जे जे भक्तांची आवडी
2240.
जे जे भक्तांची आवडी । तया संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची ॥१॥
होय तयांचा अंकित । नेणे लहान थोर मात । आपुले आपण पुढे धांवत । न सांगता करी सर्व ॥२॥
एका जनार्दनी कनवाळ । पतितपावन म्हणवी दयाळ । माता स्नेहें परीस सबळ । भक्तांलांगीं स्वये रक्षी ॥३॥
२२४१
जे जे वेळें जे जे लागे । ते न मागतां पुरवी वेगे ॥१॥
ऐसा भक्तांचा अंकित । राहे द्वारी पै तिष्ठत ॥२॥
आवडी गौळियांची मोठी । गायी राखी जगजेठी ॥३॥
भक्ति भावार्थे भुकेला । एका जनार्दनी विकला ॥४॥
