🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दळण - अभंग १७४ ते १७५›
📿 अभंग क्र. १७५
📿 माया जिवलगा जाता बैस
175.
माया जिवलगा जाता बैसली कृष्ण म्हणे गे आई । दळण दळिण शिणलिसी हात लावु गे आई ।
समान तळी तळींवरी ठेवी पावो ठायीं॥क्षणामाजी मी वो दळीन तु कोतुक पाही ॥धृ.॥
येई गे येई गे येई गे कान्हाई हात लावी तु वहिली । जातीये जाता शिणलीये किती दळुम एकली ।
विसावा निजाचा तू माझा विश्रांती साऊली । येइ गे येई गे कान्हाई ॥१॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 संत स्तुती›
📿 अभंग क्र. १७६
📿 स्त्री जन्म ह्मणवुनी
176.
स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावे उदास । साधुसंता ऐसे केले जनी ॥1॥
संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबाने दिल्ही प्रेमकळा ॥2॥
विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकार त्याचा केला देवे ॥3॥
न विचारिता कुळ गणिका उद्धरिली । नामे सरती केली तिही लोकी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १७६
📿 सोस हा बहुत केलासे ल
176.
सोस हा बहुत केलासे लागाचा । परी वाउगाचि साचा शीण झाला ॥१॥
पुढील चुकले मागील मुकले । दोनी ठाव गेले काय करू ॥२॥
लिगाडाची मासी गोडपणा गुंतली । फडफडे बुडाली अधिकाधिक ॥३॥
चोखा म्हणे मीन गळाते गिळी । मग तळमळी न चले कांही ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 वृषभरूपधारी रिढा सुराचा वध›
📿 अभंग क्र. १७६
📿 वृषभधारी रिडा सुराचा
176.
वृषभधारी रिडा सुराचा वध
वृषभाच्या रूपे आला रिठासूर । इंद्रादि सुरवर भीती त्यासी ॥१॥
बहू देतो त्रास गोकुळींच्या जना । धांवधांव कृष्णा मारी याला ॥२॥
जगजेठी तेव्हा धरितसे शिंगे । सारितसे मागे भुजाबळे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत तुकाराम गौळणी›
📿 अभंग क्र. १७७
📿 काय उणे का करिशील चो
177.
काय उणे का करिशील चोरी । किती सांगो तुज नाइकसी हरी ।
परपरता तू पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसू या जनांचे आघात ।
न पुरे अवसरु हे चि नित्यानित्य । तूंचि सोडवी करूनि स्थिर चित्त वो ॥धृ॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 संत स्तुती›
📿 अभंग क्र. १७७
📿 संतभार पंढरींत । कीर
177.
संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥1॥
तेथे असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥2॥
रंग भरे कीर्तनांत । प्रेमे हरिदास नाचत ॥3॥
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचे जो जिव्हार ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १७७
📿 संसाराचे नाही भय । आ
177.
संसाराचे नाही भय । आम्हा करील तो काय ।
रात्रंदिवस पाय । झालो निर्भय आठविता ॥१॥
आमुचे हे निजधन । जोडियेले तुमचे चरण ।
आणि संतांचे पूजन । हेचि साधन सर्वथा ॥२॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १७८
📿 हीन याती माझी देवा ।
178.
हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥
मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटू कवण्या रीती॥ ॥२॥
माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥
माझ्या गोविंदा गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पिंगा - अभंग १७७ ते १७८›
📿 अभंग क्र. १७८
📿 निराकाराचा आकार झाला
178.
निराकाराचा आकार झाला । त्यांतच माझा पिंगा जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥१॥
माझा पिंगा घालितो धिंगा ॥धृ.॥
पिंग्यापासुन शंकर झाला । ढवळ्या नदींवर बसुन आला । माझ्या पिंग्याने धक्का दिला । माझा ॥२॥
पिंग्यापासुन मच्छ झाला । शंकसुराचा प्राण घेतला । चारी वेद घेउनी आला॥माझा ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १७८
📿 विस्तार हरिचा चराचर
178.
विस्तार हरिचा चराचर जाले । त्या माजी सानुले गुरु दैवत ॥१॥
गुरुविण व्यर्थ विज्ञान न संपडे । ज्ञान हेतुकडे हिंडने व्यर्थ ॥२॥
गुरु परब्रह्म गुरु मात पिता । गुरूविण दैवत नाही दुजे ॥३॥
निवृत्ति म्हणे मज गुरु बोध दिठी । भक्ति नाम पेटी उघडिली ॥४॥
179.
कास घालोनि बळकट । झालो कळीकाळावरी नीट ।
केली पायवाट । भवसिंधु वरुनि ॥१॥
या रे या रे लहान थोर । याति भलती नारीनर ।
करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत तुकाराम गौळणी›
📿 अभंग क्र. १७९
📿 धरिला पालव न सोडी मा
179.
धरिला पालव न सोडी माझा येणे । कांही करिता या नंदाचिया कान्हे ।
एकली न येते मी ऐसे काय जाणे । कोठे भरले या अवघड राणे रे ॥१॥
सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरी ।
सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगता नाही उरी रे ॥धृ॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १७९
📿 वामसव्य दोहीकडे । दे
179.
वामसव्य दोहीकडे । देखू कृष्णाचे रुपडे ॥1॥
आता खाले पाहू जरी । चहूकडे दिसे हरी ॥2॥
चराचरी जे जे दिसे । ते ते अविद्याची नासे ॥3॥
माझे नाठवे मीपण । तेथे कैचे दुजेपण ॥4॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १७९
📿 तुटले पडळ भेटले केवळ
179.
तुटले पडळ भेटले केवळ । सर्व हा गोपाळ गुरुमुखे ॥१॥
न देखो बंधन सर्व जनार्दन । व्यासदिकी खूण सांगितली ॥२॥
ब्रह्मांडविवरण हरिचा हा खेळ । त्यांतील हा वेळ तोडियेला ॥३॥
निवृत्ति बोधला गुरुखुणा बोध । मनाचा उद्बोध हरिचरणी ॥४॥
180.
उदार तू हरी । ऐसी कीर्ति चराचरी ।
अनंत हे थोरी । गर्जताती पवाडे ॥१॥
तुझे पायी माझा भाव । पुसी जन्ममरण ठाव ।
देवाचा तू देव । स्वामी सकळा ब्रम्हांडा ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत तुकाराम गौळणी›
📿 अभंग क्र. १८०
📿 हरिरता चपळा नारी । ल
180.
हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥
अवघ्या अंगे सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥धृ॥
वाचा वाच्यत्वासि न ये । कोठे काय करावे ॥२॥
तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नाम›
📿 अभंग क्र. १८०
📿 अखंड नामाचे चिंतन सर
180.
अखंड नामाचे चिंतन सर्व काळ । तेणे सफळ संसार होय जना ॥१॥
सर्व हे मायिक नाशिवंत साचे । काय सुख याचे मानितसा ॥२॥
निर्वाणी तारक विठोबाचे नाम । येणे भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपे दिननिशी । येणे सदा सुखी होसी जना ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोपांचे खेळ - अभंग १८० ते १८१›
📿 अभंग क्र. १८०
📿 गोपांचे खेळ - अभंग १
180.
गोपांचे खेळ - अभंग १८० ते १८१
खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो ॥१॥
पंचप्राणांचे गडी वाटिले । तेथे जीवशिव नाम ठेविले वो ॥२॥
एका जनार्दनी खेळ मांडिला । शाहाणा तो येथे नाही गुंतला वो ॥३॥
181.
कळे ना कळे ज्या धर्म । ऐका सांगतो रे वर्म ।
माझ्या विठोबाचे नाम । अट्टाहासे उच्चारा ॥१॥
तो या दाखवील वाटा । जया पाहिजे त्या निटा ।
कृपावंत मोठा । पाहिजे तो कळवळा ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत तुकाराम गौळणी›
📿 अभंग क्र. १८१
📿 कोणी सुना कोणी लेंकी
181.
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी स्वतंता ॥१॥
अवघियांची जगनिंद । झाली धिंद सारखी ॥धृ॥
अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥
तुका म्हणे करा सेवा । आले जीवावरी तरी ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नाम›
📿 अभंग क्र. १८१
📿 अवघा आनंद राम परमानं
181.
अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेचि साधन निके जगासी उद्धार । आणिक साचार दुजे नाही ॥२॥
क्रोधांचे न पडता आघात । वाचे गाता गीत राम नाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथे कळिकाळांचा रीघ नाही ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 अक्रुराचे गोकुळी गमन›
📿 अभंग क्र. १८१
📿 अक्रुराचे गोकुळी गमन
181.
अक्रुराचे गोकुळी गमन
कंसासुर सारे करोनि विचार । धाडती अकूर गोकु-ळासी ॥१॥
अकुरा आनंद झाला असे फार । पाहीन श्रीधर डोळे-भरी ॥२॥
आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक । वैकुंठनायक पाहीन मी ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत तुकाराम गौळणी›
📿 अभंग क्र. १८२
📿 मै भुली घरजानी बाट ।
182.
मै भुली घरजानी बाट । गोरस बेचन आये हाट ॥१॥
कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरू देखे गोपाल ॥धृ॥
कहा पग डारू देख आनेरा । देखे तो सब वोहिने घेरा ॥२॥
हु तो थकित भई रे तुका । भागा रे सब मनका धोका ॥३॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८›
📿 अभंग क्र. १८२
📿 सांगाती आमुचिया रे ।
182.
सांगाती आमुचिया रे । विद् गद पावया छंदे रे ॥
नाचे विनोंदे कान्हा रे । विद्गद पावया छंदे रे ॥
निवृत्तिदासा प्रियो रे । विद्गद पावया छंदे रे ॥
अर्थ :
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नाम›
📿 अभंग क्र. १८२
📿 अवघ्या साधनांचे सार
182.
अवघ्या साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
येणे घडे सकळ नेम । वाचे नाम जपतांचि ॥२॥
भाग्ये होय संत भेटी । सांगू गोष्टी सुखाच्या ॥३॥
चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 टिपरी - अभंग १८२ ते १८३›
📿 अभंग क्र. १८२
📿 टिपरी - अभंग १८२ ते
182.
टिपरी - अभंग १८२ ते १८३
खेळसी टिपर्या घाई रे । वाचे हरिनाम गाई रे । टिपरीस टिपरी चुकुं जाता भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥
सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरीयांचा खेळ खेळा रे । एका खेळा दोन्ही गुतला । यमाजी घालीला डोळा रे ॥२॥
वाय खेळ खेळतीसी बाळा रे । सावध होई पाहे डोला रे । एक एका जनार्दनी शरण जाता । चुकशील कळिकाळारे ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १८२
📿 सर्वांघटी वसे तो आम्
182.
सर्वांघटी वसे तो आम्हा प्रकाशे । प्रत्यक्ष आम्हा दिसे गुरुकृपा ॥१॥
विराले ते ध्येय ध्यान गेले मनी । मनाची उन्मनि एक जाली ॥२॥
ठेला अहंभाव सर्व दिसे देव । निःसंदेह भाव नाही आम्हा ॥३॥
निवृत्ति साधन गयनिप्रसादे । सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥४॥
183.
कथा त्रिवेणीसंगम । देव भक्त आणि नाम ।
तेथींचे उत्तम । चरणरज वंदिता ॥१॥
जळती दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारी नर ।
गाती ऐकती सादर । जे पवित्र हरिकथा ॥२॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नाम›
📿 अभंग क्र. १८३
📿 आता माझा सर्व निवेदि
183.
आता माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥
जेथे काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायी चित्त समर्पिले ॥२॥
भय नाही चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळे ॥३॥
चोखा म्हणे आता लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 टिपरी - अभंग १८२ ते १८३›
📿 अभंग क्र. १८३
📿 अनुहत टिपरी घाई खेळ
183.
अनुहत टिपरी घाई खेळ जाणे तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥धृ.॥
मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळे मातला रे ।
खेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे । गोल्हाट योग साधुनि तेणे काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥
निवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे । कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिले घाणा रे ।
184.
यमधर्म सांगे दूता । तुम्हा नाही तेथे सत्ता ।
जेथे होय हरिकथा । सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊ तया गावा । नामधारकाच्या शिवा ।
सुदर्शन यावा । घरटी फिरे भोवती ॥२॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १८४
📿 संतमहानुभाव येती दिग
184.
संतमहानुभाव येती दिगंबर । नम्रतेचे घर विरळा जाणे ॥1॥
निवाले मीपण ते जे ठायी नाही । सोहं शब्द सोई तेथे कैची ॥2॥
पाहता हा कोण दाविता हा कोण । पाहता दाविता हे खूण विरळा जाणे ॥3॥
नामयाची जनी वस्तु झाली । अवघ्यांसी बुडाली परब्रह्मी ॥4॥