🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९६७
📿 करिता वेरझारा । उभा
1967.
करिता वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृपद॥
आरोगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
तुका म्हणे किती । बुडविली आळविती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९६७
📿 नाही देणे घेणे । गोव
1967.
नाही देणे घेणे । गोवी केली अभिमाने ॥१॥
आता का हो निवडू नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥धृपद॥
पाचांमधी जावे । थोड्यासाठी फजित व्हावे ॥२॥
तुज ऐसी नाही । पांडुरंगा आह्मी काही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९६७
📿 तुम्ही उदार सर्वगुणे
1967.
तुम्ही उदार सर्वगुणें । मी रंकपणें रंकाहुनी ॥१॥
काया वाचा आणि मन । केले समर्पण तव चरणी ॥२॥
आणिक नाही कांही चाड । सेवा दृढ संतांची ॥३॥
एका जनार्दनी तुमचा दास । आहे आस पायांची ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९६८
📿 दास्य करु हरिदासाचें
1968.
दास्य करु हरिदासाचें । तेणे जन्माचें सार्थक ॥१॥
बुद्धि वसो तुमचे नामी । आणिका कामीं न गुंतो ॥२॥
संसार तो पारिखा जाहला । या विठ्ठला पाहता ॥३॥
पालटला भेदाभेद । एका जनार्दनी आनंद ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९६९
📿 सिंचन करिता मूळ । वृ
1969.
सिंचन करिता मूळ । वृक्ष ओलावे सकळ ॥१॥
नको पृथकाचे भरी । पडो एक सार धरी ॥धृपद॥
पाणचोऱ्याचे दार । वरील दाटावे ते थोर ॥२॥
वश जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९६९
📿 प्रपंच स्वार्थास साध
1969.
प्रपंच स्वार्थास साधावया चांग | वैराग्याचे अंग दाविसी जना ॥१॥
अनुताप नित्य नाही कदाकाळी | मग संचिताची होळी कैसी होय ॥२॥
पवित्र ते वाचा का रे गमविसी | रामनाम न म्हणसी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे जीव कासया ठेवावा | न भजता केशवा मायबाप ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९७०
📿 करू याची कथा नामाचा
1970.
करू याची कथा नामाचा गजर । आम्हा संवसार काय करी ॥१॥
म्हणवू हरीचे दास लेऊ ती भूषणे । कापे तयाभेणे कळिकाळ ॥धृपद॥
आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥
तुका म्हणे करू ऐसियांचा संग । जेणे नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९७१
📿 काय सर्प खातो अन्न ।
1971.
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचे ॥१॥
अंतरींची बुद्धि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृपद॥
काय उंदीर नाही धावी । राख लावी गाढव ॥२॥
तुका म्हणे सुसर जळी । काउळी का न न्हाती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९७२
📿 पुर्वीचिया मतांतरा ।
1972.
पुर्वीचिया मतांतरा । सांपडला बरा आम्हा मार्ग ॥१॥
नाही कोठे गोंवा गुंतीं । ऐसे गर्जती हरिदास ॥२॥
वाचे नाम करे टाळी । साधन कली उत्तम हे ॥३॥
धालों कीर्तनी प्रेमानंदे । वाचे आनंदें गाऊ गीत ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९७३
📿 शरीर काळाचे भातुके |
1973.
शरीर काळाचे भातुके | तुम्ही नेणा का इतुके ॥१॥
माझा जन्म गेला वाया | तुजविण पंढरिराया ॥२॥
अझुनि तू का रे निश्चित | काळ जवळी हटकित ॥३॥
नामा म्हणे अवधी चोरे | शेखी हरिनाम सोयरे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९७४
📿 भक्त समागमे सर्वभावे
1974.
भक्त समागमे सर्वभावे हरी । सर्व काम करी न संगता ॥१॥
साठवला राहे हृदयसंपुष्टी । बाहेर धाकुटी मूर्ती उभा ॥धृपद॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥
तुका म्हणे जीव भाव देवापायी । ठेवूनि ते काही न मगती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९७४
📿 औट हात जायाचे कोपट |
1974.
औट हात जायाचे कोपट | दोन दिवस फुकट भोगाकारी ॥१॥
कवणाचे घर कवणाचे दार | भावे वोळगारे नरहरी ॥२॥
आढे मोडले घर जर्जर जाले | मोडोनिया गेले बारियाने ॥३॥
खचला तो पाया पडली ते भिती | नामा म्हणे चित्ती घर नलगे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९७५
📿 परमअमृते रसना ओलावली
1975.
परमअमृते रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायी ॥१॥
सकळ ही तेथे वोळली मंगळे । वृष्टी केली जळे आनंदाच्या ॥धृपद॥
सकळ इंद्रिये जाली ब्रम्हरूप । ओतले स्वरूप माजी तया ॥२॥
तुका म्हणे जेथे वसे भक्तराव । तेथे नांदे देव संदेह नाही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९७६
📿 कासया गुणदोष पाहो आण
1976.
कासया गुणदोष पाहो आणिकाचे । मज काय त्यांचे उणे असे ॥१॥
काय पापपुण्य पाहो आणिकाचे । मज काय त्यांचे उणे असे ॥धृपद॥
नष्टदुष्टपण कवणाचे वाणू । तयाहून अणु अधिक माझे ॥२॥
कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहो डोळा आपुलिये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९७७
📿 काळ जवळचि उभा नेणा ।
1977.
काळ जवळचि उभा नेणा । घाली झांपडी खुंटी काना ॥१॥
कैसा हुशार सावध राही । आपुला तू अपुलेठायी ॥धृपद॥
काळ जवळिच उभा पाही । नेदी कोणासि देऊ काही ॥२॥
काळे पुरविली पाठी । वरुषे जाली तरी साठी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९७८
📿 नामा म्हणावया तू का
1978.
नामा म्हणावया तू का रे करंटा | काय तुझे अदृष्टी लिहिले असे ॥१॥
यमाचे यमपाश पडतील गळा | जाशील सगळा काळापोटी ॥२॥
शरीराची आशा बाळ है तारुण्य | अवचित वृद्धपण येईल मूढा ॥३॥
लक्ष्मी धन मद पुत्र स्त्री घरदार | नेता यमकिकर न सोडविती ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९७९
📿 वाळ वृद्ध तरुण काया
1979.
वाळ वृद्ध तरुण काया हे जर्जर | वेगी हा पामर आळसी जाला ॥१॥
काय करू देवा नाही यासि भावो | न करी उपावो तुझे भजनी ॥२॥
मन ठेवी ठायी रंगे तू श्रीरंगी | गोष्टी त्या वाडग्या बोलू नको ॥३॥
नामा म्हणे श्रीरंग चिती पा चोखडा | उघडा पवाडा सांगितला ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९८१
📿 भुक्ति मुक्ति सिद्धि
1981.
भुक्ति मुक्ति सिद्धि यावयाकारणे | सेवकाशी देणे पांडुरंगा ॥१॥
ऐसिया तुज सांगणे आपणाते म्हणविती | तया अधोगति कल्पकोडी ॥२॥
देहो सरल्या मिळे ज्योतिस ज्योति | ऐसे म्हणता किती सितरिले ॥३॥
नामा म्हणे ऐसे नाशिवंत शरीर | पूजा हरिहर एक वेळा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९८१
📿 सर्वभावे शरणागत । जा
1981.
सर्वभावे शरणागत । जाहलों निश्चित कृपाळु ॥१॥
आता कळे तैसे करी । तुम्ही उदार श्रीहरी ॥२॥
मी आलो असे शरण । कृपा करणे उचितची ॥३॥
शरण एका जनार्दनी । ऋद्धिसिद्धि तुमचे चरणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९८३
📿 कथे उभा अंग राखेल जो
1983.
कथे उभा अंग राखेल जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥
येथे तो पातकी न येता च भला । रणी कुचराला काय चाले ॥धृपद॥
कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥
तुका म्हणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९८४
📿 नावडे ज्या कथा उठोनि
1984.
नावडे ज्या कथा उठोनिया जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥
तो असे जवळी गोचिडाच्या न्याये । देशत्यागे ठाये तया दुरी ॥धृपद॥
नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥
तुका म्हणे तया करावे ते काई । पाषाण का नाही जळामध्ये ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९८४
📿 भक्तीविणे जिणे जळो ल
1984.
भक्तीविणे जिणे जळो लाजिरवाणे | संसार भोगणे दुःखरूप ॥१॥
एक एक योनि कोटि कोटि फेरा | मनुष्य देवारा मग लागे ॥२॥
वीस लक्ष योनि वृक्षामध्ये घ्याव्या | जळचरी भोगाव्या नव लक्ष ॥३॥
अकरा लक्ष योनि किरडामध्ये घ्याव्या | दश लक्ष भोगाव्या पक्षामध्ये ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९८५
📿 जवळी नाही चित्त । का
1985.
जवळी नाही चित्त । काय मांडियेले प्रेत ॥१॥
कैसा पाहे चंद्रिदृष्टि । दीप स्नेहाच्या शेवटी ॥धृपद॥
कांतेलेंसे श्वान । तैसे दिशा हिंडे मन ॥२॥
त्याचे कानी हाणे । कोण बोंब तुका म्हणे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९८६
📿 दुर्बळा वाणीच्या एक
1986.
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा समाधि विश्वरूपी ॥१॥
काय त्याचे वाया गेले ते एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥धृपद॥
तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिले ॥२॥
तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्ये आगिळया घरा येती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९८६
📿 बावडी दुरिच्या दुरी
1986.
बावडी दुरिच्या दुरी उडतसे अंबरी | हाती असे दोरी परि लक्ष तेथे ॥१॥
दुडी वरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळया करी परि लक्ष तेथे ॥२॥
व्यभिचारि नारी परपुरुष जिव्हारी | वर्ते घरोबारी परि लक्ष तेथे ॥३॥
तस्कर नगरी परद्रव्य जिव्हारी | वर्ते घरोघरी परि लक्ष तेथे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९८७
📿 भक्तीविण मोक्ष नव्हे
1987.
भक्तीविण मोक्ष नव्हे हा सिद्धांत | वेद बोले हात उभारोनि ॥१॥
जगी तेंचि ज्ञान जाणाया लागुनि | संता वोळगोनि वश्य कीजे ॥२॥
प्रपंच हा खोटा शास्त्र निवडिला | पाहिजे साक्षीला सद्गुरु तो ॥३॥
नामा म्हणे सेवा घडावी संतांची घ्यावी कृपा त्यांची तेंचि ज्ञान ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९८९
📿 गर्भी असता बाळा । को
1989.
गर्भी असता बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥
कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥धृपद॥
सर्प पिली विताचि खाय । वाचविता कोण माय ॥२॥
गगनी लागला कोसरा । कोण पुरवी तेथे चारा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. १९८९
📿 तुम्हा स्वहित करणे आ
1989.
तुम्हा स्वहित करणे आहे | सेवा राघोबाचे पाय ॥१॥
दुष्टबुद्धि दुरी करा | तोडा अविद्येचा थारा ॥२॥
शुद्ध करा तुमचे मन | तुम्हा जवळी नारायण ॥३॥
निर्मळ करा अंतःकरण | लावा राघोबासी ध्यान ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९९०
📿 देव तुष्टला मय दे घे
1990.
देव तुष्टला मय दे घे । तुजावांचुनी कांही नेघे ॥१॥
देवा इतुली कृपा करी । जो मी तुझा घोट भरीं ॥२॥
आणिक कांही मागेन जरी । तरी मज दंडावें हरी ॥३॥
वैकुंठ देई रे एका । तो तंव फोडीव फटका ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९९३
📿 करिता या सुखा । अंतप
1993.
करिता या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥
माथा पडती संतपाय । सुख कैवल्य ते काय ॥धृपद॥
ऐसा लाभ नाही । दुजा विचारिता काही ॥२॥
तुका म्हणे गोड । तेथे पुरे माझे कोड ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९९३
📿 ज्याचा केला अंगीकार
1993.
ज्याचा केला अंगीकार । न मानी भार त्याचा हा ॥१॥
अरिमित्रां सम देणे । एकचि पेणे वैकुंठ ॥२॥
उत्तर मध्यम चांडाळ । देणे स्थळ एकची ॥३॥
एका जनार्दनी भाकी कींव । उद्धारा जीव पातकी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. १९९४
📿 हरिकथा ऐकता अन्ये पे
1994.
हरिकथा ऐकता अन्ये पे गोष्टी | निधान त्या दृष्टी अंतरले ॥१॥
घडी घडी प्रेम अंतरु न द्यावे | सावधान व्हावे रामनामी ॥२॥
यापरी स्वहिती ठेवियेले लक्ष | ते पावती मोक्ष म्हणे नामा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९९५
📿 तुम्ही तरी हो श्रीपत
1995.
तुम्ही तरी हो श्रीपती । माझी बहु हीन याती ॥१॥
दोघे असो एके ठायी । माझा माथा तुझे पायी ॥धृपद॥
माझ्या दीनपणा पार । नाही बहु तू उदार ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । मी ओहोळ तू गंगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९९५
📿 माझे देई मजलागुन । म
1995.
माझे देई मजलागुन । म्हणोनि दृढ धरिले चरण ॥१॥
भक्तीचें ऋण देवा । देई माझे मज केशवा ॥२॥
माझे देता जड काई । अभिलाषेंक धरीन पायी ॥३॥
एका अभिलाषें फावला । एका जनार्दनी उभा केला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९९६
📿 मी याचक तू दाता । का
1996.
मी याचक तू दाता । काय सत्य पाहो आता ॥१॥
म्या तो पसरिला हात । करी आपुले उचित ॥धृपद॥
आह्मी घ्यावे नाम । तुम्हा समाधान काम ॥२॥
तुका म्हणे देवराजा । वाद खंडी तुझा माझा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९९६
📿 जाईल तरी जावो प्राण
1996.
जाईल तरी जावो प्राण । परी मी न सोडी चरण ॥१॥
ऐसा विश्वासलो हरीं । नाम तुमचे कंठी धरी ॥२॥
होईल एं होवो साचा । परी न संडो नाम वाचा ॥३॥
चित्त वेधले चिंतनीं । शरण एका जनार्दनी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. १९९७
📿 राम वाचे बोल | तया प
1997.
राम वाचे बोल | तया पुरुषा नाही मोल ॥१॥
धन्य तयाचे शरीर | वरी जना उपकार ॥२॥
ऋणिया तो तारी| विश्वव्यापक तो हरि ॥३॥
नामा म्हणे स्वामी | सुखे वसे अंतर्यामी ॥४॥