🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६३२
📿 बहु मार्ग बहु प्रकार
1632.
बहु मार्ग बहु प्रकार । तेथे निर्धार न बैसे ॥१॥
उलट सुलट कासया करणे । जप तप अव्हान दैवते ॥२॥
योग याग तप तीर्थे । साधन कष्ट ते पसारा ॥३॥
शरण एका जनार्दनी । घडे निशिदिनीं संतसेवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६३४
📿 देव राखे तया मारील क
1634.
देव राखे तया मारील कोण । न मोडे काटा हिंडता वन ॥१॥
न जळे न बुडे नव्हे काही । विष तेही अमृत पाही ॥धृपद॥
न चुके वाट न पडे फंदी । नव्हे कधी यम बाधा ॥२॥
तुका म्हणे नारायणा । येता गोळ्या वारी बाण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६३५
📿 बकाचिये परि ध्यान नक
1635.
बकाचिये परि ध्यान नको धरु । जीवेभावें धरु संतचरण ॥१॥
मग ते तात्काळ करिती पावन । ऐसे अनुमोदन आहे शास्त्रीं ॥२॥
ध्यानाचे ध्यान संतांचे चरण । काया वाचा मन दृढ ठेवी ॥३॥
वाच्य ते वाचक संत ते व्यापक । एका जनार्दनी देख अंतर्बाही ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६३६
📿 तुझा माझा देवा का रे
1636.
तुझा माझा देवा का रे वराकार | दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥
वळे बांधोनिया देसी काळा हाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या ॥२॥
आम्ही देवा तुझी केली होती आराधना | न म्हणे हरपिले आम्ही भाने ॥३॥
नामा म्हणे देवा करू नाथा गार्हाणे | नाही तरी जीव व्यथा साहाता ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६३६
📿 समसृष्टीं । म्हणो नय
1636.
समसृष्टीं । म्हणो नये थोर सान । ऐसे उपदेशी ज्ञान । आपण ही गोष्टीं ॥१॥
काया वाचा मने भावे । संतांशीं शरण जावे । संगती ते जीवेंभावें । अंतरीची गोष्टी ॥२॥
पूर्ण बुद्धिचाची रावो । पापपुण्य नाही ठावो । साधु संतांसी भजावो । मुख्य ही गोष्टी ॥३॥
ऐसिया संतांसी जाण । शरण एका जनार्दन । घालीतसे लोटांगण । मुख्य ही गोष्टी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६३७
📿 जयांचे चित्त संताच्य
1637.
जयांचे चित्त संताच्या चरणा । तेणे नारायणा जिंकियलें ॥१॥
भावे देव मिळे भावे देव मिळे । संतचरणी लोळे सर्व काळ ॥२॥
संतांची आवडी म्हणोनि अवतार धरी । योगक्षेम भारी चालवी त्यांचा ॥३॥
संतचरणी सेवा आदर उपचार । एका जनार्दनी साचार करीतसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६३८
📿 असत्य वचन होता सर्व
1638.
असत्य वचन होता सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥
जाईल पतना यासि संदेह नाही । साक्ष आहे काही सांगतो ते ॥धृपद॥
वदविले मुखे नारायणे धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला ॥२॥
तुका म्हणे आता सांभळा रे पुढे । अंतरिचे कुडे देईल दुःख ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६३८
📿 कृपाळूचे रूप कृपाळु
1638.
कृपाळूचे रूप कृपाळु करुणा | मजलागी दीन होती देवा ॥१॥
राजा दिसत सदा ठेंविनि जळक | पाहोनि फळक मुजामाजी ॥२॥
देवा सुभाष्याची परितोष करीत | मजवरी अंतर केले आता ॥३॥
नामा म्हणे पाहिजे करिता गोपाळ | देहा मनेचि देख पाऊंला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६३८
📿 संतांची आवडे तो देवा
1638.
संतांची आवडे तो देवाचाही देव । कळिकाळांचे भेव पायातळीं ॥१॥
आणिकाची चड नसेची वासना । संताचियां चरणा वाचूंनिया ॥२॥
ऐसे ज्यांचे प्रेम ऐशी ज्याची भक्ति । एका जनार्दनी मुक्ति तेथे राबें ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६३९
📿 जळो त्याचे तोंड । ऐस
1639.
जळो त्याचे तोंड । ऐसी का ते व्याली रांड ॥१॥
सदा भोवयासी गाठी । क्रोध धडधडीत पोटी ॥धृपद॥
फोडिली गोंवरी । ऐसी दिसे तोंडावरी ॥२॥
तुका म्हणे नाही । चित्ता समाधान काही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६३९
📿 संतांचे सुख जिही अनु
1639.
संतांचे सुख जिही अनुबहविलें । ते जीवनमुक्त जहले जन्मोजन्मी ॥१॥
संतांचा संग जयासी हो जाहला । प्रत्यक्ष घडला सत्यलोक ॥२॥
एका जनार्दनी संतांचा अनुभव । धाला माझा जीव परमानंदे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६४०
📿 कटी कर उघा ठेवत | एथ
1640.
कटी कर उघा ठेवत | एथ ठाये कररोळ ॥१॥
माझा हिशेब करी हिशेब करी | हिशेब करी केशवा ॥२॥
चौयाशी लक्ष जन्म केली तुझी सेवा | माझे ठेवणे देई गा देवा ॥३॥
नामा म्हणे मज खवळिसी वाया | पिसाळलो तरी झोंबेन तुझ्या पाया ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६४०
📿 संतचरणी सावधान । ज्य
1640.
संतचरणी सावधान । ज्याचे जडलेसें मन ॥१॥
तया नाही जन्ममरण । मुक्तीअ उभ्या कर जोडोन ॥२॥
ब्रह्माज्ञान हात जोडी । संताघरी घाली उडी ॥३॥
शरण एक जनार्दनी । वंदितसे अनुदिनी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६४१
📿 साचपणे ब्रीद सोडविन
1641.
साचपणे ब्रीद सोडविन तुझ्या | आता केशिराजा पण हाचि ॥१॥
लबाड तू देवा लबाड तू देवा | लबाड तू देवा ठावा आम्हा ॥२॥
काय मूर्खपणे सांगशिल गोष्टी | थोरपणे मोठी पुरे आता ॥३॥
नामा म्हणे काय खवळिसि आम्हा | लाज नाही तुम्हा कवणेविसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६४२
📿 पंडित म्हणता थोर सुख
1642.
पंडित म्हणता थोर सुख । परि तो पाहाता अवघा मूर्ख ॥१॥
काय करावे घोकिले । वेदपाठ वाया गेले ॥धृपद॥
वेदी सांगितले न करी । सम ब्रम्ह नेणे दुराचारी ॥२॥
हा वेदीचा अनुभव । तुका देखे जीवशिव ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६४२
📿 कांहींच मी नव्हे ऐसे
1642.
कांहींच मी नव्हे ऐसे जरी केले ।तरि का जन्मविले पांडुरंगा ॥१॥
काय ब्रह्मज्ञान सांगशील माते ।खातया न खाते न देखेचि ॥२॥
यातिहीन शिंपी अधिकारी कैंचा ।हा धर्म तयाचा सांग त्यासी ॥३॥
चतुर्थ आश्रमी यति दिगंबर ।अशक्त संसार सोसवेना ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६४२
📿 संतसेवा केल्यापाठीं
1642.
संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी ॥१॥
तेथे कैंचें कर्माकर्म । अवघा देव परब्रह्मा ॥२॥
कैंचे ध्येय ध्याता ध्यान । एक संतचरणी मन ॥३॥
कैंचा भेद कैंचे भान । एक जनार्दनी ध्यान ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६४३
📿 पंडित तोचि एक भला ।
1643.
पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥
अवघे सम ब्रम्ह पाहे । सर्वा भूती विठ्ठल आहे ॥धृपद॥
रिता नाही कोणी ठाव । सर्वा भूती वासुदेव ॥२॥
तुका म्हणे तोचि दास । त्या देखिल्या जाती दोष ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६४३
📿 भय नाही हरीच्या दासा
1643.
भय नाही हरीच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा ॥१॥
नाही तया गोंवागुंतीं । न लगे पुराण व्युत्पत्ती ॥२॥
नाही शास्त्रांचे कारण । वेदाभ्यासाचें नको मनन ॥३॥
एका जनार्दनी शरण । परंपरा हेचि पूर्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६४४
📿 ऐका पंडितजन । तुमचे
1644.
ऐका पंडितजन । तुमचे वंदितो चरण ॥१॥
नका करू नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥धृपद॥
अन्न आच्छादन । हे तो प्रारब्धा अधीन ॥२॥
तुका म्हणे वाणी । सुखे वेचा नारायणी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६४४
📿 काय केले मागे कोणाचे
1644.
काय केले मागे कोणाचे तू बरे | शेवटी वान्नरे संग करी ते ॥१॥
संगे करूनिया हिंडे रानोरान | दशरथा खूण चुकविसी ॥२॥
काय काय तरी सांगो तुज गुण | भिल्लिणीची आण सत्य मनी ॥३॥
सत्य मानी बाळी वशिष्ठासहित | नामा म्हणे मात ही पुरातन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६४५
📿 विठ्ठल टाळ विठ्ठल दि
1645.
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥धृपद॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६४५
📿 काय तुज देवा आले थोर
1645.
काय तुज देवा आले थोरपण | दाविसी कृपण उणे पुरे ॥१॥
पुरे आता सांगो नको बा श्रीहरी | गोकुळाभीतरी खेळ मांडी ॥२॥
हलाहल शांत करी तत्क्षण | अमृतजीवन नाम तुझे ॥३॥
तुझे नाम सर्व सदा गोपाळासी | नामा म्हणे यासी काय जाले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६४५
📿 देवाचे ते आप्त जाणाव
1645.
देवाचे ते आप्त जाणावे ते संत । त्यांचे चरणी रत व्हावे सर्वदा ॥१॥
श्रीहरीची भेटी सहजची होय । श्रमलीया जाय क्षणमात्रें ॥२॥
पापाचे पर्वत भस्म नामाग्रीतं । अभक्ता न कळे हित नाम न घेती ॥३॥
एका जनार्दनी संताचिया कृपें । नाम होय सोपे त्याच्या ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६४६
📿 काय तुझे वेचे मज भेट
1646.
काय तुझे वेचे मज भेटी देता । वचन बोलता एक दोन ॥१॥
काय तुझे रूप घेतो मी चोरोनि । त्या भेणे लपोनि राहिलासी ॥धृपद॥
काय तुझे आम्हा करावे वैकुंठ । भेवो नको भेट आता मज ॥२॥
तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६४६
📿 निर्गुणपणाच्या घेसी
1646.
निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना | तुज नारायणा शोधी नामी ॥१॥
काय तुझी भीड धरावी म्या आता | कृपाळु अनंता म्हणे ना मी ॥२॥
पुंडलिकासाठी उभा राहिलासी | ठकडा तू होसी म्हणे ना मी ॥३॥
नामा म्हणे नको मज चाळवण | लवकरी चरण दावींना का ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६४६
📿 संतावाचोनियां नाम नय
1646.
संतावाचोनियां नाम नये हाता । साधने सांधितां कोटी जाणा ॥१॥
जैसे कातेंविण कारणे संसार । साधन विचार व्यर्थ ठेला ॥२॥
संतसमागम धरलिया वांचुनी । संसार सांडणी नोहे बापा ॥३॥
एका जनार्दनी संतांसी शरण । रिघलिया जाण देव जोडे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६४७
📿 संतनिंदा ज्याचे घरी
1647.
संतनिंदा ज्याचे घरी । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥
त्याच्या पापा नाही जोडा । संगे जना होय पीडा ॥धृपद॥
संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥
तुका म्हणे तो नष्ट । जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६४७
📿 कल्पतरुतळी बैसलिया |
1647.
कल्पतरुतळी बैसलिया | कल्पिले फळ न पविजे ॥१॥
कामधेनु जरी दुभती | तरी उपवासी का मरावे ॥२॥
उगे असा उगे असा होणार ते होय जाणार ते जाय ॥३॥
नामा म्हणे केशवा काय तुझी भीड | संता महंता देखता सांगेन तुझी खोड ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६४८
📿 आले देवाचिया मना । त
1648.
आले देवाचिया मना । तेथे कोणाचे चालेना ॥१॥
हरीश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरी पाणी ॥धृपद॥
पांडवाचा साहाकारी । राज्याहुनि केले दुरी ॥२॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल ते सहज पाहा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६४८
📿 ज्ञान ध्यान जप तप ते
1648.
ज्ञान ध्यान जप तप ते साधन । ते हे संतनिधान सखे माझे ॥१॥
संतापायीं आधी जावे वो शरण । संसार बोळवण होय तणे ॥२॥
तयाचे हे मुळ संतांचे पाय । आणीक उपाय नाही नाही ॥३॥
द्वैत अद्वैताचा न सरेचि कोंभ । तो हाचि स्वयंभ संतसंग ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६४९
📿 निजल्याने गाता उभा न
1649.
निजल्याने गाता उभा नारायण । बैसल्या कीर्तन करिता डोले ॥१॥
उभा राहोनिया मुखी नाम वदे । नाचे हा गोविंद नाना छंदे ॥धृपद॥
मारगी चालता मुखी नाम वाणी । उभा चक्रपाणी मागे पुढे ॥२॥
तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाठी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६४९
📿 सहस्त्र मिळणी सिंधू
1649.
सहस्त्र मिळणी सिंधू जाहली जी मुखे । ओघ तो उदक आन नाही ॥१॥
बीजाचिया पोटी वटाचा विस्तारु । सर्व तो आकारु तुझाचि असे ॥२॥
नामा म्हणे ऐसे असता निर्धार । खवळोनिया सुणे घेवो नको ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६४९
📿 तापलीया तापत्रयें सं
1649.
तापलीया तापत्रयें संता शरण जावे । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे ॥१॥
करुनि विनवणी वंदु पायवाणी । घालु लोटांगणी मस्तक हे ॥२॥
उपासनामार्ग सांगती ते खुण । देती मंत्र निर्वाण विठ्ठल हरि ॥३॥
एका जनार्दनी संतासी शरण । रात्र आणि दिन चिंतूं त्यासी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६५०
📿 काम क्रोध आम्ही वाहि
1650.
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली । आवडी धरिली पायासवे ॥१॥
आता कोण पाहे मागे परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥धृपद॥
रिद्धिसिद्धी सुखे हाणितल्या लाता । तेथे या प्राकृता कोण मानी ॥२॥
तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलो ग्रास ब्रम्हांडाचा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६५१
📿 वाउगाचि सोस न करी सा
1651.
वाउगाचि सोस न करी सायास । भजे श्रीसंतांस एकभावे ॥१॥
जाणोनि नेणतां का होसीं रे मुर्ख । सुखांचे निजमुख विटेवरी ॥२॥
एका जनार्दनी धरुनि विश्वास । होई का रे दास संतचरणी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६५३
📿 गरणे पेरणे जन्म उगवण
1653.
गरणे पेरणे जन्म उगवणे | मायेची ते खूण सांगितली ॥१॥
संग तुझा पुरे संग तुझा पुरे | संग तुझा पुरे नारायणा ॥२॥
तू तरी न मरे मी तरी न पुरे | भक्ति हे संचरे हाचि लाभु ॥३॥
नामा म्हणे माझ्या ठायचा मी नेणे | संसार भोगणे तुझी लाज ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६५४
📿 सर्वकाळ सुख रामनामी
1654.
सर्वकाळ सुख रामनामी । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि ॥१॥
जागृती सुषुप्ती रामनाम ध्यान । कार्य आणि कारण रामनामे ॥२॥
एका जनार्दनी ध्यानीं मनी । श्रीरामावांचुनीं आन नेणे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६५५
📿 येथे बोलोनिया काय ।
1655.
येथे बोलोनिया काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥
मज न साहे वाकडे । ये विठ्ठलकथेपुढे ॥धृपद॥
ऐकोनि मरसी वृथा । जव आहेसि तु जीता ॥२॥
हुरमतीची चाड । तेणे न करावी बडबड ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६५५
📿 उदार कृपाळ सांगशील ज
1655.
उदार कृपाळ सांगशील जना | तरी का रावणा मारियेले ॥१॥
नित्यानित्य पूजा सिरकमळी करी | तेणे तुझे हरी काय केले ॥२॥
किती बडिवार सांगसील वाया | ठावा पंढरिराया आहेसी आम्हा ॥३॥
कर्णा ऐसा वीर झुंझार उदार | त्यासी त्वा जर्जर केले वाणी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६५६
📿 आवडे देवासी तो ऐका प
1656.
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन ॥१॥
तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयी कळवळा वैष्णवांचा ॥२॥
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । साधन निर्धारी आन नाही ॥३॥
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम । तो देवा परमपूज्य जगी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६५७
📿 मी तो तुझा दास न करी
1657.
मी तो तुझा दास न करी उदास । मायामोहपाश तोडी देवा ॥१॥
प्राण जावो परी नको करू त्याग । करी अंगसंग अंगिकार ॥२॥
अंगीकारी आता अजामेळ अंती । समान श्रीपती सम करी ॥३॥
नामा म्हणे ऐसे वर्णावे म्या किती । नामे केली ख्याति चराचरी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६५८
📿 निर्गुण नामाची अनंत
1658.
निर्गुण नामाची अनंत कल्पना | धरूनि नारायणा व्यक्ति येसी ॥१॥
लाज लावियेली त्या निर्गुणपणा | श्रुतींच्या वचना वाखाणिता ॥२॥
तैसे न हो आम्ही करणीचे विलगट | नामाचे निकट दास तुझे ॥३॥
चतुरा शिरोमणी नंदाचा खिल्लारी | हे अघटित मुरारी नाम जरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६५९
📿 भुक्तिमुक्तीचें सांक
1659.
भुक्तिमुक्तीचें सांकडें नाही विष्णुदासां । प्रपंचाची आशा मा तेथे कैची ॥१॥
वैकुंठ कैलास अमरपदें तिन्ही । तुच्छवत मनी मानिताती ॥२॥
राज्य भोग संतती संपत्ति धन मान । विष्ठेंअतें समान श्वान सुकर ॥३॥
मा ब्रह्माज्ञाना तेथे कोण पुसे तत्त्वता । घर रिघोनि सायुज्यता येत असे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६६१
📿 समर्थाचे केले । मोडि
1661.
समर्थाचे केले । मोडिले कोणा जाईल ॥१॥
वाया करावी ते उरे । खटपट सोस पुरे ॥धृपद॥
ठेवा जो ठेविला । आपुलाला तैसा खावा ॥२॥
ज्याचे त्याचे हाती । भुके तयाची फजिती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६६१
📿 काया हरपे फुटो नेदी
1661.
काया हरपे फुटो नेदी ।टाळ विंडी वाहिन खांदी ॥१॥
तू बा माझा तू बा माझा ।तू बा माझा केशिराजा ॥२॥
आळवणीच तू बा वाचे ।तेणे छंदे पेंधा नाचे ॥३॥
तू बा माझा मी दास तुझा ।विनवितो नामा केशिराजा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६६१
📿 जाईल तरी जावो प्राण
1661.
जाईल तरी जावो प्राण । परी न सोडा चरण संतांचे ॥१॥
होणार ते हो का सुखे । परी मुखें रामनाम न सोडा ॥२॥
कर्म धर्म होतु कं होनी । परी प्रेम कीर्तनी न सोडा ॥३॥
एका जनार्दनी वर्म । सोपा धर्म सर्वांसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६६२
📿 नेणे गति काय कवण अधो
1662.
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली निश्चिंती तुझ्या पायी ॥१॥
कर्म धर्म कोण नेणे हा उपाव । तुझ्या पायी भाव ठेवियेला ॥धृपद॥
नेणे निरसं पाप पुण्य नेणे काय । म्हणऊनि पाय धरिले तुझे ॥२॥
वेडा मी अविचारी न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६६२
📿 परमार्थाचा हाचि भाव
1662.
परमार्थाचा हाचि भाव । वाचे देव स्मरावा ॥१॥
नाही दुजा छंद मनी । संतचरणी विश्वास ॥२॥
न धांवे वाया कोठे मन । संतचरणांवाचुनी ॥३॥
एका जनार्दनी नेम । सर्वोत्तम हृदयी वसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६६३
📿 देवा हे माझी मिराशी
1663.
देवा हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायापाशी ॥१॥
याचा धरीन अभिमान । करीन आपुले जतन ॥धृपद॥
देऊनिया जीव । वडिली साधिला हा ठाव ॥२॥
तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 प्रेम कलह›
📿 अभंग क्र. १६६३
📿 छंदिस्त है मन माझे प
1663.
छंदिस्त है मन माझे पंढरिनाथा | न सोडी सर्वथा पाय तुझे ॥१॥
यासि काय करू सांगा जी विठ्ठला | स्नेह का लाविला पूर्वीहूनि ॥२॥
कासवीची पिली सोडोनि निराळी | दृष्टि पान्हाइल अमृतमय ॥३॥
तैसा मी जवळुनि असेन वे दुरी | दृष्टि मजवरी असो द्यावी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६६३
📿 जन्ममरण कोडे निवारी
1663.
जन्ममरण कोडे निवारी हा संग । भजें पाडुंरंग आधी ॥१॥
वायांची पसारा नासिलासी सारा । का रे चुकसी पामरा भजनासी ॥२॥
एकविध भाव भक्ति करी मोळी । तेणे कुळींची मुळी हाती लागे ॥३॥
एका जनार्दनी संतांचा सेवक । तयाचा मग धाक ब्रह्मादिका ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६६४
📿 तुझा म्हणऊनि जालो उत
1664.
तुझा म्हणऊनि जालो उतराई । त्याचे वर्म काई ते मी नेणे ॥१॥
हाती धरोनिया दावी मज वाट । पुढे कोण नीट तेची देवा ॥धृपद॥
देवभक्तपण करावे जतन । दोही पक्षी जाण तूचि बळी ॥२॥
अभिमाने तुज लागली हे लाज । शरणागता काज करावया ॥३॥