🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नाममाला > अभंग ११० ते १५५›
📿 अभंग क्र. १२४
📿 एक मुख नेणती । नाम ह
124.
एक मुख नेणती । नाम हरीचे न घेती ।
मुखे भलतेंचि जल्पती । ते पावती अध:पंथा ॥
नामेंवीण सुटका नाही । ऐसी वेदशास्त्री ग्वाही ।
जो वेद मस्तकी पाही । ब्रह्मयाने वंदिला ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १२४
📿 कैसा मी वानू कैसा मी
124.
कैसा मी वानू कैसा मी वानू । कैसा ध्याना आणू पांडुरंग ॥१॥
कैसी ते सेवा करू ते प्रकार । नव्हेचि अंतर स्थिर माझे ॥२॥
वारिता हे मन न येचि हाता । कितीसी हे चिंता करू आता ॥३॥
चोखा म्हणे येथे खुंटला उपाय । कैसेनि पाय आतुडती ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १२४
📿 हिरण्यगर्भ माया अंडा
124.
हिरण्यगर्भ माया अंडाकार छाया । ब्रह्म असलया तेथे नेत ॥१॥
ते रूप वैकुंठ जीवशिवपीठ । मायेचा उद्धाट छायासंगे ॥२॥
माया ब्रह्म हरि माता पिता चारी । जीवशिव शरिरी एक नांदे ॥३॥
निवृत्ति छाया जीवशिवमाया । वासना संदेहा लया गेली ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत जनाबाई गौळणी›
📿 अभंग क्र. १२५
📿 राधा आणि तो मुरारी ।
125.
राधा आणि तो मुरारी । क्रीडा कुंजवनी करी ॥१॥
कृष्ण डोलत डोलत । आले राधेमंदिरांत ॥२॥
सुमनाचे शेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥
आवडीने विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १२५
📿 कोण माझा आता करील पर
125.
कोण माझा आता करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥
तू वो माझी माय तू वो माझी माय । दाखवी गे पाय झडकरी ॥२॥
बहु कनवळा तुझिया गा पोटी । आता नको तुटी करू देवा ॥३॥
चोखा म्हणे मज घ्यावे पदरांत । ठेवा माझे चित्त तुमचे पायी ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १२५
📿 अनंत सृष्टि घटा अनंत
125.
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा । परिमाण पैठा आत्माराम ॥१॥
ते रूप साजिरे चतुर्भुजवेष । वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥२॥
सिद्धीचे साधन चिंतामणि धन । कल्पवृक्ष वन वसते जेथे ॥३॥
निवृत्तिचे मूळ गोपाळ सकळ । साधक दयाळ हरि होय ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नाममाला > अभंग ११० ते १५५›
📿 अभंग क्र. १२६
📿 समाधीचे साधन । ते रा
126.
समाधीचे साधन । ते रामनाम चिंतन ।
चित्ता सुखसंपन्न हर्ष । जीवन केला ॥
कोटी तपाचिया राशी । जोडती रामनामापाशी ।
नाम जपता अहर्निशी । वैकुंठपद पाविजे ॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १२६
📿 पानी मे मीन प्यासी,
126.
पानी मे मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हांसी॥धृ०॥
आत्मज्ञान बिन नर भटकत है । कहा मथुरा काशी॥१॥
भवसागर सब हार भरा है । धुंडत फिरत उदासी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । सहज मिळे अविनाशी॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १२६
📿 नित्य निर्गुण सदा अस
126.
नित्य निर्गुण सदा असणे गोविंदा । सगुणप्रबंधा माजि खेळे ॥१॥
ते रूप सगुण अवघेंचि निर्गूण । गुणि गुणागुण तयामाजि ॥२॥
अनंत तरंगता अनंत अनंता । सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥३॥
निवृत्ति परिमाण अनंत नारायण । सर्वाहि चैतन्य आपरूपे ॥४॥
127.
संसार तो कोण लेखे । आम्हा सखे हरिजन ॥१॥
काळ ब्रम्हानंदे सरे । आवडी उरे संचली ॥२॥
स्वप्नी तेही नाही चिंता । रात्री जाता दिवस ॥३॥
तुका म्हणे ब्रम्हरसे । होय सरिसे भोजन ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत जनाबाई गौळणी›
📿 अभंग क्र. १२७
📿 डोईचा पदर आला खांद्य
127.
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ॥१॥
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आता मज मना कोण करी ॥२॥
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावरी तेल घाला तुम्ही ॥३॥
जनी म्हणे देवा मी झाले येसवा । रिघाले केशवा घर तुझे ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १२७
📿 जगामध्ये दिसे बरे की
127.
जगामध्ये दिसे बरे की वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥
आता कोठवरी धरावी हे भीड । तुम्ही तो उघड जाणतसा ॥२॥
ब्रीदाचा तोडर बांधलासे पायी । त्रिभूवनी ग्वाही तुमची आहे ॥३॥
चोखा म्हणे जेणे न ये उणेपण । तेंचि ते कारण जाणा देवा ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १२७
📿 पायो जी म्हे तो राम
127.
पायो जी म्हे तो राम रतन धन पायो ।
वस्तु अमोलक दी म्हारे सतगुरू, किरपा कर अपनायो॥
जनम-जनम की पूँजी पाई, जग मे सभी खोवायो ।
खरच न खूटै चोर न लूटै, दिन-दिन बढ़त सवायो॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विरहावस्था - अभंग ११९ ते १३८›
📿 अभंग क्र. १२७
📿 जन्म जन्मांतरी विराह
127.
जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी ।
दुःखी सेशिलें होते मागे जन्मी । ये खेपे निरसले स्थुळ कारणीं ॥१॥
येउने भेंटी देही देहातीत । तयाचा विरह मजलागी होत ।
मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १२८
📿 आई मेली बाप मेला । म
128.
आई मेली बाप मेला । मज सांभाळी विठ्ठला ॥1॥
हरीरे मज कोणी नाही । माझी खात असे डोई ॥2॥
विठ्ठल म्हणे रुक्मिणी । माझे जनीला नाही कोणी ॥3॥
हाती घेउनी तेलफणी । केस विंचरुन घाली वेणी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १२८
📿 जनक तू माझा जननी जगा
128.
जनक तू माझा जननी जगाची । करूणा आमुची का हो नये ॥१॥
कासया संसार लावियेला पाठी । पडलीसे लुटी तुमची माझी ॥२॥
जन्म जरा मरण आम्हा सुख दुःख । पाहासी कौतुक काय देवा ॥३॥
गहिंवरूनी चोखा उभा महाद्वारी । विनवी जोडूनि करी विठोबासी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत जनाबाई गौळणी›
📿 अभंग क्र. १२९
📿 गौळणी म्हणती गौळणीला
129.
गौळणी म्हणती गौळणीला ॥यशोदेशी पुत्र झाला ॥१॥
एक धांवती एकीपुढे ॥एक वांटीती सुंडवडे ॥२॥
वाणे घेऊनिया ताटी ॥नंदाघरी झाली दाटी ॥३॥
ऐसी गलबला झाली ॥दासी जनी हेल घाली ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १२९
📿 एक प्रहर रात्र झाली
129.
एक प्रहर रात्र झाली । फेरी विठ्ठलाची आली ॥1॥
नामा म्हणे जनी पाहे । द्वारी उभा कोण आहे ॥2॥
प्रभा घरात दाटली । एक सराद सुटली ॥3॥
एकमेका आलिंगन । नामा म्हणे जनी धन्य ॥4॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विरहावस्था - अभंग ११९ ते १३८›
📿 अभंग क्र. १२९
📿 मागे विरह बहुतंशी झा
129.
मागे विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वाया केला । क्षणभरीं विश्रांती नाही मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥
आता विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणी घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥
एका जनार्दनी पाहता आनंदलें । जन्म जन्मातरींचें दुःख । फिटले विरहाविरहें हर खुंटले । काया वाचा मने वेधले वो ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १२९
📿 निकट वेल्हाळ नेणो मा
129.
निकट वेल्हाळ नेणो मायाजाळ । विव्हळ पाल्हाळ नेणो कांही ॥१॥
ते रूप श्रीधर मानवी अकार । सर्व निराकार सिद्धि वोळे ॥२॥
कुटूंबआचार कुळवाडी साचार । सर्व हा श्रीधर एका एक ॥३॥
निवृत्ति निगग्न गयनीच प्रतिज्ञा । नामे कोटि यज्ञा होतजात ॥४॥
130.
संसाराचे अंगी अवघीच व्यसने । आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ॥१॥
आता हे सोवळे झाले त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेले ॥२॥
ब्रम्हपुरी वास करणे अखंड । न देखिजे तोंड विटाळाचे ॥३॥
तुका म्हणे आम्हा एकान्ताचा वास । ब्रम्ही ब्रम्हरस सेवू सदा ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नाममाला > अभंग ११० ते १५५›
📿 अभंग क्र. १३०
📿 देवावीण शून्य मुख ।
130.
देवावीण शून्य मुख । न घेता नाही सुख ।
अंती होईल रे दुःख । नाम नसता मुखी ॥
राम कृष्ण गोविंद । हरि माधव परमानंद ।
नित्य ऐसा जयासि क्रुद । तोचि सुलभ गर्भवासी ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३०
📿 जन्मोजन्मीचे तुम्ही
130.
जन्मोजन्मीचे तुम्ही सांगाती । का हो मज घातिले भ्रांती ।
नाही कोठे सुख विश्रांति । पंढरीवांचोनी सर्वथा ॥१॥
विठोबा का न कळे तुम्हा । सर्व जगाचा तू आत्मा ।
पुराण पुरूष परमात्मा आम्हा दीना उपेक्षिसी ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 यज्ञान्न मागण्याविषयी गोपास आज्ञा›
📿 अभंग क्र. १३०
📿 पडे प्रायश्चित्त बोल
130.
पडे प्रायश्चित्त बोलो नका कोणी । ऐकू नये कानी शब्द यांचा ॥१॥
स्वर्गसुखासाठी करिताति यज्ञ । टाकिती अवदान अग्निमुखी ॥२॥
भोक्ता वनी आला न कळेचि त्याला । पूर्ण ब्रह्म कृष्णाला न जाणती ॥३॥
कृपाळु बहुत परीक्षिती राया । उद्धार कराया पाठविले ॥४॥
131.
सर्व संगी वीट आला । तू एकला आवडसी ॥१॥
दिली आता मिठी । जगजेठी न सोडी ॥२॥
बहु झालो खेदक्षीण । येणे शीण तो नासे ॥३॥
तुका म्हणे गंगे वास । बहु त्या आस स्थळाची ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३१
📿 जयांचियासाठी जातो वन
131.
जयांचियासाठी जातो वनाप्रती । ते तो सांगाती येती बळे ॥१॥
जयांचियासाठी टाकिला संसार । ते तो बलवत्तर पाठी येती ॥२॥
जयाचिया भेणे घेतिले कपाट । तो तेणे वाट निरोधिली ॥३॥
जयाचिया भेणे त्यागियेले जग । तो तेणे उद्योग लावियेला ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १३१
📿 पिहु की बोलि न बोल प
131.
पिहु की बोलि न बोल पपैय्या॥धृ०॥
तै खोलना मेरा जी डरत है । तनमन डावा डोल॥ पपैय्या०॥१॥
तोरे बिना मोकू पीर आवत है । जावरा करुंगी मै मोल॥ पपैय्या०॥२॥
मिरा के प्रभु गिरिधर नागर । कामनी करत कीलोल॥ पपैय्या०॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १३१
📿 भरते ना रिते आपण वसत
131.
भरते ना रिते आपण वसते । सकळ जग होते तयामाजी ॥१॥
ते रूप पै ब्रह्म चोखाळ सर्वदा । नित्यता आनंदा नंदाघरी ॥२॥
आशापाश नाही घरी पूर्णापूर्ण । सकळ जग होणे एक्यारूपे ॥३॥
निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक । जेथे ब्रह्मादिक ध्याती सदा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत एकनाथ गौळणी›
📿 अभंग क्र. १३२
📿 माझा कृष्ण देखिला का
132.
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥धृ॥
हाती घेऊनिया फूल । अंगणी रांगत आले मूल ।
होते सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥
माथा शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण ।
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नाममाला > अभंग ११० ते १५५›
📿 अभंग क्र. १३२
📿 नाम प्रल्हाद उच्चारी
132.
नाम प्रल्हाद उच्चारी । तया सोडवी नरहरि ।
घेतला कडियेवरी । भक्तसुख निवाला ॥
नाम बरवया बरवंट । नाम पवित्र आणि चोखट ।
नाम स्मरे नीलकंठ । निजसुखे निवाला ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १३२
📿 जिकडे पाहे तिकडे बां
132.
जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥
परी ते वर्म भज न कळे कांही । अधिंकचि डोही बुडतसे ॥२॥
एका पुढे एक पडती आघात । सारिता न सरत काय करूं॥ ॥३॥
चोखा म्हणे येथे न चलेंचि कांही । धांवे माझे आई विठाबाई ॥४॥