वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

अंकित अंकिला । देव भ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085683 · अभंग क्र. २२४७

2247.
अंकित अंकिला । देव भक्तांचा पै जाला ॥१॥
पहा पुंडलीकासाठी । उभा असे वाळूवंटी ॥२॥
युगें अठ्ठावीस जालीं । न बैसे अद्यापि तो खालीं ॥३॥
न बैसोनि उभा असे । एका जनार्दनी भक्तिपिसें ॥४॥
२२४८
भक्त अर्पिता सुमनमाळा । घाली आवडीनें गळा ॥१॥
ऐसा आवडीचा भुकाळू । श्रीविठ्ठल दीनदयाळु ॥२॥
भक्तें भावार्थे अर्पिता । ते आवडे पंढरीनाथा ॥३॥
भक्तासाठीं विटेवर । समपद कटी करक ॥४॥
ऐशी कृपेची कोंवळी । एक जनार्दनी माउली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग