🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३११३
📿 भोगोनी नान योनी । आल
3113.
भोगोनी नान योनी । आलासी आता या जनीं ॥१॥
ऐसा धरी मागील आठव । करी देहाचें वाटीव ॥२॥
नाही तरी जाशील वाया । पुनरपि यमालया ॥३॥
येता जाता शिणतोसी । एका जनार्दनी का न भजसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३११४
📿 पाने जो खाईल बैसोनि
3114.
पाने जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ते ॥१॥
तमाखू ओढूनि काढिला जो धूर । बुडेल ते घर तेणे पापे ॥धृपद॥
कीर्तनी बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येईल जन्मा ॥२॥
जयाचिये मनी कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३११५
📿 कामांमध्ये काम । काह
3115.
कामांमध्ये काम । काही म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचे ॥१॥
कळो येईल अंतकाळी । प्राणप्रयाणाचे वेळी । राहाती निराळी । रांडापोरे सकळ ॥धृपद॥
जीता जीसी जैसा तैसा । पुढे आहे रे वोळसा । उगवुनि फासा । काय करणे ते करी ॥२॥
केले होते याचि जन्मे । अवघे विठोबाच्या नामे । तुका म्हणे वर्मे । जाणोनिया तरती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३११५
📿 पळ पळ आयुष्य खातसे क
3115.
पळ पळ आयुष्य खातसे काळ । का रे होसी सबळक पोसणा तू ॥१॥
वाढविसी देह काळाचे भातुकें । का रे तुज कौतुके सुख वाटे ॥२॥
नामस्मरण करिता लाजसी पामरा । भोगिसी अघोरा यमदंडा ॥३॥
एका जनार्दनी सांगतसे हित । का रे न घ्या त्वरित हरिनाम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३११६
📿 काळानें ग्रासिले साव
3116.
काळानें ग्रासिले सावधान व्हा रे । सोडवण करा रे हरिनामें ॥१॥
आयुष्य सरलीया कोण पा सांगाती । पुढे हो फजिती यमदंड ॥२॥
उपाय तो सोपा नामाचा गजर । न करी विचार पुढे काही ॥३॥
एका जनार्दनी तू का रे अंधळा । देखतोसी डोळा सुख दुःख ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३११८
📿 अवघ्या पातकांची मी ए
3118.
अवघ्या पातकांची मी एक रासी । अवघा तू होसी सर्वोत्तम ॥१॥
जैसा तैसा करणे लागे अंगीकार । माझा सर्व भार चालविणे ॥धृपद॥
अवघेचि मज गिळियेले काळे । अवघाच बळे तुझे अंगी ॥२॥
तुका म्हणे आता खुंटला उपाय । अवघेचि पाय तुझे मज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३११८
📿 का रे नागविसी काळा ।
3118.
का रे नागविसी काळा । मानिसी संसार सोहळा । शेवटी तो गळा । यमपाश पडतील ॥१॥
वाचे म्हणे रामनाम । आणीक नको दुजे काम । मोक्ष मुक्ति धाम । नामे एका जोडती ॥२॥
वाउगें जप तप कर्म । याचा न धरी संभ्रम । वाचे गाय सदा नाम । तेणे सर्व जोडतसे ॥३॥
एका जनार्दनी नेमक । कायावाचा - मने सप्रेम । वाचे सम्रतसे नाम । श्रीराम सर्वदा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३११९
📿 सावळे सुंदर रूप मनोह
3119.
सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ॥१॥
आणीक काही इच्छा आम्हा नाही चाड । तुझे नाम गोड पांडुरंगे ॥धृपद॥
जन्मोजन्मी ऐसे मागितले तुज । आम्हासी सहज द्यावे आता ॥२॥
तुका म्हणे तुज ऐसे जी दयाळ । धुंडिता सकळ नाही आम्हा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३११९
📿 अशाश्वत देह काळाचे भ
3119.
अशाश्वत देह काळाचे भातुकें पंचप्राण कौतुके खेळ तेथे ॥१॥
जीव शिव दोन्ही मध्य बैसाकार । व्यापारी व्यापार सर्व त्याचा ॥२॥
जीव गुंतलासे विषयाचे वोढी । शिव जाणे गौरी आत्मस्वरूप ॥३॥
ऐसा हा खेळ अनादि पसर । एका जनार्दनी निर्धार नाम जपा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१२०
📿 देहाचिये माथा काळाची
3120.
देहाचिये माथा काळाची तो सत्ता । म्हणोनि सर्वथा घोका राम ॥१॥
आदि मध्य अंतीं काळ लागलाहे । क्षणक्षणां पाहे वास त्यासी ॥२॥
सर्व जाणोनिया अंधळें पै होती । काळ नेतांचि देखतो ते दुजा ॥३॥
परि रामनामी न धरिती विश्वास । निकट समयास धांवाधांवी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१२१
📿 येवोनिया काळ बैसलासे
3121.
येवोनिया काळ बैसलासे उसां । झाकितोसी कैसा डोळे आता ॥१॥
वाचे नारायण वदे तू सादर । काळपाश साचार चुके जेणे ॥२॥
वाया हा संसार करसी हावभरी । काळाची तो फेरी निकट आली ॥३॥
एका जनार्दनी नको यातायाती । संसार फजिती जन्म दुःख ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१२२
📿 करणे ते हेचि करा । न
3122.
करणे ते हेचि करा । नरका अघोरा का जाता ॥१॥
जयामध्ये नारायण । शुद्धपण ते एक ॥धृपद॥
शरणागता देव राखे । येरा वाखे विघ्नाचे ॥२॥
तुका म्हणे लीन व्हावे । कळे भावे वर्म हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१२२
📿 आला रे आला आला काळ न
3122.
आला रे आला आला काळ निकटी । राम नाम कोटी केव्हा जपसी ॥१॥
बाळ तरुण वृद्ध दशा ती पावली । काळाची पडली छाया अंगी ॥२॥
यातायाती करता जन्म वाया गेला परी नाही वदला मुखी राम ॥३॥
एका जनार्दनी फजितखोर जिणें । सवेंचि मरणें पुढती जन्म ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१२३
📿 देह हा काळाचा जाणार
3123.
देह हा काळाचा जाणार शेवटी । याची धरुनी मिठी गोडी काय ॥१॥
जाणार जाणार जाणार हे विश्व । वाउगाचि सोस करसी काय ॥२॥
प्रपंच काबाड एरंडाचे परी । रसस्वाद तरी कांही नाही ॥३॥
नाशिवंतासाठीं रडतोसी वाया । जनार्दनी शरण निघे तू पाया ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१२४
📿 सावधान सर्व आहे । तु
3124.
सावधान सर्व आहे । तुझे हात आणि पाय । तोंवरीं तू जाय । तीर्थयात्रेकारणेकं ॥१॥
सरलीया आयुष्यकाळ । इंद्रिये होतील विकळ । कांही न चाले बळ । वाउगी ते तळमळ ॥२॥
डोळे कान नाक आहे । तोंवरी संता शरण जाय । ही मावळलीया होय । हाय हाय तुजलागी ॥३॥
काय म्हणशी माझे माझे । हे तो शेवटींचें वोझे । एका जनार्दनी दुजे । तुज कोण सोडवील ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१२५
📿 मागे बहुत झाले खेळ ।
3125.
मागे बहुत झाले खेळ । आता बळ वोसरले ॥१॥
हालो नये चालो आता । घट रिता पोकळ ॥धृपद॥
भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥
तुका म्हणे पाहता घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१२५
📿 काय याचे मुखी बैसे द
3125.
काय याचे मुखी बैसे दांतखीळ । नामोच्चारा बळ क्षीण होते ॥१॥
काय याचे कर्ण बधिर पै वहिले । हरिकीर्तनी जाहले पांगुळ ते ॥२॥
काय याचे नेत्रां अंधत्व ते आलेक । न देखती सांवळे रूप कधी ॥३॥
एका जनार्दनी ऐसा तो चांडाळ । त्याचा मन विटाळ नको नको ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१२९
📿 त्या हरीदासांची भेटी
3129.
त्या हरीदासांची भेटी घेता । नरका उभयतांसी जाणे ॥१॥
माते परीस थोरी कथा । भाड घेता न लाजे ॥धृपद॥
देता घेता नरकवासी । उभयतांसी रवरव ॥२॥
तुका म्हणे नरकगांवा । जाती हावा धरोनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१२९
📿 चोर्यांयशी लक्ष देह
3129.
चोर्यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥१॥
अवचट देह मनुष्य जन्म । तेथे साधावें परब्रह्मा ॥२॥
जन्मोनिया मनुष्यदेहीं । परमार्थ साधिला तो नाही ॥३॥
सदा विषयी अनुसंधान । भुले प्रपंचीं अनुदिन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१३२
📿 आम्ही आइते जेवणार ।
3132.
आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणेचि वाढेले ॥१॥
ठेवा जोडला मिरासी । ठाव झाला पायापासी । नव्हे आणिकासी । रीघ तेथे यावया ॥धृपद॥
बळी दिला जीवभाव । नेणे आणिकाचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥२॥
तुका म्हणे झालो बळी । आम्ही निकट जवळी । बोलिलो ते पाळी । वचन स्वामी आमुचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१३२
📿 तू म्हणशील बा हे माझ
3132.
तू म्हणशील बा हे माझे । वाया वाहसी वाउगें ओझे ॥१॥
सोडी दे टाकूनी परता येई । रामनाम वाचे सदा गाई ॥२॥
नामाचि जाण सत्य सार । वाया का वाहशील भार ॥३॥
एका जनार्दनी नाम सार । वेदशास्त्री हा निर्धार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१३३
📿 कोण आमची योगतपे । कर
3133.
कोण आमची योगतपे । करू बापे जाणावी ॥१॥
गीत संतसंगे गाऊ । उभी ठाऊ जागरणी ॥धृपद॥
आमुचा तो नव्हे लाग । करू त्याग जावया ॥२॥
तुका म्हणे इंद्रियांसी । येचि रसी रंगवू ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१३३
📿 जन्ममरणांच्या चुकवा
3133.
जन्ममरणांच्या चुकवा रे खेपा । यासी तो सोपा राममंत्र ॥१॥
वेळोवेळां वाचे उच्चारावे नाम । तेणे निष्काम प्राणी होय ॥२॥
सायास नाही अनायासे वर्म । वाचे रामनाम आठवावे ॥३॥
एका जनार्दनी नामविण काही । आणिक थोर नाही कलीमाजी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१३४
📿 साडंआ वाउगे ते बोल ।
3134.
साडंआ वाउगे ते बोल । वाचे म्हणा विठ्ठल विठ्ठल ॥१॥
तेणे तुटती यातना । भवपाश तुटेल जाणा ॥२॥
बैसला जिव्हारी । व्यापूनि ठेला तो अंतरी ॥३॥
एका जनार्दनी ध्यान । ध्यानीं मनी विठ्ठल पूर्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१३५
📿 उदंड पाहिले उदंड ऐकि
3135.
उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटे वरी देव कोठे ॥धृपद॥
ऐसे संतजण ऐसे हरीदास । ऐसा नाम घोष सांगा कोठे ॥२॥
तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे । पंढरी निर्माण केली देवे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१३७
📿 सांडावी हे भीड अधमाच
3137.
सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदे ॥१॥
ऐसे तव तुम्ही नाही जी दिसत । का हे अनुचित वदलेती ॥धृपद॥
फांटा झाला त्यासी नाही वोढा वारा । बेरसाचा खरा हा तो गुण ॥२॥
तुका म्हणे नाही ज्याच्या बापा ताळ । तो देखे विटाळ संता अंगी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१३८
📿 आवडे हे रूप गोजिरे स
3138.
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहाता लोचन सुखावले ॥१॥
आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे । जो मी तुज पाहे पांडुरंगा ॥धृपद॥
लांचावले मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१३८
📿 का रे नायकसी गव्हारा
3138.
का रे नायकसी गव्हारा । का रे न भजसी ईश्वरा ॥१॥
सोपा मंत्र विठ्ठराज । तेणे पुरे सर्व काज ॥२॥
नको संसाराचे कोड । अंतकांळीं यमदंड ॥३॥
एका जनार्दनी कींव भाकी । रामनाम वदा मुखी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१३९
📿 तिळ एक अर्ध राई । सी
3139.
तिळ एक अर्ध राई । सीतबिंद पावे काई । तया सुखा नाही । अंतपार पाहता ॥१॥
म्हणउनी करा लाहो । नका मागे पुढे पाहो । अवघ्यामध्ये आहो । अवघे साव चित्त तो ॥धृपद॥
तीर्थे न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे काशी गयेहुनी । जी आगळी असती ॥३॥
येथे धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१४०
📿 विठोबाचे नाम ज्याचे
3140.
विठोबाचे नाम ज्याचे मुखी नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरती ॥१॥
विठ्ठलविठ्ठल भावे म्हणे वाचे । तरी तो काळाचे दात ठेंची ॥धृपद॥
बहुत तारिले सांगो किती आता । ऐसा कोणी दाता दुजा नाही ॥२॥
तुका म्हणे म्या ही ऐकोनिया कीर्ती । धरिला एकांती हृदयामाजी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१४०
📿 एक वेळ वाचे वेद का र
3140.
एक वेळ वाचे वेद का रे नाम । निरसे सर्व श्रम भवदूःख ॥१॥
नाम हे नौका नाम हे नौका । जगी तारक देखा भाविकांसी ॥२॥
एका जनार्दनी नाम हे अमृत । सेविता त्वरित मुक्ति होय ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१४१
📿 आड पडे काडी । तरि ते
3141.
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥
ऐशी दुर्जनसंगती । बहुतांचे घात होती ॥धृपद॥
एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥२॥
तुका म्हणे रांड । ऐसी का ते व्याली भांड ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१४२
📿 पंढरीचे भूत मोठे । आ
3142.
पंढरीचे भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥
बहु खेचरीचे रान । जाता वेडे होय मन ॥धृपद॥
तेथे जाऊ नका कोणी । गेले नाही आले परतोनि ॥२॥
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१४३
📿 काय करू आता या मना ।
3143.
काय करू आता या मना । न संडी विषयांची वासना ।
प्रार्थितांही राहेना । आदरे पतना नेऊ पाहे ॥१॥
आता धावधावे गा श्रीहरी । गेलो वाया नाही तरी ।
न दिसे कोणी आवरी । आणीक दुजा तयासी ॥धृपद॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१४५
📿 स्वप्नवत देह स्वप्नव
3145.
स्वप्नवत देह स्वप्नवत संसार । नाही पारावार दुःखा तेथे ॥१॥
काय त्याची गोडी लागसीसे मूढा । नाचतो माकोडा गारोड्याचा ॥२॥
स्त्री पुत्र धन कवणाचे ते आप्त । वाया भुललें चित्त म्हणे माझे ॥३॥
सावध होउनी गाये रामनाम । एका जनार्दनी विश्राम तेणे तुज ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१४७
📿 जगाची ती रहाटी । जैश
3147.
जगाची ती रहाटी । जैशी अंधाहातीं दिली काठी । चिखलाची पाउती । काय मार्ग दिसे ॥१॥
तैसे भुलोनिया जन । गेले म्हणती माझे जाण । बा कवणाचें कवण । कामा न ये शेवटी ॥२॥
चालतो पाहतो ऐकतो कानी । दुजियाचे गुणदोश मनी । नका आणू चुकवा पतनी । पुढील पेणे अंतरू नका ॥३॥
हेंचि बोधाचे लक्षण । धरा हृदयी याची खुण । शरण एका जनार्दन । वारंवार विनवितसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१४८
📿 नागले देखोनि चांगले
3148.
नागले देखोनि चांगले बोले । आपुले वेचूनि त्याजपुढे खुले ॥१॥
अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणे तो धर्म कोण ॥धृपद॥
आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मगे त्यासी घाली साखर गुळ ॥२॥
एकासी धड न बोले वाचा । एकासी म्हणे मी तुझे बांदीचा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१४८
📿 प्रपंची सदा सक्त । र
3148.
प्रपंची सदा सक्त । रामनामी नाही चित्त ॥१॥
तया म्हणावे ते काय । व्यर्थ शिणविली माय ॥२॥
वाया जिणे पै तयाचे । सदा मान दंभीं नाचे ॥३॥
एका जनार्दनी शरण । तया सोडवील कोण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१४९
📿 पिंडपोशकाच्या जळो ज्
3149.
पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥
नाही संतचिन्ह उमटले अंगी । उपदेशालागी पात्र झाला ॥धृपद॥
पोहो नये कासे लावितो आणिका । म्हणावे त्या मूर्खा काय आता ॥२॥
सिणले ते गेले सिणलियापासी । झाली त्या दोघासी एक गति ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१४९
📿 कैंचे ध्येय ध्याता ध
3149.
कैंचे ध्येय ध्याता ध्यान । अवघे विषयावरी मन ॥१॥
तेथे कैचें कर्माचरण । सदा विषयींच मन ॥२॥
कैंचा दोष कैंचा गुण । अवघे विषयींच मन ॥३॥
कैंचा बोध कैंचा भेद । सदा विषयी तो धुंद ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१५०
📿 ऐसे लागलिया ध्यान ।
3150.
ऐसे लागलिया ध्यान । अंतकाळीं ठसावें मन ॥१॥
म्हणोनि भोगक्षयें जाण । मागील देहाचें अनुसंधान ॥२॥
मागील सांडी रे दगड । का घालिसी पायखोडा ॥३॥
भुलोनि जाऊ नको वाया । एका जनार्दनी लागे पाया ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१५१
📿 राम कृष्ण ऐसी उच्चार
3151.
राम कृष्ण ऐसी उच्चारिता नामे । नाचेन मी प्रेमे संतांपुढे ॥१॥
काय घडेल ते घडो ये सेवटी । लाभ आणि तुटी देव जाणे ॥धृपद॥
चिंता मोह आशा ठेवीन निराळी । देईन हा बळी जीव पायी ॥२॥
तुका म्हणे काही उरो नेदी उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१५१
📿 वैर करुनी मन मारावें
3151.
वैर करुनी मन मारावें । मनाधीन पै न व्हावे ॥१॥
मनामार्ग जाऊ नये । मन आकळुनी मन पाहे ॥२॥
मन म्हणे ते न करावे । मनी मनासी बांधावें ॥३॥
मन म्हणेल ते सुख । परी पाहता अवघे दुःख ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१५२
📿 का गा कोणी न म्हणे प
3152.
का गा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलाविते पाही चाल नेटे ॥१॥
तेव्हा माझ्या मना होय समाधान । जाय सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥
तुका म्हणे माझी होईल माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१५४
📿 नाही पाक होत उफराटे
3154.
नाही पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥१॥
नाही मानू येत वांजटाचे बोल । कोरडेच फोल चवी नाही ॥धृपद॥
तरुवरा आधी कोठे आहे फळ । चावटा बरळ म्हणा त्यासी ॥२॥
तुका म्हणे किती ठकली बापुडी । गव्हा नाही गोडी मांडे पुऱ्या ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१५५
📿 झाली हरीकथा रंग वोरस
3155.
झाली हरीकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥
वाटितो हे प्रेम उचिताचा दाता । घेई रे तू आता धणीवरी ॥धृपद॥
प्रेम देऊनिया अवघी सुखी केली । जे होती रंगली विठ्ठली ती ॥२॥
तुके हे दुर्बळ देखियले संती । म्हणउनि पुढती आणियेले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१५७
📿 उपाय यासी एक आहे । ज
3157.
उपाय यासी एक आहे । जो या जाय शरण विठ्ठला ॥१॥
मग न चले काळाचे बळ । घेता सरळ नामक वाचे ॥२॥
आम्हा आलेसे प्रचीत । म्हणोनि मात सांगतो ॥३॥
शरण एका जनार्दनी । विठ्ठल वदनी उच्चारा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१५८
📿 देव तिळी आला । गोडे
3158.
देव तिळी आला । गोडे गोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥धृपद॥
पापपुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले ॥२॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१५८
📿 नाकळे जो आकळ । भक्ति
3158.
नाकळे जो आकळ । भक्तिप्रेमाचा वत्सल । रूप धरूनि कोमळ । भीमातटीं उभा ॥१॥
त्याचा छंद असो जनी । काया वाचा आणि मनी । संचिताची हानी । कदा काळी न होवो ॥२॥
जे जे होत कर्माकर्म । अथवा उत्तम ते धर्म । प्राचीन ते कर्म । तयापासूनि सोडवी ॥३॥
एकविधि धरी भाव । मागे देवापदीं ठाव । संचिताची हाव । तयापाशीं नुरेचि ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१५९
📿 अन्यायासी राजा न करि
3159.
अन्यायासी राजा न करिता दंड । बहुत ते लंड पीडी जना ॥१॥
न करिता निगा न काढिता तन । कैची येती कण हातासी ते ॥धृपद॥
तुका म्हणे संता करू नये अनृत । पाप नाही नित विचारिता ॥२॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१५९
📿 अवघा वाया संसार । अव
3159.
अवघा वाया संसार । अवघा सार विठ्ठल ॥१॥
अवघे आले वाया जाती । फजिती हे समजेना ॥२॥
अवघे नरदेहीं चोर । अवघा सार विठ्ठल ॥३॥
अवघे वाया जाते जन्म । अवघे कर्म चुकेना ॥४॥