🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७००
📿 भांडावे तो हित । ठाय
1700.
भांडावे तो हित । ठायी पडा ते उचित ॥१॥
नये खंडो देऊ वाद । आम्हा भांडवलभेद ॥धृपद॥
शब्दासारसे भेटी । नये पडो देऊ तुटी ॥२॥
तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नास ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १७००
📿 तुझे नाम म्हणता सुलभ
1700.
तुझे नाम म्हणता सुलभ अनंता | दुर्लभ म्हणता अंतकाळी ॥१॥
तैसे तुवा मज केशवा करावे | हृदयी भेदावे नाम तुझे ॥२॥
मुके पशु पक्षी वृक्ष आणि पाषाण | तया नारायणा गति कैसी ॥३॥
नामा म्हणे कैसे केशवा सांगणे | अज्ञानी ते नेणे कवर्णेपरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७००
📿 संत भलते याती असो ।
1700.
संत भलते याती असो । परी विठ्ठल मनी वसो ॥१॥
तया घालीन लोळणीं । घेईन मी पायवणी ॥२॥
ज्ञाती कुळासी संबंध । मज नाही भेदाभेद ॥३॥
भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७०२
📿 तुझा विसर नको माझिया
1702.
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥
जाओ राहो देह आता येचि घडी । कायसी आवडी याची मज ॥धृपद॥
कुश्चीळ इंद्रिये आपुलिया गुणे । यांचिया पाळणे कोण हित ॥२॥
पुत्र पत्नी बंधु सोयरी खाणोरी । यांचा कोण धरी संग आता ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १७०२
📿 भागलासि देवा धांव धा
1702.
भागलासि देवा धांव धांवणिया | दाखविसी पाया पांडुरंगा ॥१॥
गजेंद्र गणिका तुम्हा श्रमविले | मी काय उगले परदेशी ॥२॥
सोळा सहस्र आणि गोपी त्या उद्धरती | माझी कींव चित्ती का वा नये ॥३॥
नामा म्हणे आम्हा पुरे तुझा संग वारंवार मग वारी कोण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७०३
📿 ऐसे सत्य माझे येईल अ
1703.
ऐसे सत्य माझे येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥
वचनांसारिखे तळमळी चित्त । बाहेरि तो आत होईल भाव ॥धृपद॥
तरि मज ठाव द्यावा पायापाशी । सत्यत्वे जाणसी दास खरा ॥२॥
तुका म्हणे सत्य निकट सेवके । तरिच भातुके प्रेम द्यावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७०४
📿 आदि वर्तमान जाणसी भव
1704.
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागे पुढे नीस संचिताचा ॥१॥
आता काय देऊ पायापे परिहार । जाणा तो विचार करा देवा ॥धृपद॥
आपुले ते येथे काय चाले केले । जोडावे ते भले हात पुढे ॥२॥
तुका म्हणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईल ते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७०७
📿 मज नाही तुझ्या ज्ञान
1707.
मज नाही तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेता वाटे गोड नाम तुझे ॥१॥
नेणते लेकरू आवडीचे तान्हे । बोलतो वचने आवडीने ॥धृपद॥
भक्ती नेणे काही वैराग्य ते नाही । घातला विठाई भार तुज ॥२॥
तुका म्हणे नाचे निर्लज्ज होऊनि । नाही माझे मनी दुजा भाव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७०७
📿 मनाचेनि मने जहालों श
1707.
मनाचेनि मने जहालों शरणागत । कृपावंत संत मायबाप ॥१॥
धरुनिया आस घातली लोळणीं । मस्तक चरणी माझा तुमच्या ॥२॥
तुमचा मी दास कामारी त्रिवाचा । आणिक मनाचा संकल्प नाही ॥३॥
एका जनार्दनी तुम्ही तो पावन । काय हा मी दीन वानु महिमा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७०८
📿 काय माझे संत पाहती ज
1708.
काय माझे संत पाहती जाणीव । सर्व माझा भाव त्यांचे पायी ॥१॥
कारण सरते करा पांडुरंगी । भूषणाची जगी काय चाड ॥धृपद॥
बोबडा उत्तरी म्हणे हरीहरी । आणीक भीकारी नेणे दुजे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास । करितो मी आस उच्छिष्टाची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७०८
📿 पाहुनिया मनोगत । पुर
1708.
पाहुनिया मनोगत । पुरवा हेत तुम्ही माझा ॥१॥
मग मी न सोडी चरणा । संत सुजाणा तुमचीया ॥२॥
दंडवत घालीन पाया । करा छाया कृपेची ॥३॥
शरण एका जनार्दनी । मुगुटमणी तुम्ही संत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७०९
📿 जीवाचे जीवन अमृताची
1709.
जीवाचे जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण ॥१॥
सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥धृपद॥
गोडाचे ही गोड हर्षाचे ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥२॥
भावाचा निज भाव नावाचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७०९
📿 मी असे तेथे मग तू कं
1709.
मी असे तेथे मग तू कंचा | हा उपजत ठायींचा तोडी वेळु ॥१॥
आपुले करोनि ठेवी तुझे चरणी | न मानिंति कोणी क्षिती नाही ॥२॥
सेवा तुझी देई हेंचि दुजेपण | येर तो अभिमान खंडी माझा ॥३॥
नामा म्हणे देवा आवडसी माझ्या जीवा | सुखरूप केशवा विठ्ठलराजा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७०९
📿 जन्मजन्मातरीचें सुकृ
1709.
जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणे भाग्ये ॥१॥
हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाही हेवा प्रपंचाचा ॥२॥
मागणें ते नाही आणिक तयासी । संत हे सेवेसी झिजवी अंग ॥३॥
एका जर्नादनी सेवेसी मन । रात्रंदिवस ध्यान लागो त्याचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७१०
📿 आता मी सर्वथा नव्हे
1710.
आता मी सर्वथा नव्हे गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥
माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयता पक्ष दोन्ही ॥धृपद॥
बापुडा मी नव्हे दुर्बळ ठेंगणा । पागिला हा कोणा आणिकासी ॥२॥
दृष्ट नव्हो आम्ही अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७१०
📿 जगी जनार्दन मुख्य हा
1710.
जगी जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृति ऐसी ॥१॥
समाधी साधन संतजन । विश्रांतीचे स्थान संतापायीं ॥२॥
योगयाग धारण पंचाग्र्नि साधन । ते हे ध्यान संतापायी ॥३॥
एका जनार्दनी तयांचा सांगात घडो मज निश्चित सर्वकाळ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७११
📿 केले नाही मनी तया घड
1711.
केले नाही मनी तया घडे त्याग । उबगे उद्वेग नाही चित्ती ॥१॥
देवचि हा जाणे अंतरीचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥धृपद॥
त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी । अवघी ते परी विटंबना ॥२॥
तुका म्हणे आपआपणा विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७११
📿 काळ देहासी आला खाऊ |
1711.
काळ देहासी आला खाऊ | आम्ही आनंद नाचू गाऊ ॥१॥
कोण वेळे काय गाणे | हे तो भगवंता मी नेणे ॥२॥
टाळ मृदंग दक्षिणेकडे | माझे गाणे पश्चिमेकडे ॥३॥
नामा म्हणे वा केशवा | जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७११
📿 तुमच्या चरणींक मिठी
1711.
तुमच्या चरणींक मिठी । आता तुटी न करावी ॥१॥
थोराचे जे थोरपण । तुम्हा करणे सहजची ॥२॥
मी पतीत दीन हीन । म्हणोनि शरण तुम्हांसी ॥३॥
पतीत पावन तुम्ही संत । एवढें आर्त पुरवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७१२
📿 हित व्हावे तरी दंभ द
1712.
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाईजे एकांती । अलभ्य ते येती लाभ घरा ॥धृपद॥
आणीका अंतरी निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥
तुका म्हणे बाण हाचि निर्वाणीचा । वाउगी हे वाचा वेचू नये ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७१२
📿 तू एक म्हणोनि मी ऐसा
1712.
तू एक म्हणोनि मी ऐसा जाणे | तुझे नाम जाण विस्तारिले ॥१॥
आता करिसी काय आता करिसी काय | सांपडली सोय रामचंद्रा ॥२॥
चरणीजे आहे ती माझी माय | ईश्वरू तो वाहे शिरकमळी ॥३॥
नामा म्हणे देवा न सोडी मी भावा | जन्मोजन्मी सेवा द्यावी तुझी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७१३
📿 हो का नर अथवा नारी ।
1713.
हो का नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरी ॥१॥
ते मज विठोबासमान । नमू आवडी ते जन ॥धृपद॥
ज्याचे अंतर निर्मळ । त्याचे सबाह्य कोमळ ॥२॥
त्यांचा संग सर्वकाळ । घडो मज हे मंगळ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७१४
📿 हरीची हरीकथा नावडे ज
1714.
हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणता तया वेळ लागे ।
मनुष्यदेही तया नाट लागले । अघोर साधिले कुंभपाक ॥१॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत का होऊन पडिला नाही ।
उपजे मरोनि वेळोवेळा भांड । परि न धरी लंड लाज काही ॥धृपद॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७१५
📿 उपेक्षिला येणे कोणी
1715.
उपेक्षिला येणे कोणी शरणागत । ऐसी नाही मात आईकिली ॥१॥
आता काय ब्रीद सांडील आपुले । ठायीचे धरिले जाणोनिया ॥धृपद॥
माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥
तुका म्हणे रूप आमुच्या कैवारे । धरिले गोजिरे चतुर्भुज ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७१५
📿 हेचि माझी संध्या हें
1715.
हेचि माझी संध्या हेंचि माझे स्नान | तुझ्या पायी मन लागो देवा ॥१॥
हेचि माझी ऋद्धि हेचि माझी सिद्धि | अखंड समाधी पाय तुझे ॥२॥
नामा म्हणे हेंचि देई गा श्रीपती | कथेची विश्रांति जन्मोजन्मी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७१५
📿 पुरवा माझी एवढी आस ।
1715.
पुरवा माझी एवढी आस । करा निजदास संतांचा ॥१॥
इच्छा पुरवा मनीचा हेत । सभाग्य संत दाखवा ॥२॥
आणिक मागणें ते नाही । दुजा नाही आठव नको ॥३॥
घालीन लोळणीं । संतचरणा निशिदिणीं ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७१५
📿 मायबाप तुम्ही संत ।
1715.
मायबाप तुम्ही संत । मी पतित कींव भाकी ॥१॥
करा माझे समाधान । अभय वचन देउनी ॥२॥
मागे तारिले सकळ । उत्तम अधम चांडाळ ॥३॥
तोचि आहे अनुभव । म्हणोनि कींव भाकितसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७१६
📿 आवडी सारिखे संपादिले
1716.
आवडी सारिखे संपादिले सोंग । अनंत हे मग जाले नाम ॥१॥
कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥धृपद॥
हाते जेवी एक मुखी मागे घास । माउली जयास तैसी बाळा ॥२॥
तुका म्हणे माझे ध्यान विटेंवरी । तैसीच गोजिरी दिसे मूर्ती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७१७
📿 धन्य मी मानीन आपुले
1717.
धन्य मी मानीन आपुले संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामी ॥१॥
धन्य जालो आता यासि संदेह नाही । न पडे या वाही काळा हाती ॥धृपद॥
ब्रम्हरस करू भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे पोट धालेचि न धाये । खादलेचि खाये आवडीने ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७१७
📿 माता आणि तात सोयरे ह
1717.
माता आणि तात सोयरे हरिजन | यम नेम नेणे दोन गोष्टी ॥१॥
गोष्ट ते कोणती म्हणाल तुम्ही जरी | वाचे हरिहरि म्हणतसो ॥२॥
नामा म्हणे आम्ही मागतो देवासी | कीर्तनी उपवासी करावे देवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७१८
📿 आवडी न पुरे सेविता न
1718.
आवडी न पुरे सेविता न सरे । पडियेली धुरेसवे गाठी ॥१॥
न पुरे हा जन्म हे सुख साठिता । पुढती ही आता हे चि मागो ॥धृपद॥
मारगाची चिंता पालखी बैसता । नाही उसंतिता कोसपेणी ॥२॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तहान ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७१८
📿 आम्ही दिला जीव तुझिय
1718.
आम्ही दिला जीव तुझिया कीर्तने | पांगुळली मने योगियांची ॥१॥
न बोलवे वाचा न बोलवे कांही | आपेंआप पाही ठाकलो असे ॥२॥
ऐसे तुझे नाम दे गोड गा देवा | घाली वा केशवा हृदयामाजी ॥३॥
नामा म्हणे आम्हा सांपडले वर्म | नित्य वाचे नाम रामकृष्ण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७१९
📿 तुम्ही तंव उदार मायब
1719.
तुम्ही तंव उदार मायबाप संत । करावे कृतार्थ मजलागी ॥१॥
ठेवा माथा हात वंदुं पायवाणी । आणिक दुजे मनी नाहे कांही ॥२॥
गुण दोष याती न पहा कारण । करितो भजन निशिदिनीं ॥३॥
एका जनार्दनी तयाचा मी दास । एवढीची आस पायी मिठी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७२०
📿 फार बोलू काय वांया ।
1720.
फार बोलू काय वांया । जाणवेल पाया चित्त माझे ॥१॥
धन्य धन्य तुम्ही संत । कॄपावंत संसारी ॥२॥
उत्तीर्णपणें मज दासा । पुरवा इच्छा कृपाळुवा ॥३॥
शरण एका जनार्दनी । कृपा करुना तुम्ही संत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७२१
📿 उत्तम घालावे आमुचिये
1721.
उत्तम घालावे आमुचिये मुखी । निवारावे दुःखी होऊ नेदी ॥१॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागे पुढे वारी घातपात ॥धृपद॥
नाही शंका असो भलतिये ठायी । मावळले पाही द्वैताद्वैत ॥२॥
तुका म्हणे भार घेतला विठ्ठले । अंतरी भरले बाह्य रूप ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७२१
📿 सगुण निर्गुण जे का ब
1721.
सगुण निर्गुण जे का बोलिजे | ते तू माझे सर्व पांडुरंगा ॥१॥
आहेसि तितुके तूंचि सर्वागत | मी काय अनाथ वर्णू तुज ॥२॥
चरणींची आवडी न संडावी मने | यापरि पोसणे मायबापा ॥३॥
साक्ष भीमरथी संत पुंडलिक | नाम्याते आणिक न कळे कांही ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७२२
📿 श्रीमुखाची सोय पाहो
1722.
श्रीमुखाची सोय पाहो म्हणो जरी | एवढा मी अधिकारी कैंचा देवा ॥१॥
चरणांजवळूनि नसावे जी दुरी | जन्मजन्मातरी हेचि देई ॥२॥
तुज देता सोपे मजहि तृप्ति अल्पे | सर्वज्ञा साक्षेपे सांगतसे ॥३॥
अनाथाचा नाथ हे ब्रीद साच | न करावे उदास नामा म्हणे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७२२
📿 धन्य आज दिन संतदरुशन
1722.
धन्य आज दिन संतदरुशनाचा । अनंत जन्मांचा शीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्याचे ॥२॥
त्रिविध तापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥३॥
एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७२४
📿 हेंचि देवा मागत |चरण
1724.
हेंचि देवा मागत |चरणसेवा अखंडित ॥१॥
वास द्यावा पंढरीचा | सदा संग हरिदासाचा ॥२॥
जन्म हो का भलते याति | परि मी न चुके हरिभक्ति ॥३॥
नामा म्हणे कमळापती | हेंचि द्यावे पुढतपुढती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७२४
📿 संत आमुचे देव संत आम
1724.
संत आमुचे देव संत आमुचे भाव । आमुचे गौरव संत सर्व ॥१॥
वेदशास्त्रा पुराण मंत्रादि साधन । संतसेवा ध्यान आम्हा धन्य ॥२॥
योगयाग व्रत साधन पसर । संतांठायीं आदर हेंचि बरे ॥३॥
जनीं जनार्दन संतसेवा जाण । एका जनार्दन तोचि धन्य ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १७२५
📿 विणा घेऊनिया करी | उ
1725.
विणा घेऊनिया करी | उभा राउळामाझारी ॥१॥
तहान भूक हरपली | छंद लागला विठ्ठली ॥२॥
कन्या पुत्र बाप माय | त्यांचा आठव तो न ये ॥३॥
नामा म्हणे हेंचि देई | तुझे पायी माझी डोई ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७२६
📿 किती वेळी खादला दगा
1726.
किती वेळी खादला दगा । अझून का जागसी ना ॥१॥
लाज नाही हिंडता गावे । दुःख नवे नित्य नित्य ॥धृपद॥
संवचोरा हाती फासे । देखता कैसे न देखसी ॥२॥
तुका म्हणे सांडिती वाट । तळपट करावया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७२८
📿 निरोप सांगता । न धरी
1728.
निरोप सांगता । न धरी भय न करी चिंता ॥१॥
असो ज्याचे त्याचे त्याचे माथा । आपण करावी ते कथा ॥धृपद॥
उतरावा भार । किंवा न व्हावे सादर ॥२॥
तुका म्हणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७२८
📿 तुम्ही संतजन । माझे
1728.
तुम्ही संतजन । माझे ऐका हो वचन ॥१॥
करा कृपा मजवरी । एकदां दाखवा तो हरी ॥२॥
आहे तुमचे हाती । म्हणोनि येतो काकुळती ॥३॥
एका जनार्दनी म्हणे थारा । संतीं द्यावा मज पामरा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७२९
📿 शूरत्वासी मोल । नये
1729.
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥
केला न संडी कैवाड । जीवेसाठी तो हे होड ॥धृपद॥
धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥
तुका म्हणे हरी । दासा रिक्षतो निर्धारी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७३०
📿 हरीच्या दासा भये । ऐ
1730.
हरीच्या दासा भये । ऐसे बोलो ते ही नये ॥१॥
राहोनिया आड । उभा देव पुरवी कोड ॥धृपद॥
हरीच्या दासा चिंता । अघटित हे वार्ता ॥२॥
खावे ल्यावे द्यावे । तुका म्हणे पुरवावे ॥३॥