संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३०५
📿 पिंडिच्या प्रळयासी स
2305.
पिंडिच्या प्रळयासी सांगेन तुम्हांसी जो का या देहासी होत आहे. ॥१॥
पृथ्वी बोलिजे प्राणी प्राणरंध्र । परिमळ घेउनी जाये ते घर ॥२॥
मग तो नेणे सुमनाचा सुवास । पृथ्वी ते अंशें जीवन मिळे ॥३॥
रसनेसी स्वाद ते जनवृंदा खाद्य । जीवनाचा जो स्वाद तोचि मिळे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३०६
📿 त्रिविधकर्माचे वेगळा
2306.
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले ॥१॥
आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख तो गौरव संता अंगी ॥धृपद॥
हिशेबे आले ते सकळांसी प्रमाण । तेथे नाही आन चालो येत ॥२॥
तुका म्हणे नाही पापपुण्य खती । झाड्याची हुजती हाता आली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३०६
📿 आता उरले ते मत । तेथ
2306.
आता उरले ते मत । तेथे वस्तु सदोदित । त्यासी नाही अंत । कवणे काळी ॥१॥
महाकारण शरीर । ज्याचा अभिमानी ईश्वर । मुर्ध्नीं ते घर । ब्रह्माडीचें ॥२॥
तेथे नाही काळ । त्यासी नाही वेळ । उत्तम स्थळ । पवित्र असे ॥३॥
प्रभा आणि ज्योति । रत्न आणि दीप्ती । किरण आणि गभास्ती । एकरुप ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३०७
📿 मृतिका आणि अग्नी । द
2307.
मृतिका आणि अग्नी । देहासी दहन । वस्तुतें व्यापुन । घेतलीं दोनीं ॥१॥
अग्नीमाजीं अग्निरुप । मृत्तिकामाजीं मृत्तिकारुप । जैसे आपीं आप । मिळोनि गेले ॥२॥
वस्तु नाही एकदेशी । ते सर्वत्र समरसी । जयाचे प्रकाशीं । त्रैलोक्य वर्ते ॥३॥
तैसे मेले आणि जीत । हे अज्ञान भासत । ते वस्तुंतें नांदत । देहींमाजी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३०८
📿 सुखें घेऊ जन्मांतरें
2308.
सुखें घेऊ जन्मांतरें । एक बरें इहलोकी ॥१॥
पंढरीचे वारकरी । होता थोरी जोडी हे॥ध्रु.॥
हे तो आले अनुभवा। पाहावे जीवावरूनि॥२॥
तुका म्हणे केला त्याग । सर्वसंग म्हणऊनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३०८
📿 सक्षत्वे जीत त्याचा
2308.
सक्षत्वे जीत त्याचा होय अंत । विचारे मुरत वस्तुमाजीं ॥१॥
पिंडीचें ते दोन्ही ब्रह्माडींचे दोन्ही । हे प्रळय पुराणीं बोलिलेती ॥२॥
प्रळय आत्यांतिक जेथे संहारत । विवेक आपणचि येत सर्वाठायीं ॥३॥
मग प्रचीत सहज बरवे वाईट वोज । निपजे तेथे दुजे भाव नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३०९
📿 करू जाता सन्निधान ।
2309.
करू जाता सन्निधान । क्षण जन पालटे ॥१॥
आता गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥
हरी दासांचा समागम । अंगी प्रेम विसावा ॥२॥
तुका म्हणे हे चि मन । इच्छादान मागतसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३०९
📿 निरसुनी ज्ञान महविती
2309.
निरसुनी ज्ञान महविती विज्ञान । त्याहुनी अभिन्न स्वरुप माझे ॥१॥
पिंड आणि ब्रह्मांड म्हणिजे अखम्ड । याहुनी उदंड स्वरुप माझे ॥२॥
माया आणि ममत्व शोधुनी शुद्ध सत्व । सत्वाचें निज सत्व स्वरुप माझे ॥३॥
सद आणी चिद म्हणती आनंद । त्याहुनी अभेद स्वरुप माझे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३११
📿 विंचा पीडी नांगी । ज
2311.
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगी ॥१॥
केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥धृपद॥
मधुरा उत्तरी । रांवा खेळे उरावरी ॥२॥
तुका म्हणे रेडा । सुखे जाती ऐशा पीडा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३११
📿 छत्तिसांतील चेतना ।
2311.
छत्तिसांतील चेतना । तोचि पुरुष जाणा । हेंचि निवडुनी अर्जुना । सांगितले ॥१॥
तेची दैवी प्रकृति माया । तेचि बोध आणि तुर्या । ऐसे धनंजया । सांगितले ॥२॥
तेचि ॐकार अर्धं मात्रा । तेंचि महाकारण जाणा परा । एका जनार्दनी सारा । निवाडा केला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३१२
📿 तीर्थाची अपेक्षा स्थ
2312.
तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म । जाणावे ते वर्म बहु पुण्य ॥१॥
बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाही घडी जात वाया ॥धृपद॥
करूनी चिंतन करवावे आणिका । तो या जाला लोका नांव जगी ॥२॥
तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायावरी डोई माझी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३१२
📿 सांगता ते खुण न बिंब
2312.
सांगता ते खुण न बिंबे पोटी । वाया आटाआटीं करुनी काय ॥१॥
जो गुरुचें दास पुर्ण अधिकारी । ब्रह्माज्ञानी सारा तया लोभे ॥२॥
अभ्यास पुर्वीच्या पुण्य लेश जन्माचा । तै ब्रह्माज्ञानाचा लाभ होय ॥३॥
एक जनार्दनी पुर्ण कृपा होता । सहज सायुज्यता पाठी लागें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३१३
📿 जगाचिये नेत्री दिसे
2313.
जगाचिये नेत्री दिसे तो संसारी । परि तो अंतरी स्फटिक शुद्ध ॥१॥
वायांचि हांव नधरी कांही पोटी । वाउगी ती गोष्टी न करी जगा ॥२॥
स्त्रिया पुत्र धन नाही तेथे मन । इष्टमित्र कारण नाही ज्याचे ॥३॥
एका जनार्दनी प्रपंच परमार्थ । सारिखाचि होत तयालागी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३१६
📿 दर्शनाचे आर्त जीवा ।
2316.
दर्शनाचे आर्त जीवा । बहु देवा राहिले ॥१॥
आता जाणसी ते करी । विश्वंभरी काय उणे ॥धृपद॥
येथे जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥
तुका म्हणे जाणवले । आम्हा भले एवढेंच ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३१६
📿 सोहमाची साक्षा मंत्र
2316.
सोहमाची साक्षा मंत्र तोचि दीक्षा । तयाची परीक्षा सांगा मज ॥१॥
सोहमाचे ज्ञान निवडोनियां खूण । अनुभव मज जाण करावा जी ॥२॥
ऐसे श्रोते जन विनंति करुन । एका जनार्दन नमस्कारिला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३१७
📿 देखो तितकें आहे ब्रह
2317.
देखो तितकें आहे ब्रह्मा । वाया सांडीं की भवभ्रम ॥१॥
पोटी नाही परमार्थ । धरिती स्वार्थाचा अर्थ ॥२॥
अर्थ नाही जयापाशीं । अनर्थ स्पर्शेना तयासी ॥३॥
अर्थापाशी असत्य जाण । एका जनार्दनी शरण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३१८
📿 विश्वंभरा वोळे । बहु
2318.
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥
जेथे असे तेथे देखे । मागितले ते आइके ॥धृपद॥
जे जे वाटे गोड । तैसे पुरवितो कोड ॥२॥
तुका म्हणे भेटी । काही पडो नेदी तुटी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३१८
📿 ब्रह्मी नाही भवभ्रां
2318.
ब्रह्मी नाही भवभ्रांति । ब्रह्मी नाही दिवसराती ॥१॥
ब्रह्मी नाही रूपवर्ण । ब्रह्मी नाही काळकरण ॥२॥
ब्रह्मी नाही ध्येयध्यान । ब्राह्मी नाही देवदेवता ॥४॥
ब्रह्मी नाही वर्णाश्रव । ब्रह्मी नाही क्रियाकर्म ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३२०
📿 निरालंब सहज माय पहात
2320.
निरालंब सहज माय पहाता कैसे । सबाह्म अभ्यंतर व्यापुनी पुर्ण अखंड दिसे ।
लक्ष वो अलक्ष पाहता देही देह न दिसे । निर्गुण गुणसी आले अवघे ब्रह्माचि दिसे ॥१॥
ऐसा हा व्यापकु हरि आहे सर्वांठायीं । ज्ञानांजन लेऊनि पाहे देहींच्या देहीं॥धृ०॥
पिंड ब्रह्मांड व्यापुनी अतीत कैसा । आदि अंत ज्याचा न कळे श्रुति मुरडल्या कैशा ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३२२
📿 आम्ही आर्तभूत जिवी ।
2322.
आम्ही आर्तभूत जिवी । तुम्ही गोसावी तो उदास ॥१॥
वादावाद समर्थाशी । काशानशी करावा ॥धृपद॥
आम्ही मरो वेरझारी । स्वामी घरी बैसले ॥२॥
तुका म्हणे करिता वाद । काही भेद कळेना ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३२३
📿 नाही नामरुप गुण कर्म
2323.
नाही नामरुप गुण कर्म । पाहता अवघे परब्रह्मा ॥१॥
पिंडी आणि ब्रह्माडी । भरला असे नवखंडीं ॥२॥
रिता नाही कोठे ठाव । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥
एका जनार्दनी भाव । अवघा माझा गुरुराव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३२४
📿 माझी आता सत्ता आहे ।
2324.
माझी आता सत्ता आहे । तुम्हा पाया हे वरती ॥१॥
एकाविण नेणे दुजा । पंढरिराजा सर्वांगे ॥धृपद॥
पुरवावी केली आळी । जे जे काळी मागेन ते ॥२॥
तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३२४
📿 मी ब्रह्मा जाहलों म्
2324.
मी ब्रह्मा जाहलों म्हणे अंतरी ब्रह्मा नव्हे ऐसे कांही । ब्रह्माविण अनु न दिसे कोठे । तितुके ब्रह्मा पाही ॥१॥
होय नाही ऐसा संशयचि नाही निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्मा नाही तेंचि ब्रह्मा अवघेंचि ब्रह्मा पाहे ॥२॥
वर्णाश्रमधर्म साचार मानुनी यथाविधी आचरती । स्वमताचा देही अभिमान धरुनी पृथक पृथक वाद करिती ॥३॥
पाषांडाच्या बळे होताती तोडागळे भेदे साचि हे अम्हीं ना हो म्हणती । सर्वदा तरी ब्रह्मा आहे ऐसे न कळे तयाप्रती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३२६
📿 आता नये बोलो अव्हेरा
2326.
आता नये बोलो अव्हेराची मात । बाळावरी चित्त असो द्यावे ॥१॥
तुज का सांगणे लागे हा प्रकार । परि हे उत्तर आवडीचे ॥धृपद॥
न वंची वो काही एकही प्रकार । आपणा अंतर नका मज ॥२॥
तुका म्हणे मोहो राखावा सतंत । नये पाहो अंत पांडुरंगा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३२७
📿 करूनि राहो जरी आत्मा
2327.
करूनि राहो जरी आत्माचि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करू ॥१॥
जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥धृपद॥
पुरे पुरे आता तुमचे ब्रम्हज्ञान । आह्मासी चरण न सोडणे ॥२॥
विरोधे विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हाती गर्भवास ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३२७
📿 ब्राह्मण क्षत्रिय वै
2327.
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण चारी । हे स्थान मान निर्धारी तो मी ॥१॥
ब्रह्माचारी गृहस्थ संन्यासी वानप्रस्थ । आश्रम धर्मक समस्त नेव्हे मी ॥२॥
बावन मात्रा चौदा चक्रें सहा शत एकवेस हजार । स्थान मान पवित्र नाही मज ॥३॥
स्थूळ सुक्ष्म कारण महाकारणाचे ज्ञान । चहुं देहाचें बंधन नाही मज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३२९
📿 सर्वविशी आह्मी हेचि
2329.
सर्वविशी आह्मी हेचि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥
पाहिले चि नाही मागे परतोनी । जिंकिला तो क्षणी क्षण काळ ॥धृपद॥
नाही पडो दिला विचाराचा गोवा । नाही पाठी हेवा येऊ दिला ॥२॥
केली लाग वेगी अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३३०
📿 लोह तांबे सोने । रुप
2330.
लोह तांबे सोने । रुपे माती पाषाण । टवाळी भिन्न भिन्न । निर्मित होती ॥१॥
वाती स्नेह भरती । पदार्थ वेगळे दिसती । परि तयामाजी ज्योती । असे एकरुप ॥२॥
तैसे अठरा वर्ण । अत्यंजादि ब्राह्मण । मेरु मशक धरून । भरले जीव ॥३॥
यांचे शरीर भिन्न । आत्मा एक परिपुर्ण । नामरुप जाती वर्ण । नाही तेथे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३१
📿 तू माझा मायबाप सकळ व
2331.
तू माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूचि माझे हित करिता देवा ॥१॥
तू चि माझा देव तू चि माझा जीव । तू चि माझा भाव पांडुरंगा ॥धृपद॥
तू चि माझा आचार तूचि माझा विचार । तू चि सर्व भार चालविसी ॥२॥
सर्व भावे मज तू होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३३१
📿 ऐसी मी मी करता । अज्
2331.
ऐसी मी मी करता । अज्ञानाची अहंता । तेव्हा तैसी ईश्वरसत्ता । वर्तू लागे ॥१॥
सज्ञान अज्ञान । दोघे अदृष्टाधीन । साधुत्व वर्ते सज्ञान । अज्ञानीं अहंकर्ता ॥२॥
अद्रुष्टाधीन देह । त्यांत ज्ञान मुरुनी जाय । मग द्रष्टा होउनी पाहे । जग ब्रह्मारूप ॥३॥
तेथे निंदा आणि स्तवन । हारपले दोष गुण । ऐसे एका जनार्दन सांगतसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३२
📿 वारंवार तुज द्यावया
2332.
वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा ॥१॥
गेला मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाही ॥धृपद॥
गुणा अवगुणाचे पडती आघात । तेणे होय चित्त कासावीस ॥२॥
काही एक तुझा न देखो आधार । म्हणऊनी धीर नाही जीवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३३२
📿 शाब्दिक शब्दाचा करित
2332.
शाब्दिक शब्दाचा करिती कंटाळा । द्वेषाचा उमाळा अंगी वसे ॥१॥
शब्द ब्रह्माज्ञानें फुगविती अंग । वाउगाची सोंग गर्व वाहाती ॥२॥
सर्वा भूतमात्रीं शब्द तो संचला । न कळे तयाला शब्दभेद ॥३॥
एका जनार्दनी शब्दाचा भेद । न कळे प्रसिद्ध ज्ञानीयासी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३३
📿 असोत हे तुझे प्रकार
2333.
असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥
आमुचे स्वहित जाणतसो आम्ही । तुझे वर्म नामी आहे तुझ्या ॥धृपद॥
विचारिता आयुष्य जाते वायाविण । रोज नागवन पडतसे ॥२॥
राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक ते मनी येऊ नेदी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३४
📿 विष्णुदासा भोग । जरी
2334.
विष्णुदासा भोग । जरी आम्हा पीडी रोग ॥१॥
तरि हे दिसे लाजिरवाणे । काय तुम्हासी सांगणे ॥धृपद॥
आम्हा काळे खावे । बोलिले ते वाया जावे ॥२॥
तुका म्हणे दास । आम्ही भोगू गर्भवास ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३५
📿 भावे गावे गीत । शुद्
2335.
भावे गावे गीत । शुद्ध करूनिया चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥धृपद॥
आणिकाचे कानी । गुण दोष मना नाणी ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३६
📿 नव्हो आता जीवी कपट व
2336.
नव्हो आता जीवी कपट वसती । मग काकुळती कोणा यावे ॥१॥
सत्याचिये मापे गाठी नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥धृपद॥
चोखटिया नाही विटाळाचा आघात । साच ते साचांत सांच पडे ॥२॥
विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढे बळ तृणतुल्य ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३७
📿 नव्हती ही माझी जायाच
2337.
नव्हती ही माझी जायाची भूषणे । असे नारायणे उचित केले ॥१॥
शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥धृपद॥
अर्थांतरी असे अनुभवसेवन । परिपाकी मन साक्ष येथे ॥२॥
तुका म्हणे मज सरते परते । हे नाही अनंते उरो दिले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३३७
📿 मी तुं ऐसी परी । जैस
2337.
मी तुं ऐसी परी । जैसे तरंग सागरी ॥१॥
दोहींमाजीं एका जाणा । कृष्ण द्वारवती राणा ॥२॥
तंतु वस्त्र दोनी एक । तैसे जगासी व्यापक ॥३॥
देवभक्त ऐसी बोली । भ्रांति निरसेनासी जाली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३८
📿 सहज लीळा मी साक्षी य
2338.
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचू वाचा ऐसे जाले ॥१॥
उपक्रमे वदे निशब्दाची वाणी । जे कोठे बंधनी गुंपोनेणे ॥धृपद॥
तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥२॥
तुका म्हणे येथे गेला अतिशय । आता पुन्हा नये तोंड दावू ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३३९
📿 बोलाल या आता आपुल्या
2339.
बोलाल या आता आपुल्यापुरते । मज या अनंते गोवियेले ॥१॥
झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधे जीव वेधियेला ॥धृपद॥
तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवे मिठी अंगसंगे ॥२॥
तुका म्हणे तुम्हा होईल हे परी । अनुभव वरी येईल मग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३४१
📿 सतीचे ते घेता वाण ।
2341.
सतीचे ते घेता वाण । बहु कठीण परिणामी ॥१॥
जिवासाठी गौरव वाढे । आहाच जोडे ते नव्हे ॥धृपद॥
जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥
तुका म्हणे अंगा येता । तरी सत्ता धैर्याची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३४१
📿 प्रपंचाचें भान । आहे
2341.
प्रपंचाचें भान । आहे मृगजळासमान ॥१॥
नाथिलेंचि सत्य दिसे । सत्य आहे ते आभासे ॥२॥
मृगजळीम उप्तत्ति नाही । पाहता अवघे मिथ्या पाही ॥३॥
एका जनार्दनी शरण । मिथ्या अवघे देह जाण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३४२
📿 आडवा तो उभा । असे दा
2342.
आडवा तो उभा । असे दाटोनिया प्रभा ॥१॥
देव नाही एकविध । एक भाव असे शुद्ध ॥धृपद॥
भेदाभेद आटी । नाही फार कोठे तुटी ॥२॥
तुका म्हणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३४२
📿 सागरींची लहरी । मी ए
2342.
सागरींची लहरी । मी एक म्हणे सागरी । तैसा तुझा तुंचि तुजवरी । एकदशीं ॥१॥
शुद्ध आणि शबल । तुंचि एक सकळ । औटहात केवळ । ते तंव कल्पना तुझी ॥२॥
डोळे झाकून किती । पहासी आतौतें । बाहेर न करी ते वोस पाडुं ॥३॥
सबाह्म संमतु असता वाडेंकोडें । एक देशी थोडें कल्पनेसाठीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३४४
📿 सत्यत्वेंशी घेणे भक्
2344.
सत्यत्वेंशी घेणे भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसे ॥१॥
मग ते अवीट न भंगे साचारे । पावले विस्तारे फिरो नेणे ॥धृपद॥
वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभये करे दास सत्य तई ॥२॥
तुका म्हणे आधी न करी तांतडी । पायी जाली जोडी तेणे शुद्ध ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३४५
📿 मृगजळ जेथे नसे । तेथ
2345.
मृगजळ जेथे नसे । तेथे वसे कोरडे ॥१॥
ऐसा घ्यावा अनुभव । पदोपदीं भाव जीवासी ॥२॥
जे दिसे ते नासे । ऐसे असे सर्वत्र ॥३॥
यापरी जाणावें मिथ्यापण । शरण एका जनार्दन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३४६
📿 आणिता त्या गती । हंस
2346.
आणिता त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथे गाठीसवे धुरे ॥धृपद॥
नाकेविण मोती । उभ्या बाजारे फजिती ॥२॥
हुकुमदाज तुका । येथे कोणी फोंदो नका ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३४७
📿 दोरा अंगी जैसा नसतां
2347.
दोरा अंगी जैसा नसतां सर्प दिसे । मिथ्या देह तैसा वस्तूवरी आभासे ॥१॥
देह मी नव्हे देह मी नव्हे । देह मी नव्हे माझेनी अनुभवें ॥२॥
घटी वर्तूळ आकाश परि ते महदाकाश । विकारवंत देह चैतन्य विलास ॥३॥
एका जनार्दनी दो नांवीं एक । देह झाला मेला समूळ मिथ्या देखा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३४८
📿 आकाशापासोनी वायु झाल
2348.
आकाशापासोनी वायु झाला । तो गगनावेगळा नाही गेला ॥१॥
अग्नीपासुनी जळाचा अंशु । जळापासुनी पृथ्वीप्रकाशु ॥२॥
तैसे कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण ॥३॥
जेवी तंतु आणि पटु । दोन्ही दिसती एकवटु ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३५०
📿 अष्टही दिशा पुर्ण भर
2350.
अष्टही दिशा पुर्ण भरला देव । मा पुर्व पश्चिम भाव तेथे कैंचा ॥१॥
पाहे तिकदे देव व्यापुनी भरला । रिता ठाव ठरला कोठे नाही ॥२॥
समाधी समाधान मनाचे उन्मन । मा देवा भिन्नपण नाही नाही ॥३॥
एका जनार्दनी एकपणासाठी । देव पाठीपोटीं भक्तामागें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३५१
📿 चारी वेद जयासाठी । त
2351.
चारी वेद जयासाठी । त्याचे नाम धरा कंठी ॥१॥
न करी आणीक साधन । कष्टसी का वायाविण ॥धृपद॥
अठरा पुराणांचे पोटी । नामाविण नाही गोठी ॥२॥
गीता जेणे उपदेशिली । ते ही विटेवरी माउली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३५१
📿 अष्टदिशी व्यापक नारा
2351.
अष्टदिशी व्यापक नारायण । तेथे नाही पूर्व पश्चिमेंचें भान ॥१॥
पहा कर्माची राहाटी । सर्व व्यापक संकल्प म्हणती उठाउठी ॥२॥
नको विष्णु म्हणता भेद उरला नाही । भेदभावे पाहाती सर्वाठायी ॥३॥
भेदाभेद टाकुनी देई वेगे । एका जनार्दनी शरण रिघे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३५३
📿 नामसंकीर्तन साधन पै
2353.
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरे ॥१॥
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥धृपद॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥२॥
रामकृष्णहरीविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३५३
📿 भजता भजन एका जनार्दन
2353.
भजता भजन एका जनार्दन । ब्रह्मा परिपुर्ण सर्व एका ॥१॥
सांडुनी वासना भजता भजन । ब्रह्मा परिपुर्ण सर्व एक ॥२॥
विषयवासना त्यागितां संपुर्ण । ब्रह्मा ते संपुर्ण सर्व एक ॥३॥
एका जनार्दनी एकत्व भाव । तेथे नांदे देव संदेह नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३५४
📿 भाविकांचे काज अंगे द
2354.
भाविकांचे काज अंगे देव करी । काढी धर्माघरी उच्छीष्ट ते ॥१॥
उिच्छष्ट ती फळे खाय भिल्लटीची । आवडी तयांची मोठी देवा ॥धृपद॥
काय देवा घरी न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥
अर्जुनाची घोडी धुतली अनंते । संकटे बहुते निवारिली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३५४
📿 जैशी देहापाशीं छाया
2354.
जैशी देहापाशीं छाया । तैशी दिसे मिथ्या माया ॥१॥
आत्मा शुद्ध काया मळीन । काया जड आत्मा चिदघन ॥२॥
जीव अलिप्त माया गुणी । माया वेष्टन जीवालागुनी ॥३॥
एका जनार्दनी शिव । सदा असे स्वयमेव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३५५
📿 सांवळे रूपडे चोरटे च
2355.
सांवळे रूपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी ॥१॥
डोळियांची धणी पाहाता न पुरे । तया लागी झुरे मन माझे ॥धृपद॥
प्राण रिघो पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनी न देखता ॥३॥
चित्त मोहियेले नंदाच्या नंदने । तुका म्हणे येणे गरुडध्वजे ॥४॥