🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११६८
📿 गाजराची पुंगी । तैसे
1168.
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥
काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥धृपद॥
अल्प असे ज्ञान । अंगी ताठा अभिमान ॥२॥
तुका म्हणे लंड । त्याचे हाणोनि फोडा तोंड ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११६९
📿 सकळ साधनांचे सार । म
1169.
सकळ साधनांचे सार । मुखी नामाचा उच्चार ॥१॥
सकळ तपांचे जे सार । मुखी नामाचा उच्चार ॥२॥
सकळ ज्ञानाचें जे सार । मुखी नामाचा उच्चार ॥३॥
सकळ ब्रह्मा विद्येंचें जे घर । एका जनार्दनीचें माहेर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११७०
📿 टिळा टोपी उंच दावी ।
1170.
टिळा टोपी उंच दावी । जगी मी एक गोसावी ॥१॥
अवघा वरपंग सारा । पोटी विषयांचा थारा ॥धृपद॥
मुद्रा लाविता कोरोनि । मान व्हावयासी जनी ॥२॥
तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढे जाती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११७०
📿 साधन सोपे नाम वाचे ।
1170.
साधन सोपे नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी ॥१॥
अहोरात्र वदता वाणी । ऐसा छंद ज्याचे मनी । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥
एका जनार्दनी नाम । भाविकंचें पुरे काम । अभागियांतें वर्म । नव्हे नव्हे सोपारें ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज नमन›
📿 अभंग क्र. ११७१
📿 आचमन करुनि आले सिद्ध
1171.
आचमन करुनि आले सिद्धेशवरा | हरि ऋषीइवरा आर्जविती ॥१॥
निवृत्ति मुक्ताईला त्यागू नये कोणी | आता उत्तरायणी गमन करू ॥२॥
पांच दिवस उत्सव केला चांगदेवा | विश्वाचा विसावा श्रीहरी ॥३॥
वैष्णवांनी समाधि बांधली साजिरी | सुवर्णाचा वरी पिंपळ तो ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज नमन›
📿 अभंग क्र. ११७२
📿 शुद्ध फाल्गुन मासी व
1172.
शुद्ध फाल्गुन मासी वैष्णव हृषीकेशी | पंचमीचे दिवशी सिद्ध जाले ॥१॥
निवृत्तिराज म्हणे जावे म्हाळसापुरी | जेथे ज्ञानेश्वरी पूर्ण जाली ॥२॥
उठावले भार देवऋषीश्वर | केला नमस्कार समाधीसी ॥३॥
सव्यहाते क्षेत्र घेतले वंष्णवांनी | चालली विमाने नेवाशासी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११७३
📿 तेथोनि वैष्णव आले ने
1173.
तेथोनि वैष्णव आले नेवाशासी | सहसमुदायेंसी देवराव ॥१॥
म्हाळसेलागी पूजा केली असे निगुती | राहिले दहा रात्री हृषिकेशी ॥२॥
येथोनि चलावे पुढती शारंगधरा | जावे टोकेश्वरा स्तानालागी ॥३॥
चहू युगा आदि स्थळ पुरातन | आले नारायण गोदातीरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११७३
📿 नाम पावन तिही लोकी ।
1173.
नाम पावन तिही लोकी । मुक्त झाले महा पातकी ॥१॥
नाम श्रेष्ठांचें हे श्रेष्ठ । नाम जपे तो वरिष्ठ ॥२॥
नाम जपे नीलकंठ । वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ ॥३॥
नाम जपे हनुमंत । तेणे अंगी शक्तिवंत ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११७४
📿 देव म्हणे राहणे न घड
1174.
देव म्हणे राहणे न घडेचि येथे | जोवे आता पुढते उद्योगासी ॥१॥
निवृत्तिराज म्हणे शुद्ध प्रतिपदा | जाऊ जी गोविंदा प्रतिष्ठाना ॥२॥
अनादि जे स्थळ दाविले नारायणे | मग प्रतिष्ठाना येते जहाले ॥३॥
चक्रतीर्थी पोहा म्हणती आला थोर | वैष्णवांचे भार उतरले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११७५
📿 माझे मज कळो येती अवग
1175.
माझे मज कळो येती अवगुण । काय करू मन अनावर ॥१॥
आता आड उभा राहे नारायणा । दयासिंधुपणा साच करी ॥धृपद॥
वाचा वदे परी करणे कठीण । इंद्रिया अधीन जालो देवा ॥२॥
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरी उदास मायबापा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११७५
📿 मायभूमि पाहू यांची आ
1175.
मायभूमि पाहू यांची आम्ही डोळा | चलावे गोपाळा सहजासहज ॥१॥
भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदि | तयाची समाधि आपेगांवी ॥२॥
आपेगांवी आले देव ऋषीवर | उतरले भार वैष्णवांचे ॥३॥
धन्य यांचे कुळ घ्य यांचा वंश | धन्य यांचे कुशी योगिराज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११७६
📿 वर्णावी ते थोरी एका
1176.
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगो नये ॥१॥
उदंडचि जाले जन्मोनिया मेले । होऊनिया गेले राव रंक ॥धृपद॥
त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११७६
📿 निवृत्ति मुक्ताईने
1176.
निवृत्ति मुक्ताईने पाहुनि स्थळ डोळा | आलासे उमाळा ओसंडोनी ॥१॥
तात आणि माता गेलीसे येथून | तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा ॥२॥
निवृत्ति ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न | सांभाळी सोपान मजलागी ॥३॥
तुझ्या योगे हरि क्रमियेले काळा | फुटलासे मेळा तापसांचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११७७
📿 नको देऊ देवा पोटी हे
1177.
नको देऊ देवा पोटी हे संतान । मायाजाळे जाण नाठवसी ॥१॥
नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥२॥
तुका म्हणे करी फकिराचे परी । रात्रंदिवस हरी येईल वाचे ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११७७
📿 पाहिली गे माय पूर्वभ
1177.
पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली | बहुत सन्मानिली वैष्णवांनी ॥१॥
चैत्रमास शिवरात्र उत्सव आगळा | जावे पा वेरुळा घृष्णेश्वरा ॥२॥
दशमीचे दिवशी निघाले बाहेर | उठावले भार वैष्णवांचे ॥३॥
वेरूळ नगर असे पुरातन | विश्वकर्मा याने कीर्ति केली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११७८
📿 जोडोनिया धन उत्तम वे
1178.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥धृपद॥
परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रीया सदा बहिणी माया ॥२॥
भूतदया गाईपशूचे पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११७८
📿 नाम तारक हे क्षिती ।
1178.
नाम तारक हे क्षिती । तरलें आणि पुढे तरती ॥१॥
न लगे साधन मंडण । नामे सर्व पापदहन ॥२॥
योगयागांची परवडी । नामापुढे वाया गोडी ॥३॥
नाम वाचे आवडी घोका । म्हणे जनार्दनी एका ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११७९
📿 नाम पावन पावन । नाम
1179.
नाम पावन पावन । नाम दोषांसि दहन । नाम पतीतपावन । कलीमाजी उद्धार ॥१॥
गाता नित्य हरिकथा । पावन होय श्रोता वक्ता । नाम गाऊनि टाळी वाहता । नित्य मुक्त प्राणी तो ॥२॥
एका जनार्दनी नाम । भवसिंधु तारक नाम । सोपे सुगम वर्म । भाविकांसी निर्धारे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११८०
📿 नये वाटू मन । काही न
1180.
नये वाटू मन । काही न देखावे ते भिन्न ॥१॥
पाय विठोबाचे चित्ती । असो द्यावी दिवसराती ॥धृपद॥
नये काकुळती । कोणा यावे हरीभक्ती ॥२॥
तुका म्हणे साई । करील कृपेची विठाई ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११८०
📿 तांपीचिये तीरी मह्तग
1180.
तांपीचिये तीरी मह्तग्राम थोर | असे सोमेश्वर पुरातन ॥१॥
वद्य वैशाख मास दशमी निर्मळ | उष्णकाळ फार तापतसे ॥२॥
तेथ परशुरामे मारियेला बाण | पाहती पुरातन पश्चिमेस ॥३॥
पाहिले माय आम्ही तापीतीर | उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११८०
📿 नाम गाये तो सर्वत्र
1180.
नाम गाये तो सर्वत्र क्षिती । नामे उद्धार त्रिजगती ॥१॥
ज्यांचे उच्चारिता नाम । निवारे क्रोध आणि काम ॥२॥
वेदशास्त्र विवेकीसंपन्न । नामे होताती पावन ॥३॥
नामे उत्तम अधमा गती । एका जनार्दनी ध्यान चिंत्ती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११८१
📿 सकळ देवाचे दैवत । उभ
1181.
सकळ देवाचे दैवत । उभे असे या रंगात ॥१॥
रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरे माप ॥धृपद॥
रंग लुटिला बहुती । शुक नारदादि संती ॥२॥
तुका लुटिताहे रंग । साह्य जाला पांडुरंग ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११८१
📿 नाम हे पावन नाम हे प
1181.
नाम हे पावन नाम हे पावन । दुजा ठाव आन नाही येथे ॥१॥
देखेणाही झाला देखणाही झाला । देखणाही झाला अंधत्वेसी ॥२॥
द्वैत अद्वैत गेलेंक नेणे हारपलें । जाणणे ते गेले जाणते ठायी ॥३॥
एका जनार्दनी नाम ते अनाम । सर्वोत्तम नाम सर्वा ठायी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११८२
📿 उशीर का केला । कृपाळ
1182.
उशीर का केला । कृपाळुवा जी विठ्ठला ॥१॥
मज दिले कोणा हाती । काय मानिली निश्चिंती ॥धृपद॥
कोठवरी धरू धीर । आता मन करू स्थिर ॥२॥
तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कीव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११८२
📿 दोष दुरितांचें पाळें
1182.
दोष दुरितांचें पाळें । पळती बळे नाम घेता ॥१॥
नाम प्रताप गहन । भवतारण हरिनाम ॥२॥
आणीक नको दुजी चाड । नाम गोड विठ्ठल ॥३॥
एका जनार्दनी नाम । तरले तरती निष्काम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११८३
📿 नामे पावन इये लोकी ।
1183.
नामे पावन इये लोकी । नामे पावन परलोकीं । नाम सदा ज्याचे मुखी । धन्य तो नर संसारी ॥१॥
नामे कलिमल दहन । नाम पतीतपावन । नाम दीनोद्भारण । नाम जनार्दन वदता ॥२॥
नाम गाता सुख वाटे । प्रेमे प्रेम ते कोंदाटें । एका जनार्दनी भेटें । नाम गाता निश्चये ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११८४
📿 निवृत्तीने एकांत केल
1184.
निवृत्तीने एकांत केला मुक्ताईशी | गमन कोणे दिवशी आरंभिले ॥१॥
मुक्ताई म्हणे जावे यावे कोठे | अवघे निघोट स्वरूप स्वामी ॥२॥
गर्जता गगन कडाडली वीज | स्वरूपी सहज मिळयेली ॥३॥
मावळला दीप ज्योत कोठे होती | सहज सामावती निरंजनी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११८४
📿 नामे घडे निज शांति ।
1184.
नामे घडे निज शांति । तेथे वसे भुक्ति मुक्ति । नाम तारक त्रिजगती । दृढभावें आठवितां ॥१॥
म्हणोनि घेतलासे लाहो । रात्रंदिवस नाम गावो । कळिकाळाचे भेवो । सहज तेथे पळतसे ॥२॥
मज मानला भरंवसा । नामी आहे निजठसा । एका जनार्दनी सर्वेशा । नाम जपे अंतरी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११८५
📿 आमुच्या स्वस्थानी ना
1185.
आमुच्या स्वस्थानी नाही पा अंधार | अवघी चराचर प्रकाशत्वे ॥१॥
उदयु आणि अस्तु नाही स्वरूपासी | ऐसे मुनि ऋषि जाणताती ॥२॥
आम्ही कधी आलो स्वरूप सोडोन | जावे पालटीन जेथिल तेथे ॥३॥
अंतर बाहेर स्वामीचे स्वरूप | स्वये नंदादीप उजळिला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११८७
📿 जितुका आकार दिसत । न
1187.
जितुका आकार दिसत । नाशिवंत जात लया ॥१॥
एक नाम सत्य सार । वाउगा पसार शीण तो ॥२॥
नामे प्राप्त ब्रह्मापद । नामे देह होय गोविंद ॥३॥
एका जनार्दनी नाम । सर्व निरसे क्रोधकाम ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११८८
📿 लागोनिया पाया विनवित
1188.
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला । करे टाळी बोला मुखे नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा । हा सुखसोहळा स्वर्गी नाही ॥धृपद॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
सकळासी येथे आहे अधिकार । कलयुगी उद्धार हरीनामे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११८८
📿 ऋषि म्हणती हरि पातले
1188.
ऋषि म्हणती हरि पातलेसे विघ्न | आता कैसे प्राण वाचतील ॥१॥
कोणाचिया शुद्धि नाहींचिया कोणा | म्हणती नारायणा मृत्यु आला ॥२॥
कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताई तेव्हा गुप्त जाली ॥३॥
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकघाई | जाली मुक्ताई स्वरूपाकार ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११८९
📿 परेसी न कळे पार । पश
1189.
परेसी न कळे पार । पश्यंतीसी निर्धार । मध्यमा तो स्थिर वैखरीये ॥१॥
चहुं वाचा कुंठीत । ऐसे नाम समर्थ । आम्ही गाऊ सदोदित । सोपे नाम ॥२॥
ऋद्धिसिद्धि धांवे पायी । मुक्तिसे तो अवसर नाही । मुक्तीचा तो उपाय काही । हरिदास ॥३॥
एका जनार्दनी भाव । भावंचि तुष्टे देव । आणीक नको उपाव । नाम स्मरे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 मुक्ताबाई समाधी›
📿 अभंग क्र. ११९०
📿 ज्ञानेश्वरा तुम्ही
1190.
ज्ञानेश्वरा तुम्ही निरविले सोपान | केली बोळवण पांडुरंगा |॥१॥
तो आम्ही उत्सव पाहिलासे डोळा | चांगोबांचा सोहळा दाविला हरी ॥२॥
होती ऐसी नाही जाली मुक्ताई | संत तया ठायी स्फुंदताती ॥३॥
रम्य स्थळ म्हणोनि राहिले एक मास | युगा ऐसे दिवस क्रमियेले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११९१
📿 वेदांचा संवाद श्रुती
1191.
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥१॥
शास्त्रांचे मत नामाचा इतिहास । यापरती भाष नाही नाही ॥२॥
एका जनार्दनी संताचे हे मत । नामे तरती पतित असंख्यात ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११९२
📿 जन्मा येणे घडे पातका
1192.
जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ॥१॥
मग वायाविण दुःख वाहो नये । रुसोनिया काय देवावरी ॥धृपद॥
ठाउकाचि आहे संसार दुःखाचा । चित्ती सीण याचा वाहो नये ॥२॥
तुका म्हणे नाम त्याचे आठवावे । तेणे विसरावे जन्मदुःख ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. ११९२
📿 .श्री निवृतीनाथ महार
1192
.श्री निवृतीनाथ महाराजांची समाधी.
निवृत्तिराज म्हणे भले केले देवा | आता जी केशवा सिद्ध व्हावे ॥१॥
निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी | बोळविली सारी सुखधामा ॥२॥
दाही दिशा चित्त जाले असे सैरा | आता शारंगधरा सिद्ध व्हावे ॥३॥