जीव जीती जींवना संगे
2260.
जीव जीती जींवना संगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥१॥
जया चित्ती जैसा भाव । तया जविळ तैसा देव ॥धृपद॥
सकळा पाडीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥२॥
तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥
अर्थ :
जगातील सर्व प्राणिमात्र हे पाण्यावरच जीवन जगत असतात परंतु असे असले तरीदेखील मासा पाण्यातून बाहेर काढला की पाण्याच्या वियोगाने लगेच तो मरण पावतो म्हणजे त्याला त्याचा वियोग सहन होत नाही. म्हणजेच सर्व तर देवाला मानतातच परंतु खरा जो परमर्थिक आहे त्याला देवा वाचुन जमतच नाही याचा अर्थ असा की ज्याचा जसा भाव असेल तशा प्रकारचा देव त्याच्या जवळ असतो. सर्वांना सूर्यकिरण तर लागतेच परंतु सूर्यकिरणांपासून उमलनारे कमळ सूर्यकिरण अंगावर पडल्या वाचून उमलत नाही म्हणजे त्याचे जीवनच सूर्यकिरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलांची काळजी त्याच्या आईलाच असते त्याप्रमाणे जो जसा देवाला भजतो तशा प्रकारची काळजी देव त्याची घेतो.
