🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. १९
📿 अरे विठया विठया । मू
19.
अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया ॥1॥
तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥2॥
तुझे गेले मढे । तुला पाहून काळ रडे ॥3॥
उभी राहूनि आंगणी । शिव्या देत दासी जनी ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७›
📿 अभंग क्र. १९
📿 ब्रह्मादिका आठवु तो
19.
ब्रह्मादिका आठवु तो । शिवध्यान ध्यानकु तो गे बाई ॥
गौरी जाप्य सहस्त्रनामी तो । पुण्यपावन त्रैलोक्य तो गे बाई ॥
रखुमादेविवरू तो । सहजपूर्ण बोधू तो गे बाई ॥
अर्थ :
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १९
📿 कोण या पांगिला होइल
19.
कोण या पांगिला होइल संसारा । कन्या पुत्र दारा त्यजोनिया ॥१॥
का हे गुंतले वाया मृगजळा । का यांसी कंटाळा येईच ना ॥२॥
का हे नाठविती हरिनाम चित्ती । येता जाता फजिती किती होती ॥३॥
का हे न धरीती संत समागम । कासयाचा भ्रम पडिला यांसी ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १९
📿 कौतुके आनंदे लोटहा क
19.
कौतुके आनंदे लोटहा कांही काळ । तो आले असे फळ प्रसादाचे ॥१॥
चोखियाची कांता जालीसे गार्भीण । लागलासे पूर्ण नववा मास ॥२॥
स्वभावे विनंती करी पतीलागी । घरी नाही सामोग्री कैसे करू ॥३॥
बंका म्हणे ऐसी ऐकोनिया मात । निघाला त्वरित बहिणी घरा ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १९
📿 मज नामाची आवडी । संस
19.
मज नामाची आवडी । संसार केला देशधडी ॥१॥
सापडले वर्म सोपे । विठ्ठल नाम मंत्र जपे ॥२॥
नाही आणिक साधन । सदा गाय नारायण ॥३॥
निर्मळा म्हणे देवा । छंद येवढा पुरवावा ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १९
📿 एक एक म्हणती अवघे लो
19.
एक एक म्हणती अवघे लोक । एकचित्ते टेक नेणवेची ॥
एक दावुनिया ठाकिती आणिका । पदरासी ढका लागो नेदी ॥
बोधला म्हणे ऐशा केवी होये गती । कुळासहित बुडती नर्कपाशा ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. १९
📿 राम नाम खेती राम नाम
१९.
राम नाम खेती राम नाम वारी । हामरे धन बाबा बनवारी ॥१॥
या धनकी देशहु आधी काई । तसकर हारे नलगे कोई ॥२॥
दहदिसी राम रह्या भरपुरी । सतनी नीयरे झाकत दुरी ॥३॥
नामदेव कहे मेरे करम न सोई । क्रतम साईसी करे न कोई ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नामदेवाची हरिगुणवर्णनाची उत्सुकता›
📿 अभंग क्र. १९
📿 नामदेवाची हरीगुणवर्ण
19.
नामदेवाची हरीगुणवर्णनाची उत्सुकता.
वेळोवेळा तुला बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक ॥१॥
मागे बहुतांनी केले रे प्रबंध । तुझे पाहूनि छंद वेडाचलो ॥२॥
माथा ठेऊनि हात बोले विश्वाचा जो बाप । वर्णिरे प्रताप नामदेव ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १९
📿 ध्येय ध्यान मनी उन्म
19.
ध्येय ध्यान मनी उन्मनी साधनी । लाविता निशाणी ध्यान मागे ॥१॥
ते रुप सधन गुणागुण संपन्न । ब्रह्म सनातन नांदे विटे ॥२॥
विठ्ठल नाम सार ऐसाचि निर्धार । मुक्ति पारावार ती अक्षरी ॥३॥
निवृत्ति निवांत राहिला निश्चिंत । केला मथीत पुंडलिका ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत एकनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २०
📿 जगाचिये नेत्री दिसे
20.
जगाचिये नेत्री दिसे तो संसारी । परि तो अंतरी स्फटिक शुद्ध ॥१॥
वायांची हांव न धरी काही पोटी । वाउगी ती गोष्टी न करी जगा ॥२॥
स्त्रियापुत्र धन नाही तेथे मन । इष्टमित्र कारण नाही ज्याचे ॥३॥
एकाजनार्दनी प्रपंच परमार्थ । सारिखाचि होत तया लागी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २०
📿 अग्नी जाळी तरी न जळत
20.
अग्नी जाळी तरी न जळती पांडव । हृदयी माधव धरिला म्हणोनी ॥१॥
अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ । हृदयी देव बोल धरिला म्हणोनी ॥२॥
अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत । हृदयी सीताकांत म्हणोनिया ॥३ ।
अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद । हृदयी गोविंद म्हणोनिया ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. २०
📿 होऊनि हरण राहिला ते
20.
होऊनि हरण राहिला ते वनी । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥
जातीच्या स्वभावे करिती विहार । चित्त झाले स्थिर एकमेका ॥२॥
धाकुटीला दोन्ही पाडसे गोजिरी । दुजी गरोदरी पूर्ण मास ॥३॥
नामा म्हणे पुढे काय झाली गती । कथेची संगति ऐका बरी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. २०
📿 अइकाल परी ऐसे नव्हे
20.
अइकाल परी ऐसे नव्हे बाई । न संडावी या सोई भ्रताराची ॥१॥
नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविले ते ॥२॥
तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशी ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. २०
📿 हाती घेऊनिया काठी ॥त
20.
हाती घेऊनिया काठी ॥तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥
नेऊनि निजविले स्मशानी । माणसे जाळी ते ठिकाणी ॥२॥
काढिले ते ओढे । मागील उपचाराचे पुढे ॥३॥
नाही वाटो आला भेव । सुख दु:ख भोगिता देव ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. २०
📿 अहो क्रोधे यावे कोठे
20.
अहो क्रोधे यावे कोठे । अवघे आपण निघोटे ॥१॥
ऐसे कळले ज्याला पूर्ण । जन तेची जनार्दन ॥२॥
ब्रीद बांधिले चरणी । नये दाविता करणी ॥३॥
वेळ क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरपूर महात्म्य अभंग›
📿 अभंग क्र. २०
📿 वाराणसी गया पाहिली द
20.
वाराणसी गया पाहिली द्वारका । परि नये तुका पंढरीचा ॥१॥
पंढरीसी नाही कोणा अभिमान । पाया पडे जन एकमेका ॥२॥
तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरी यम नये ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 गुरुवारचे अभंग›
📿 अभंग क्र. २०
📿 ज्ञानाचा सागर । सखा
20.
ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
मरोनिया जावे । बा माझ्या पोटा यावे ॥२॥
ऐसे करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
जावे वोवाळुनी । जन्मोजन्मी दासी जनी ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २०
📿 रात्रंदिवस मन करी तळ
20.
रात्रंदिवस मन करी तळमळ । बहु हळ हळ वाटे जीवा ॥१॥
काय करू आता पाउले न दिसती । पाडिलीसे गुंती न सुटे गळे ॥२॥
बहु हा उबग आला संसाराचा । तोडा फांसा याचा मायबापा ॥३॥
निर्मळा म्हणे आता दुजेपण । चोखियाची आण तुमहा असे ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. २०
📿 सांवरा म्हारी प्रीत
20.
सांवरा म्हारी प्रीत निभाज्यो जी॥
थे छो म्हारा गुण रा सागर, औगण म्हारू मति जाज्यो जी ।
लोकन धीजै म्हारो मन न पतीजै, मुखडारा सबद सुणाज्यो जी॥
मै तो दासी जनम जनम की, म्हारे आंगणा रमता आज्यो जी ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २०
📿 एक दिन तु एक दयाळू ।
20.
एक दिन तु एक दयाळू । दयाळू करितसे सांभाळ रात्रंदिवस ॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या राशी । सांगो कोणापाशी तुजविण ॥
मी अंतरीची खूण तूचि एक जाणना । सांगो या अनंता कोणापाशी ॥
एक मशयेक पडिलो तुझे द्वारी । लाज सर्वापरी आहे तुज ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. २०
📿 ऐसो राम राय अंतर जान
२०.
ऐसो राम राय अंतर जानी । जैसे दरपन माह बदन परवानी ॥१॥
बसे घटाघट लीप न झिपे । बंधन मुक्त जात न दिसे ॥२॥
पानी माहे देख मुख जैसा नामेको स्वामी विठल ऐसा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 हरिगुण वर्णन श्रवणफल›
📿 अभंग क्र. २०
📿 हरीगुणवर्णन श्रवणफळ.
20.
हरीगुणवर्णन श्रवणफळ.
करील जो प्रश्र सांगेल जो कथा । श्रवण करिता उद्ध-रती ॥१॥
कथा भागिरथी स्नान जे करिती । त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥
भागीरथी स्नाना श्रम लागे फार । करावे एकग्न मन येथे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. २१
📿 रामनाम तू भजले प्यार
21.
रामनाम तू भजले प्यारे कायकू मगरूरी करता है ।
कच्ची मिटीका बंगला तेरा पाव पलखमे गिरता है ॥धृ॥
बम्मन होकर पोथी बांचे स्नान तरपन करता है ।
सबकाल सुचिल रहत है वो क्या साहेब मिलता है ॥१॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत एकनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २१
📿 पोटींचे बाळ अवगुणी व
21.
पोटींचे बाळ अवगुणी वोखटे । परि मायबापा स्नेहो मोठे ॥१॥
तयापरि उदरा आलो जी स्वामी । अवगुणांच्यापरि नुपेक्षा तुम्ही ॥२॥
गुण नाही तेथे कर्म कैचे धड । परिमायबापा वाटतसे कोड ॥३॥
एकाजनार्दनी उद्भव साचे । म्हणोनि हरिदासा कौतुक त्याचे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २१
📿 नाम तेची रूप रूप तेच
21.
नाम तेची रूप रूप तेची नाम । नामरूपा भिन्न नाही नाही ॥१॥
आकारला देव नामरूपा आला । म्हणोनि स्थापिला नाम वेदी ॥२॥
नामा परता मंत्र नाही हो आणिक । सांगती जे मूर्ख ज्ञान हीन ॥३॥
नामा म्हणे नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ भक्त भले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २१
📿 संसार तापे तापलो मी
21.
संसार तापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनि तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥२॥
बहुता जन्मींचा झालो भारवाही । सुटिजे हे नाही वर्म ठावे ॥३॥
विढियेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. २१
📿 देवलोकी इंद्र शेवेसी
21.
देवलोकी इंद्र शेवेसी सादर । भूतसेन चाकर होता तेथे ॥१॥
सेवेसी चुकता होय तू किरात । ऐसे इंद्रे त्याते शापियेले ॥२॥
शेज सज्ज करिता अंतर पाडिले । ह्मणोनी घडले भोग त्यासी ॥३॥
नामा ह्मणे सेवा करणे हे कठीण । त्याने व्हावे जाण सावधान ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. २१
📿 आहांच वाहांच आंत वरी
21.
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हा तैशा ॥१॥
भेऊ नये तेथे भेडसावू कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
तुका म्हणे कांही अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. २१
📿 सांडी कल्पना उपाधी ।
21.
सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥१॥
वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥२॥
पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥३॥
एक मन चेष्टा करी । भूते बापुडी शेजारी ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २१
📿 वडील तू बंधु असोनी अ
21.
वडील तू बंधु असोनी अविचार । केला का निर्धार सांग मज ॥१॥
न पुसता का बा आलासि धांवत । वहिनी आकांत करतील की ॥२॥
येरू म्हणे विठु पुरविले सामोग्री । भार तयावरी घातिलासे ॥३॥
निर्मळा म्हणे ही बरी नोहे गोष्टी । विठोबासी कष्टी करणे काज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २१
📿 विष्णुमय जग वैष्णवाच
21.
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥धृपद॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २१
📿 एव्हडिये दुरुनी आलो
21.
एव्हडिये दुरुनी आलो तुज कारणे भेटी दे । निधाने पांडुरंगे ॥
भेटी मज देसि आहे तुझी दासी । म्हणोनी आलो चरणापाशी ॥
तरी बापा तारिशिल मज । शरण आलो तुज ॥
राख माजी लाज । येहि काळी ॥