वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

पंढरीची वारी आहे माझ

🙏 3. संत तुकाराम · ABH-078271 · अभंग क्र. २२४१

2241.
पंढरीची वारी आहे माझे घरी । आणीक न करी तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखी नाम ॥२॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे । बीज कल्पातींचे तुका म्हणे ॥३॥

अर्थ :
पंढरीची वारी माझ्या घरीच आहे या वाचून मी दुसरे कोणतेही तीर्थ आणि व्रत करीत नाही. मी एकादशी व्रत करून त्या दिवशी उपवासी राहिल आणि रात्रंदिवस हरिनाम घेत त्याचे गुणगान गाईन. तुकाराम महाराज म्हणतात कल्पंतीचे बीज असलेले विठोबाचे नाम मी माझ्या मुखाने सतत गात राहील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग