🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १११८
📿 दुर्बुद्धहि ते मना ।
1118.
दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आता मज ऐसे करी । तुझे पाय चित्ती धरी ॥धृपद॥
उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥२॥
तुका म्हणे आता । लाभ नाही या परता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११२०
📿 हरिपाठ - अभंग ११२० त
1120.
हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४
हरिपाठ अभंग १ ला
हरिचिया दासां दाही दिशा । भावे जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरि मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११२२
📿 माझी सर्व चिंता आहे
1122.
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायाशी न विसंबे ॥१॥
विसरणे रूप क्षण एक चित्ती । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥धृपद॥
विसरता हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥
तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११२२
📿 ओळखिला हरि धन्य तो स
1122.
ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिद्धिसहित ॥१॥
सिद्धि लावी पिसे कोणतया पुसे । नेणे राजहंसे पाणी कायी ॥२॥
काय ते करावे संदेहीं निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केले ॥३॥
केले कर्म झाले तेंचि भोगा आले । उपजलें मेले ऐसे किती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११२३
📿 काय ती करावी मोलाची
1123.
काय ती करावी मोलाची माकडे । नाचताती पुढे संसाराच्या ॥१॥
झाडा देतेवेळे विचकिती दात । घेती यमदूत दंडवरी ॥धृपद॥
हात दात कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥
तुका म्हणे किती जाली ही फजित । मागे नाही नीत भारवाही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. ११२३
📿 सोपान वटेश्वर पातले
1123.
सोपान वटेश्वर पातले समोर | केला नमस्कार निवृत्तीसी ॥१॥
म्हणे मुक्ताबाई जाती दोघेजण | ऐसे नारायणे बुझाविले ॥२॥
गरूड हनुमंता परिसा भागवता | मग साधुसंता श्रुत केले ॥३॥
गंधर्वा आणि देवा कळला वृत्तान्त | जाती उभयता समाधीसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११२३
📿 जे जे दृष्टी दिसे ते
1123.
जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरुप । पुजा ध्यान जप त्यासी नाही ॥१॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठे ॥२॥
वैष्णवांचे गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहता नाही ॥३॥
आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११२४
📿 थोर ते गळाली पाहिजे
1124.
थोर ते गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेता सुख वाटे ॥१॥
व्यर्थ भरोवरी केले पाठांतर । जोवरी अंतर शुद्ध नाही ॥धृपद॥
घोडे काय थोडे वागविते ओझे । भावेविण तैसे पाठांतर ॥२॥
तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११२४
📿 नामविण मुख सर्पाचें
1124.
नामविण मुख सर्पाचें ते बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांव जळो त्याचे जिणे । यातना भोगणें यमपुरी ॥२॥
वैष्णवांचें गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहता नाही ॥३॥
आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११२६
📿 संतांच्या हेळणे बाटल
1126.
संतांच्या हेळणे बाटले जे तोंड । प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे ॥१॥
भेसळीचे वीर्य ऐशा अनुभवे । आपुले परावे नाही खळा ॥धृपद॥
संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विटाळ बहु त्याचा ॥२॥
तुका म्हणे केली प्रतिज्ञा याचसाठी । काही माझे पोटी शंका नाही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. ११२७
📿 जाती ब्रह्मादिक जाती
1127.
जाती ब्रह्मादिक जाती चराचर | मायिक ग्यवहार ऐशा परी ॥१॥
प्रकृति पुरुषाचा मांडियेला खेळ | जाईल सकळ नाशिवंत ॥२॥
चंद्र सूर्य जाईल जाईल मृगजळ | जाती तिन्ही ताळ शून्यापोटी ॥॥३॥
होईल निरामय अवघे चराचर | ब्रह्मींचा विस्तार होईल ब्रह्मी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११२८
📿 भक्तिविण पशू कशासी व
1128.
भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाही ॥१॥
काय माय गेली होती भूतापाशीं । हरि नये मुखासी अरे मुढा ॥२॥
पातके करिता पुढे आहे पुसतां । काय उत्तर देता होशील तु ॥३॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथे तुजला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११२९
📿 स्वहिताकारणें संगती
1129.
स्वहिताकारणें संगती साधुची । भावे भक्ति हरीची भेटी तेणे ॥१॥
हरि तेथे संत संत तेथे हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसां ते वेदार्थ नाकळे । तेथे हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेदें नाही ऐसे सांगितले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११३०
📿 जेथे कीर्तन करावे ।
1130.
जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ॥धृपद॥
तटावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११३१
📿 लंकेमाजी घरे किती ती
1131.
लंकेमाजी घरे किती ती आइका । सांगतसे संख्या जैसीतैसी ॥१॥
पाच लक्ष घरे पाषाणांची जेथे । सात लक्ष तेथे विटबंदी ॥धृपद॥
कोटि घरे जेथे काशा आणि तांब्याची । शुद्ध कांचनाची सप्त कोटी ॥२॥
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगाते कवडी गेली नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११३२
📿 ओळखिला हरि सांठविला
1132.
ओळखिला हरि सांठविला पोटी । होता त्याची भेटी दुःख कैचें ॥१॥
नर अथवा नारी हो का दुराचारी । मुखी गाता हरी पवित्र तो ॥२॥
पवित्र ते कुळ धन्य त्याची माय । हरिमुखें गाय नित्य नेंमें ॥३॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरी । नाही अधिकारी ऐसा येथे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. ११३४
📿 कळवळी मन नाही देहभान
1134.
कळवळी मन नाही देहभान |वटेश्वर सोपान सोंवळे जाले |॥१॥
संत साधुजन होत कासाविसी | आले समाधीपाशी तांतडीने | २ ॥
समाधीभोंवते कुंकुमाचे सडे | पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥
वरी मृगछाला दिसताती लाल | दर्भ आणि फुले समर्पिली ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११३४
📿 एक तीन पांच मेळा पंच
1134.
एक तीन पांच मेळा पंचविसाचा । छत्तीस तत्वांचा मुळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधि शिव बोलिजे रवी ॥२॥
जीव शिव दोनी हरिरुपी तरंग । सिंधु तो अभंग नेणे हरि ॥३॥
शक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे । रज्जुवरीं भासे मिथ्या सर्प ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११३५
📿 कल्पनेपासुनी कल्पिला
1135.
कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणे पडे गोंवा नेणे हरि ॥१॥
दिधल्यावांचुनि फलप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
इच्छावें ते जवळी हरीचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥३॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेता जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांचे नमन›
📿 अभंग क्र. ११३६
📿 आता स्तुति पुरे पुरे
1136.
आता स्तुति पुरे पुरे सोपाना | प्रेमळाचिया निधाना | संतुष्ट जालो रे वचना | एक एका तुझिया ॥१॥
तू अवतार चतुरानन | ऐसे बोलिले जगज्जीवन |तंव स्तवन करिता सोपान | तो मौन्यचि राहिला ॥२॥
सर्वोत्तम म्हणे चतुरा | महा विचाराच्या सारा | पवित्ररूपा परिकरा | सकळ 'जनासी तूंची ॥३॥
मग पाचारिली तीर्थे | जे जे तीर्थरूप सामथ्ये |म्हणे उदक द्यावे स्नानाते | सोपानदेवासी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११३८
📿 परिमळ गेलिया वोस फुल
1138.
परिमळ गेलिया वोस फुल देठी । आयुष्य शेवटी देह तैसा ॥१॥
घदिघडी काळ वाट याची पाहे । अझुनि किती आहे अवकाश ॥२॥
हाचि अनुताप घेऊनि सावाध । कांही तरी बोध करी मना ॥३॥
एक तास उरला खटवांगरायासी । भाग्यदशा कैसीप्राप्त झाली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११३९
📿 का रे माझी पोरे म्हण
1139.
का रे माझी पोरे म्हणसील ढोरे । मायबाप खरे काय एक ॥१॥
का रे गेले म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ गेलियाचा ॥धृपद॥
का रे माझे माझे म्हणसील गोत । न सोडविती दूत यमाहाती ॥२॥
का रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशी कैसा उचलविसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११३९
📿 करा रे बापानों साधन
1139.
करा रे बापानों साधन हरीचें । झणी करणीचें करु नका ॥१॥
जेणे नये जन्म यमाची यातन ऐसिया साधना करा कांही ॥२॥
साधनांचे सार मंत्रबीज हरि । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनामा जपतां घडे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११४०
📿 अगा करुणाकरा करितसे
1140.
अगा करुणाकरा करितसे धावा । या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनिया माझी करुणेची वचने । व्हावे नारायणे उतावीळ ॥धृपद॥
मागे पुढे अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायी भाव वाट पाहे ॥२॥
उशीर तो आता न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११४१
📿 न मनी ते ज्ञानी न मन
1141.
न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावे ॥१॥
धातू पोसोनिया आणिका उपदेश । अंतरी तो लेश प्रेम नाही ॥धृपद॥
न मनी ते योगी न मनी ते हरिदास । दर्शने बहुवस बहुता परीची ॥२॥
तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी । आवडती परि चित्तशुद्धी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११४१
📿 पिंडी देहस्थिती ब्रह
1141.
पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥
शुक याज्ञावल्क्या दत्त कपिल मुनी । हरीसी जाणोनी हरिच झाले ॥२॥
या रे या रे धरु हरिनाम तारुं । भवाचा सागरु भय नाही ॥३॥
साधुसंत गेले आनंदी राहिले । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११४२
📿 कासया पाषाण पूजितसा
1142.
कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावे विण ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । मोक्षाचे साधन बोलियेले ॥धृपद॥
काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळा विषयजप ॥२॥
काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 वटेश्वर नमन›
📿 अभंग क्र. ११४२
📿 धूप आणि दीप उजाळिल्य
1142.
धूप आणि दीप उजाळिल्या ज्योति | तेव्हा ओसंडती अवघे जन ॥१॥
सोपान वटेश्वरे केला नमस्कार | उतरले पार भवसिंधू ॥२॥
घेतियेले तीर्थ तंव झाले विकळ | झांकिंयेले डोळे ब्रह्मबोधे॥३॥
निवृत्ति मुक्ताई राहिली बाहेरी | आता तुम्ही हरि सांभाळावे ॥४॥