🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१६६
📿 आम्हांसी विश्वासी पु
2166.
आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा ॥१॥
विश्रांतीचे घर संताचें माहेर । करिती निर्धार वेदशास्त्रे ॥२॥
जनार्दनाचा एका प्रेमे तो आठवी । विठ्ठल साठवी हृदयामाजीं ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१६८
📿 जन्मा येउनि काय केले
2168.
जन्मा येउनि काय केले । तुवा मुदल गमाविले ॥१॥
का रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥धृपद॥
केली गांठोळीची नासी । पुढे भीके चि मागसी ॥२॥
तुका म्हणे ठाया । जाई आपुल्या आलिया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 ह्याळसेन कथा (द्रोण पर्व)›
📿 अभंग क्र. २१६८
📿 तरी तुम्ही कालच्या द
2168.
तरी तुम्ही कालच्या दिवशी । रणी वधिले अभिमन्यूसी । ते मूळ आहे तुह्मांसी । यमयातना ॥२०१॥
असो तुम्हासी काय सांगणे । तुह्मी ठाईंहूनि कपट करणे । तैसेंच भोगाल पतने । सत्य जाणा ॥२०२॥
ऐसे बोलोनी घेतले बाण । तोडिले तयाचे संधान । तंव आणिक आले तीव्रपणे । तेंहि तोडिले ॥२०३॥
तितकीया वीरांचे संधान । एकलचि सांवरी त्राण । जैसे नपूंसकाचे जिणे । निरर्थक ॥२०४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१६९
📿 देव प्रसन्न जाला माग
2169.
देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला । भक्त घरोघरी विचार पुसो गेला ॥१॥
भाव की भ्रांति आळस की भक्ती । विचारुनी व्यक्ति ठायी ठेवा ॥२॥
अरे हे गुह्मा गोप्य कुडे करु नये उघडे । तरी द्वारोद्वार पुसुं जाय वेडे ॥३॥
विलंब करिता पहा हो उदास जाला देवो । निवालिया खंती न घाली म्हणे घावो ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१७०
📿 सर्वाठायीं ज्याची सत
2170.
सर्वाठायीं ज्याची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता ॥१॥
ज्याची आज्ञा प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ॥२॥
आज्ञा ज्याची धडफुडी । पर्वत बैसका न सोडी ॥३॥
ज्याचे आज्ञेविण । पवनु न चाले एक क्षण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१७१
📿 संतांचिया पायी हा मा
2171.
संतांचिया पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ॥१॥
तेचि माझे हित करिती सकळ । जेणे हा गोपाळ कृपा करी ॥धृपद॥
भागलिया मज वाहतील कडे । त्यांचियाने जोडे सर्व सुख ॥२॥
तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडी बोलिलो ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१७१
📿 भक्त देवातें भजती ।
2171.
भक्त देवातें भजती । देव भक्ती धरी प्रीती ॥१॥
ऐसा एकमेंकांचा ठावो । भक्ताअंगीं देव पहा हो ॥२॥
अलंकार एक सुवर्ण । तैसे नाही दुजेपण ॥३॥
एका आर्धी एक पाठी । एका जनार्दनी राहाटी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 श्रीयाळ चरित्र›
📿 अभंग क्र. २१७२
📿 श्रीयाळ चरित्र
2172.
श्रीयाळ चरित्र
सूर्यवंशी राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषी बाळ चिलया त्यासी ॥१॥
पतिव्रता कांता नाम ते चांगुणा । अतिता भोजन घाली नित्य ॥२॥
कैलासी नारद वर्णी यांची कीर्ति । सत्व पाह्याप्रति आले शिव ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 प्रल्हाद चरित्र›
📿 अभंग क्र. २१७३
📿 प्रल्हाद चरित्र.
2173.
प्रल्हाद चरित्र.
दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगी तो विख्यात हिरण्यकश्यप ॥१॥
करुनिया तप तोषवी ब्रम्हाया । मागे वर तया दैत्यराव ॥२॥
वरदान मागे नसावा तो मृत्यु । कवणाचे हातु देव सुरा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१७३
📿 आधी देव पाठी भक्त ।
2173.
आधी देव पाठी भक्त । ऐसे मागे आले चालते ॥१॥
हेंहि बोलणेंचि वाव । भक्ता आधी कैचा देव ॥२॥
भक्त शिरोमणी भावाचा । देव लंपट जाला साचा ॥३॥
भक्तासाठीं अवतार । ऐसा आहे निर्धार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१७४
📿 नाम घेता कंठ शीतळ शर
2174.
नाम घेता कंठ शीतळ शरीर । इंद्रिया व्यापार नाठवती ॥१॥
गोड गोमटे हे अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्ते ॥धृपद॥
प्रेमरसे जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध नसती ताप क्षणे ॥२॥
तुका म्हणे तेथे विकाराची मात । बोलो नये हित सकळांचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 प्रल्हाद चरित्र›
📿 अभंग क्र. २१७४
📿 ऐसे हो असता देव खेळे
2174.
ऐसे हो असता देव खेळे मेळा । सहित गोपाळा चाल केली ॥१॥
भय ते मानुनी स्त्री पाठवी माहेरा । होता तो उदरा भक्तराज ॥२॥
अकस्मात् वाटे नारद भेटला । उपदेश केला दैत्यपत्नी ॥३॥
हरिमंत्र शुद्ध पडता श्रवणी । गर्भस्थ ते क्षणी स्वहित मानी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१७४
📿 सप्रेम करिता भजन । न
2174.
सप्रेम करिता भजन । नोहे भावाचें बंधन ॥१॥
भक्तांचे आधीन देवो । नाही नाही हो संदेहो ॥२॥
भक्तीची एवढी गोडी । वैकुंठाहुनी घाली उडी ॥३॥
भक्तामाजीं देव असे । देवा अंगी भक्त दिसे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 प्रल्हाद चरित्र›
📿 अभंग क्र. २१७५
📿 घेऊनिया गुरू आले राज
2175.
घेऊनिया गुरू आले राजसभे । वंदूनिया उभे सन्मुख तो ॥१॥
ह्मणे काय पढसी तू सांग । म्हणे लागू वेगे हरीहरी ॥२॥
ऐकता वचन बोले क्रोधावोनि । पापीयासी झणी नका येथे ॥३॥
माझा जो वैरी तया आठवितो । कुळघात होतो ऐशानेंचि ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१७५
📿 देव भक्त दोन्ही समचि
2175.
देव भक्त दोन्ही समचि सारखें । पाहातां पारिखे न दिसे दुजे ॥१॥
भक्ताचें अंगें देव असे । देवाचे हृदयी भक्त वसे ॥२॥
ऐसी परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१७६
📿 चित्त घेऊनिया तू काय
2176.
चित्त घेऊनिया तू काय देसी । ऐसे मजपासी सांग आधी ॥१॥
तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघे जया तुटी येईल ते ॥धृपद॥
रिद्धिसिद्धि काही दाविसी अभिळास । नाही मज आस मुक्तीची ही ॥२॥
तुका म्हणे तुझे माझे घडे तर । भक्तीचा भाव रे देणे घेणे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 प्रल्हाद चरित्र›
📿 अभंग क्र. २१७६
📿 आघात न चले आणची जवळी
2176.
आघात न चले आणची जवळी । म्हणे कोण बळी साह्यकर्ता ॥१॥
कोठे राहतो कैसा कोण सांग । येरू म्हणे वेग नाही कोठे ॥२॥
सर्वा ठायी आहे व्यापुनी सगळा । नाही तो निराळा कोठे पाहता ॥३॥
जळी काष्ठी आहे माझे अंतरंग । सखा पांडुरंग मायबाप ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 प्रल्हाद चरित्र›
📿 अभंग क्र. २१७८
📿 अज्ञान बांळंक तुझा प
2178.
अज्ञान बांळंक तुझा प्रल्हाद धांवा करिता ।
आणि त्रिभुवन देवता नाभी नाभींरे आता ।
माझा प्रर्हादु असे वो केउता । तो कवणे पा गांजिला ॥१॥
वदन पसरूनि विक्राळ । झरझरीत झरे लाळ ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१७८
📿 माझा भक्त मज अंतरी ।
2178.
माझा भक्त मज अंतरी । मी सदा बाहेरी तिष्ठतसें ॥१॥
ऐशी परस्परें खूण । जाणती ते ब्रह्माज्ञान ॥२॥
माझी सायुज्यता मुक्ति । घेउनी बळे मीच होती ॥३॥
सायुज्यापरीस भक्ती गोड । एका जनार्दनी धरिती चाड ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१७९
📿 बहु बोलाचे नाही कारण
2179.
बहु बोलाचे नाही कारण । मी देह भक्ति आत्मा जाण ॥१॥
माझा देह शरीर जाण । भक्त आंत पंचप्राण ॥२॥
नांदे सहज भक्त आंत । मी देह भक्त देहातील ॥३॥
एका जनार्दनी भक्त । देवपणा मी भक्तांकित ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१८१
📿 मज भक्त आवडता फार ।
2181.
मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार ॥१॥
भक्तांअंगीं मीच वसे । माझा भक्त मजमाजीं असे ॥२॥
मज आणलें नामरुपा । भक्त सखा माझा तो ॥३॥
एकाजनार्दनी निर्गुण । भक्तें सगुण मज केले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१८२
📿 काय धोविले बाहेरी मन
2182.
काय धोविले बाहेरी मन मळले अंतरी । गादले जन्मवरी असत्यकाटे काटले ॥१॥
सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करी रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तू च ग्वाही आपुला ॥धृपद॥
पापपुण्यविटाळ देही भरिता न विचारिसी काही । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥
कामक्रोधा वेगळा ऐसा होई का सोवळा । तुका म्हणे कळा गुंडुन ठेवी कुसरी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१८२
📿 मातेलागी पुसे पिता म
2182.
मातेलागी पुसे पिता माझा कोण । ते म्हणे वचन ऐक बाळा ॥१॥
क्षिराब्धीपासोनी चंद्रमा का जैसा । होसी तूंहि तैसा राजपुत्र ॥२॥
तरी का आम्हा त्याने टाकीले निवडोन । संचित ते म्हणे पूर्वकर्म ॥३॥
जाऊ भेटू त्याला बोलवू का मागे । नको बा तुज काय उणे असे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१८३
📿 माझा ब्रीदावळी । कदा
2183.
माझा ब्रीदावळी । कदाकाळीं न संडी मी ॥१॥
तुम्हा पडता अंतर । मज वाटे हुरहुर ॥२॥
तुमची न होते भेटी । मज दुःख पोटी अनिवार ॥३॥
अंकिता अंकिलोंक तुमचा । एका जनार्दनी सत्य साचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१८४
📿 पाषाण देव पाषाण पायर
2184.
पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥
सार तो भाव सार तो भाव । अनुभवी देव ते चि जाले ॥धृपद॥
उदका भिन्न पालट काई । गंगा गोड येरा चवी काय नाही ॥२॥
तुका म्हणे हे भाविकांचे वर्म । येरी धर्माधर्म विचारावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१८५
📿 सापत्न माउली होती वो
2185.
सापत्न माउली होती वोंवरींत । ऐकीला भावार्थ दोघांचाहि ॥१॥
बुद्धीचा कांतर बुब्दुदला मोठा चावीतसे ओंठा खेद बहु ॥२॥
निघुनी ते वेगी आली रायापाशी । म्हणे या पोरासी का घेतले ॥३॥
मांडी बैसवीसी लाडाने बोलवीसी । पाहू आता कैसी लोचनी मी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१८६
📿 बाईल आधीन होती जे का
2186.
बाईल आधीन होती जे का नर । ते म्हणो पामर श्वानरूपे ॥१॥
नेणती स्वहित कामाचिया वृत्ती । प्रवृत्ति निवृत्ति सोडोनिया ॥२॥
इष्ट मित्र गुरु ऐसा कैसा भाव । सर्वही निर्वाह तेचि एका ॥३॥
नाचविले तिणे तैसे ते नाचती । माकडाच्या गति गारुडयाच्या ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१८६
📿 भावे करिता माझी भक्त
2186.
भावे करिता माझी भक्ति । मी आतुडें भक्ताहातीं ॥१॥
माझे भक्तीपरतें । साधन नाही वों निरुते ॥२॥
माझे भक्तीचें महिमान । भक्त जाणती सज्ञान ॥३॥
एका जनार्दनी भाव । स्वये बोलतसे देव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१८७
📿 जो जो कोणी भजनीं बैस
2187.
जो जो कोणी भजनीं बैसे । तेथे मी दिसे तैसाची ॥१॥
उपासनेचा निर्वाहो । सर्वाभूति देवाधिदेवो ॥२॥
हो का माझी प्रतिमा मूर्ति । अंतर्ज्योति मी वसे ॥३॥
तेथे करिता भावे भक्ति । एका जनार्दनी मुक्ति तयासी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१८८
📿 तरि का पवाडे गर्जती
2188.
तरि का पवाडे गर्जती पुराणे । असता नारायण शिक्तहीन ॥१॥
कीर्तीविण नाही नामाचा डांगोरा । येर का इतरा वाणीत ना ॥धृपद॥
तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखी गुणे ॥२॥
चांगलेपण हे निरुपायता अंगी । बाणले श्रीरंगा म्हणऊनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१८८
📿 जे भजती मज जैसे वासन
2188.
जे भजती मज जैसे वासना । मीही तया तैसा असे ॥१॥
जया जैशी पै वासना । मीहि तैसा होय जाणा ॥२॥
हो का माझी प्रतिमा मूर्ति । आदरे करिता माझी भक्ति ॥३॥
मी जनी असोनीं निराळा । एकाजनार्दनी अवलीला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१८९
📿 तेव्हा धाले पोट बैसल
2189.
तेव्हा धाले पोट बैसलो पंगती । आता आम्हा मुक्तिपाग काई ॥१॥
धावा केला आता येईल धावोन । येथे काही करणे न लगे संदेह ॥धृपद॥
गायनाचा आता कोठे उरला काळ । आनंदे सकळ भरी आले ॥२॥
देवाच्या सख्यत्वे विषमासी ठाव । मध्ये कोठे वाव राहो सके ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१८९
📿 मज जे अनुसरले काय वा
2189.
मज जे अनुसरले काय वाचा मने । त्याचे चालवणें सर्व मज ॥१॥
ऋणवई त्यांचा आनंद जन्माचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ॥२॥
तयांचियां द्वारी लक्षीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणें ॥३॥
सर्व जडभारी जाणे योगक्षेम । एकाजनार्दनी नेम जाणा माझा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१९०
📿 न कळता मुलांसंगे मी
2190.
न कळता मुलांसंगे मी खेळत । गेलो सभेआंत राजयाच्या ॥१॥
काय सांगो माये जाहला अपमान । तेणे माझे मन । दुखावले ॥२॥
माते प्रेमभावे राये आळवीले । मांडी बैसवीले सन्मानेशी ॥३॥
आली आकस्मात् दुर्धर कोपोन । लांस की ते कोण मी तो नेणे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१९०
📿 मजसि जेणे विकिले शरी
2190.
मजसि जेणे विकिले शरीर । जाणे मी निर्धारे अंकित त्याचा ॥१॥
त्याचे सर्व काम करीन मी अंगें । पडों नेदीं व्यंगें सहासा कोठे ॥२॥
एका जनार्दनी त्याचा मी अंकित । राहे पै तिष्ठत त्याचे द्वारी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१९१
📿 सत्ताबळे येतो मागता
2191.
सत्ताबळे येतो मागता विभाग । लावावया लाग निमित्य करू ॥१॥
तुझी ऐसी मुखे करू उच्चारण । बोले नारायण सांपडवू ॥धृपद॥
आसेविण नाही उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदी ॥२॥
तुका म्हणे आता व्हावे याजऐसे । सरिसे सरिसे समागमे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१९१
📿 सर्व कर्म मदर्पण । क
2191.
सर्व कर्म मदर्पण । करिता मन शुद्ध होय ॥१॥
न्य़ुन ते चढतें जाण । करी संपुर्ण मी एक ॥२॥
माझ्या ठायी ठेवुनी मन । करी कीर्तन आवडी ॥३॥
मन ठेवुनी माझ्या ठायी । वसो कोठे भलते ठायी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१९२
📿 करिता होय होय चित्तच
2192.
करिता होय होय चित्तचि नाही । घटापटा काही करू नये ॥१॥
मग हालत चि नाही जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥धृपद॥
साहत चि नाही काही पाकुळले । उगल्या उगले ढळत आहे ॥२॥
तुका म्हणे तरी बोलावे झांकून । येथे खुणे खूण पुरते चि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१९३
📿 संतसंगे याचा वास सर्
2193.
संतसंगे याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत ॥१॥
घालूनिया काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरी वास दिला ॥धृपद॥
आपुलेसे जिंही नाही उरो दिले । चोजविता भले ऐसी स्थळे ॥२॥
तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचे स्थळ चंदन चि ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१९३
📿 संकल्पाचा मळु नेत्री
2193.
संकल्पाचा मळु नेत्री नीडारला । त्यालागी तो डोळा काय दिसे ॥१॥
जेथे देखो तेथे तोचि तो कोंदला । विश्वामाजी भरला विश्वंभर ॥२॥
मोठे थोर थोर तापसी नाडीले । कामाने वोढिले माघौतेची ॥३॥
वेदाचे पुनीत यज्ञशीळ सारे । झकवती बारे वास नेणे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१९४
📿 केला नमस्कार मातेला
2194.
केला नमस्कार मातेला उठोनी । निघाला तेथुनी लागवेगे ॥१॥
वनी बैसोनिया धरोनी विश्वास । आळवावा ईश ऐसे चित्ती ॥२॥
हाक मारीत मागे माउली चालली । तियेसवे बोली करीना ते ॥३॥
एकाकी तो नीट चालीला त्वरेने । पाहोंनिया जन स्तब्ध झाले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१९४
📿 स्वर्ग नरक इहलोक । य
2194.
स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनि देख ॥१॥
भावे करिता माझी भक्ति । भाविक आपें आप उद्धरती ॥२॥
गव्हांची राशी जोडिल्या हाती । सकळ पक्कान्न त्याची होती ॥३॥
द्रव्य जाहलें आपुले हाती । सकल पदार्थ घरां येती ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१९५
📿 नगरी नरनारी समस्तही
2195.
नगरी नरनारी समस्तही । म्हणती झाले कांही राजयाला ॥१॥
बाळ ते केवढे धाडीले वनासी । याचीया धैर्यासी दुजा नाही ॥२॥
मागे बहु झाले नाही हे देखीले । हे तो नव्हे भले विचारिता ॥३॥
सर्वांदिकी त्यासी सांगितली वृत्त । कांरे तू निवांत बैसलासी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१९५
📿 माझा शरणागत न दिसे क
2195.
माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥
एकविध भावे आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे ॥२॥
समर्थाचे मुला काय खावयाची चिंता । तैसे मी त्या तत्त्वता न विसंबे ॥३॥
एका जनार्दनी हा माझा नेम । आणीक नाही वर्म भावेंविण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१९६
📿 पाहता तव एकला दिसे ।
2196.
पाहता तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥
ज्याचे त्याचे मिळणी मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥धृपद॥
जाणिवेचे नेदी अंग । दिसे रंग निवडेना ॥२॥
तुका म्हणे ये चि ठायी । हे तो नाही सर्वत्र ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१९६
📿 म्हणे बा आता करिशील
2196.
म्हणे बा आता करिशील कायी । एकाला ये ठायी येऊनिया ॥१॥
वय हे केवढे बुद्धि हे केवढी । वांया काढाकाढी तपाची का ॥२॥
व्याघ्र आणि सिंह जंबुक विखार । नांदती या घोर वनामाजी ॥३॥
म्हैषा मसको भूते वसती रानी । तुज माये रानी झोंबतील ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१९६
📿 माझा भक्त मज भीतरी ।
2196.
माझा भक्त मज भीतरी । मी स्वये असे तया माझारीं ॥१॥
बहु बोलाचे नाही कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥
माझिया भक्तिसी जे लागले । ते तीच होउनी ठेले ॥३॥
एकाजनार्दनी अभेद । तया हृदयी मी गोविंद ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१९७
📿 पुजी माझिया भक्तांते
2197.
पुजी माझिया भक्तांतें । तेणे संतोष होत माते ॥१॥
भक्त माझा मी भक्तांचा । ऐसी परंपरा साचा ॥२॥
देवभक्तपण । वेगळीक नाही जाण ॥३॥
भक्त जेवितांची धालो । एका जनार्दनी लाधलो. ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१९८
📿 करावा उद्धार हे तुम्
2198.
करावा उद्धार हे तुम्हा उचित । आम्ही केली नीत कळली ते ॥१॥
पाववील हाक धावा म्हणऊन । करावे जतन ज्याचे तेणे ॥धृपद॥
दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आम्ही भाव जाणतसो ॥२॥
तुका म्हणे माझे कायावाचामन । दुसरे ते ध्यान करित नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९›
📿 अभंग क्र. २१९८
📿 वमिल्या मिष्टान्ना ।
2198.
वमिल्या मिष्टान्ना । परतोई श्रद्धा न धरी रसना ॥१॥
ऐसे आठवितां माझे गुण । मिथ्या ठायी नसें ज्ञान ॥२॥
जेथे कर्माचे परिपाठी । हे तो पुन्हा नये गोष्टी ॥३॥
येव्हढें कथेचे महिमान । एका जनार्दनी शरण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २१९९
📿 संताचे उपदेश आमुचे म
2199.
संताचे उपदेश आमुचे मस्तकी । नाही मृत्यु लोकी राहाणेंसा ॥१॥
म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येई वो धावत पांडुरंगे ॥धृपद॥
उपजली चिंता लागला उसीर । होत नाही धीर निढळ वाटे ॥२॥
तुका म्हणे पोटी रिघालेसे भय । करू आता काय ऐसे जाले ॥३॥