🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ६३
📿 कानडीने केला मर्हाट
63.
कानडीने केला मर्हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ॥१॥
तैसे मज नको करू कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥धृपद॥
तिने पाचारिले इल बा म्हणोन । येरु पळे आण झाली आता ॥२॥
तुका म्हणे येर येरा जे विच्छिन्न । तेथे वाढे सीण सुखा पोटी ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ६३
📿 पतितपावन म्हणोनि ऐकत
63.
पतितपावन म्हणोनि ऐकत होतो दुरुनी । ते आह्यालागुनी कळो आले ॥
मी आरुस साबड माझे बोलणे बोबडे । परि तुज आवडले पांडुरंगा ॥
कळा गा कुसरी नये मज गाता । परि वो पंढरीनाथा आंगिकारले ॥
बोधला म्हणे देवा वानले तुझ्या भावा । कळो आल्या केशवा मायेबापा ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रीकृष्ण व बलराम यांची बाललीला›
📿 अभंग क्र. ६३
📿 मिळवूनि सौंगडे सांगत
63.
मिळवूनि सौंगडे सांगती तयासी । चला गोरसासी देतो तुम्हा ॥१॥
गेली असे एक गौळण जळाळा । सांगे तो गोपाळा तेथे जाऊ ॥२॥
न पुरेची हात दूध शिंक्यावरी । करावे मुरारी कैसे येथे ॥३॥
पाटावरी रची वनमाळी । पाडीतसे डुळी मोहो-रीने ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ६३
📿 निगम आगम वेदादिकसम ।
63.
निगम आगम वेदादिकसम । श्रुतीचा उपक्रम हारपला ॥१॥
ते रूप साजिरे नंदाचे गोजिरे । यशोदा श्रीधरे प्रेमभेटी ॥२॥
जेथे हे वाग् वाट शून्य तो निघोट । प्रत्यक्ष वैकुंठ ते गोपवेष ॥३॥
निवृत्ति तडाग निवांत सम्यक । सर्व रूपे एक आत्माराम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ६३
📿 एकमेका गौळणी करिती व
63.
एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥ नायके वो बाई करु गत काई । धरू जाता पळुन जातो न सांपडेचि बाई ॥२॥ दही दूध लोणी चोरी करुनियां खाये । पाहू जाता कवाड जैसे तैसे आहे ॥३॥ एका जनार्दनी न कळे लाघव तयाचे । न कळेची ब्रह्मादिका वेडावले साचे ॥४॥
64.
जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा । माळ घालु नये गळा ॥२॥
तट्टावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥३॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरका जाती ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ६४
📿 शरण आलो नारायणा । आत
64.
शरण आलो नारायणा । आता तारी हो पावना ॥1॥
शरण आला मारुतिराया । त्याची दिव्य केली काया ॥2॥
शरण प्रल्हाद तो आला । हिरण्यकश्यपू मारिला ॥3॥
जनी ह्मणे देवा शरण । व्हावे भल्याने जाणोन ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ६४
📿 न करी आळस जाय पंढरीस
64.
न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथे आहे ॥१॥
पाहता भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
कान धरोनी सुखे नाचा महाद्वारी । तया सुखासरि दुजी नाही ॥३॥
पाहता श्रीमुख हरे ताहान भूक । चोखा म्हणे सुख विठुपायी ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ६४
📿 पांडवा कैवारी । जाला
64.
पांडवा कैवारी । जालासि श्रीहरि । तैसी आम्हावरी । केली कृपा ॥
संसार परंजनी । पडलो होतो महावनी । आलासे धावोनि पांडुरंग माझा ॥
बोधला म्हणे आता धन्ये पंढरीनाथा । सकळ माझी चिंता दूर केली बापा ॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ६४
📿 काय सांगू यशोदेबाई ।
64.
काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलो पाही । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥ ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारी । जातो पळुनिया दुरी ॥२॥ माझी सुन एकली घरी । नाहात होती परसद्वारीं । आपण येउनि झडकरी । उभा पुढे राहिला ॥३॥ तवं ती म्हणे का आलासी । कृष्ण म्हणे तू परियेसी । मी खेळत होतो बिदीसीं । चेंडु उडोनियां आला ॥४॥ तंव ती म्हणे पाहे कृष्णा । क्रियाहीन नष्ट तू कान्हां । घाली मिठी धरी स्तना । का गे चेंडू देईना ॥५॥ तव ती म्हणे परतां सर । कृष्ण म्हणे दे चेंडूं सत्वर । एका जनार्दनी निर्धार । परा भक्ति हे साचार ॥६॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ६५
📿 पदोपदी निजपदा गेले व
65.
पदोपदी निजपदा गेले वो । कर्म संचित सकर्म जाले वो ॥१॥
तेथे आपुले नाठवे काही वो । आप आपणा न सांपडे डाई वो ॥२॥
श्रीगुरुप्रसादे ज्ञान बोधु झाला वो । नव्हे ते ठाउके पडिले माय वो ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ६५
📿 ऐक बापा माझ्या पंढरी
65.
ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्ये या आर्तभूता ॥1॥
माझ्या दुणेदारा पुरवी त्याची आस । न करी निरास आर्तभूता ॥2॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा । अभय तो द्यावा कर तया ॥3॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा । अढळपद ध्रुवा दिधलेंसे ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ६५
📿 पंढरी पंढरी वाचे जो
65.
पंढरी पंढरी वाचे जो उच्चारी । तोचि संसारी तरे जाणा ॥१॥
ऐसा हा वर आहे सकळिका । पुंडलिके देखा मागितले ॥२॥
युगे अ्टावीस कर दोनी कटी । उभा असे तटी भिवरेच्या ॥३॥
जोडोनिया पाय उभारोनी बाह्या । दरूशने देता हे मोक्ष मुक्ति ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ६५
📿 स्वामी सब संसार के ह
65.
स्वामी सब संसार के हो सांचे श्रीभगवान ।
स्थावर जंगम पावक पाणी धरती बीज समान॥
सब मे महिमा थांरी देखी कुदरत के करबान ।
बिप्र सुदामा को दालद खोयो बाले की पहचान॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ६५
📿 पंढरीवाचुनी सुख कोठे
65.
पंढरीवाचुनी सुख कोठे नाही । ते आहे गा पाई विठोबाचे ॥
भाग्यवंत येती हे सुखे घेती । मागुते न येती परतोनिया ॥
बोधला म्हणे धन्ये भाग्य ज्यांचे होये । तरीच त्या सोय सांपडली ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ६५
📿 जेथे रूप रेखा ना आपण
65.
जेथे रूप रेखा ना आपण आसका । सर्व रूपे देखा हरि माझा ॥१॥
ते रूप गोजिरे नंदाघरी असे । जनीवनी दिसे गोपिकांसी ॥२॥
नादभेद कळा जेथे भेद नुठी । ब्रह्मरूपे तुष्टि अवघी होय ॥३॥
निवृत्ति जन जन वन देख । आत्मरुपभाव ब्रह्म जाला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ६५
📿 आम्ही असता माजघरीं ।
65.
आम्ही असता माजघरीं । रात्र झाली दोन प्रहरी । मी असता पतिशेजारीं । अवचित हरी तुझा आला ॥१॥ काय संगु सखये बाई । वेदशास्त्रां अगम्य पाही । आगमनिगमां न कळे कांही । मन पवन पांगुळलें गे बाई ॥२॥ आम्ही असता निदसुरी । मुंगुस घेउनी आपुले करी । सोडियलें अदोघा माझारीं । तंव ते बोचकरी आम्हांते ॥३॥ आम्ही भ्यालों उभयतां । चीर फिटले बाई तत्त्वता । नग्नाचि जाहलें मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्यालें ॥४॥ ऐसे करुनि आपण पळाला । जाउनी माये आड लपला । एका जनार्दनी म्हणे भला । आता सांपडता न सोडी त्याला ॥५॥
66.
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा । मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा ॥१॥
नारायणनामे होऊ जीवन्मुक्त । कीर्तन अनंत गाऊ गीती ॥२॥
वैकुंठीचे जन सदा चिंतिताती । कई येथे येती हरीचे दास ॥३॥
यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनिया कर तिष्ठतसे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ६६
📿 दुरुळ अंबुला केला गे
66.
दुरुळ अंबुला केला गे बाई । ब्रम्हादिका तो न पडे ठाई ॥१॥
हालो नये चालो नये । सैरावैरा काही बोलो नये ॥२॥
अंबुला केला धावे जरि मन । बुडती बेताळीस जाती नाक कान ॥३॥
मागील केले ते अवघे वावो । बापरखुमादेविवरु विठ्ठल नाहो ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ६६
📿 पंढरीचे सुख नाही त्र
66.
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणि देखा । पुंडलीक सखा आहे जेथे ॥३॥
चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी । भोळ्या भाविकासी अखंडित ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ६६
📿 राम मिलण रो घणो उमाव
66.
राम मिलण रो घणो उमावो, नित उठ जोऊ बाटड़ियाँ ।
दरस बिना मोहि कछु न सुहावै, जक न पड़त है आँखड़ियाँ॥
तड़फत तड़फत बहु दिन बीते, पड़ी बिरह की फांसड़ियाँ ।
अब तो बेग दया कर प्यारा, मै छू थारी दासड़ियाँ॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ६६
📿 घर आवो जी सजन मिठ बो
66.
घर आवो जी सजन मिठ बोला ।
तेरे खातर सब कुछ छोड्या, काजर, तेल तमोला॥
जो नहि आवै रैन बिहावै, छिन माशा छिन तोला ।
'मिरा' के प्रभु गिरिधर नागर, कर धर रही कपोला॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ६६
📿 संसारच्यातापे तापलो
66.
संसारच्यातापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥धृपद॥
बहुता जन्मींचा झालो भारवाही । सुटिजे हे नाही वर्म ठावे ॥२॥
वेढियेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ६६
📿 प्रपंचाच्या डोही बुड
66.
प्रपंचाच्या डोही बुडत होतो पाही । काढिले लवलाही पांडुरंगे ॥
बहुत जाल्या तुझ्या उपकाराच्या रासी । सांगा संतापासी घडी घडी ॥
ऐसे मागे बहुत ऐकत होतो कानी । ते तो मजलागुनी केले बापा ॥
बोधला म्हणे तुझी वाखाणिता कीर्ती । सांगो संता प्रतीत तुझे गुण ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ६६
📿 काल भई बापा सह्या न
६६.
काल भई बापा सह्या न जाई । महा भैभीत जगत कृत खाई ॥१॥
अनेक मुनेश्वर उझो जाई । सुरनर थाके करत उपाई ॥२॥
कंपे पीर पेगंबर देव । रीखी कंपे चौरासी देव ॥३॥
चंद सुरज घर पवन आकाश । पाणी कंपे अगनीगरास ॥४॥
67.
नाम घेता उठाउठी । होय संसारासी तुटी ॥१॥
ऐसा लाभ बांधा गाठी । विठ्ठलपायी पडे मिठी ॥२॥
नामापरते साधन नाही । जे तु करिसी आणिक काही ॥३॥
हाकारोनी सांगे तुका । नाम घेता राहो नका ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ६७
📿 पूर आला आनंदाचा । ला
67.
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥
बांधु नामाची सांगडी । पोहुन जाऊ पैलथडी ॥
अवघे भाविक जन भक्त । घाला उड्या चंद्रभागेत ॥
बोधला म्हणे थोर पुण्ये । वोघा आली पंथे येणे ॥
68.
लागोनिया पाया विनवितो तुम्हांला । करे टाळी बोला मुखे नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा । हा सुख सोहंळा स्वर्गी नाही ॥२॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥३॥
सकळांसी येथे आहे अधिकार । कलियुगी उद्धार हरिनामे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ६८
📿 काय करू पंढरीनाथा ।
68.
काय करू पंढरीनाथा । काळ साह्य नाही आता ॥1॥
मज टाकिले परदेशी । नारा विठा तुजपाशी ॥2॥
श्रम बहु झाला जीवा । आता सांभाळी केशवा ॥3॥
कोण सखा तुजवीण । माझे करी समाधान ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ६८
📿 बहुत हिंडलो देश देशा
68.
बहुत हिंडलो देश देशांतर । परी मन नाही स्थिर झाले कोठे ॥१॥
बहुत तीर्थे फिरोनिया आलो । मनासवे झालो वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहता पंढरी भूवैकुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ६८
📿 नातो नामको जी म्हांस
68.
नातो नामको जी म्हांसू तनक न तोड्यो जाय॥
पाना ज्यू पीली पड़ी रे, लोग कहै पिंड रोग ।
छाने लांघण म्है किया रे, राम मिलण के जोग॥
बाबल बैद बुलाइया रे, पकड़ दिखाई म्हांरी बांह ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ६८
📿 पैल यमुने पावली । कृ
68.
पैल यमुने पावली । कृष्ण खेळे चेंडु फळी । खेळ खेळोनी वनमाळी । कवणा नातुडे ॥
हा तव नाटक निराळा । कवणा न कळे । याची लिळा । हा तव जाईन गोकुळा ।
कोसाल करिरीस ॥
जाऊनी गोकुळा भितरी भुलवितो नरनारी । खुणा दावी नाना परी । या गोपिकालागी ॥