🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६›
📿 अभंग क्र. २६८
📿 पानी मे मीन प्यासी ।
268.
पानी मे मीन प्यासी । मोहे सुन सुन आवत हांसी॥धृ०॥
आत्मज्ञानबिन नर भटकत है । कहा मथुरा काशी॥१॥
भवसागर सब हार भरा है । धुंडत फिरत उदासी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । सहज मिळे अविनशी॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २६८
📿 का रे माझा तुज न ये
268.
का रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१॥
अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणा कंठस्फोट ॥धृपद॥
का हे चित्त नाही पावत विश्रांती । इंद्रियांची गति खुंटेचि ना ॥२॥
तुका म्हणे का हो धरियला कोप । सरले नेणो पाप पांडुरंगा ॥३॥
269.
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा । पुनरपि संसारा येणे नाही ॥१॥
मन हे सेवंती अर्पुनी भगवंती । पुनरपि संसृती येणे नाही ॥२॥
मन हे तुळशी अर्पू हृषीकेश पुनरपि जन्मासी येणे नाही ॥३॥
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तया वास व्हावा वैकुंठासी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २६९
📿 विषयाचे लोलंगित गुंत
269.
विषयाचे लोलंगित गुंतले हे जन । न कळे साधन यासी कांही ॥१॥
जन्मती मरती जन्मती मरती । ऐसी हे फजिती होती जाती ॥२॥
काय हे आंधळे जाणोनिया झाले । झांकिताती डोळे देखानिया ॥३॥
चोखा म्हणे ऐसे भुलोनिया गेले । शेवटी खाती टोले गांडीवरी ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६›
📿 अभंग क्र. २६९
📿 पानी मे मीन प्यासी ।
269.
पानी मे मीन प्यासी । मोहे सुन सुन आवत हांसी॥धृ०॥
आत्मज्ञानबिन नर भटकत है । कहा मथुरा काशी॥१॥
भवसागर सब हार भरा है । धुंडत फिरत उदासी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । सहज मिळे अविनशी॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देवकी बंधमुक्तता - अभंग २६७ ते २७१›
📿 अभंग क्र. २६९
📿 अहं तृणावर्त बळी । प
269.
अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळी । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥
रज उधळले तेणे बळे । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाही हे न कळे । सकळिकांसी हो ॥२॥
श्रद्धा यशोदा म्हणे । माझा कृष्ण नेला कोणे । न दिसे रजोगुणें । मायें काय करु वो ॥३॥
कैसे निबीड निबीड रज । मीचि न देखे मज । तेथे कृष्ण सोय निज । कवण दावी ॥४॥
270.
इतुके करी देवा हे ऐसे वचन । समूळ अभिमान जाली माझी ॥१॥
इतुके करी देवा एकावी ही गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखू ॥२॥
इतुके करी देवा ऐकावी हे खुण । संत चरण राज वंदू आता ॥३॥
भलतिया भावे तारी पंढरीराव । तुका म्हणे भावे शरण आलो ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६›
📿 अभंग क्र. २७०
📿 पानी मे मीन प्यासी ।
270.
पानी मे मीन प्यासी । मोहे सुन सुन आवत हांसी॥धृ०॥
आत्मज्ञानबिन नर भटकत है । कहा मथुरा काशी॥१॥
भवसागर सब हार भरा है । धुंडत फिरत उदासी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । सहज मिळे अविनशी॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २७०
📿 वर्णु महिमा ऐसी नाही
270.
वर्णु महिमा ऐसी नाही मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥
ठायीची हे काया ठेविली चरणी । आता ओवाळुनि काय सांडू ॥धृपद॥
नाही भाव ऐसा करू तुझी सेवा । जीव वाहू देवा तो ही तुझा ॥२॥
मज माझे काही न दिसे पाहाता । जे तुज अनंता समर्पावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २७०
📿 मला तू हरी कळलासी रड
270.
मला तू हरी कळलासी रडीवाला ॥धृ॥विधीचे अक्षर खरे हे असता | अजासुताचे का जाले हाल ॥१॥
पाराशरसुत वरचढ जाला | म्हणून का त्वा फुगविले गाल ॥२॥
बळीने तुज पाहे खरीद केले | खर्चून तो धनमाल ॥३॥
नामा मनी निर्भय गुरुवर कृपे | तुजलागी देता हे प्रतिख्याल ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 ज्ञानेश्वर स्तुती›
📿 अभंग क्र. २७१
📿 संत राउळा चालिले । ज
271.
संत राउळा चालिले । ज्ञानेश्वर तव बोले ॥1॥
एवढे नवल सांगावे । दासी जनीचे पद ल्याहावे ॥2॥
पाय जोडुनी विटेवरी । कटी हात उभा हरी ॥3॥
रुप सांवळे सुंदर । कानी कुंडल मनोहर ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २७१
📿 साधन ते एक जगासी प्र
271.
साधन ते एक जगासी प्रमाण । परदारा परधन वमन जैसे ॥१॥
ऐसा ज्याचा भाव तोचि एक साधु । येर अवघे भोंदु जगामाजी ॥२॥
काम आणि क्रोध जिरवोनी अंतरी । वांचे हरि हरि जप करी ॥३॥
आन वासना विराली कल्पना । शांति क्षमा ह्या जाणा अंगी वसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २७१
📿 नाही सुख मज न लगे हा
271.
नाही सुख मज न लगे हा मान । न राहे हे जन काय करू ॥१॥
देहउपचारे पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न ते ॥धृपद॥
नाइकवे स्तुति वाणिता थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥
तुज पावे ऐसी सांग काही कळा । नको मृगजळा गोवू मज ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २७२
📿 सुख पाहावया नाना उपा
272.
सुख पाहावया नाना उपाय । अवघेंचि होय दुःखमय ॥१॥
ऐसी हे चाली उफराटी देखिली । वाउगी ती बोली श्रम वाया ॥२॥
दोराचा सर्प भासतसे साचा । तैसा हा देहाचा परिणाम ॥३॥
चोखा म्हणे याचे मानिताती कोड । कैसे हे दगड जन्मा आले ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २७२
📿 रावणा मारून माझ्या म
272.
रावणा मारून माझ्या माये गे | बिभीषण लंकेस स्थापिलास काय गे |अयोध्येस आलीस काय गे | माझे हृदयमंदिरी राहे गे | विठ्ठल माये गे ॥१॥
रुसुनी आली रखुमाबाई गे | तिच्या मागे तू धावलीस काय गे |संगे घेऊनिया गोपाळ गाय गे | मम हृदयमंदिरी राहे गे ॥२॥
सत्त्ये राधिकेचे पायी गे | सोडूनी द्वारकेचा ठाव गे |आलीस काय गे | माझे हृदयमंदिरी राहे गे ॥३॥
धन्य पुंडलिक भक्त माय गे | त्याने विटेवर उभा केला काय गे |नामा म्हणे माझे माय गे | माझे हृदयमंदिरी राहे गे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 ज्ञानेश्वर स्तुती›
📿 अभंग क्र. २७३
📿 सदाशिवाचा अवतार । स्
273.
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥1॥
महाविष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥2॥
ब्रम्हा सोपान तो झाला । भक्ता आनंद वर्तला ॥3॥
आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायी ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २७३
📿 मेरूपरते एक व्योम आह
273.
मेरूपरते एक व्योम आहे । तेथे एकु पाहे तेज:पुंजू ॥
तेज नव्हे तेज:पुंजू नव्हे । शितळ नव्हे शांतही नव्हे ॥
बाप रखुमादेविवरू विठ्ठलही नव्हे । नव्हे तो होये चतुर्देहेंवीण ॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २७३
📿 काहीच मी नव्हे कोणिय
273.
काहीच मी नव्हे कोणिये गावीचा । एकट ठायीचा ठायी एक ॥१॥
नाही जात कोठे येत फिरोनिया । अवघेचि वायाविण बोले ॥धृपद॥
नाही मज कोणी आपुले दुसरे । कोणाचा मी खरे काही नव्हे ॥२॥
नाही आम्हा ज्यावे मरावे लागत । आहो अखंडित जैसे तैसे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २७३
📿 चिदानंद दोंदिल बाळ ड
273.
चिदानंद दोंदिल बाळ डोळस | कृष्ण खेळविता निवे मानस ॥१॥
सये आन काही या जीवा नावडे | चित्त गुंतले त्या सुखी न निवडे ॥२॥
देहा गेहा आठव नाही सर्वथा | स्थिति बाणली सहज रूप पाहता ॥३॥
तेज सावळे दृष्टीत कोंदले | तेणे प्रकाशे सबाह्य वेधले ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २७४
📿 स्त्री पुत्र धन कोणा
274.
स्त्री पुत्र धन कोणाचे हे कोण । याचा अभिमान धरती प्राणी ॥१॥
देवांचा हा देव तया ठकविती । बापुड्या पूजिती मायराण्या ॥२॥
अगाडे बगाडे करिती नवस । ते काय आस पुरविती ॥३॥
चोखा म्हणे ऐसे आंधळे आहे जन । नाशिवंत धन मागताती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २७४
📿 न देखवे डोळा ऐसा हा
274.
न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥१॥
काय तुम्ही येथे नसालसे झाले । आम्ही न देखिले पाहिजे हे ॥धृपद॥
परचक्र कोठे हरीदासांच्या वासे । न देखिजेत देशे राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणे देवा जिणे झाले ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 ज्ञानेश्वर स्तुती›
📿 अभंग क्र. २७५
📿 नामयाचा गुरु । तो हा
275.
नामयाचा गुरु । तो हा सोपान सद्गरु ॥1॥
करविरी करुनी वस्ती । ब्रम्हपुरी तिशी म्हणती ॥2॥
माझ्या जिवींच्या जीवना । ह्रुदयी राहे तू सोपाना ॥3॥
चित्त उद्धव ज्याची सत्ता । जनी म्हणे माझ्या ताता ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २७५
📿 काय म्या मानावे हरीक
275.
काय म्या मानावे हरीकथेचे फळ । तरिजे सकळ जनी ऐसे ॥१॥
उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडे विठ्ठला परचक्र ॥धृपद॥
पापाविण नाही पाप येत पुढे । साक्षसी रोकडे साक्ष आले ॥२॥
तुका म्हणे जेथे वसतील दास । तेथे तुझा वास कैसा आता ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 भाव›
📿 अभंग क्र. २७६
📿 प्रकरण :- ॥ भाव ॥
276.
प्रकरण :- ॥ भाव ॥
आमुचा आम्ही केला भावबळी । भावे वनमाळी आकळीला ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । भावे देव शरण भाविकासी ॥२॥
निज भावबळे घातिलासे वेढा । देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २७६
📿 भीत नाही आता आपुल्या
276.
भीत नाही आता आपुल्या मरणा । दुःखी होता जना न देखवे ॥१॥
आमची तो जाती ऐसी परंपरा । का तुम्ही दातारा नेणा ऐसे ॥धृपद॥
भजनी विक्षेप तेचि पै मरण । न वजावा क्षण एक वाया ॥२॥
तुका म्हणे नाही आघाताचा वारा । ते स्थळी दातारा ठाव मागे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २७७
📿 कोण जाणे कोणा घडे उप
277.
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥
आता माझा श्रोता वक्ता तूंची देवा । करावी ते सेवा तुझीच म्या ॥धृपद॥
कुशळ चतुर येथे न पवती । करितील रिते तर्क मते ॥२॥
तुका म्हणे केणे जाले एके घरी । मज आणि हरी तुम्हा गाठी ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 सेना न्हावी चरित्र›
📿 अभंग क्र. २७८
📿 सेना न्हावी भक्त भला
278.
सेना न्हावी भक्त भला । तेणे देव भुलविला ॥1॥
नित्य जपे नामावळी । लावी विठ्ठलाची टाळी ॥2॥
रुप पालटोनि गेला । सेना न्हावी विठ्ठल झाला ॥3॥
काखे घेउनी धोकटी । गेला राजियाचे भेटी ॥4॥