🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८११
📿 ब्राह्मणवाक्यबळें वे
2811.
ब्राह्मणवाक्यबळें वेदू नेमी जगा । येरव्ही राहे उगा थोटावला ॥१॥
ब्राह्मण तो ब्रह्मा ब्राह्मण तो ब्रह्मा । जयाचेनि कर्माकर्म दाटुगें जगी ॥२॥
ब्रह्मावाक्याची राणीव तै शास्त्राची जाणीव । येरव्ही नुसते पवे पाषाणाचें ॥३॥
ब्राह्मण वचनार्थ यागकर्म समर्थ । येरव्ही ते समस्त जीत ना मेली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८१२
📿 ऐक पांडुरंगा वचन माझ
2812.
ऐक पांडुरंगा वचन माझे एक । झालो मी सेवक दास तुझा ॥१॥
कळे तैसा आता करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढे ॥धृपद॥
दंभ मान माझा करू पाहे घात । झालिया ही थीत कारणाचा ॥२॥
हीन बुद्धी माझी अधम हे याती । अहंकार चित्ती वसो पाहे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८१२
📿 शम दम तप शौच आणि क्ष
2812.
शम दम तप शौच आणि क्षमा । आर्जव तो प्रेमा ज्ञानालागीं ॥१॥
आत्मा अनुभव वेदीं सत्य भाव । ब्राह्मण स्वभाव कर्म ऐसे ॥२॥
ब्राह्मणाच्या ठायी गुण शुद्ध सत्त्व । वसे ब्रह्मातत्त्व तया चित्ती ॥३॥
सर्वांभुती दया असे तयापाशीं । विटला उपाधीसी सर्वभावे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८१५
📿 आपण चाळक बुद्धीच्या
2815.
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हासी वेव्हारा पात्र केले ॥१॥
काय झाले तरी नेघा तुम्ही भार । आणीक कोणा थोर म्हणो सांगा ॥धृपद॥
पंच भूते तव चर्माचिया मोटा । येथे खरा खोटा कोण भाव ॥२॥
तुका म्हणे नाही बोलावया जागा । का देवा वाउगा श्रम करू ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८१६
📿 एका एक वर्मे लावूनिय
2816.
एका एक वर्मे लावूनिया अंगी । ठेवितो प्रसंगी सांभाळीत ॥१॥
नेघावा जी तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥धृपद॥
वेव्हारे आले ते समानचि हाते । बळ नाही येथे चालो येत ॥२॥
तुका म्हणे आता निवाडाच साठी । संवसारे तुटी करुनि ठेलो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८१७
📿 आता येथे खरे । नये फ
2817.
आता येथे खरे । नये फिरता माघारे ॥१॥
होय तैसी हो आबाळी । देहनिमित्य या बळी ॥धृपद॥
तुम्हासवे गाठी । देवा जीवाचिये साठी ॥२॥
तुका नव्हे लंड । करू चौघांमध्ये खंड ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८१७
📿 कोणा ब्रह्मकर्म कळेन
2817.
कोणा ब्रह्मकर्म कळेना हे वर्म । नासिलें जीवन संध्या वेळें ॥१॥
धरिले नासिक अनुभवावांचुनीं । त्रिपुटीस पाणी लावियेले ॥२॥
डोळिया वंदना स्वीकारिले कान । तेथे वर्म कोण नेणवेची ॥३॥
हृदयावरी हात नाभीस लाउनी । डोळे ते झाकुनी नाश केला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८१८
📿 असोनि ब्राह्मण । न क
2818.
असोनि ब्राह्मण । न करी जो संध्या स्नान ॥१॥
तो पातकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥
वेदमंत्र न ये मुखा । सदा द्वेष निंदा देखा ॥३॥
नाहे श्राद्धसंकल्प घरी । हिंडें सदा दारोदारीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८१९
📿 नव्हो सभाधीट । समोर
2819.
नव्हो सभाधीट । समोर बोलायाचे नीट । एकली एकट । दुजे नाही देखिले ॥१॥
आता अवघे तुम्ही जाणा । तुमचे माझे नारायणा । येईल करुणा । तेचि पहा तुम्हासी ॥धृपद॥
ताळ नाही माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आता वेळ कधी । कोण्या जन्मे निवाड ॥२॥
आता शेवटीचे । उत्तर ते हेचि साचे । शरण आले त्याचे । तुका म्हणे सांभाळा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८१९
📿 आम्ही ब्रह्मापुरींचे
2819.
आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण । यातिकुळ नाही लहान ॥१॥
आम्हा सोवळें वोवळें नाही । विटाळ न देखो कवणें ठायी ॥२॥
आम्हा सोयरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥
एका जनार्दनी बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८२१
📿 जे जे कर्म करावे या
2821.
जे जे कर्म करावे या देही । भोगावें तेंही देहादेह ॥१॥
देहींचें कर्म देहींच भोगावें । वाया का शिणावें हाव भरी ॥२॥
आपुलें संचित तैसा कर्मभोग । वाउगा उद्योग बोलून काय ॥३॥
एका जनार्दनी कर्माची जे रेखा । न चुके सकळिका भोग त्याचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८२२
📿 काही एक तरी असावा आध
2822.
काही एक तरी असावा आधार । कासयाने धीर उपजावा ॥१॥
म्हणविल्यासाठी कैसे पडे रुजु । धणी नाही उजू सन्मुख तो ॥धृपद॥
वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आम्ही ॥२॥
नाही मनोगत तोवरी देवा । तुका म्हणे सेवा नेघेजेतो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८२२
📿 विपरीत सुपरीत हा तो
2822.
विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथे त्याग भोग करूनी काय ॥१॥
होणार ते होते आपुलें न चले कांही । वाया दुःख पाही मानू नये ॥२॥
जी जी संचितीं लिहिलीसे रेखा । ती तो ब्रह्मादिका न चुकेचि ॥३॥
एका जनार्दनी वाया का सायास । सुखदुःख लेश पूर्व कर्म ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८२३
📿 मनाचिये साक्षी झाली
2823.
मनाचिये साक्षी झाली सांगो मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥
तुम्हा परामृष घेता सत्ताबळे । धरिता निराळे कैसी वांचो ॥धृपद॥
मी माझे सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥
तुका म्हणे आम्ही तुजविण एका । निढळे लौकिकामाजी असो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८२३
📿 सम आणि विषम ही तो का
2823.
सम आणि विषम ही तो काळाची फळे । भोगिल्याविण बळे न सुटती कधी ॥१॥
वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥
उसनें आणि ताना जीवा वाटे गोड । देतों ते लिगाड होय मग ॥३॥
एका जनार्दनी हाही अनुभव । सुखदुःखा ठाव याचपरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८२६
📿 गंगोदक ते पवित्र । य
2826.
गंगोदक ते पवित्र । येर कडु अपवित्र ॥१॥
दोनीं उदकें तंव सारखी । शुद्ध अशुद्ध काय पारखीं ॥२॥
गंगा देवापासून जाली । येर काय मध्यवर्ती केली ॥३॥
शुद्धाशुद्ध हे वासना । शरण एका जनार्दना ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८२७
📿 वेदान्त प्रतिपाद्य क
2827.
वेदान्त प्रतिपाद्य करावा हा धर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥१॥
मुख्य चारी वर्ण यांचा पै धर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥२॥
जया जे जे धर्म तया ते ते कर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥३॥
ब्राह्माणांचा धर्म संध्या षट्कर्म । न करिता अधर्म सहज लागे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८२८
📿 तुम्हा उद्धरणे फार ।
2828.
तुम्हा उद्धरणे फार । मज दुसरी नाही थार ॥१॥
आता जैसे तैसे सोसा । काय करणे हृषीकेशा ॥धृपद॥
बरे न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥
लाविता आभार । तुका विसरलेती फार ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८२९
📿 फणस खातां लागे गोड ।
2829.
फणस खातां लागे गोड । तेथे अधिक खाय तोंड ॥१॥
सूर्या पूजितां पुण्य घडे । तेथे जे बेलपत्री चढे ॥२॥
ऐसा कर्माकर्म विनाश । गुण तेचि होती दोष ॥३॥
एका जनार्दनी जाण । वाया दोषाचें हे चिन्ह ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८३१
📿 आता सोडवणे न या नारा
2831.
आता सोडवणे न या नारायणा । तरि मी न वांचेना काळा हाती ॥१॥
ऐसे सांगोनिया झालो उतराई । आणीक ते काई माझे हाती ॥धृपद॥
केलियाचे माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥२॥
तुका म्हणे भय वाटतसे जीवा । धावणिया धावा लवकरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८३२
📿 सत्य माप वाढे । गाबा
2832.
सत्य माप वाढे । गाबाळाची चाली खोडे ॥१॥
उत्तरे ते कळे कसी । विखरोनि सर्वदेशी ॥धृपद॥
घरामध्ये राजा । नव्हे हो पट्ट पूजा ॥२॥
तुका म्हणे साचे । रूप ते दर्पणीचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८३३
📿 नाही खंड झाला । माझा
2833.
नाही खंड झाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥
कैसे कैसे हो दुश्चित । आहे चौघांपाशी नीत ॥धृपद॥
मुळींचे लिहिले । मज आता सापडले ॥२॥
तुका म्हणे मज । न लगे बोलणे सहज ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८३४
📿 हेचि वादकाची कळा । न
2834.
हेचि वादकाची कळा । नाही येऊ येत बळा ॥१॥
धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हा देवा ॥धृपद॥
रिघावे पोटांत । पाया पडोन घ्यावा अंत ॥२॥
तुका म्हणे वरी । गोडा आणावा उत्तरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८३४
📿 देवातळींचें वस्त्र त
2834.
देवातळींचें वस्त्र ते म्हणती अपवित्र । उदके भिजविलें ते जाले पवित्र ॥१॥
देवापरीस जळ सबळ केले । ज्ञान ते दुर्बळ होऊनीं ठेले ॥२॥
नीचाचेनी स्पर्शे देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळुनी सोंवळा केला ॥३॥
एका जनार्दनी साच नाही भाव । संशयची देव नाही केला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८३५
📿 कर्म धर्म ऐसा आहे ।
2835.
कर्म धर्म ऐसा आहे । ब्रह्मी शोदूनियां पाहे ॥१॥
स्नान करावे ते कैसे । संध्या आपरुप असे ॥२॥
कैसा आहे ब्रह्मायज्ञ । मन अर्जवा ते नमन ॥३॥
एका जनार्दनी भजे । कर्म धर्म सहज बुजे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८३७
📿 झाली झडपणी खडतर देवत
2837.
झाली झडपणी खडतर देवता । संचरली आता निघो नये ॥१॥
मज उपचार झणी उपचार झणी आता करा । न साहे दुसरा भार काही ॥धृपद॥
नेऊनिया घाला चंद्रभागे तिरी । जीवा नाही उरी काही आता ॥२॥
तुका म्हणे कळो आले वर्तमान । माझे तो वचन आच्छादले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८३८
📿 अंगी देवी खेळे । का
2838.
अंगी देवी खेळे । का रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनिता ॥१॥
मी तो आता येथे नाही । ओळखी वचनाच्या ठायी । पालटाचा घेई । भाव खरा लोपे ना ॥धृपद॥
आपुलाले तुम्ही पुसा । सोवा पेव्याच सरिसा । स्थिरावल्या कैसा काय । जाणो विचार ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ । तेथे नसावे शीतळ । मग तैशी वेळ । कोठे जाते सांपडो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८३९
📿 उचिताचा काळ । साधावय
2839.
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपले सकळ । ते प्रसंगी पाहिजे ॥१॥
नेम नाही लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनी । पाहिजे ते प्रयोजावे ॥धृपद॥
जाळ जाळा काळे । करपोनेदावे आगळे । जेविता वेगळे । ज्याचे त्याचे तेथे शोभे ॥२॥
पाळी नांगर पाभारी । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे घरी । सेज जमा शेवटी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८४०
📿 पडिलिया ताळा । मग अव
2840.
पडिलिया ताळा । मग अवघा निर्वाळा । तेथे कोणी बळा । नाही येत कोणासी ॥१॥
जोडिले ते लागे हाती । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथे दोनी नासली ॥धृपद॥
सहज सरलिया कारणे । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥
करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हणु लागती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८४१
📿 जो वितो तो माझा पिता
2841.
जो वितो तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा ॥१॥
जनार्दनी सरती कर्मे । बाधा भ्रमे अन्यत्र ॥धृपद॥
अपसव्य सव्यामधी । ऐसी शुद्धी न धरिता ॥२॥
तुका म्हणे खांद्या पाने । सिंचता भिन्न कोरडी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८४१
📿 वेदवाणी देवे केली ।
2841.
वेदवाणी देवे केली । येर काय चोरापासून झाली ॥१॥
सकळ वाचा वदवी देव । का वाढावा अहंभाव ॥२॥
ज्या ज्या वाणी स्तुती केली । ते तीक देवासी पावली ॥३॥
एका जनार्दनी मातु । वाचा वाचक जगन्नाथु ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८४३
📿 केवढा तो अहंकार । मा
2843.
केवढा तो अहंकार । माझा तुम्हा नव्हे दूर ॥१॥
आता कोण पडे पाया । तुमच्या अहो पंढरिराया ॥धृपद॥
का जी कृपेने कृपण । वेचतसे ऐसे धन ॥२॥
तुका म्हणे देवे । दुजियाचे पोते न्यावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८४४
📿 अपराधी म्हणोन येतो क
2844.
अपराधी म्हणोन येतो काकुलती । नाही तरी होती काय चाड ॥१॥
येईल तारू तरी तारा जो जी देवा । नाही तरी सेवा घ्यावी भार ॥धृपद॥
कासया मी आता वंचू हे शरीर । आहे बारगीर जायजणे ॥२॥
तुका म्हणे मन करूनि मोकळे । आहे साळेंढाळे उदार ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८४४
📿 कर्म करता काही न कळे
2844.
कर्म करता काही न कळे विचार । परि द्वेषाद्वेष संचार होता असे ॥१॥
राजस तामस सात्विक ते देखा । उपाधी ते देखा मूळ जाणा ॥२॥
यथाविधी कर्म न घडे निश्चये । उणें पडता जाय पतनासी ॥३॥
एका जनार्दनी नाम मुखी गाता । सर्व कर्मे तत्त्वता घडती सांग ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८४५
📿 माझे तो फुकाचे काय व
2845.
माझे तो फुकाचे काय वेचे कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥१॥
काहीच न वंची आजिच्या प्रसंगी । सकळा ही अंगी करीन पूजा ॥धृपद॥
द्यावे तुम्ही काही हे तो नाही आस । असो या उदास देहभावे ॥२॥
तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्ती सर्वकाळ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८४७
📿 कर्म करसी तरी कर्मठच
2847.
कर्म करसी तरी कर्मठचि होसी । परि निष्कर्म नेणसी कर्मामाजीं ॥१॥
ब्रह्मालागीं कर्म सांडणे हे कुंडें । पाय सांडोनि पुढे चालुं पाहसी ॥२॥
डोळ्यांची नव्हाळी घेवो जाता करतळी । पाहो जाता मुळी पाहणेंचि नाही ॥३॥
एका जनार्दनी सर्व कर्म पाही । सांडी मांडी नाही तये ठायी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८४९
📿 समर्थ या नावे दिनांच
2849.
समर्थ या नावे दिनांचा कृपाळ । हे तव सकळ स्वामीअंगी ॥१॥
मज काय लागे करणे विनवणी । विदित चरणी सकळ आहे ॥धृपद॥
दयासिंधु तुम्हा भांडवल दया । सिंचावे आता या कृपामृते ॥२॥
तुका म्हणे अहो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८४९
📿 कोटी जन्म आम्ही करू
2849.
कोटी जन्म आम्ही करू हरिकथा । कर्मकांड माथा धरूनियां ॥१॥
ऐहिकादि कर्मे करुनी सर्वदा । भजो जी गोविंदा निरंतर ॥२॥
यजन याजन करुनी अग्निहोत्र । पूजोनि पवित्र द्विजवर ॥३॥
एका जनार्दनी कर्म ब्रह्मा एक । वेदान्ती विवेक बोलियेला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८५०
📿 लेखिले कवित्व माझे स
2850.
लेखिले कवित्व माझे सहज बोल । न लगेचि ओल जिव्हाळ्याची ॥१॥
नयेचि उत्तर काही परतोनि । झालो नारायणे न सरते ॥धृपद॥
लाजिरवाणी का वदली हे वाचा । नव्हेचि ठायीचा मननशीळ ॥२॥
तुका म्हणे फळ नव्हेचि सायासा । पंढरीनिवासा काय झाले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८५०
📿 मर्दुनी शंखासुरा हात
2850.
मर्दुनी शंखासुरा हातें वागविसी कलीवरा । तेवी निवटोनि अहंकारा । माझ्या वागविशी शरीरा ॥१॥
येथे नवल नव्हे पहा हो । माझा देहचि वागवे देवो ॥२॥
शंख वाजविशी नाना स्वरा । ते तंव न बाधी शंखासुरा ॥३॥
तैसी चेतउनी माझी गिरा । बोली बोलविता तू खरा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८५१
📿 येणे झाला तुझ्या पोत
2851.
येणे झाला तुझ्या पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥
भरूनिया घरी राहिलो वाखती । आपुली निश्चिंती आपुल्यापे ॥धृपद॥
आता काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥२॥
तुका म्हणे कोठे पाहोजासी आता । माझी झाली सत्ता तुम्हावरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८५२
📿 आम्हा विधिनिषेधाचे न
2852.
आम्हा विधिनिषेधाचे नाही पै कारण । नाम मुखी स्मरण गोविंदाचे ॥१॥
घडेल ते घडो जोडेल ते जोडो । आम्ही तो न सोडोंक रामकृष्ण ॥२॥
शरीर पतन घडे अनायासें । काय ते सायासें जतनेंचि ॥३॥
एका जनार्दनी श्रीरामावांचुनीं । दुजा छंद मनी हा न वाहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८५४
📿 मज काही सीण न व्हावा
2854.
मज काही सीण न व्हावा यासाठी । कृपा तुम्हा पोटी उपजली ॥१॥
होते तैसे केले आपले उचित । शिकविले हित बहु बरे ॥धृपद॥
आम्ही न मनावी कोणाची आशंका । तुम्हा भय लोका आहे मनी ॥२॥
तुका म्हणे आता संचिताचा ठेवा । वोढवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८५४
📿 काय जाणो विधि- । निष
2854.
काय जाणो विधि- । निषेधाचे ते बुद्धी ॥१॥
आम्ही गाऊ नाम मुखे । नाचुं सुखे कीर्तनी ॥२॥
न पडो भलतिया भरीं । वाचे म्हणो हरिहरी ॥३॥
एका जनार्दनी शरण । विधिनिषेध गेला पूर्ण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८५५
📿 विधिनिषेध धरिता मनी
2855.
विधिनिषेध धरिता मनी । सहजें कार्य होय हानीं ॥१॥
जे जे वेळे जे जे घडे । विधिनिषेध सर्व जोडे ॥२॥
अन्य नाही विचारणा । कार्यकारण सर्व जाणा ॥३॥
एका जनार्दनी खूण । जाणते ते परिपुर्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८५६
📿 का जी तुम्ही ऐसे नव्
2856.
का जी तुम्ही ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझे चित्त ठायीच्या ठायी ॥१॥
काही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥धृपद॥
दुःखी होतो पंचभूताच्या विकारे । जडत्वे दातारे राखावी ती ॥२॥
तुका म्हणे मोडा अहंकाराची मान । धरितो चरण म्हणऊनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८५६
📿 पूजा यथासांग पूर्ण ।
2856.
पूजा यथासांग पूर्ण । न घडे तरी संतपूजन ॥१॥
करिता ऐसा संकल्प । तेणे जोडे महातप ॥२॥
ध्यानीं ध्याता संतचरण । होईल मना समाधान ॥३॥
ऐसा पूजेचा सोहळा । एका जनार्दनी पाहे डोळा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८५७
📿 मागत्याची कोठे घडते
2857.
मागत्याची कोठे घडते निरास । लेंकरा उदास नाही होत ॥१॥
कासया मी होऊ उतावीळ जीवी । जाणता गोसावी सर्व आहे ॥धृपद॥
झाला तरी वेळ कवतुकासाठी । निर्दया तो पोटी उपजेना ॥२॥
तुका म्हणे त्यासी ठाउके उचित । होईंल संकेत नेमियेला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८५७
📿 पूजा करू तरी पूजे ना
2857.
पूजा करू तरी पूजे नाही ठाव । भाव धरूं तरी देवचि देव ॥१॥
करु तरी पूजा कवणाचि सांगा । देवाविण जागा रिती कोण ॥२॥
एका जनार्दनी पूजेसी नाही ठाव । अवघा व्यापला देवाधिदेव ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८६०
📿 नको घालू झांसा । मना
2860.
नको घालू झांसा । मना उपाधिवोळसा ॥१॥
जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी तेचि पाप ॥धृपद॥
उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥२॥
तुका म्हणे पाहो । होईल ते निवांत साहो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६›
📿 अभंग क्र. २८६०
📿 देवपूजे ठेवितां भावो
2860.
देवपूजे ठेवितां भावो । तो स्वयेंचि जाला देवो ॥१॥
आता कैसेनी पूजुं देवा । माझी मज होतसे सेवा ॥२॥
अन्न गंध धूप दीप । तेंही माझेंचि स्वरुप ॥३॥
एका जनार्दनी करी पूजा । तेथे पूज्य पूजकू नाही दुजा ॥४॥