🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ३१
📿 येणे जाणे दोनी खुंटल
31.
येणे जाणे दोनी खुंटले मारग । अवघा केला त्याग इंद्रियांचा ॥१॥
एक धरिला मनी पंढरीचा राणा । वेदशास्त्र पुराणा अकळ तो ॥२॥
आगमाची आटी निगमा न कळे । बहु शीणले वाखाणिता ॥३॥
बंका म्हणे तो हा पहा विटेवरी । पाउले गोजिरी कर कटीं॥ ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ३१
📿 करुणा सुणो स्याम मेर
31.
करुणा सुणो स्याम मेरी, मै तो होय रही चेरी तेरी॥
दरसण कारण भई बावरी बिरह-बिथा तन घेरी ।
तेरे कारण जोगण हूंगी, दूंगी नग्र बिच फेरी॥
कुंज बन हेरी-हेरी॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ३१
📿 चरणी घागऱ्या धुळ घुळ
31.
चरणी घागऱ्या धुळ घुळर । त्यापरि वाकि वाजति मंजुळ र ॥
कैश्या गोपिका शोभति दोहि भागिर । आपण कृष्ण खेळता कैसा रंगिर ॥
कैसा गोपाळास देतो शोभा र । बोधला म्हणे हा उभा भीमातिरी ।
कैसा सवंगड्या वाटितो सिदोरी र ॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ३२
📿 परदारा परधन परनिंदा
32.
परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनिया भजन हरीचे करा ॥१॥
सर्वांभूती कृपा संताची संगती । मग नाही पुनरावृत्ती जन्म मरण ॥२॥
शास्त्रांचे हे सार वेदांचे गव्हार । ते नाम परिकर विठोबाचे ॥४॥
नामा म्हणे न लगे साधन आणिक । दिधली मज भाक पांडुरंगे ॥५॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ३२
📿 जोडोनिया हात वंदिला
32.
जोडोनिया हात वंदिला कृतांत । ह्मणे माझा हेत इतुकाची ॥१॥
सर्वसुखाहूनि हेचि वाटे गोड । संसाराची ओढ मोडवेना ॥२॥
मृग पक्षीयाचे कळावे बोलणे । सर्व कांही येणे कार्यसिद्धी ॥३॥
इतुकी आहे हो माझी ही वासना । पुरवूनि स्वस्था - ना जावे तुम्ही ॥४॥
32.
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकी मात जयाची ॥१॥
केला भगवद्गीते अर्थ । ऐसे समर्थ तिही लोकी ॥२॥
बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवाते उपदेशिती ॥३॥
एका जनार्दनी समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३२
📿 तुझ्या निजरुपाकारणे
32.
तुझ्या निजरुपाकारणे । वेडावली षड्दर्शने ॥1॥
परि सोय न कळे त्यासी । समीप असता देवासी ॥2॥
चारीश्रमे हो कष्टती । वेदशास्त्रे धुंडाळिती ॥3॥
परि कवणे रीति तुला । न जाणवे जी विठ्ठला ॥4॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ३२
📿 येरी म्हणे मज काय दे
32.
येरी म्हणे मज काय देता स्वामी । उच्छिष्टाचे आम्ही धणी असो ॥१॥
तुमचे कृपेचा प्रसाद तुम्ही ठेवा । तोचि प्रियदेवा आहे आम्हा ॥२॥
येरू म्हणे घास घेई माझा करी । मूल ते निर्धारी होईल तुज ॥३॥
ऐकता आनंदे घाली लोटांगण । वंदिले चरण जीवे भावे ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ३२
📿 चलो रे प्राणि मन राम
32.
चलो रे प्राणि मन राम सुलावू । राम रे ऐक राम विना कुछ पाऊ ॥
किनका बेटा किनकी बेटी । ऐक राम बिन फजिती झुटी ॥
किनका बित किनका गात । ऐक राम बिना कछु पाना गत ॥
किनक्या गाया किनक्या म्हैसी । ऐक राम बिना हे महिर सोपरदिसे ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ३२
📿 उपजे ते मरे मरे ते त
32.
उपजे ते मरे मरे ते ते उपजे । जन्म येरझारे एकरुपे ॥१॥
ते हे कृष्णनाम गोपीसंगे मेळे । नंदाघरी सोहळे बाळक्रीडा ॥२॥
अमर अमरे अमर कंद खरे । होऊनि गोजिरे दुध मागे ॥३॥
निवृत्ति परिचार सर्व हा गोपाळ । पूजी दिनकाळ आत्माराम ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ३३
📿 निरंतर तुम्ही करावा
33.
निरंतर तुम्ही करावा विचार । भवाब्धी चा पार होय कैसा ॥१॥
जन्म गेले वाया विषयाचे संगे । भुलले वाउगे माया मोहे ॥२॥
अवघा करीता संसाराचा धंदा । वाचे वदा सदा हरीनाम ॥३॥
सर्वभावे एका विठोबाते भजा । आर्ते करा पूजा हरीभक्त ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ३३
📿 श्रीगुरुसारिखा असता
33.
श्रीगुरुसारिखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे । मनाचिया जोगे सिद्धी पावे ॥२॥
कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजो जी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो । आता उद्धरिलो गुरुकृपे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , काकड आरती अभंग›
📿 अभंग क्र. ३३
📿 तुझिये निढळी कोटी चं
33.
तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे । कमल नयन हास्य वदन हासे ॥१॥
हाल का रे कृष्णा डोल का रे । घडिये घडिये घडिये गुज बोल का रे ॥२॥
उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविवरू विठ्ठलु नाहो ॥३॥
33.
तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी अहोरात्री ।
तया सायुज्यता मुक्ति । ब्रम्हस्थिती सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरे ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव ।
तया ब्रम्हपदी ठाव । ऐसे शिवादिदेव बोलिले ॥२॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३३
📿 निगमाचे शाखे आगमाचे
33.
निगमाचे शाखे आगमाचे फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचे गुज । सकळा निजबीज विठ्ठल हा ॥२॥
निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस । तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तू जगाचे जीवन । संतांचे मनरंजन विठ्ठल हा ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ३३
📿 नामाचा भरंवसा मानिला
33.
नामाचा भरंवसा मानिलासे सार । उतरले पार भवनदी ॥१॥
नाम हे सोपे नाम हे सोपे । नाम हे सोपे मुखी गाता ॥२॥
नामाची आवडी सदा सर्वकाळ । नाही काळ वेळ नाम गाता ॥३॥
नामेंचि जन तरती संसारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ३३
📿 वासना उडाली तृष्णा म
33.
वासना उडाली तृष्णा मावळली । कल्पना गळाली अहंकृती ॥१॥
तोंची भक्त जाणा दया शांती वसे । काम क्रोध फासे न बांधी त्या ॥२॥
मोह ममतेचे तोडोनिया जाळे । केले निजबळे तृणप्राय ॥३॥
बंका म्हणे तोचि प्राणाचाही प्राण । आणिक प्रमाण नाही मज ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ३३
📿 कागळ कोण लेई जायरे म
33.
कागळ कोण लेई जायरे मथुरामा वसे रेवासी मेरा प्राण पियाजी॥धृ०॥
ए कागळमा झांझु शू लखिये । थोडे थोडे हेत जणायरे॥१॥
मित्र तमारा मळवाने इच्छे । जशोमती अन्न न खाय रे॥२॥
सेजलडी तो मुने सुनी रे लागे । रडता तो रजनी न जायरे॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३३
📿 सदा तळमळ । चित्ताचिय
33.
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥
त्याचे दर्शन न व्हावे । शव असता तो जिवे ॥धृपद॥
कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥
नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ३३
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ३३
📿 धीराचे पै धीर उदार त
33.
धीराचे पै धीर उदार ते पर । चोखाळ अमर अभेदपणे ॥१॥
ते हे चतुर्भुज कृष्णरुपे खेळे । माजि त्या गोपाळे छंदलग ॥२॥
किडाळ परते चोखाळ अरुते । मी माझे हे कर्ते तेथे नाही ॥३॥
निवृत्ति धर्मता विचारे चोखाळ । सर्वत्र गोपाळ सखा आम्हा ॥४॥
34.
धन्य देहु गांव पुण्यभूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥२॥
कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगी ते माता रखुमादेवी ॥३॥
गरुडपारी उभा जोडूनिया कर । अश्वत्थ समोर उत्तरामूख ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ३४
📿 घाव घालू जाता देखिले
34.
घाव घालू जाता देखिले नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावे ॥१॥
परी ते होणार कदापि चुकेना । तैसीच वासना धांव घाली ॥२॥
धाकुटी हरणी पाडसे धाकुटी । सांडी उठाउठी आली तेथे ॥३॥
पाहो जाता पाशी गुंतला तो मृग । तेव्हा काय मग केले तिने ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३४
📿 पाहता पाहता वेधियेला
34.
पाहता पाहता वेधियेला जीव । सुखाचा सुखसिंधू पंढरीराव ॥१॥
माझा हा मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥
भवसागराचा दाता । विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणता ॥३॥
उभा राहुनि महाद्वारी । चोखामेळा दंडवत करी ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ३४
📿 नामाचे चिंतन करा सर्
34.
नामाचे चिंतन करा सर्वकाळ । नाही काळ वेळ नामालागी ॥१॥
सुलभ है सोपे नाम आठविता । हरि हरि म्हणता मोक्षमुक्ती ॥२॥
सायासाचे नाही येथे हे साधन । नामाचे चिंतन करा सुखे ॥३॥
नामाचे सामर्थ्य जपता श्रीहरि । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ३४
📿 संसार दुःखे पीडिलो द
34.
संसार दुःखे पीडिलो दातारा । किती येरझारा जन्म मरण ॥१॥
सोडवी गा देवा भवाची काचणी । जातो आडरानी विषयसंगे ॥२॥
भवाचिया डोही बुडतो वेळोवेळा । का नये कळवळा तुज देवा ॥३॥
बंका म्हणे तुम्ही जरी मोकलिले । कवणाते वहिले शरण जाऊ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३४
📿 जया नाही नेम एकादशीव
34.
जया नाही नेम एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत सर्व लोकी ॥१॥
त्याचे वय नित्य काळ लेखीताहे । रागे दात खाय कराकरा ॥धृपद॥
जयाचिये द्वारी तुळसीवृंदावन । नाही ते स्मशान गृह जाणा ॥२॥
जये कुळी नाही एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ३४
📿 चंद्र चकोरांचा पाळित
34.
चंद्र चकोरांचा पाळिता तयाचा । तैसा देव आमचा पांडुरंग ॥
माऊली बालका घडिघडी पाहे देखा । तैसा आमचा सखा पांडुरंग ॥
सकळ आमचा भार चालवितो दातार । काये उपकार सांगो आता ॥
बोधला म्हणे देवा तुज मग नायक आहे । जन्मोजन्मी पाय दावी मज ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ३४
📿 विश्रामधर्मता आश्रमप
34.
विश्रामधर्मता आश्रमपूर्णता । आपरुप कथा निमे जेथे ॥१॥
ते हे कृष्णबाळ गोपिकांसि खेळे । नंदाघरी सोहळे आनंदाचे ॥२॥
कथा त्या कथिता पूर्ण त्या मथिता । अरुप अच्युता सर्व असे ॥३॥
निवृति समाधान कृष्ण हे चोखडे । मनोनिग्रह खोड चरणी गोवी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२›
📿 अभंग क्र. ३४
📿 घरोघरी कृष्ण धरिला ब
34.
घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥ पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२॥ गोपिका धांवती घेऊनिया कृष्ण । न कळे विंदान कांही केल्या ॥३॥ घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनी ॥४॥ एका जनार्दनीदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिका ॥५॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ३५
📿 जळा \जळी बुडबुडे देख
35.
जळा \जळी बुडबुडे देखता देखता । क्षण न लागता दिसेनाती ॥१॥
तैसा हा संसार पाहता पाहता । अंतकाळी हाता काय नाही ॥२॥
गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संसार दिसे खरा ॥३॥
नामा म्हणे तेथे काही नसे बरे । क्षणाचे हे सर्व खरे आहे ॥४॥