🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३५९
📿 जे जे जेथे पावे । ते
359.
जे जे जेथे पावे । ते ते समर्पावे सेवे ॥१॥
सहज पूजा याचि नावे । गिळत अभिमाने व्हावे ॥धृपद॥
अवघे भोगिता गोसावी । आदी आवसानी जीवी ॥२॥
तुका म्हणे सिण । न धरिता नव्हे भिन्न ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३५९
📿 जीव विठ्ठल शिव विठ्ठ
359.
जीव विठ्ठल शिव विठ्ठल | आत्मा विठ्ठल अखंडित ॥१॥
जनक विठ्ठल जननी विठ्ठल | सोयरा विठ्ठल सांगाती ॥२॥
अहिक्य विठ्ठल परत्र विठ्ठल | निरंतर विठ्ठल तारिता ॥३॥
नाम विठ्ठल रुप विठ्ठल | पतित पावन विठ्ठल विठ्ठल नामा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३५९
📿 बहु क्षेत्रें बहु ती
359.
बहु क्षेत्रें बहु तीर्थ । बहु दैवते असतीं ॥१॥
परी नये पंढरीराम । वाउगा श्रम होय अंतीं ॥२॥
देव भक्त आणि नाम । ऐसे उत्तम नाही कोठे ॥३॥
एका जनर्दनी तिहींचा मेळ । पाहता भूमंडळ पंढरीये ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३६०
📿 तीर्थ विठ्ठल क्षेत्र
360.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल |देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल पिता विठ्ठल |बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल गुरूदेवता विठ्ठल |निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला |म्हणोनि कळिकाळा पाड नाही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६०
📿 गंगा सागरादि तीर्थे
360.
गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती ॥१॥
श्रेष्ठांमांजी श्रेष्ठ तीर्थ पं समर्थ । दरुशने मनोरथ पूर्ण होती ॥२॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसे वैष्णव देखे नाही कोठे ॥३॥
गाताती वैष्णव आनंदे नाचती । सदोदित कीर्ति विठ्ठलाची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३६१
📿 नये जरी काही । तरी भ
361.
नये जरी काही । तरी भलतेचि वाही ॥१॥
म्हणविल्या दास । कोण न धरी वेठीस ॥धृपद॥
समर्थाच्या नावे । भलतैसे विकावे ॥२॥
तुका म्हणे सत्ता । वरी असे त्या बहुता ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३६१
📿 माता पिता बंधु भगिनी
361.
माता पिता बंधु भगिनी इष्टमित्र विठ्ठला तू रे ॥ध्रु.॥
बापा यावे भेटावे विसावा माझा गा तू |माझा कुळाचार माहेर रे जिव्हार विठ्ठला तू ॥१॥
माझे विद्याधन आयुष्य आरोग्यता विठ्ठला तू गा |माझे तप व्रत तीर्थ दान पुण्य विठोबा तू गा ॥२॥
माझा गुरूमंत्र दैवत आगम निगम विठ्ठला तू गा | भूपति सुरपति ब्रह्ममूर्ति विठोबा तू गा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६१
📿 प्रयागादि तीर्थे आहे
361.
प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये ॥१॥
बहुत ते साक्ष देती या स्थळासी । सदा तो मनासी शिव ध्याये ॥२॥
आनंद सोहळा त्रैलोक्य अगाध । पंढरीये भेदाभेद नाहींसत्य ॥३॥
एका जनार्दनी क्षेत्रवासी जन । देवा ते समान सत्य होती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३६२
📿 न संडवे अन्न । मज न
362.
न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥१॥
म्हणउनी नारायणा । कीव भाकितो करुणा ॥धृपद॥
नाही अधिकार । काही घोकाया अक्षर ॥२॥
तुका म्हणे थोडे । आयुष्य अवघेचि कोडे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६२
📿 समुद्रवलयांकित पृथ्व
362.
समुद्रवलयांकित पृथ्वी पाहता । ऐसे तीर्थ सर्वथा नाही कोठे ॥१॥
भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥
एका जनार्दनी तयाचाचि ठसा । भरुनि आकाशा उरलासे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३६३
📿 विटेवरी ऊभा दीनांचा
363.
विटेवरी ऊभा दीनांचा कैवारी |भेटाया उभारी दोन्ही बाह्या ॥१॥
गुण दोष त्याचे न पाहेचि डोळा |भेटे वेळोवेळा केशिराज ॥२॥
ऐसा दयावंत घेत समाचार |लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥
सर्वांलागी देतो समान दरूशन |उभा तो आपण समपायी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६३
📿 उत्तम ते क्षेत्र उत्
363.
उत्तम ते क्षेत्र उत्तम ते स्थळ । धन्य ते राऊळ पाहता डोळा ॥१॥
एक एक तीर्थ घडती कॊटी वेळां । चंद्रभागा डोळा देखिलिया ॥२॥
गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान । परी हे महिमान नाही कोठे ॥३॥
वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । दिंडी पताका घोळ नोहे कोठे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६४
📿 देव भक्त दोन्ही तीर्
364.
देव भक्त दोन्ही तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठे नाही ॥१॥
प्रयागादी तीर्थ पहाती पाहता । न बैसे तत्त्वता मन माझे ॥२॥
पंढरीची ऐसा आहे समागम । म्हणोनि भवभ्रम हरलासे ॥३॥
एका जनार्दनी पाहता विठ्ठल देव । फिटला तो भेव संसाराचा ॥४॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ३६५
📿 देवकी कहे सुन बात भ्
365.
देवकी कहे सुन बात भ्रतारो सुनिके आवे कंस रे ।
जानि मनमें लेकर होतो श्रीधर नइ जसवदा पास रे ॥१॥
झबके जावोजी तुम वसुदेवा आयेंगे कंसबिखार ।
डंखविखे प्राण लेवे सबके, कहा करो बिचार ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३६५
📿 विचारावाचून । न पविज
365.
विचारावाचून । न पविजे समाधान ॥१॥
देह त्रिगुणाचा बांधा । माजी नाही गुण सुदा ॥धृपद॥
देवाचिये चाडे । देवा द्यावे जे जे घडे ॥२॥
तुका म्हणे होते । बहु गोमटे उचिते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६५
📿 सकळीक तीर्थे पाहता ड
365.
सकळीक तीर्थे पाहता डोळा । निवांत नोहे हृदयकमळा ॥१॥
पाहता तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले । भंगा ॥२॥
पाहती विठ्ठल सांवळा । परब्राह्मा डोळा देखियेलें ॥३॥
एका जनार्दनी पाहोनी ध्यान । भुललें मन त्या ठायी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३६६
📿 तुटे भवरोग । संचितक्
366.
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥
ऐसे विठोबाचे नाम । उच्चारिता खंडे जन्म ॥धृपद॥
वसो न सके पाप । जाय त्रिविध तो ताप ॥२॥
तुका म्हणे माया । होय दासी लागे पाया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६६
📿 पावन क्षेत्र पंढरपुर
366.
पावन क्षेत्र पंढरपुर । पावन तीर चंद्रभागा ॥१॥
पावन संत पुंडलीक । पावन देख श्री विठ्ठल ॥२॥
पावन देह गेलीया तेथे । होती जीवनमुक्त सर्व जीव ॥३॥
एका जनार्दानीं पावन । पावन पंढरी अधिष्ठिन ॥४॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ३६७
📿 बसुदेवा तब बारन आवे
367.
बसुदेवा तब बारन आवे सोवे गोकुल नंद ।
दरवाजा आपे खोलत है रे आवत है गोविंद ॥१॥
जिस दरवाजे लोहेके साकल-कुलुपो तोडि रखाये ।
सब जन सेवक सोवे तबही बसुदेवा घर जाये ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३६७
📿 मुसावले अंग । रंगी म
367.
मुसावले अंग । रंगी मेळविला रंग ॥१॥
एकी एक दृढ जाले । मुळा आपुलिया आले ॥धृपद॥
सागरी थेंबुटा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥
तुका म्हणे नवे । नव्हे जाणावे हे देवे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६७
📿 अवघे आनंदाचे । क्षेत
367.
अवघे आनंदाचे । क्षेत्रं विठ्ठल देवांचे ॥१॥
अवघे हे पावन । तीर्थ चंद्रभागा स्नान ॥२॥
अवघे संतजन । पुंडलिकासी वंदन ॥३॥
अवघा विठ्ठल देव । एका जनार्दनी भाव ॥४॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ३६८
📿 बसुदेवा जब देखे हरिक
368.
बसुदेवा जब देखे हरिकू चार भुजा श्रीमुरारी ।
कहत है श्याम तुमारो दरशन वांच्छित है दिन सारी ॥१॥
तमकू बचन सुनावे दारो सेबक सोवा ।
तुम रूप छोडो देवा हमसे कंसकु है दावा ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३६८
📿 आमुचा विठ्ठल प्रचंड
368.
आमुचा विठ्ठल प्रचंड | इतरा देवांचे न पाहू तोंड ॥१॥
एका विठ्ठलावांचून | न करू आणिक भजन ॥२॥
आम्हा एकविध भाव | कदा न म्हणू इतरा देव ॥३॥
नित्य करू हा अभ्यास | म्हणे नामा विष्णुदास ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३६८
📿 अवघे परब्रह्मा क्षेत
368.
अवघे परब्रह्मा क्षेत्र । अवघे तेथे ते पवित्र ॥१॥
अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ॥२॥
अवघीयां दुःख नाही । अवघे सुखाचि तया ठायी ॥३॥
अवघे आनंदभरित । एका जनार्दनी सदोदित ॥४॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ३६९
📿 जय जय कृष्ण कृपाल भय
369.
जय जय कृष्ण कृपाल भयोजी नहीं किये जप तप दान ।
जै गृहि ब्राह्मणपूजन नहिं रे भूमि नहीं गोदान ॥१॥
तुम क्यो प्रगट भयो कहा जानो ।
अर्जन वंदन नहिं कछु पालो होय अचंबा मान ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३६९
📿 चहू आश्रमांचे धर्म ।
369.
चहू आश्रमांचे धर्म । न राखता जोडे कर्म ॥१॥
तैसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥धृपद॥
तपे इंद्रिया आघात । क्षणे एका वाताहात ॥२॥
मंत्र चळे थोडा । तरि धडचि होय वेडा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३६९
📿 भजू एका विठोबास | आण
369.
भजू एका विठोबास | आणिक न करू अभ्यास ॥१॥
येथे साधन आहे एक | पाहोन विठोबाचे मुख ॥२॥
वर्णू हरीचे पवाडे | काळ लावू देशधडे॥३॥
नामा विष्णुदास म्हणे | ऐसे करू हरिकिर्तन ॥४॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ३७०
📿 सुनो कहत है श्याम सु
370.
सुनो कहत है श्याम सुजानो पुण्य बिना नहीं कोई ।
जिसके पल्लो जप तप दान पावे दरसन वोही ॥१॥
तुम सब बात सुनोजी चित्तकु ठोर धरोजी ।
हरिके आयो पेटे येही बात कहोजी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३७०
📿 सोडिला संसार । माया
370.
सोडिला संसार । माया तयावरी फार ॥१॥
धावत चाले मागे मागे । सुखदुःख साहे अंगे ॥धृपद॥
याने घ्यावे नाम । तीसीकरणे त्याचे काम ॥२॥
तुका म्हणे भोळी । विठ्ठल कृपेची कोवळी ॥३॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ३७१
📿 ये गोविंद प्राप्त भय
371.
ये गोविंद प्राप्त भयो कहा काज ।
व्रत नहि जानूं तप नहि जानूं कारागृहमें बिराज ॥१॥
पूरब जनम तप करत है तब बरद मिलो बनमाली ।
मेरे पेटमें प्रगटो निरगुन येही मॉंगत बाली ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३७१
📿 बैसू खेळू जेवू । तेथ
371.
बैसू खेळू जेवू । तेथे नाम तुझे गाऊ ॥१॥
रामकृष्णनाममाळा । घालू ओवुनिया गळा ॥धृपद॥
विश्वास हा धरू । नाम बळकट करू ॥२॥
तुका म्हणे आता । आम्हा जीवन शरणागता ॥३॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ३७२
📿 ये अजब बात सुनाई भाई
372.
ये अजब बात सुनाई भाई ।
गरूडको पांख हिराये कागा लक्ष्मी काहे चोरन गाई ॥१॥
ये सूरज को बिंब अंधारे सोवे चंदरकु आग जलावे ।
राहुकु गिर्हो भोगी कहा रे अमृत ले मर जावे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३७२
📿 महाक्षेत्र पंढरपुर ।
372.
महाक्षेत्र पंढरपुर । नांदे विठ्ठ्ल सचार ॥१॥
तया ठायी सुख आहे । संत जाणती तो लाहें ॥२॥
विश्रांतीचे स्थान । भावाभाव समान ॥३॥
दुःख दरिद्र नाही । वाचे म्हणता विठाबाई ॥४॥