🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०३३
📿 पंढरीची वारी कंरील ज
2033.
पंढरीची वारी कंरील जो कोणी | त्याच्या चक्रपाणि मागे पुढे ॥१॥
लोखंड असता सोने जाले कसे | समागम-मिषे गुणे त्याच्या ॥२॥
तैसे एकवेळ करी मायबापा | चुकवी या खेपा चौऱर्यांशीच्या ॥३॥
नामा म्हणे असो प्रारब्ध सरे | होई कृपण निकुरे चरणाचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०३४
📿 देव विठ्ठल तीर्थ विठ
2034.
देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥
जन विठ्ठल वन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥
भाव विठ्ठल देव विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥३॥
एका जनार्दनी मनी विठ्ठल । जप तप ध्यान विठ्ठल ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०३५
📿 अडचणीचे दार । बाहेर
2035.
अडचणीचे दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥
काय करावे ते मौन । दाही दिशा हिंडे मन ॥धृपद॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥
नाही इंद्रिया दमन । काय मांडिला दुकान ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०३५
📿 एकपण पाहता सृष्टी ।
2035.
एकपण पाहता सृष्टी । भरली दृष्टी विठ्ठल ॥१॥
नाहे द्वैताची भावना । बैसला ध्याना विठ्ठल ॥२॥
मीतुंपणा वोस ठाव । बैसला सर्व विठ्ठल ॥३॥
ध्यानीं विठ्ठल मनी विठ्ठल । एका जनार्दनी अवघा विठ्ठल ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०३६
📿 लय लक्षूनिया जालो म्
2036.
लय लक्षूनिया जालो म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥
जालो बहुश्रुत न लगे आता काही । नको राहू ते ही निश्चिंतीने ॥धृपद॥
तपे दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढे ॥२॥
कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०३६
📿 रिता ठाव न दिसे पाहत
2036.
रिता ठाव न दिसे पाहता । भरला पुरता विठ्ठल ॥१॥
जनीं वनी विजनी देखा । विठ्ठल सखा भरलासे ॥२॥
पाहता पाहणें परतले । विठ्ठले व्यापिलेंक सर्वत्र ॥३॥
नाही पाहण्यासी ठाव । अवघा भाव विठ्ठल ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०३७
📿 मागे पुढे विठ्ठल भरल
2037.
मागे पुढे विठ्ठल भरला । रिता ठाव नाही उरला ॥१॥
जिकडे पहावे तिकडे आहे । दिशाद्रुम भरला पाहे ॥२॥
एका जनार्दनी सर्व देशी । विठ्ठल व्यापक निश्चयेंशीं ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०३८
📿 जे जे मना वाटे गोड ।
2038.
जे जे मना वाटे गोड । ते ते कोड पुरविसी ॥१॥
आता तू चि बाह्यात्कारी । अवघ्यापरी जालासी ॥धृपद॥
नाही सायासाचे काम । घेता नाम आवडी ॥२॥
तुका म्हणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०३८
📿 विठ्ठलावांचुनीं आणिक
2038.
विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाही आम्हा चिंतन दुजियांचे ॥१॥
आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥
विठ्ठलावांचुनी नेणो क्रियाकर्म । विठठलावांचुनी धर्म दुजा नाही ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठल भरला । भरुनीं उरला पंढरीये ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०३९
📿 जेथे माझी दृष्टी जाय
2039.
जेथे माझी दृष्टी जाय । तेथे पाय भावीन ॥१॥
असेन या समाधाने । पूजा मने करीन ॥धृपद॥
अवघा च अवघे देसी । सुख घेवविसी संपन्न ॥२॥
तुका म्हणे बंधन नाही । ऐसे काही ते करू ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०३९
📿 उच्चार फुकाचा नाम हे
2039.
उच्चार फुकाचा नाम हे विठ्ठल । नाही कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥
जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊ ते कीर्तनी दिननिशी ॥२॥
एका जनार्दनी केला लागपाठ । तेणे सोपी वाट वैकुंठीची ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०४०
📿 आप तेज वायु पृथ्वि आ
2040.
आप तेज वायु पृथ्वि आणि गगन | त्याचे केले बा अरिरनिधान ॥१॥
|त्यामांजी घातले मत पवत | पिडब्रह्मांड केली रचना ॥२॥
काय सांगो तुझी करणी नारायणा | वेदपारायणा केणिराजा 1३ ॥पृथ्वीवरी तीथे आहेत अपार | परि पंढरीची सर एका नाही ॥४॥
जन्मोजन्मींच्या पातका दरारा | चुके येरझारा एके खेपे ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०४०
📿 रूप तेंचि नाम नाम ते
2040.
रूप तेंचि नाम नाम तेंचि रुप । अवघा संकल्प एकरुप ॥१॥
पहाता पहाणें हरपले देही । देहचि विदेही होउनी ठेलो ॥२॥
सांगता नवल पाहता सखोल । बोलता अबोल चोज वाटे ॥३॥
एका जनार्दनी बोलण्या वेगळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०४१
📿 अवघे चुकविले सायास ।
2041.
अवघे चुकविले सायास । तप रासी जीव नाश ॥१॥
जीव देऊनिया बळी । अवघी तारिली दुबळी ॥धृपद॥
केला भूमंडळी । माजी थोर पवाडा ॥२॥
काही न मागे याची गती । लुटवितो जमा हाती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०४१
📿 पाहता पाहतांभुललें म
2041.
पाहता पाहतांभुललें मन । धरिले चरण हृदयी ॥१॥
वेधे वेधिला जीव प्राण । ब्रह्माज्ञान नावडे ॥२॥
तीर्थाचे जे अधिष्ठान । पुण्यपावन चंद्रभागा ॥३॥
सकळ देवांचा देव उभा । एका जनार्दनी गाभा लावण्याचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०४२
📿 प्रमाण हे त्याच्या ब
2042.
प्रमाण हे त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥१॥
न पुसता जाता नये । खाली बैसता ही भिये ॥धृपद॥
अवघा त्याचा होय । जीव भावाही सहित ॥२॥
वदे उपचारे वाणी । काही माग म्हणऊनि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०४३
📿 काही न मागती देवा ।
2043.
काही न मागती देवा । त्यांची करू धावे सेवा ॥१॥
हळूहळू फेडी ॠण । होऊनिया रूपे दीन ॥धृपद॥
होऊ न सके वेगळा । क्षण एक त्या निराळा ॥२॥
तुका म्हणे भक्तीभाव । तोचि देवाचा ही देव ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०४४
📿 पूर्ण परिपूर्ण पंढरी
2044.
पूर्ण परिपूर्ण पंढरी हे पेठ | आपण वैकुंठ समचरण ॥१॥
ऐसे कांही करा नाम हेंचि धरा | विठ्ठल अपारा जप करा ॥२॥
|करिता साधन नागवी अहंकार | विठ्ठल उच्चार पुण्य ओघे ॥३॥
नामा म्हणे घेई विठ्ठल कुळदेवो | सर्व हाचि भावो केशव ऐसा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०४४
📿 शब्द आदि मध्य अंती ।
2044.
शब्द आदि मध्य अंती । उच्चारिता व्यक्ताव्यक्ति ॥१॥
विठ्ठल विठ्ठल जिव्हारी । मुक्ति होईल कामारी ॥२॥
विश्वी विठ्ठल उघडा पाहे । मुक्त होता वेळुं काये ॥३॥
एका जनार्दनी ठसा । विठ्ठल उभा नामासरिसा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०४५
📿 तंतुपट जेवी एकत्व दि
2045.
तंतुपट जेवी एकत्व दिसती । तैसी भगवद्भक्ति सर्वांभुतीं ॥१॥
सर्वत्री व्यापक विठ्ठल विसांवा । म्हणोनी त्याच्य गांवा मन धांवे ॥२॥
एका जनार्दनी व्यापक विठ्ठल । तेथे नाही बोल आन दुजा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०४६
📿 विष्णूचे सेवन जये गा
2046.
विष्णूचे सेवन जये गांवी पूजा | नित्य तया द्विजा समारंभ ॥१॥
घरी वृंदांवन नित्य अन्नदान | श्रीकृष्ण आपण तेथे असे ॥२॥
ऐसी ध्यानगती विष्णूचे पूजन | तयासि पतन नाही नाही ॥३॥
नामा म्हणे करा विष्णुकधा नित्य | रामनाम सत्य वचन धरा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०४६
📿 लाडिके विठोबाचे आम्ह
2046.
लाडिके विठोबाचे आम्ही । गाऊ नित्यनेमीं नाम तुझे ॥१॥
उत्तम उत्तम साधन हे नाम । गांता प्रेम वाटे जीवी ॥२॥
न कळेचि वेदा उपनिषद्बोधा । त्या हरि गोविंदा लगे आम्ही ॥३॥
एका जनार्दनी मंगळा मंगळ । न लगे आम्हा मोल उच्चारिता ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०४७
📿 नको दुष्टसंग । पडे भ
2047.
नको दुष्टसंग । पडे भजनामधी भंग ॥१॥
काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥धृपद॥
तुज निषेधिता । मज न साहे सर्वथा ॥२॥
एका माझ्या जीवे । वाद करू कोणासवे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०४८
📿 तप न करिसी जप हृषिके
2048.
तप न करिसी जप हृषिकेशी | नाम अहर्निशी राघोबाचे ॥॥१॥
॥तीर्थाचे हे तीर्थ नाम हे समथ | होईल कृतार्थ रामनामी ॥२॥
|साधेल साधन तुटेल बंधन | वाचे नारायण सुफळ सदा ॥३॥
लामा म्हणे हरिनाम ते उच्चारी | तरीच उद्धारी इहलोकी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०४८
📿 गाऊ तरी एक विठ्ठलाचि
2048.
गाऊ तरी एक विठ्ठलाचि गाऊ । ध्याऊं तरी एक विठ्ठलचि ध्याऊं ॥१॥
पाहू तरी एक विठ्ठलचि पाहू । आणिकां न गोवुं वासनाही ॥२॥
आठवुं तो एक विठ्ठल आठवुं । आणिक न सांठवुं हृदयामाजीं ॥३॥
विठ्ठलावांचुनीं मनी नाही आन । सर्वभावे प्रमाण विठ्ठल मज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०४९
📿 भक्ती सुखे जे मातले
2049.
भक्ती सुखे जे मातले । ते किळकाळा शूर जाले ॥१॥
हाती बाण हरीनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥धृपद॥
महा दोषा आला त्रास । जन्ममरणा केला नाश ॥२॥
सहस्रनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०४९
📿 व्रत तप न लगे करणे स
2049.
व्रत तप न लगे करणे सर्वथा | न लगे तुम्हा तीर्था जाणे तया ॥१॥
आपुलेचि ठायी असा सावधान | करा हरिकीर्तन संवकाळ ॥२॥
न लगे ते कांही वर्जावे अश्न जीवन | लावा अनुसंधान हरिचे पायी ॥1३॥
न लगे योग याग न लगे संग त्याग | असो द्या अनुराग हरिचे पायी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०५०
📿 पंधरा दिवसा एक एकादश
2050.
पंधरा दिवसा एक एकादशी । का रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ॥धृपद॥
स्वहित कारण मानवेल जन । हरीकथा पूजन वैष्णवांचे ॥२॥
थोडे तुज घरी होती उजगरे । देउळासी का रे मरसी जाता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०५१
📿 कथा हे भूषण जनामध्ये
2051.
कथा हे भूषण जनामध्ये सार । तरले अपार बहुत येणे ॥१॥
नीचिये कुळीचा उंच वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥धृपद॥
देव त्याची माथा वंदी पायधुर्ळी । दीप झाला कुळी वंशाचिये ॥२॥
त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०५२
📿 जगाचें जीवन मनाचे मो
2052.
जगाचें जीवन मनाचे मोहन । योगियांचें ध्यान विठ्ठल माझा ॥१॥
द्वैताद्वैताहुनि वेगळा । श्रीविठ्ठल कळा पौर्णिमेचा ॥२॥
न कळे आगमा नेणवेचि दुर्गमा । एका जनार्दनी आम्हा सांपडला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०५३
📿 देखोवेखी करिती गुरू
2053.
देखोवेखी करिती गुरू । नाही ठाउका विचारु ॥१॥
वर्म ते न पडे ठायी । पांडुरंगाविण काही ॥धृपद॥
शिको कळा शिको येती । प्रेम नाही कोणा हाती ॥२॥
तुका म्हणे सार । भक्ती नेणती गव्हार ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०५३
📿 चेईला तो जाणारे सद्ग
2053.
चेईला तो जाणारे सद्गुरुवचनी निर्धारे |विपरित भांवना विसर पडिला कंठी जया परिहार रे ॥१॥
आपणा पे पहावया कवण लावू दिवा रे ॥चंद्र सूर्य जेणे प्रकाशे तो मी कैसा पाहु रे॥२॥
अंत त्यासी नाही रे स्थान भान कांही रे |चेईला तेणे ओळखिंला येरासी भाई रे. ॥३॥
पूर्वे परिचम दक्षिण उत्तर नाहो दाही दिशा रे |महाप्रळयी सप्त सागर एक होती: अनुभविया तो तैसा रे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०५४
📿 मन माझे वेधले मन माझ
2054.
मन माझे वेधले मन माझे वेधले । पहाता भलें सच्चिदानंद ॥१॥
आनंदीआनंद मनासी पै झाला । देखिला सांवळा पाडुरंग ॥२॥
एका जनार्दनी उघडाचि देखिला । आनंद तो झाला मनी माझ्या ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०५५
📿 जैसे चित्त जयावरी ।
2055.
जैसे चित्त जयावरी । तैसे जवळी ते दुरी ॥१॥
न लगे द्यावा परिहार । या कोरडे उत्तर ।
असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥धृपद॥
अवघे जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०५६
📿 नाही पाइतन भूपतीशी द
2056.
नाही पाइतन भूपतीशी दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥
मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवे ॥२॥
तुका म्हणे आधी करावा विचार । शूरपणे तीर मोकलावा ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०५६
📿 मी माझे म्हणता अथ जो
2056.
मी माझे म्हणता अथ जोडिता साहिचक्र गेले |नळ नीळ मांधाता पुरुषार्थी सारिखे तेहि काळे ग्रासियले |कपिल महामुनि सिद्ध विचारिता सागरराये पे अंगा गेले |कुमार अंत:पुर सांडूनिया ते भक्तराज काय जाले रे ॥१॥
_संसार स्वप्न जाणुनिया शरण रिघे पंढरिया' राया रे ॥ धृ ॥दुंदुभिराये धर्म चालविला तेणे शांतिचा सागर म्हणविले |अजपाळ जंपाळ राजा दशरथ सूयंवंशी ते जन्मले ॥२॥
जळींचे तरंग जळींच निमाले नेणो तेथे काय जाले |रामलक्ष्मण भरतकत्रुध्न सांग पा ते काय जाले रे ॥३॥
सूर्यवंशी राजा हरिचंद्र जन्मला. स्वप्न तेणे काय साच केले |स्त्रीपुत्राते विकुनिया तेणे ब्राह्मणा सुखिय्रा पे केले |शिबी चक्रवर्तीने आपुले प्राण देऊनि जीव ते भक्तराज काय जाले रे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०५७
📿 तत्त्वमसि वाक्य उपद
2057.
तत्त्वमसि वाक्य उपदेंशिले तुज | ते तू जीवी का अझून धरिसी दूर ॥ धृ॥त्रिभूवनापरता धांवतोसी दुरी | आधी तू आपुली शुद्धि करी |उदय अस्तु जाला कवणिये घरी | पिंडामाझारी पाहे पा ॥१॥
जागृतीमध्ये कवण जागते | दोही माजी स्वप्न कोण देखते |पुषप्तीमध्ये कोण नांदते | मग अनुवादते ते कवण ॥२॥
जागृती वरोनि करी चितन | सुषुप्तीमाजी रिघे ज्ञान |दोन्हींभाजी स्वप्न देखे कवण | जीव की मन सांग पा ॥३॥
निद्रा मरण हे एक स्थान | दोहींचा देखणा जाणे आपण |लहान सुईच्या इंधनाहून | आढळले मन पांचासी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०५८
📿 संसार. सागरी रे माझे
2058.
संसार. सागरी रे माझे माहेर पंढरपुरी |विठोबा बाप माझा माता रखुमाई सुंदरी ॥१॥
पुंडलिक भाऊ माझा तोहि नांदे बरव्यापरी |सासुरे दुबळ भारी मज मोकलिले दुरी ॥२॥
सुखदुःख कवणा सांगू माझे माहेर पंढरपुरी ॥ धृ० ॥
भ्रतार निष्ठुर वो काम क्रोध दोघे दौर |आश्या हे सासू माझी ते मज गांजितसे थोर ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०५८
📿 निळा पंढरपूरचा लावण्
2058.
निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळा विठ्ठल देव ॥१॥
जीव वेधला वो वेधला वो । पाहता पाहता जीव वेधला वो ॥२॥
एका जनार्दनी पाहातांचि देव । वेधिला जीव परतेना भाव ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०५९
📿 आणिक मात माझ्या नावड
2059.
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करू यासी पांडुरंगा ॥१॥
मुखा ते चि गोड श्रवणी आवडी । चित्त माझे ओढी तुझे पायी ॥धृपद॥
जये पदी नाही विठ्ठलाचे नाम । मज होती श्रम आइकता ॥२॥
आणिकाचे मज म्हणविता लाज । वाटे हे सहज न बोलावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०५९
📿 बोलवरी बोलती | श्रृत
2059.
बोलवरी बोलती | श्रृति वाखाणिती |हरि पांविजे ती गति | वेगळी असे ॥१॥
तुज न पवे गा ते स्वप्न | हरिशब्द एकचि ब्रह्म |पाविजे ते वर्म | वेगळे असे ॥२॥
एक जाणीव खटपट | करिती ते सैराट |हरि पाविजे ती वाट | वेगळी असे ॥३॥
एक आहेत तार्किक | चर्चिकवादक |हरि पाविजे ते सुख | वेगळे असे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६०
📿 कळेल हे तैसे गाईन मी
2060.
कळेल हे तैसे गाईन मी तुज । जनासवे काज काय माझे ॥१॥
करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥धृपद॥
होऊनी निर्भर नाचेन मी छंदे । आपुल्या आनंदे करूनिया ॥२॥
काय करू कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०६०
📿 आम्हा संगती नावडे का
2060.
आम्हा संगती नावडे कांही | म्हणोनि जालो बा विदेही |दुःखमूळ संगतीचे पाई | आम्ही नव्हो या गांवींचे ॥१॥
आम्हा नाही रूप नांव | वस्तीसी नाही एक ठाव |मन घ्या इच्छेसी धांव | आम्ही नव्हो त्या गांवींचे ॥२॥
स्तान केले गंगातीरी | गंध लाविले पंढरपुरी |संध्या केली कृष्णातीरी | आम्ही नव्हो त्या गांवींचे ॥३॥
भिक्षा केली कोल्हापुरी | भोजन केले महाद्वारी |निद्रा केली माहुरी | आम्ही नव्हो त्या गांवींचे ॥ ४ |ऐसियाची संगत करी | त्याचे चरण हृदयी धरी |नामा म्हणे या संसारी | आम्ही नव्हो त्या गांवींचे ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०६१
📿 भेदबुद्धि पालटली । क
2061.
भेदबुद्धि पालटली । कृपा या विठ्ठलीं केली मज ॥१॥
प्रकाश जाहला देहादेही । वासना प्रवाहीं वहावली ॥२॥
विषयांचें ते लिगाड । जाहले देशोधडी आपोआप ॥३॥
एका जनार्दनी शरण । काया वाचा आणि मन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६२
📿 न लगे पाहावे अबद्ध व
2062.
न लगे पाहावे अबद्ध वाकडे । उच्चारावे कोडे नाम तुझे ॥१॥
नाही वेळ काळ पंडितांचा धाक । होत का वाचक वेदवक्ते ॥धृपद॥
पुराणी ही कोठे न मिळे पाहाता । तैशी या अनंता ठेवू नामे ॥२॥
आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करू छंद कथेकाळी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६३
📿 दैन्य दुःख आम्हा न य
2063.
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥
सर्व सुखे येती माने लोटांगणी । कोण यांसी आणी दृष्टीपुढे ॥धृपद॥
आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचे ॥२॥
आमचे मागणे मागो त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०६३
📿 भक्ति प्रतापे पावलो
2063.
भक्ति प्रतापे पावलो मी सुपंथ | सफळ निश्चित परमार्थ ॥१॥
देव सर्वांभूती असता प्रगट | निर्वाण चोखट भक्ति जाण ॥२॥
भरुनिया मनी जपसील नाम | तेणे निजधाम पावसील ॥३॥
जप तप ध्यान न लगे साधन | भक्ति ते कारण नामा म्हणे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०६३
📿 सर्व सिद्धि मनोरथ ।
2063.
सर्व सिद्धि मनोरथ । पंढरीनाथ पहाता ॥१॥
दैन्य दरिद्र्य ते गेले । सुंदर पाउले पाहता ॥२॥
विषयांतें पळ सुटला । सुंदर सांवळां पाहता ॥३॥
काम क्रोध विलया गेले । श्रीमुख चांगले न्याहाळिता ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६४
📿 काळतोंडा सुना । भलते
2064.
काळतोंडा सुना । भलते चोरुनि करी जना ॥१॥
धिग त्याचे साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥धृपद॥
मंत्र ऐसे घोकी । वश व्हावे जेणे लोकी ॥२॥
तुका म्हणे थीत । नागवला नव्हे हित ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०६४
📿 माझिया मने मज उपदेश.
2064.
माझिया मने मज उपदेश. केला | तो मज बिबला हृदयकमळी ॥१॥
निर्वाणीची एक सांगितली खूण | केवल्य चरण केशवाचे ॥२॥
|श्रृति स्मृति आणिक पुराणे | पढोनि जाणणे हेंचि सत्य ॥३॥
क्रिया कर्म धर्म करणे ज्या कारणे | ते खूण निर्वाण चरण हेचि ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६५
📿 विठ्ठल मुक्तीदाता ।
2065.
विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हे बोलता ॥१॥
मज न साहावे कानी । विष उत्तर लागे मनी ॥धृपद॥
हरीकथेते धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥
सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०६५
📿 अच्युता अनंता गोविदा
2065.
अच्युता अनंता गोविदा | अरे मेघःश्यामा तू आत्मया रामा रे ॥१॥
आत्मया तू रामा रे | म्हणा म्हणा गोविद नामा रे ॥२॥
ऐसे तुझे ध्यान लागो आम्हा रे | नामयाचा स्वामी पंढरिराणा रे ॥३॥