वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 233. रावण मंदोदरी संवाद

रावण मंदोदरी संवाद.

🙏 4. संत नामदेव · ABH-083862 · अभंग क्र. २२४३

2243.
रावण मंदोदरी संवाद.

मंदोदरी सांगे रावणाप्रती । स्वप्न देखिले म्या मध्यराती । नेणो वान्नर मिळाले किती । शिळा सागरू बांधिला ॥१॥
दोघे धनुर्धर वीर वान्नर । उतरोनी आले पैलसागर । एकापरीस एकगा वीर । ते बडीवार बोलताती ॥२॥
नेणो त्याचा वळीया आला । लंकेमोवता वेढा घातला । सभामंडप उडोनि नेला । जो केला त्रिकुटेसी ॥३॥
लंकेभोंवता रुधिराचा पूर । रणी पडिला कुंभकर्ण वीर । तो तुमचा सखा सहोदर । निद्रा करी सामास ॥४॥
सत्य तुझी छेदील दश शिरे । येणे रामे रणरंगधीरे । लंका जाळोनी केली जोहरे । अंबरी तुरे गर्जताती ॥५॥
हे स्वप्न सत्य होईल जाणा । लंका दान बिभीषणा । शरण जाई रघुनंदना । नामयाच्या स्वामीसी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग