🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७९७
📿 (गौळणींची अवस्था)
3797.
(गौळणींची अवस्था)
कोठे मी तुझा धरू गेले संग । लावियेले जग माझ्या पाठी ॥१॥
सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावू चाळा खोटा येथे ॥धृपद॥
रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती । न देखे भोवती मी ते माझी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नीती ३८००›
📿 अभंग क्र. ३८००
📿 नीती ३८००
3800.
नीती ३८००
नीति सांगतो ऐका एक । दास सभेचासेवक । मन टाळू नका एक । कोणी एक॥ध्रु॥सांडावरून जाऊ नये । लांच खाऊ नये । चोहट्यात राहुंनये । कोणी एक ॥१॥ अक्रीत घेऊनये । इमान सोडूं नये । बैमान होऊ नये । कोणीएक ॥२॥ सञ्जनाशीं विटूंनये । नीचासवें वाटूनये । तस्कराशीं पुसू नये । कोणी एक ॥३॥ भक्तिमार्गखंडू नये । कुभांड्यासी तंडु नये । खळासंगे भांडुनये । कोणी एक ॥४॥ सत्पुरूषाशीं छळु नये । शिवेचा गुंडा ढाळू नये । केला नेम टाळु नये । कोणीएक ॥५॥ सद्गुरूसेवा सोडूं नये । कुळधर्मासीमोडू नये । पापद्रव्य जोडू नये । कोणी एक ॥६॥ संपत्ती आलीया माजू नये । अभिमाने फुगु नये । सभा देखोनी लाजू नये । कोणी एक ॥७॥ असत्यवाद करू नये । खोटा संग धरू नये । मोचकाशीमैत्री करू नये । कोणी एक ॥८॥ भलते भरी पडूंनये । अनाचार करू नये । कपट मनी धरूं नये । कोणी एक ॥९॥ जन्मा अलिया स्वभावे । कांहीसार्थक करावे । ऐसे मनी विचारावें । कोणीएक ॥१०॥ एका जनार्दनी भावे । संतचरणी लीनव्हावें । सदा हरिनाम उच्चारावे कोणी एक ॥११॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८०१
📿 करूनी आइती सत्यभामा
3801.
करूनी आइती सत्यभामा मंदिरी । वाट पाहे टळोनि गेली रात्री ।
नये देव येतील काम लहरी । पडिली दुश्चिती तव तो कवाड टिमकारी वो ॥१॥
सर परता तुझा कळला भाव । कार्या पुरते हे दाविसी लाघव ।
बोल बोलतोसी ते अवघी तुझी माव । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥धृपद॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८०२
📿 तव तो हरी म्हणे निजा
3802.
तव तो हरी म्हणे निजांगने वो । लाइ नीच के देसील दोहणे वो ।
मजपे दुजे आले ते देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥
पाहा मनी विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करी स्थिर बुद्धि वो ।
तंट केले हे माझे तुझे उपाधी वो । उघडी डोळे आझुनि तरी धरी शुद्धि वो ॥धृपद॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 डोहो ३८०३›
📿 अभंग क्र. ३८०३
📿 डोहो ३८०३
3803.
डोहो ३८०३
डोहो डोहो डोहो । कान्होबा डोहो । चला जाऊ डोहांत पोहों रे कान्होंबा ॥धृ.॥ त्याडोहाचे अमूप जीवन । डोहो पहाता अति गहन । तया नाही चळण वळण । सर्व जीवांचे निधान ॥१॥ ।डोहो ज्याला हे जीवन । डोहो व्यालासे पवन । डोहो गिळिला पर्वत । डोहो कार्य करी कारण ॥२॥ डोहो न कळे साचार । डोहो क्षर ना अक्षर । एकाजनार्दनीं निर्धार । तरिच पावाल पैलपार ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८०४
📿 कान्हो एकली रे तुजसव
3804.
कान्हो एकली रे तुजसवे चुकले रे । भय वाटे जनी मज अबळा धाकली रे ॥१॥
निघता घरी आई बा वारी । तुजसवे का आलिये हरी ॥धृपद॥
लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलिये ॥२॥
पिकल्या बोरी झाले सामोरी । काय जाणा कोठे राहिला हरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाळणा ३८०४ ते ३८०७›
📿 अभंग क्र. ३८०४
📿 पाळणा ३८०४ ते ३८०७
3804.
पाळणा ३८०४ ते ३८०७
जो जो जो जो जो बाळा केवि येवो । उन्मनी निद्रा लागो तुज गीती गावो ॥१॥ जागजागतां निज पाहीमाझिया तान्हुलीयां । निजी निजनिजुनियां सावधरे कान्हया ॥२॥ तुम्हा चवघींचीकळवळ झणी येथ का करा । निजी निजला कान्हापरतोनी जावे घरा ॥३॥ चवघी जणी वोसरल्यातेथें अनुहत गोष्टी । तया नादातें साधुन परेपरत्यासृष्टी ॥४॥ तेथे उन्मनी निद्रा हारपलें चित्त । देहविदेह खुंटले सगुण गुणातीत ॥५॥ शब्द निशब्दखुंटले आता बोलावें ते काय । निजी निजला एकाजनार्दन माय ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८०६
📿 आता न ये मागे । मी आ
3806.
आता न ये मागे । मी आले याच्या रागे । काय माझे जगे । कोपोनिया करावे ॥१॥
का गो कलित्या कोल्हाळा । तुम्ही भलत्याच सकळा । वेचाला ते बोला । झुटे होती बोलिले ॥धृपद॥
याचे भेटी माझे मन । स्वरुपी ठाकले लोचन । वेगळे ते क्षण आता होऊ नावरे ॥२॥
काज काम नको झाले । बीजे नावरे बोलिले । याचिया भेदिले । कामबाणी अंतर ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८०७
📿 हरीरता चपळा नारी । ल
3807.
हरीरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥
अवघ्या अंगे सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥धृपद॥
वाचा वाच्यत्वासि नये । कोठे काय करावे ॥२॥
तुका म्हणे देवा ऐशा । देव पिशा उदारा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८०९
📿 (बाळक्रीडा अभंग)
3809.
(बाळक्रीडा अभंग)
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम काही कळा ॥२॥
कळा तुजपाशी आमुचे जीवन । उचित करून देई आम्हा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 छापा ३८०९›
📿 अभंग क्र. ३८०९
📿 छापा ३८०९
3809.
छापा ३८०९
अजब है त्रिकुटका घाट । जोतलगी घनदाट । धुंडले ना ओही बात । पलख जोतलगी ॥१॥ उडवत चवरंग गुलाल । झमकर हेजोत ही लाल । महाकारण महाल । बिचमे लालचमकत है ॥२॥ चमक लगी दिनरात । नहीं कछुआदि अंत । समजलेना ओही बात । सहज संगबतावे ॥३॥ खिजमत करले कछु काम । अजमतपावोगे राम । भ्रमर गुंफामे राम । रामनामसुमरले ॥४॥ सुमरलेना नहीं मंत्र । छांडदे सबतंत्र । अनुहात जंत्र । धिमक मृदंग बजावे ॥५॥ बजावे धन् धन् धन् स्वरका बीन । भजन करलेसंगीन । नयन जागे रातदीन । ब्रह्म ताल लगावे ॥६॥ लगावे तो है तयार । करले दिलमों करार । हो जाभवजल पार । मेरे सद्गुरु साहेबकी ॥७॥ साहेबसद्गुरु जनार्दनके प्रतिपाल । एकनाथ तुम्हारे । फकीर में रहता है ॥८॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८१०
📿 (बाळक्रीडा अभंग)
3810.
(बाळक्रीडा अभंग)
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण झाला वसुदेवदेवकीस । वधी बाळे कंस दुराचारी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रहाट ३८१०›
📿 अभंग क्र. ३८१०
📿 रहाट ३८१०
3810.
रहाट ३८१०
हुंडगी निघाली बाजारा । बारिक माझाजुना ॥धृ.॥ दाराची गोधन का तोडाना । मजलारहाट करून का द्याना । माझे रहाटाकडे कांपहाना ॥१॥ तुमचा बैल कांमाराना । मजला तांतकरून कांद्याना । माझे तातांकडे का पहाना ॥२॥ तुमची तरवार का मोडाना । मजलाचात करून कांद्याना । माझ्या चाताकडे का पहाना ॥३॥ तुमचाटाळ का मोडाना । मजलाभिंगरी करून का द्याना । माझ्या भिंगरीकडे का पहाना ॥४॥ तुमची वस्त्रेकां फाडा ना । मजला पिंजुन पिंजुन का द्याना । माझ्या पिंजण्याकडे का पहाना ॥५॥ पिंजुनपिंजुन केला पिळु । नव इंद्रियांखेळु । एका जनार्दनींपिळू ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८११
📿 (बाळक्रीडा अभंग)
3811.
(बाळक्रीडा अभंग)
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवे ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आले ॥२॥
आले अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कोडे ३८१३ ते ३८१६›
📿 अभंग क्र. ३८१४
📿 नाथाच्या घरची उलटी ख
3814.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥ आंत घागरबाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥ आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणीआढ्या लागले ॥३॥ शेतकऱ्याने शेत पेरिलें । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥ हांडी खादलीभात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥। एका जनार्दनी मार्ग उलटा । जो जाणे तो गुरुचाबेटा ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८१५
📿 (बाळक्रीडा अभंग)
3815.
(बाळक्रीडा अभंग)
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरी । आचरणे बरी नाही म्हुण ॥२॥
नसापडे इंद्रचंद्रब्रम्हादिका । अभिमाने एका तळिमात्रे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८१७
📿 (बाळक्रीडा अभंग)
3817.
(बाळक्रीडा अभंग)
वर्म दावी सोपे भाविका गोपाळा । वाहे त्यांच्या गळा पाले माळा ॥१॥
मान देती आधी मागतील डाव । देवा ते गौरव माने सुख ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नवल ३८१७ ते ३८२३›
📿 अभंग क्र. ३८१८
📿 मूळ नाही शेंडा । काय
3818.
मूळ नाही शेंडा । काय म्हणावे त्यागुंडा । वेद अनुवादती प्रचंडा । शास्त्रे भांडती खंडविखंडा ॥१॥ नवलजहालेंबाई नवलजहाले बाई । पाणियाने विस्तवपेटला कोणा सांगावे काई॥ध्रु॥शुन्य होतेंआधी तेथेंजहाले एक । एक पहाता दोनजहालें अलक्ष लक्ष देख ॥२॥ पुरूष नाही स्त्रीनाहीं नाही काही आकार । पहाता पहाणे बुडोनिगेले तेथे कैचा निराकार ॥३॥ ब्रह्मज्ञान घरोघरीकोण तया पुसे । शरण एका जनार्दनी नामगातसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८१९
📿 (बाळक्रीडा अभंग)
3819.
(बाळक्रीडा अभंग)
मने हरीरूपी गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांची धरूनिया रूपे । त्यांच्या घरी त्यापे भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एका दिसे हरी एका लेंक ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नवल ३८१७ ते ३८२३›
📿 अभंग क्र. ३८२२
📿 नवलाचे नवल आज म्या द
3822.
नवलाचे नवल आज म्या देखिले । सागराचे पाणी रांजणासी आले ॥१॥ नवल गेमायेनवलगे माये । गंगा येऊनिरांजणात समाये ॥२॥ निर्मळ पाणी डहुळते झाले । डहुळले पाणी रांजणांत । आले ॥३॥ मृगजळाचें नीर रांजणी भरले । एकाजनार्दनीं नवलचि केले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८२३
📿 (बाळक्रीडा अभंग)
3823.
(बाळक्रीडा अभंग)
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥
म्हणे कृष्णाविण कैसे तुम्हा गमे । वेळ हा करमे वायाविण ॥२॥
वायाविण तुम्ही पिटीता चावटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नवल ३८१७ ते ३८२३›
📿 अभंग क्र. ३८२३
📿 एक नवल देखिले दृष्टी
3823.
एक नवल देखिले दृष्टी । पहाता पहाणेगिळिलें उठाउठी ॥१॥ जे निजे चोजवेना जे निजेचोजवेना । अंधारें सूर्य गिळीला जाणा ॥२॥ कल्पनेविरहित पुत्र झाला । कल्पना गिळुनीआपणची धाला ॥३॥ स्त्री पुरूष नामे नटलाप्राणी । एका जनार्दनी प्रत्यक्ष देखो ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८२४
📿 (बाळक्रीडा अभंग)
3824.
(बाळक्रीडा अभंग)
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळता दिवस गमे ॥१॥
दिवस राती काही नाठवे तयांसी । पाहाता मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखे नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८२८
📿 (बाळक्रीडा अभंग)
3828.
(बाळक्रीडा अभंग)
कुंभपाक लागे तयासि भोगणे । अवघाचि नेणे देव ऐसा ॥१॥
देव ऐसा ठावा नाही जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥
कळला हा देव तयासीच खरा । गाई वत्से घरा धाडी ब्रम्हा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८३१
📿 तयांसवें करी काला दह
3831.
तयांसवें करी काला दहींभात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी ॥1॥
मेळवुनी अवघियांचे एके ठायी । मागे पुढे कांही उरो नेदी ॥2॥
नेदी चोरी करू जाणे अंतरींचें । आपले ही साचे द्यावे तेथे ॥3॥
द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८३२
📿 (बाळक्रीडा अभंग)
3832.
(बाळक्रीडा अभंग)
केला पुढे हरी अस्तमाना दिसे । मागे त्यासरिसे थाट चाले ॥१॥
थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्ण राम तया सोयी ॥२॥
सोयी लागलिया देवाची आवर्ती । बोलविता येती मागे तया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 थाक ३८३४›
📿 अभंग क्र. ३८३४
📿 थाक ३८३४
3834.
थाक ३८३४
थाक रे थाक तुज नाही रे उंचनाक । तुझा देह करीन पाक । आपुली जन्ममरणाचीगोष्टी झाक । सर सर मागे सर ॥१॥ तुझा मायबापठाऊक आहे मला । माझ्या दासीच्या दासीपासूनकी रे झाला । गुरुगम्ये खूण नाही कळलीतुला । कच्चे मडके घेऊन जा आपले घराला ॥२॥ पाठमोरा उभा का राहसी । सन्मुख पाहिले नाहींमसी । तरी उघड्या कर चारी वेशी । पळूनजाशी कोणत्या दारी रे ॥३॥ म्या थाककैकासी दिधला । चंद्र सूर्य उभा केला । इंद्र आहेयेसणीला । काय रे सांगू मुला तुजला । भ्रांतीपडळ झांकून का नाही गेला ॥४॥ माझ्यामुलाचे एक मूल जाण । तू ब्रह्मचारी होऊन । क्षणांत साठ पोरगे होऊन । एका कन्या दान रे ॥५॥ पाराशरासारखा ऋषेश्वर । दिवसाचे करून । अंधकार । रतवी धिवरे नदीतीर । आगस्तिलीलोपामुद्रा । हाही खेळ म्यांच केला ॥६॥ अवघेजाणून प्रपंच सार । त्याला माझा की आधार । जे । राहती निराकार । एका जनार्दनी तत्पर ॥७॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८३५
📿 (बाळक्रीडा अभंग)
3835.
(बाळक्रीडा अभंग)
भक्तीसाठी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥
देव गिळुनिया धरिले मोहन । माय म्हणे कोण येथे दुजे ॥धृपद॥
दुजे येथे कोणी नाही कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 टिळा ३८३५›
📿 अभंग क्र. ३८३५
📿 टिळा ३८३५
3835.
टिळा ३८३५
माझा टिळा माझा टिळा । धाक पडेकळिकाळा । चौघांचा करूनि गुंडाळा । शेष पाताळीघातला की ॥१॥ टिळ्यानेदाविला कैलास । केलागंधर्वाचा नाश । धाक दरारा इंद्रचंद्रास । सुख लागलेतेव्हा धुवास ॥२॥ हा टिळा कोणाचा जाणे । हाटिळा शुद्ध चैतन्यें नीतीनें । महंत विष्णु म्हणतीजाणे । हा टिळा रेखिला यानें ॥३॥ माझ्याटिळ्यापासुन । आकाश पाताळ कैलास । तत्परअसेल त्यांत कोण । सुंदर सगुण निरूपण ॥४॥ हा टिळा शोधुन जाता । नये ब्रह्मादिकांच्या हाता । त्याला नाही मातापिता । मग कैंचा काकाचुलता ॥५॥ ह्या टिळ्याची ऐका खूण । विरंची करीध्यान । ज्यापासून झाला उत्पन्न । केले वेदांचेखंडण । चारी मुक्ति साधिल्या त्याने ॥६॥ टिळातुला नाही हात ना पाये । टिळा स्वरूपी राहे । एकाजनार्दनीं ध्याये । माझा टिळा ॥७॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८३६
📿 (बाळक्रीडा अभंग)
3836.
(बाळक्रीडा अभंग)
नारायण भूती न कळे जयांसि । तया गर्भवासी येणे जाणे ॥१॥
येणे जाणे होय भूताच्या मत्सरे । न कळता खरे देव ऐसा ॥धृपद॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ देहबुद्धी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 किल्ला ३८३६›
📿 अभंग क्र. ३८३६
📿 किल्ला ३८३६
3836.
किल्ला ३८३६
धुम धुम बार उडविला । ऐसा गलीमकोण आला । त्याने किल्ल्यासी वेढा दिला । तोआज ऐकिला ॥१॥ राजा पुसे प्रधानाला । का रेकशाचा आवाज आला । वेढा फौजेचा पडला । कसा वांचवीन जीवित्वाला ॥२॥ फौजेचा आकारपाहिला । तोफा जडल्या रे किल्ल्याला । या रयतीतफितूर झाला । माझा संगती मिळाला त्याला ॥३॥ आता कैसा राहिला किल्ला । या किल्ल्याचा आधारकेला । मुजुमदारानेच फितुर केला । आता आश्रयकोण जाणिला ॥४॥ कोण वांचवील माझ्यापाणाला । प्रधान विसंगीत होऊनि पडला । मातकऱ्याचा पहिला अबुला । विश्वासाचा हुजऱ्यामेला ॥५॥ कोण सांभाळील या किल्ल्याला । किल्ल्याचा पहिलाच पाया पडला । खबर नाहींपायदळाला । तोफेचा म्होरेस्वार गेला ॥६॥ निदानींआश्रा नाही किल्ल्याला । तोंडपुरचा दरवाजा पडला । धक्का लागला गांडियेसी । त्याने मार्गच अवघामोडिला । अंतकाळ आला राजाला ॥७॥ तोफालावून चाही कोण । चाही बुरुज गेले पडून । धुगधुगीत राजाचें मन । मग कशास हो हैराण ॥८॥ यम चोपदार नेती बांधोन । सहस्र अंगालावोन । तप्त अर्गळा मुखी घालून । तप्त भूमीवरचालवून ॥९॥ सुळी दिला राजा जाण । केलेंकर्मे झाडा देऊन । गेले तसेंच उसने देणे । राज्याच्या अंती नर्क जाण ॥१०॥ ऐसे बोलवितीप्रजाजन । शेवटी राजा गेला निर्गुण । सावध म्हणेजनार्दन । धोका झाला ॥११॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८३७
📿 (बाळक्रीडा अभंग)
3837.
(बाळक्रीडा अभंग)
भाव दावी शुद्ध देखोनिया चित्त । आपल्या अंकिता निजदासा ॥१॥
सांगे गोपाळांसि काय पुण्य होते । वांचलो जळते आगी हाती ॥२॥
आजि आम्हा येथे राखियेले देवे । नाही तरी जीवे न वंचतो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाईक ३८३७ ते ३८४८›
📿 अभंग क्र. ३८३७
📿 पाईक ३८३७ ते ३८४८
3837.
पाईक ३८३७ ते ३८४८
काळ गणना कोण लेखे । जो या देखेविठ्ठला ॥१॥ बळीवंत हरिचे दास । आहे ती उदासजीवासी ॥२॥ नेणती कांही भेदाभेद । अंतर शुद्धनिर्मळ ॥३॥ एका जनार्दनी त्यांचा दास । पुरवाआस पायाची ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाईक ३८३७ ते ३८४८›
📿 अभंग क्र. ३८३८
📿 हरिदास जगी बळीवंत ।
3838.
हरिदास जगी बळीवंत । नाही भीतकळीकाळा ॥१॥ मुखी रामनामशस्त्र । करूणापात्रपोटी बहु ॥२॥ जाता कोणी आडवाटें । दावितीगोमटे रूप त्यासी ॥३॥ शरण एका जनार्दनी । त्याची पायवणी वंदीन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८४१
📿 (बाळक्रीडा अभंग)
3841.
(बाळक्रीडा अभंग)
काय आता यासि म्हणावे लेंकरू । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥
माया याची यासि राहिली लपून । कळो नये क्षण एक होता ॥२॥
क्षण एक होता विसरली त्यासि । माझेमाझे ऐसे करी बाळा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाईक ३८३७ ते ३८४८›
📿 अभंग क्र. ३८४१
📿 याची सत्ता स्वामीवरी
3841.
याची सत्ता स्वामीवरी । ऐसे ते बळीपाईक ॥१॥ उदार धीर एक मने । स्वामीकार्या देहदेणें ॥२॥ नधरिती कांही आशा । म्हणोनी सर्वेशापात्र होती ॥३॥ एका जनार्दनी पाईक । मुकुटमणीस्वामी एक ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाईक ३८३७ ते ३८४८›
📿 अभंग क्र. ३८४२
📿 कांहीच सांकडे न घालि
3842.
कांहीच सांकडे न घालिती वाया । स्वामी सन्मुख पाया सरते होती ॥१॥ ऐसे ते पाईकमुगुटमणी देहा । स्वामी त्यांची पदवी मानी । जगी ॥२॥ एका जनार्दनी तया मोल नाही । स्वामीदेतो कांही न घेता ते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८४५
📿 (बाळक्रीडा अभंग)
3845.
(बाळक्रीडा अभंग)
गोपाळा उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥
झाले काय ऐसे न कळे कोणासी । म्हणती तुम्हापासी देव होता ॥२॥
देवासवे दुःख न पवते ऐसे । काही अनारिसे दिसे आजी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाईक ३८३७ ते ३८४८›
📿 अभंग क्र. ३८४५
📿 आणिक पाईक अनेक स्वाम
3845.
आणिक पाईक अनेक स्वामींचे । कार्यकारण साचे जाणती ते ॥१॥ स्वामींचे जैसे मनतैशी पाईकांची सेवा । हे तो माझे जीवानावडेची॥२॥एका जनार्दनी स्वामीमाझा बळी । पाईकपणे रूळी करीन मीची॥३
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८४६
📿 (बाळक्रीडा अभंग)
3846.
(बाळक्रीडा अभंग)
पाषाण फुटती ते दुःख देखोनि । करिता गौळणी शोक लोका ॥१॥
काय ऐसे पाप होते आम्हापासी । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकाचिये डोळा असु बाह्यात्कारी । नाही ती अंतरी जळतील ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाईक ३८३७ ते ३८४८›
📿 अभंग क्र. ३८४६
📿 देहदान देऊनी उदार मि
3846.
देहदान देऊनी उदार मिरविले । स्वामीयासी केले आपुलें घर ।॥१॥ घेऊनी करवतआपुलेनी हातें । शरीर दोन भागातें केलीजिहीं ॥२॥ देऊनी राज्य धन जाहलेसेभिकारी । भिक्षा निरंतरी मागताती ॥३॥ एका जनार्दनींपाईक ऐसे भले । स्वामीस मानले सर्वभावे ॥४॥