🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४६०
📿 नका दंतकथा येथे सांग
2460.
नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
अनुभव येथे पाहिजे साचार । न चलती चार आम्हापुढे ॥धृपद॥
वर कोणी मानी रसाळ बोलणे । नाही झाली मने ओळखितो ॥२॥
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळाली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४६०
📿 एकचि माहेर नाथिली ।
2460.
एकचि माहेर नाथिली । हे तंव जाण भ्रांति बोली ॥१॥
विठ्ठल विठ्ठल रोकडा । विठ्ठल पाहे चहुंकडा ॥२॥
आपण आंत बाहेरी पाहे । विठ्ठल देखोनि उगाची राहे ॥३॥
एका जनार्दनी शरण । विठ्ठल विठ्ठल परिपूर्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४६१
📿 न करि त्याचे गांढेपण
2461.
न करि त्याचे गांढेपण । नारायण सिद्ध उभा ॥१॥
भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥धृपद॥
याचे सोई पाउल वेचे । मग कैचे अडथळे ॥२॥
तुका म्हणे खरे खोटे । न म्हणे मोटे लहान ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४६१
📿 सूर्य अंधारांतें नास
2461.
सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥
माझे जिणे देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥
देही देहअभिमान । जीवी मायेचें ते ध्यान ॥३॥
एका जनार्दनी माया । देहाधीन देवाराया ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४६२
📿 रिकामे तू नको मना ।
2462.
रिकामे तू नको मना । राहो क्षणक्षणा ही ॥१॥
वेळोवेळा पारायण । नारायण हे करी ॥धृपद॥
भ्रमणांच्या मोडी वाटा । न भरे फाटा आडराने ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवे । हे चि घ्यावे धणीवरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४६२
📿 नित्य नूतन दीपज्वाळा
2462.
नित्य नूतन दीपज्वाळा । होती जाती देखती डोळा ॥१॥
जागृति आणि देखती स्वप्न । दोहींसी देखता भिन्न भिन्न ॥२॥
भिन्नपणें नका पाहु । एका जनार्दनी पाहू ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४६३
📿 पंचभूतांचिये सापडलो
2463.
पंचभूतांचिये सापडलो संदी । घातलोंसे बंदी अहंकारे ॥१॥
आपल्या आपण बांधविला गळा । नेणे चि निराळा असता ही ॥धृपद॥
कासया हा सत्य लेखिला संसार । का हे केले चार माझे माझे ॥२॥
का नाही शरण गेलो नारायणा । का नाही वासना आवरीली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४६४
📿 देव झाले अवघे जन । ग
2464.
देव झाले अवघे जन । गुण दोष हारपले ॥१॥
बरवे झाले बरवे झाले । चित्त धाले महालाभे ॥धृपद॥
दर्पणीचे दुसरे भासे । परि ते असे एक ते ॥२॥
तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वोहोळासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४६५
📿 जनार्दने केले अभिनव
2465.
जनार्दने केले अभिनव देखा । तोडियेले शांखा अद्वैताची ॥१॥
केला उपकार केला उपकार । मोडियेले घर प्रपंचाचें ॥२॥
एका जनार्दनी एकपणे देव । दाविला नवलाव अभेदाचा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४६७
📿 भुक्ति आणि मुक्ति फु
2467.
भुक्ति आणि मुक्ति फुकाचे ठेवणें । श्रीगुरु जनार्दने तुच्छ केले ॥१॥
येर ब्रह्माज्ञाना काय तेथे पाड । मोक्षाचे काबाड वारियेलें ॥२॥
साधन अष्टांग यज्ञ तप दान । तीर्था तीर्थाटन शीण वाया ॥३॥
एका जनार्दनी दाविला आरिसा । शुद्धी त्या सरसा सहज झालो ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४६८
📿 देहाचें देऊळ देवळींच
2468.
देहाचें देऊळ देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे ॥१॥
पुजन ते पुज्य पूजकु आपण । स्वये जनार्दन मागेंपुढें ॥२॥
ध्यान ते ध्येय धारणा स्वयमेव । जनार्दनी ठाव रेखियेला ॥३॥
एका जनार्दनी समाधी समाधान । पडिले मौन देही देहा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४६९
📿 चित्ताचे बांधले जवळी
2469.
चित्ताचे बांधले जवळी ते वसे । प्रकाशी प्रकाशे सर्वकाळ ॥१॥
अंतरी वसावी उत्तम ते भेटी । होऊ काही तुटी न सके चि ॥धृपद॥
ब्रम्हांड कवळे आठवणेसाठी । धरावा तो पोटी वाव बरा ॥२॥
तुका म्हणे लाभ घरिचिया घरी । प्रेमतंतु दोरी न तुटता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४७०
📿 दुखवले चित्त आजिच्या
2470.
दुखवले चित्त आजिच्या प्रसंगे । बहु पीडा जगे केली देवा ॥१॥
कधी हा संबंध तोडिसी ते नेणे । आठवूनि मने पाय असे ॥धृपद॥
आणिकाची येती अंतरा अंतरे । सुखदुःख बरेंवाइट ती ॥२॥
तुका म्हणे घडे एकाताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४७२
📿 भेदाभेद ताळा न घडे घ
2472.
भेदाभेद ताळा न घडे घालिता । आठवा रे आता नारायण ॥१॥
येणे एक केले अवघे होय सांग । अच्युताच्या योगे नामे छंदे ॥धृपद॥
भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशी ॥२॥
तुका म्हणे येथे भावेविण पार । न पविजे सार हे चि आहे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४७२
📿 पहा कैसी नवलाची ठेव
2472.
पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव ॥१॥
नाही जप तप अनुष्ठान । नाही केले इंद्रियाचें दमन ॥२॥
नाही दान धर्म व्रत तप । अवघा देही जालो निष्पाप ॥३॥
पापपुण्याची नाही आटणी । चौदेहासहित शरण एका जनार्दनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४७३
📿 जे गाती अखंड विठ्ठला
2473.
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायी चित्त ठेवीन मी ॥१॥
जयांसी आवडे विठ्ठलाचे नाम । ते माझे परम प्राणसखे ॥धृपद॥
जयांसी विठ्ठल आवडे लोचनी । त्यांचे पायवणी स्वीकारीन ॥२॥
विठ्ठलासी जिही दिला सर्व भाव । त्यांच्या पायी जीव ठेवीन मी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४७४
📿 काय तो विवाद असो भेद
2474.
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावे ॥१॥
निघोनि आयुष्य जाते हातोहात । विचारी पा हित लवलाही ॥२॥
तुका म्हणे भावभक्ती हे कारण । नागवी भूषण दंभ तोचि ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४७५
📿 देवकीनंदने । केले आप
2475.
देवकीनंदने । केले आपुल्या चिंतने ॥१॥
मज आपुलिया ऐसे । मना लावूनिया पिसे ॥धृपद॥
गोवळे गोपाळा । केले लावूनिया चाळा ॥२॥
तुका म्हणे संग । केला दुरि नव्हे मग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४७७
📿 एकविध आम्ही न धरू पा
2477.
एकविध आम्ही न धरू पालट । न संडू ते वाट सांपडली ॥१॥
म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझे बुद्धीबळ पाय तुझे ॥धृपद॥
बहुत न कळे बोलता प्रकार । अंतरा अंतर साक्षी असे ॥२॥
तुका म्हणे आगा जीवांच्या जीवना । तू चि नारायणा साक्षी माझा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४७८
📿 जेथे परापश्यन्तीची म
2478.
जेथे परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥
तेणे माझे मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥
उपाधी तुटली शांति हे भेटली । सर्व तेथे आटली तळमळ ॥३॥
एका जनार्दनी प्रेमाचें ते प्रेम । दाविले सप्रेम हृदयांत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४८१
📿 आपला तो एक देव करुनि
2481.
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर ती माइके दुःखाची जनिती । नाही आदिअंती अवसानी ॥धृपद॥
अविनाश करी आपुलिया ऐसे । लावी मना पिसे गोविंदाच्या ॥२॥
तुका म्हणे एका मरणेंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ती मागे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४८२
📿 आणिकांचे धरिता आस ।
2482.
आणिकांचे धरिता आस । होतो नाश जीवित्वा ॥१॥
म्हणोनि निर्धारिलें मन । धरिले ठाणें रामकृष्ण ॥२॥
न धांवे आता कोठे मन । हृदयी ध्यान धरिले ते ॥३॥
एका जनार्दनी प्राण । ठेविला जाण समूळ चरणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४८४
📿 लोह कफ गारा सिद्ध हे
2484.
लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अग्नी टणत्कारी दिसो येतो ॥१॥
सांगावे ते काई सांगावे ते काई । चित्ता होय ठायी अनुभव तो ॥धृपद॥
अन्ने सांगो येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊ हेवा ॥२॥
तुका म्हणे मिळे जीवनी जीवन । तेथे कोणा कोण नांव ठेवी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४८४
📿 उपाधीच्या नांवे घाति
2484.
उपाधीच्या नांवे घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणें काय बोलु ॥१॥
टाकूनिइया संग धरियेला देव । आता तो उपाय दुजा नाही ॥२॥
सर्व वैभव सत्ता जयाचे पदरी । जालो अधिकारी आम्ही बळे ॥३॥
एका जनादनीं तोडियेला संग । जालो आम्ही निःसंग हरिभजनीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४८५
📿 बाळाचे जीवन । माता ज
2485.
बाळाचे जीवन । माता जाणे भूक तहान ॥१॥
काय करू विनवणी । असो मस्तक चरणी ॥धृपद॥
ठेविलिये ठायी । चित्त ठेवुनि असे पायी ॥२॥
करितो हे सेवा । चिंतन सर्वा ठायी देवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४८६
📿 जाणतो समये । परिमित
2486.
जाणतो समये । परिमित कामा नये ॥१॥
तुम्ही सांगावे ते बरे । देवा सकळ विचारे ॥धृपद॥
फुकाचिये पुसी । चिंता नाही होते ऐसी ॥२॥
तुका म्हणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४८६
📿 उघड दाखविले देवा । न
2486.
उघड दाखविले देवा । नाही सेवा घेतली ॥१॥
ऐसी प्रेमाची माउली । जगी व्यापक व्यापली ॥२॥
नाही घालीत भार कांही । आठव देही रामकृष्ण ॥३॥
एका जनार्दनी शरण । मन माझे नेलें चोरुन ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४८९
📿 एक भाव दुजा न राहो म
2489.
एक भाव दुजा न राहो मनी । श्रीरंगावांचुनी दुजे नाही ॥१॥
मनासी ते छंद आदर आवड । नामामृत चाड गोविंदाची ॥२॥
एका जनार्दनी नाम वाचे गाऊ । आणिक न ध्याऊं दुजे कांही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४९०
📿 बैसलो तो कडियेवरी ।
2490.
बैसलो तो कडियेवरी । नव्हे दुरी वेगळा ॥१॥
घडले हे बहुता दिसा । आता इच्छा पुरवीन ॥धृपद॥
बहु होता जाला सीण । नाही क्षण विसावा ॥२॥
दुःखी केले मीतूपणे । जवळी नेणे होते ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४९०
📿 अवघे देवा तुजसमान ।
2490.
अवघे देवा तुजसमान । मज नाही भिन्न भिन्न ॥१॥
नाम वाचे सदा गाऊ । आवदी ध्याऊं विठ्ठल ॥२॥
वारंवार संतसंग । कीर्तनरंग उल्हास ॥३॥
एक जनार्दनी सार । विठ्ठल उच्चार करु आम्ही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४९१
📿 भुक्ति मुक्तीचें कार
2491.
भुक्ति मुक्तीचें कारण । नाही नाही आम्हा जाण ॥१॥
एक गाऊ तुमचे नाम । तेणे होय सर्व काम ॥२॥
धरलिया मूळ । सहज हाती लागे फळ ॥३॥
बीजाची आवडी । एक जनार्दनी गोडी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४९२
📿 सेवके करावे सांगितले
2492.
सेवके करावे सांगितले काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥
काय देवा नेणो आले गांढेपण । तुम्ही शिक्तहीन झाले दिसा ॥धृपद॥
विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळे । ते दिसे या काळे अव्हेरिले ॥२॥
तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करू हरी काय सांगा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४९३
📿 खेळता निजभावे समर्था
2493.
खेळता निजभावे समर्थाचे बाळ । तयाच्या सकळ सत्तेखाली ॥१॥
तरी लेवविला शोभे अळंकार । नाही तरी भार मानाविण ॥धृपद॥
अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी म्हणऊनि ॥२॥
तुका म्हणे माझे ऐसे आहे देवा । म्हणऊनि सेवा समर्पीली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४९४
📿 निरांजनी एकटवाणे । स
2494.
निरांजनी एकटवाणे । संग नेणे दुसरा ॥१॥
पाहा चाळविले कैसे । लावुनि पिसे गोवळे ॥धृपद॥
लपले अंगे अंग । दिला संग होता तो ॥२॥
तुका म्हणे नव्हते ठावे । झाले भावे वाटोळे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४९४
📿 गाढवासांगती सुकाळ ला
2494.
गाढवासांगती सुकाळ लाथांचा । श्रम जाणिवेचा वाया जाय ॥१॥
आम्हांसी तो एक प्रेमाचे कारण । नामाचे चिंतन विठोबाच्या ॥२॥
एका जनार्दनी आवडी हे माझी । संतचरण पुजीं सर्वकाळ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४९६
📿 रामकृष्णनाम । कथा कर
2496.
रामकृष्णनाम । कथा करू कीर्तन ॥१॥
हाचि आम्हा मंत्र । सोपा दिसे सर्वत्र ॥२॥
संतांचे संगती । मुखी नामामृत तृप्ती ॥३॥
बसो कीर्तनी सदा । माझी मति गोविंदा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४९८
📿 मागे बहुतांनीं मानिल
2498.
मागे बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास जाहलो ॥१॥
कायावाचामन विकिले चरणी । राहिलो धरूनि कंठी नाम ॥२॥
एका जनार्दनी नामाचा प्रताप । भक्त आपोआप तरताती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४९९
📿 खेळतो ते खेळ पायाच्य
2499.
खेळतो ते खेळ पायाच्या प्रसादे । नव्हती ही छंदे नासिवंत ॥१॥
माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुके करी कृपादान ॥धृपद॥
प्रसादाची वाणी वदे ती उत्तरे । नाही मतांतरे जोडियेली ॥२॥
तुका म्हणे रस वाढितिया अंगे । छाया पांडुरंगे केली वरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४९९
📿 वायांविण करु नये बोभ
2499.
वायांविण करु नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हा ॥१॥
आता नाही भय तत्त्वता । ठेविला माथा चरणावरी ॥२॥
धरिल्या जन्माचें सार्थक । निवारला थोर धाक ॥३॥
गेला मागील तो शीण । तुमचे दरुशन होतांची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २५००
📿 अखंड मुडतर । सासुरवा
2500.
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥
याची जाली बोळवण । आता न देखो तो शीण ॥धृपद॥
बहुतांची दासी । तये घरी सासुरवासी ॥२॥
तुका म्हणे मुळे । खंड झाला एका वेळे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५०१
📿 अवघा भार वाटे देवा ।
2501.
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न करीता ॥१॥
कसोटी हे असे हाती । सत्य भूती भगवंत ॥धृपद॥
चुकलोंसा दिसे पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥
तुका म्हणे सोंग वाया । कारण या अनुभवे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५०२
📿 आता तुम्ही कृपावंत ।
2502.
आता तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥
गोमटे ते करा माझे । भार ओझे तुम्हासी ॥धृपद॥
वंचिले ते पायापाशी । नाही यासी वेगळे ॥२॥
तुका म्हणे सोडिल्या गाठी । दिली मिठी पायासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५०२
📿 असोनी देही आम्ही विद
2502.
असोनी देही आम्ही विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायी ॥१॥
माझे नवल म्यांच पाहिले डोळा । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥
काय सांगु नवलाची कहाणी । पाहते पाहणें बुडाले दोन्ही ॥३॥
न पहावे न देखवें नायकावें कानी । कायावाचामनें शरण एका जनार्दनी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५०४
📿 देव पाहता मजमाजीं भे
2504.
देव पाहता मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा ॥१॥
माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरुने ॥२॥
एका जनार्दनी पाहिलासे देव । फिटला संदेह आता माझा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५०५
📿 बहुता दिसांची आजि जा
2505.
बहुता दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥
येथे सावकासे घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥धृपद॥
बहु दुःख दिले होते घरी कामे । वाढला हा श्रमेंश्रम होता ॥२॥
बहु दिस होता सांडिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि झाला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५०५
📿 पहावया गेलों देव । त
2505.
पहावया गेलों देव । तो मीची स्वयमेव ॥१॥
आता पाहणेंचि नाही । देव भरला हृदयी ॥२॥
पाहता पाहता खुंटले । देवपण मजमाजीं आटले ॥३॥
परतले दृष्टीचें देखणे । अवघा देव ध्यानेंमनें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५०६
📿 कायावाचामनें । कृपाळ
2506.
कायावाचामनें । कृपाळू दीनाकारणें ॥१॥
ऐसा समर्थ तो कोन । माझ्या जनार्दनावांचुन ॥२॥
माझे मज दाखविले । उघडें वाचे बोलविलें ॥३॥
जनी जनार्दन । एका तयासी शरण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५०७
📿 सर्व देवांचा हा देव
2507.
सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥
त्याचे ठायी भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥
वारंवार ठेवीन डोई । उगेच पायी सर्वदा ॥३॥
न मागे भुक्ति आणि मुक्ति । संतसंगति मज गोड ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५०८
📿 समर्थासी नाही वर्णाव
2508.
समर्थासी नाही वर्णावर्णभेद । सामुग्री ते सर्व सिद्ध घरी ॥१॥
आदराचे ठायी बहुच आदर । मागितले फार ते ते वाढी ॥धृपद॥
न म्हणे सुहृद सोयरा आवश्यक । राजा आणि रंक सारिखेचि ॥३॥
भाव देखे तेथे करी लडबड । जडा राखे जड निराळेची ॥३॥