🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३१२
📿 करणेंचि नाही रितियाच
312.
करणेंचि नाही रितियाचा शोक । कासया हव्यास लाभ नाही ॥१॥
पुढेंही आड मागे दिसे विहीर । ऐसिया विचारी पडिलोंसे ॥२॥
बहु रगे रंग रंगोनी दाटला । परि कोण प्याला तयापरी ॥३॥
चोखा म्हणे ऐसा सर्वही प्रकार । किती कर कर करू वाया ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ७›
📿 अभंग क्र. ३१२
📿 सुण लीजो बिनती मोरी
312.
सुण लीजो बिनती मोरी मै शरण गही प्रभु तेरी ।
तुम तो पतित अनेक उधारे भव सागर से तारे॥
मै सबका तो नाम न जानू को कोई नाम उचारे ।
अम्बरीष सुदामा नामा तुम पहुंचाये निज धामा ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३१३
📿 कमळगभींचा पुतळा । पा
313.
कमळगभींचा पुतळा । पाहता दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥
वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगी चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥
उभे पुढे अक्रुर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पाहाती मुखकमळभाव । नाठवे द्वैत ॥३॥
रुप साजिरे गोजिरे । दृष्टि पाहता मन न पुरे । एका जनार्दनी झुरे । चित्त तेथे सर्वदा ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 हरिश्चंद्र आख्यान›
📿 अभंग क्र. ३१४
📿 येरीकडे ताराराणी । द
314.
येरीकडे ताराराणी । द्विजा घरी वाहे पाणी ॥1॥
छिद्र पाडोनी रांजणा । पाणी त्यामध्ये थारेना ॥2॥
नानापरीचे गांजणे । देती गाळी हो प्रदाने ॥3॥
पाणी वाहणे की खेळा । होऊ आली सांजवेळा ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३१४
📿 किती किती वाण एकचि प
314.
किती किती वाण एकचि प्रकार । न करिता सारासार न भरे गोणी ॥१॥
नवल वाटले हाटते गुंतले । रिकामे आले गेले वायाविण ॥२॥
फिरत फिरत जे जे वाण पाहाती । हांवचि भरती रिती गोणी ॥३॥
चोखा म्हणे हे तो न कळे लाघव । वोळखे जो धांव डाव विरळा एक ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३१४
📿 मी तो दीनाहूनि दीन ।
314.
मी तो दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥
मी तो आलो शरणागत । माझे करावे स्वहित ॥धृपद॥
दिनानाथा कृपाळुवा । सांभाळावे आपुल्या नावा ॥२॥
तुका म्हणे आता । भले नव्हे मोकलिता ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३१५
📿 किती या हाटासी येवोन
315.
किती या हाटासी येवोनिया गेले । आहे ते संचले जैसे तैसे ॥१॥
बहुतांचे मत बहुत प्रकार । वाण हा अपार निवडिला ॥२॥
जो जया आवडे तोचि घेतो वाण । पुढील कारण विसरोनि ॥३॥
चोखा म्हणे अवघा वाण तो देखिला । रिकामाची आला नामदेव ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ७›
📿 अभंग क्र. ३१५
📿 बंसीवारा आज्यो म्हार
315.
बंसीवारा आज्यो म्हारे देस । सांवरी सुरत वारी बेस॥
आऊं-आऊ कर गया जी कर गया कौल अनेक ।
गिणता-गिणता घस ग म्हारी आंगलिया री रेख॥
मै बैरागिण आदिकी जी थांरे म्हारे कदको सनेस ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३१५
📿 नाही दुकळलो अन्ना ।
315.
नाही दुकळलो अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥
देव केला सकळसाक्षी । काळी आणि शुद्धपक्षी ॥धृपद॥
भोगी भोगविता । बाळासवे तोचि पिता ॥२॥
कर्म अकर्म जळाले । प्रौढे तुका ते उरले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३१५
📿 जगांचे जीवन भक्तांचे
315.
जगांचे जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसे ॥१॥
ते रुप गोकुळीं नंदाचिये घरी । यशोदे मांडिवरी खेळतसे ॥२॥
इंद्रादी शंकर ध्यान धरती ज्यांचें । तो लोणी चोरी गौळ्यांचे घरोघरी ॥३॥
सर्वावरी चाले जयाची ते सत्ता । त्यांची बागुल आला म्हणता उगा राहे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 हरिश्चंद्र आख्यान›
📿 अभंग क्र. ३१६
📿 धावा धावा नगरवासी ।
316.
धावा धावा नगरवासी । लास भक्षिते लेकुरासी ॥1॥
अवघे होऊनिया गोळा । कोणी न जातो देउळा ॥2॥
जाळ करोनी पाहती । शेण धुळी धोंडे माती ॥3॥
मारोनी बाहेर घातली । केली डोंबाचे हवाली ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३१६
📿 काय खावे आता कोणीकडे
316.
काय खावे आता कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥१॥
कोपला पाटील गाविचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृपद॥
आता येणे चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणात ॥२॥
भल्या लोकी यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 रामचरित्र›
📿 अभंग क्र. ३१७
📿 म्हणसी बिभीषण शाहणा
317.
म्हणसी बिभीषण शाहणा | परि तो महामूर्ख जाणा ॥१॥
काय तो रामासी भेटला | आवघा रामचि नाही जाला ॥२॥
राम दृष्टी देखतांची | पदवी न घेववेचि त्याची ॥३॥
कोण हित केले तेणे | राम नाकळी चिंतने ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३१७
📿 अर्जुनाचे रथी श्रमला
317.
अर्जुनाचे रथी श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथे ॥१॥
धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणोनि कर जघन ठेउनी उभा ॥२॥
कंसादी मल्ल मारी जरासंध । ते चरणरविंद उभे विटे ॥३॥
धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करे । म्हणोनि श्रमें निर्धारे ठेविले कटी कर ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 थालीपाक›
📿 अभंग क्र. ३१८
📿 थालीपाक ऐकता । हरि व
318.
थालीपाक ऐकता । हरि वारी जन्मव्यथा ॥1॥
दुर्योधनाच्या घरासी । आला दुर्वास हो ऋषी ॥2॥
सेवे बहुत तोषविला । वर माग तू इच्छिला ॥3॥
शिष्यासह रानी जावे । इच्छाभोजन मागावे ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ७›
📿 अभंग क्र. ३१८
📿 आली रे मेरे नैणा बाण
318.
आली रे मेरे नैणा बाण पड़ी ।
चित्त चढ़ो मेरे माधुरी मूरत उर बिच आन अड़ी ।
कब की ठाढ़ी पंथ निहारू अपने भवन खड़ी॥
कैसे प्राण पिया बिन राखू जीवन मूल जड़ी ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 थालीपाक›
📿 अभंग क्र. ३१९
📿 मध्यरात्री ऋषिसहित ।
319.
मध्यरात्री ऋषिसहित । वना आले अकस्मात् ॥1॥
पंडुसुत जागे झाले । ऋषि समस्त वंदिले ॥2॥
धर्म भीमाकडे पाहे । सत्त्वहानि होत आहे ॥3॥
द्रौपदीने धावा केला । देव जेविता उठिला ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३१९
📿 जे मन गांजले विषयाचे
319.
जे मन गांजले विषयाचे पोखे । ते केले पारखे कृपा दृष्टी ॥१॥
काम आणि क्रोध जे जीवे मारिले । दंभ मान केले दूर देशी ॥२॥
आशा आणि ममता दवडिली चिंता । नाही भय आता संसाराचे ॥३॥
चोखा म्हणे अवघा संदेह फिटला । उपकार हा केला नामयानें॥ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३१९
📿 विठ्ठला रे तू उदाराच
319.
विठ्ठला रे तू उदाराचा राव । विठ्ठला तू जीव जगाचा या ॥१॥
विठ्ठला रे तू उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशी सकळसिद्धी ॥धृपद॥
विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥
विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले । विठ्ठला लागले ध्यान मनी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 रामचरित्र›
📿 अभंग क्र. ३१९
📿 श्रीराम सोयरा आला मा
319.
श्रीराम सोयरा आला माझ्या घरा | दिधला म्या थारा हृदयी माझ्या ॥१॥
पावलो विश्रांति धाले माझे मन | न लगे आता ध्यान शिकावया ॥२॥
ज्यासाठी हिंडणे जटामौनमग्न | धरिले तेणे ठाणे हृदयी माझ्या ॥३॥
योग याग तप करावे साधन | तोहि जाण ओठी सदा वसे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३१९
📿 जेथे वाजविला वेणु शु
319.
जेथे वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद ॥१॥
सकळीक देव आले । ते भोंवती राहिले ॥२॥
जोडिले जेथे समपद । तया म्हणती विष्णूपद ॥३॥
भोवंतालीं पदें उमटली । तेथे गोपाळ नाचती ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३२०
📿 धन्य धन्य नामदेव । म
320.
धन्य धन्य नामदेव । माझा निरसला भेव ॥१॥
विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी । खून सांगितली निर्धारी ॥२॥
ठेवोनि माथा हात । दिले मज हित ॥३॥
दावियेले तारू । चोखा म्हणे माझा गुरू ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ७›
📿 अभंग क्र. ३२०
📿 प्रभुजी मै अरज करु छ
320.
प्रभुजी मै अरज करु छू म्हारो बेड़ो लगाज्यो पार॥
इण भव मे मै दुख बहु पायो संसा-सोग निवार ।
अष्ट करम की तलब लगी है दूर करो दुख-भार॥
यो संसार सब बह्यो जात है लख चौरासी री धार ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 सिताशुद्धी›
📿 अभंग क्र. ३२०
📿 सीताशुद्धी
320.
सीताशुद्धी
हनुमंत गेला सीताशुद्धिलागी | लंका मध्यभागी घेऊनिया ॥१॥
माता जानकीच्या करीत शुद्धीसी | हिंडे गृहदेशी राक्षसांच्या ॥२॥
न देखे तो सती सीतादेवी माया | अकस्मात तया वनामाजी ॥३॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ७›
📿 अभंग क्र. ३२१
📿 म्हारे घर होता जाज्य
321.
म्हारे घर होता जाज्यो राज ।
अबके जिन टाला दे जा सिर पर राखू बिराज॥
म्हे तो जनम जनमकी दासी थे म्हांका सिरताज ।
पावणड़ा म्हांके भला ही पधार, ह्या सब ही सुघारण काज॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३२१
📿 द्वारका समुद्रांत बु
321.
द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली अद्यापि ॥१॥
द्वारकेहुनि बहुत सुख । पंढ रीये अधिक एक आहे ॥२॥
भीमातीरी दिंगबर । करुणाकर विठ्ठल ॥३॥
भक्तांसाठीं निरंतर । एका जनार्दनी कटी धरिले कर ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३२२
📿 न करी न करी आणिक साध
322.
न करी न करी आणिक साधन । नामयाने खूण सांगितली ॥१॥
संसार सागर भरला दुस्तर । तारक निर्धार विठ्ठल हा ॥२॥
मंत्रांचा हा मंत्र त्रिअक्षरी सोपा । तुटताती खेपा जन्म मरण ॥३॥
चोखा म्हणे माझा धन्य गुरूराव । दाखविला देव हृदयी माझ्या ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३२२
📿 अनिर्वाच्य ब्रह्म नि
322.
अनिर्वाच्य ब्रह्म निगम म्हणती | विणले वेवादती अठरा साही ॥१॥
ते हे पुंडलिके चोहांटा उभे केले | भावे भुलविले पंढरीये ॥२॥
घ्या रे घ्या रे तुम्ही कैवल्याचे पीक | देतो पुंडलिक सकळ जीवा ॥३॥
जे उपनिषदांचे मथित जे साराचे यथार्थ | तो हा पंढरीनाथ प्रगट जगी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३२२
📿 जो हा उद्धार प्रसवे
322.
जो हा उद्धार प्रसवे ॐ कार । ते रुप सुंदर विटेवरी ॥१॥
ध्याता ध्यान ध्येय जेथे पै खुटलें । ते प्रगटलें पंढरीयें ॥२॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचें आथिलें । ते रुप सानुलें पंढरीये ॥३॥
एका जनार्दनी रुपांचे रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥४॥