी बळीने इच्छा प्रकट करून तो घेतला. तेव्हा इंद्राने भगवंतांच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली. यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला. कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील असे त्याला शिखरांसारखे चार दात होते. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा, असे भगवंतांना वाटले. परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजात निघाला. तू ज्या पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस, त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता. यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगट झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणार्या ठरल्या. त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ति लक्ष्मीदेवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणार्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. तिचे सौंदर्य, औदार्य, तारुण्य, रूप-रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले. देव, असुर, मनुष्य अशा सर्वांना वाटले की, ही आपल्याला मिळावी. तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले. श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यांतून पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या. गाईंनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतूने चैत्र-वैशाखात मिळणारी सर्व फुलेफळे आणून दिली. ऋषींनी विधिपूर्वक तिला अभिषेक केला. गंधर्व मंगल गान करू लागले. नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या. मेघ देह धारण करून मृदंग, डमरू, ढोल, नगारे, रणशिंगे, शंख, वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजवू लागले. तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्या वेळी ब्राह्मणांनी वेदमंत्र म्हटले. तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली. वरुणाने वैजयंती माळ समर्पण केली. मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते. प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी दोन कुंडले तिला दिली. (१-१६)
ब्राह्मणांनी स्वस्तिमंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली. माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते. त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. सुंदर गालांवर कुंडले डोलत होती. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते. तिची कंबर बारीक होती. पुष्ट असे दोन्ही स्तन केशरी चंदनाची उटी लावलेले होते. जेव्हा ती चालत असे, तेव्हा तिच्या पायातील नूपुरांचा मधुर झंकार निघत होता. त्यावेळी ती फिरणार्या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती. आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, देव इत्यादींमध्ये तिला असा पुरुष आढळला नाही. जो तपस्वी होता, त्याने क्रोधावर विजय मिळविलेला नव्हता. कोणाला ज्ञान होते, परंतु तो अनासक्त नव्हता. कोणी थोर होते, परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते. ज्याला दुसर्याचा आश्रय घ्यावा लागतो, त्याला ईश्वर कसे म्हणायचे ? काहीजण धर्माचे आचरण करणारे होते, परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता, परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता. काहींच्या मध्ये शौर्य होते, परंतु ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकांसारखे जे गुणातीत होते, ते वर होणार नव्हते. काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे, परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही. काहींचे वर्तन मला योग्य आहे, परंतु त्यांच्या आयुष्याविषयी सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्हीही गोष्टी आहेत, परंतु त्यांचे वागणे अमंगळ असते आणि सर्व मंगल गुण ज्याच्या ठायी आहेत, ते मला इच्छित नाहीत. (१७-२२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय २४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २४ वा
मस्त्यावताराची कथा -
राजाने विचारले - मुनिवर्य, अद्भुत कर्म करणार्या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यावतार धारण करून जी लीला केली होती, त्यांच्या त्या आदिअवताराची कथा मी ऐकू इच्छितो. भगवंतांनी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी, लोकांना न आवडणारे, असह्य असे हे माशाचे रूप का धारण केले ? भगवन, महात्म्यांना कीर्तनीय अशा भगवंतांचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आहे. आपण कृपा करून त्यांची ती सर्व लीला आम्हांला सांगावी. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय १४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १४ वा
मनू इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण -
राजाने म्हटले - भगवन, हे मनू इत्यादी आपापल्या मन्वन्तरांमध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात, ते मला सांगा. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय १२›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १२ वा
मोहिनीरुपाने महादेवांना मोहिनी -
श्रीशुकदेव म्हणतात - श्रीहरींनी स्त्रीचे रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजले. हे ऐकून शंकर पार्वतीसह नंदीवर बसून, समस्त भूतगणांना बरोबर घेऊन, जेथे भगवान मधुसूदन होते, तेथे त्यांच्या दर्शनासाठी गेले. भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरी-शंकरांचे स्वागत केले. तेसुद्धा स्वस्थपणे बसून भगवंतांचा सन्मान करीत स्मितहास्यपूर्वक म्हणाले. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय १८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १८ वा
भगवान वामनांचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन -
श्रीशुक म्हणतात - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंतांच्या शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्युरहित पीतांबरधारी भगवान अदितीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्ण नेत्र होते. श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीनच झळकत होती. वक्षःस्थळावर श्रीवत्सचिह्न, हातांमध्ये कडी, कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नूपुर झगमगत होते. तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कशपांच्या घरचा अंधकार नष्ट केला. त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतू एकाच वेळी आपापले गुण प्रगट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गाई, ब्राह्मण आणि पर्वत या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय ४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ४ था
हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार -
म्हणतात - त्यावेळी ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव, ऋषी आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व नाचू-गाऊ लागले. ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले. इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न झाला. हा मगर यापूर्वी "हुहु" नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवलांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. आता भगवंतांच्या कृपेने तो मुक्त झाला. अविनाशी कीर्तीने संपन्न, आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे, अशा सर्वेश्वर भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंतांच्या सुयशाचे गायन करू लागला. भगवंतांच्या कृपेने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहात असतानाच तो आपल्या लोकी निघून गेला. (१-५)
भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंतांचेच रूप प्राप्त झाले. तो पीतांबरधारी आणि चतुर्भुज झाला. पूर्वजन्मात गजेंद्र द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न होते. तो भगवंतांचा एक श्रेष्ठ उपासक होता. राजा इंद्रद्युम्न एकदा मलयपर्वतावरील आश्रमात राहात होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेष धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौनव्रत धारण करून एकाग्र मनाने सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता. दैवयोगाने त्याचवेळी कीर्तिमान अगस्त्य मुनी आपल्या शिष्यमंडळींसह तेथे येऊन पोहोचले. आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले. त्यांनी राजाला शाप दिला की, "हा नीच, दुष्ट, असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे. हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे. म्हणून याला नीच अज्ञानी-हत्तीची योनी प्राप्त होवो. (६-१०)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय २१›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २१ वा
बलीचे बंधन -
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या चरणांच्या नखचंद्राच्या कांतीने सत्यलोकाचे तेज फिके पडलेले पाहून, त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव, मरीची इत्यादी ऋषी, सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमलाला सामोरे आले. वेद, उपवेद, नियम, यम, तर्क, इतिहास, वेदांगे आणि पुराणसंहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्ममळ भस्म करून टाकला, ते महात्मे, याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणार्या सत्यलोकात पोहोचले होते ते, अशा सर्वांनी भगवंतांच्या चरणांना वंदन केले. भगवंतांच्या नाभीकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्रकीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती केली. परीक्षिता, ब्रह्मदेवांच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमती उज्ज्वल कीर्तीच होय. जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले, तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केला. त्या लोकांनी पाणी, भेटवस्तू, पुष्पमाला, दिव्य सुगंधयुक्त उटी, सुगंधित धूप, दीप, लाह्या, अक्षता, फळे, अंकुर, भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे, जयजयकार, नृत्य, वाद्ये, गाणी, शंखनाद आणि दुंदुभीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले. त्यावेळी ऋक्षराज जांबवनाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली. (१-८)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय ६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ६ वा
देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्रमंथन -
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुती केली, तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रगट झाले. त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत, असे वाटावे. त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले. ते भगवंतांनाच काय पण आकाश, दिशा, पृथ्वी, किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत. फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले. ते रूप अत्यंत सुंदर होते. पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीत, कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पीतांबर, प्रसन्न व सुंदर सारे अवयव, सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मुख, मस्तकावर रत्नजडित किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद, कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारे गाल असलेले मुखकमळ, कमरेला कमरपट्टा, हातात कडी, गळ्यामध्ये हार आणि पायांमध्ये नूपुर शोभून दिसत होते. वक्षस्थळावर लक्ष्मी आणि गळ्यात कौस्तुभमणी तसेच वनमाला शोभून दिसत होती. स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्रे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती. सर्व देवतांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंतांची स्तुती करू लागले. (१-७)
ब्रह्मदेव म्हणाले - ज्यांचा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही, जे प्राकृत गुणांपासून रहित आणि मोक्षस्वरूप परमानंदाचे महान समुद्र आहेत, जे सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप आनंद आहे, त्या परम ऐश्वर्यशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत आहोत. हे पुरुषोत्तमा, आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पांचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात. हे निर्मात्या, आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवांसह तिन्ही लोक दिसत आहेत. हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते, मध्यकालातही हे आपल्यामध्येच स्थित आहे आणि शेवटीसुद्धा हे पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल. आपण मात्र कार्य-कारणापलीकडील असून पूर्ण स्वतंत्र आहात. आपणच या जगाचे आदी, अंत आणि मध्य आहात. जसे घड्यामध्ये सुरुवातीला मध्ये आणि शेवटी मातीच असते त्याप्रमाणे. आपल्या आश्रयाने राहणार्या आपल्या मायेने, आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता. म्हणून विवेकी आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधानपणे आपले मन एकाग्र करून या गुणांच्या, विषयांच्या गर्दीमध्येसुद्धा आपल्या निर्गुण स्वरूपाचाच साक्षात्कार करून घेतात. जसे मनुष्य लाकडापासून अग्नी, गाईपासून दूध, पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात, त्याचप्रमाणे विवेकी पुरुषसुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तियोग, ज्ञानयोग इत्यादींनी आपल्याला या विषयांमध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णनसुद्धा करतात. हे कमलनाभा, ज्याप्रमाणे वणव्याने व्याकूळ झालेले हत्ती गंगाजलात बुडी मारून सुखशांतीचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे आपल्या प्रगट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेले आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. आपणच आमचे बाहेरचे आणि आतील आत्मा आहात. आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो आहोत, तो उद्देश आपण पूर्ण करावा. आपण सर्वांचे साक्षी आहात, तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार ? प्रभो ! मी, शंकर, अन्य देवता, ऋषी, दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत. तर मग आमचे कल्याण आम्हांला कोठून कळणार ? म्हणून ब्राह्मण, देव इत्यादींनी काय करावे, त्याची आज्ञा आपणच करावी. (८-१५)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय ५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ५ वा
देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंतांची स्तुती -
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांची ही गजेंद्रमोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे. ही मी तुला सांगितली. आता रैवत मन्वंतराची कथा ऐक. पाचव्या मनूचे नाव रैवत होते. चौथा मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता. अर्जुन, बली, विंध्य वगैरे त्याचे पुत्र होते. राजा, त्या मन्वंतरात इंद्राचे नाव विभू होते; आणि भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते. त्या वेळी हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू इत्यादी सप्तर्षी होते. त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषीच्या पत्नीचे नाव विकुंठा होते. त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वतः भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला. लक्ष्मीदेवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठधाम निर्माण केले. सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे. त्या वैकुंठनाथांचे कल्याणमय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी तिसर्या स्कंधात केले आहे. ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गणती केली असेल, तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल. (१-६)
सहावा मनू चक्षू याचा पुत्र चाक्षुष होता. पुरू, पुरुष, सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते. त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आप्य इत्यादी देवगण होते. त्या मन्वंतरात हविष्मा, वीरक इत्यादी सप्तर्षी होते. जगत्पती भगवंतांनी त्यावेळी सुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता. त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले. आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला. (७-१०)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ८ वा, अध्याय २४›📂 भागवत स्कंध ८, अध्याय १५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १५ वा
बळीराजाचा स्वर्गावर विजय -
राजाने विचारले - श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत; तर ग त्यांनी दरिद्याप्रमाणे बलीकडे तीन पावले जमीन का मागितली ? शिवाय ती मिळाल्यावरसुद्धा त्यांनी बलीला का बांधले । माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतुहल आहे. पूर्णकाम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराध्याला बंधन हे का घडले, ते आम्ही जाणूम घेऊ इच्छितो. (१-२)