🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३५६
📿 ऐका ऐका भाविकजन । को
2356.
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥
तर्कीकाचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥धृपद॥
नका शोधू मतांतरे । नुमगे खरे बुडाल ॥२॥
कलिमध्ये दास तुका । जातो लोका सांगत ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३५७
📿 आपुलिया आंगे तोडी मा
2357.
आपुलिया आंगे तोडी मायाजाळ । ऐसे नाही बळ कोणापाशी ॥१॥
रांडापोरे त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥धृपद॥
हर्षामर्ष जो हे नाही जो जिराले । तोवरी हे केले चार त्यांनी ॥२॥
मुक्त जालो ऐसे बोलो जाये मुखे । तुका म्हणे दुःखे बांधला तो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३५८
📿 आलिया अतीता म्हणतसा
2358.
आलिया अतीता म्हणतसा पुढे । आपुले रोकडे सत्त्व जाय ॥१॥
काय त्याचा भार घेऊनि मस्तकी । हीनकर्मी लोकी म्हणावया ॥धृपद॥
दारी हाका कैसे करवते भोजन । रुची तरि अन्न कैसे देते ॥२॥
तुका म्हणे ध्वज उभारिला कर । ते शक्ती उदार काय जाली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३६१
📿 वाया वाया शिणती साधक
2361.
वाया वाया शिणती साधक जन । साधक तितुके ज्ञानघन । साध्य साधन मानितां भिन्न । निजात्मा पुर्ण नव्हती ॥१॥
साखरेवेगळी पाहता गोडी । पाहे म्हणती ते बुद्धि कुडी । साखर अवघी गोड धाकुडी । आत्मा निरवडी जग तैसे ॥२॥
साधने साधू आत्मायासी । ऐसे म्हणती ते परम पिसी । आत्मा प्रकाशी साधनासी । तो केवी त्यासी आकळे ॥३॥
एक ते मंत्र उपदेशिती । जपू करावा नेणो किती । जेणे होय निजात्मप्रत्पि । ते मंत्रयुक्ति न कळे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३६३
📿 चौ देहांचा पूर्णघट ।
2363.
चौ देहांचा पूर्णघट । त्याचा अवघा बोभाट ॥१॥
माझे माझे म्हणती वेडे । घट भरला रिता फूडे ॥२॥
ऐसे भांबावले देहा । दिवसां नागविले पहा ॥३॥
एका जनार्दनी पुर्ण घट । एक नांदे उघड प्रगट ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३६४
📿 कासया करावे तपाचे डो
2364.
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी ॥१॥
कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढे लाभ ॥धृपद॥
कासया पुजावी अनेक दैवते । पोटभरे तेथे लाभ नाही ॥२॥
कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साठी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३६५
📿 वैष्णवमुनिविप्रांचा
2365.
वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊ नये ॥१॥
प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥
तुका म्हणे हे आशीर्वादे बळी । जाईल तो छळी नरकायासी ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३६५
📿 स्थापक व्यापक सर्वदे
2365.
स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहता तो भला पंढरीये ॥१॥
असोनिया नसे नसोनियां असे । योगिया हृदयी वसे दृष्टी न पडे ॥२॥
एका जनार्दनी भुवैकुंठनायक । उभा असे सम्यक विटेवरी ॥३॥
२३६६ .
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३६७
📿 सुर्य आहे डोळा नाही
2367.
सुर्य आहे डोळा नाही । तेथे पाहणें न चले कांही ॥१॥
सुर्य आणि दृष्टी दोन्ही आहे । परि दृश्य पाहणें नाही होय ॥२॥
सुर्य प्रकाशी रूपासी । एका जनार्दनी स्वरुपासी ॥३॥
२३६८
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३६९
📿 सुखरूप ऐसे कोण दुजे
2369.
सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा । माझ्या पांडुरंगा सारिखेंते ॥१॥
न लगे हिंडणे मुंडणे ते काही । साधनाची नाही आटाआटी ॥धृपद॥
चंद्रभागे स्नान विध तो हरीकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३६९
📿 पंचभूतांचें हे शरीर
2369.
पंचभूतांचें हे शरीर खरें । निर्माणक ते बरें केले देवे ॥१॥
पृथ्वी आप तेज वायु हे आकाश । यांचा हा सौरस आत्माराम ॥२॥
एका जनार्दनी पंचभुत आत्मा । सर्व परमात्मा । नेणती ते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३७०
📿 नसता अधिकार । उपदेशा
2370.
नसता अधिकार । उपदेशासी बलात्कार । तरि ते केले हो चार । माकडा आणि गारूडी ॥१॥
धन धान्य राज्य बोल । वृथा रंजवणे फोल । नाही तेथे ओल । बीज वेची मूर्ख तो ॥धृपद॥
नये बांधो गाठी । पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी । शिष्टाचारअनुभव ॥२॥
उपदेसी तुका । मेघ वृष्टीने आइका । संकल्पासी धोका । सहज ते उत्तम ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७०
📿 जगाचियें देही नांदतो
2370.
जगाचियें देही नांदतो आपण । तरी करतें कर्म परियेसा ॥१॥
जीव शिव दोन्ही शरीरी नांदती । कर्मधर्म स्थिति तया हाती ॥२॥
शिव तो उपाधीवेगळाचि वसे । कामक्रोध पिसे जीवालागीं ॥३॥
लिगाडाचे मिसे जीवासी बंधन । एका जनार्दनी जाण शिव मुक्त ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७१
📿 एका देहामाजीं दोघे प
2371.
एका देहामाजीं दोघे पै वसती
एका देहामाजीं दोघे पै वसती । एकासी बंधन एका मुक्त गति ॥१॥
पहा हो समर्थ करी तैसे होय । कोण त्यासी पाहे वक्र दृष्टी ॥२॥
पापपुण्य दोन्ही भोगवी एक हाती । ऐशी आहे गति अतर्क्य ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७२
📿 जाणीव फेडा जाणीव फेड
2372.
जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेने वेडा लावियेले ॥१॥
नेणपणें मज होता जो भाव । जाणीवेने कैसे मज नागविले ॥२॥
नेणपणें मी सर्वांसी मानी । जाणीव येता कोण्हा न मानी ॥३॥
जाणीण नेणीव नेणेंचि कांही । एक जनार्दनी लागला पायी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७३
📿 माझा देही असता डोळा
2373.
माझा देही असता डोळा । काय जाले रे गोपाळा ॥१॥
माझा डोळा गिवसोनी दीजे । मी पाऊल न सोडी तुझे ॥२॥
डोळा मुराला डोळियांत । कवण जाणे तेथील मात ॥३॥
एका जनार्दनी अवलीला । पाहता त्रैलोक्य जाहला डोळा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३७४
📿 सहज पावता भगवंती । प
2374.
सहज पावता भगवंती । परि ही विकल्पे परती । फुकाची हे चित्ती । आठवण न धरिती ॥१॥
हरी व्यापक सर्वगत । हे तव मुख्यत्वे वेदांत । चिंतनासी चित्त । असो द्यावे सावध ॥धृपद॥
विरजाहोम याचि नावे । देह नव्हे मी जाणावे । मग का जी यावे । वरी लागे संकल्पा ॥२॥
कामक्रोधे देह मिळण । स्वाहाकारी कैचे पुण्य । मंत्री पूजियेला यज्ञाने । मनमुंडण नव्हेचि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७४
📿 मीच देवो मीच भक्त ।
2374.
मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥
हीच उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती ॥२॥
मीच गंध मीच अक्षता । मीच वाहें मीच पुर्ता ॥३॥
मीच धुप मीच दीप । मी माझे देख स्वरुप ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७५
📿 मी तो स्वये परब्रह्म
2375.
मी तो स्वये परब्रह्मा । मीचि स्वये आत्माराम ॥१॥
मी तो असे निरुपाधी । मज नाही आधिव्याधी ॥२॥
मी तो एकट एकला । द्वैतभाव मावळला ॥३॥
मजविण नाही कोणी । एका शरण जनार्दनी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७६
📿 ब्रह्मी स्फुरें जे स
2376.
ब्रह्मी स्फुरें जे स्फुरण शुद्ध सत्त्वाचें लक्षंण । तो तू लक्षी लक्ष्यातीत परिपुर्ण रे ॥१॥
कान्हु सच्चिदानंदु शब्द अरुता रे । त्याही परता तुं निजानंदु रे ॥२॥
जेथे नाही गुणागुण नाही कायासी कारण । तो तुं गुणा गुणातीत परिपुर्न रे ॥३॥
एकाएकी जनार्दन वेद भाष्य वचन । तो तुं शब्दादी गिळुन राहिलासी रे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७७
📿 सर्व देशी सर्व जीवी
2377.
सर्व देशी सर्व जीवी तो हरी । सर्वाठायी सर्व भावे सर्व मुरारी ॥१॥
सर्व गांवी सर्व रुपीं भरुनी उरला । सर्व व्यापक सर्वा भूतीं तो व्यापला ॥२॥
सर्व आदि सर्व अंतीं सर्वी सर्वे भावो । एका जनार्दनी देखा देवाधिदेवो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३७८
📿 सावधान ऐसे काय ते वि
2378.
सावधान ऐसे काय ते विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥
अंती समयाचा करणे विचार । वेचती सादर घटिका पळे ॥धृपद॥
मंगळ हे नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥
तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३७९
📿 तुझे तुझ्या ठायी । त
2379.
तुझे तुझ्या ठायी । तुजचि शुद्धि नाही । मी मी म्हणती काई । न कळे तुज ॥१॥
मीपण ठेविता ठायी । तुंचि ब्रह्मा पाही । इतर साधन कांही । नलगे येथे ॥२॥
मीपण तत्त्वता । साच जेथे अहंता । एका जनार्दनी तेचि ते निजात्मता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३८१
📿 तुज करिता होय ऐसे का
2381.
तुज करिता होय ऐसे काही नाही । डोंगराची राई रंक राणा ॥१॥
अशुभाचे शुभ करिता तुज काही । अवघड नाही पांडुरंगा ॥धृपद॥
सोळा सहस्त्र नारी ब्रम्हचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥
पंचभ्रतार द्रौपदी सती । करिता पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३८२
📿 आवडीच्या ऐसे झाले ।
2382.
आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम ॥१॥
आता घेऊ धणीवरी । मागे उरी नुरे तो ॥धृ॥
साठवण मना ऐसी । पुढे रासी अमुप ॥२॥
तुका म्हणे कारण झाले । विठ्ठल या ती अक्षरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३८३
📿 उपजोनिया मरे । परि ह
2383.
उपजोनिया मरे । परि हेचि वाटे बरे ॥१॥
नाही आवडीसी पार । न म्हणावे जाले फार ॥धृपद॥
अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥२॥
तुका म्हणे पचे । विठ्ठल हे मुखा साचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३८४
📿 लटिकेची साच दाविले अ
2384.
लटिकेची साच दाविले अचळ । पिडीतसे काळ किती म्हणू ॥१॥
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला । का गा हा दाविला जगदाकार ॥धृपद॥
सांभाळी सांभाळी आपुली हे माया । आम्हासी का भयभीत केले ॥२॥
रूप नाही त्यासी ठेविले नाम । लटिकाची भ्रम वाढविला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३८४
📿 श्रवणीं ऐकोनी पाहावय
2384.
श्रवणीं ऐकोनी पाहावया येणे । तंव डोळेचि जाले देखणे ॥१॥
आता पहावे ते काये । जे पाहे ते आपणचि आहे ॥२॥
जे जे देखो जाये दिठी । ते देखणे होउनी नुठी ॥३॥
एका जनार्दनी पाहे लीला । पाहता पाहणें अवलीळा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३८५
📿 आमच्या कपाळे तुज ऐसी
2385.
आमच्या कपाळे तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥
काय या राहिले विनोदावाचून । आपुलिया भिन्न केले आम्हा ॥धृपद॥
कोठे मूर्त्तिमंत दावी पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥२॥
तुका म्हणे आता आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३८६
📿 न बोलावे ऐसे जनासी उ
2386.
न बोलावे ऐसे जनासी उत्तर । करितो विचार बहु वेळा ॥१॥
कोण पाप आड ठाकते येऊन । पालटिति गुण अंतरीचा ॥धृपद॥
संसारा हाती सोडवूनि गळा । का हे अवकळा येती पुढे ॥२॥
तुका म्हणे सेवे घडेल अंतराय । यास करू काय पांडुरंगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३८६
📿 पाहता पाहता कैसे पाल
2386.
पाहता पाहता कैसे पालटले मन । देखणेचि दाविलेंक चोरुनी गगन ॥१॥
आनंदें जनार्दना लागलों मी पाया । गेली माझी माया नाहींपणे ॥२॥
देखणेंचि केवळ दिसताहे सकळक । सुखाचे निष्फळ वोतिलें जग ॥३॥
एक जनार्दनी निमाला एकपणे । मोहाचे सांडणे माया घेऊनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३८७
📿 आता हे उचित माझे जना
2387.
आता हे उचित माझे जना हाती । पाहिजे फजीती केली काही ॥१॥
मग हे तुमचे न सोडी चरण । त्रासोनिया मन येईल ठाया ॥धृपद॥
वाउगे वाणीचा न धरी कांटाळा । ऐसी का चांडाळा बुद्धी मज ॥२॥
तुका म्हणे जरि माथा बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३८७
📿 ताट भोक्ता आणि भोजन
2387.
ताट भोक्ता आणि भोजन । जो अवघाचि झाला आपण ॥१॥
भली केली आरोगण । सिद्ध स्वादुचि झाला आपण ॥२॥
कैसी गोडी ग्रासोग्रासी । चवी लागली परम पुरुषी ॥३॥
रस सेविता स्वमुखे । तेणे जगदुदर पोखे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३८८
📿 मारग ते बहु बहुत प्र
2388.
मारग ते बहु बहुत प्रकार । प्रणव विचार जयापरी ॥१॥
आदि अंतु नाही मार्गाची ग्वाही । साधने लवलाही वाया पंथे ॥२॥
जया जी भावना तोचि मार्ग नीट । परी समाधान चित्त नाहे तेथे ॥३॥
एका जनार्दनी संतमार्ग खरा । येर तो पसारा हाव भरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३८९
📿 कैसा होतो कृपावंत ।
2389.
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणे नाही यातीकुळ । लागो वेळ नेदावा ॥१॥
ऐसी काय जाणो किती । उतरती उतरले ॥धृपद॥
दावी वैकुंठीच्या वाटा । पाहाता मोठा संपन्न । अभिमान तो नाही अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥
आले द्यावे भलत्या काळे । विठ्ठल बळे आगळा । तुका म्हणे आळस निद्रा । नाही थारा त्या अंगी । ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३९१
📿 ऐसी ठावी वर्मे । तरी
2391.
ऐसी ठावी वर्मे । तरी सांडवलो भ्रमे ॥१॥
सुखे नाचतो कीर्तनी । नाही आशंकित मनी ॥धृपद॥
ऐसे आले हाता । बळ तरी गेली चिंता ॥२॥
सुखे येथे जाले तरी । नाही आणिकाची उरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३९२
📿 चित्ती बैसले चिंतन ।
2392.
चित्ती बैसले चिंतन । नारायण नारायण ॥१॥
न लगे गोड काही आता । आणीक दुसरे सर्वथा ॥धृपद॥
हरपला द्वैतभाव । तेणे देह जाला वाव ॥२॥
तुका म्हणे आम्ही । जालो निष्काम ये कामी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३९३
📿 नव्हे परी म्हणवी दास
2393.
नव्हे परी म्हणवी दास । काही निमित्तास मूळ केले ॥१॥
तुमचा तो धर्म कोण । हा आपण विचार ॥धृपद॥
नाही शुद्ध आचरण । परी चरण चिंतितो ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । ऐसे का गा नेणा हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३९३
📿 मुनीजन साधिती साधनी
2393.
मुनीजन साधिती साधनी । तो हरी कोंदला नयनी ॥१॥
नवल हो नवल वाटलें । निरखितां निरखितां मनहीं आटले ॥२॥
स्थूल देही देहधर्मा । गोष्टी केली हो परब्रह्मां ॥३॥
व्यापला तो एका जनार्दनी । पाहता दिसे जनी वनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३९४
📿 व्यापिले सर्वत्र । ब
2394.
व्यापिले सर्वत्र । बाहेरी भीतरी अंतर ॥१॥
ऐसे गोविंदे गोविले । बोले न वजाये बोलिले ॥धृपद॥
संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥२॥
तुकयाबंधु म्हणे नाही । आता संसारा उरी काही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३९४
📿 उघडा देव दिंगबर भक्त
2394.
उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥
देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरु ॥२॥
देव निलाजरा भक्त बाजारी । देहामाझारी उरीं नाही ॥३॥
उघडे नागवें जाहलें एक । एका जनार्दनी देखणे देख ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३९५
📿 आम्हापाशी सरे एक शुद
2395.
आम्हापाशी सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥१॥
सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगे गोपाळासी ॥२॥
तुका म्हणे कर्मधर्मे नये हाता । तयावरी सत्ता भाविकांची ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३९७
📿 मी मी म्हणता माझे मी
2397.
मी मी म्हणता माझे मीच मी नेणे । चुकली रविकिरणे सुर्या धुंडिती ॥१॥
मजलागी मी तो म्या भेटावे ते कैंसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥
सबाह्म अभ्यंतरीं गगन सावकाश । तैसे घटावकाश महदाकाशी ॥३॥
एका जनार्दनी एकत्वे जन वन । जन आम्हा दिसे जनार्दन ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३९८
📿 भावों देव की देवीं भ
2398.
भावों देव की देवीं भाव । दोहींचा उगव करुनी दावा ॥१॥
भावा थोर की देव थोर । दोहींचा निर्धार करुनी दावा ॥२॥
जंव जंव भाव तंव तंव देव । भाव नाही तेथे देवाचि वाव ॥३॥
एका जनार्दनी भावेंचि देव । लटिके म्हणाल तरी हृदयी साक्ष पहा हो ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २३९९
📿 माझे हाती आहे करावे
2399.
माझे हाती आहे करावे चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावे ॥१॥
मागति या भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी ॥धृपद॥
बाळक धावोनि आड निघे स्तनी ॥घालावा जननी प्रेम पान्हा ॥२॥
तुका म्हणे करी कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हाती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४००
📿 वाट दावी त्याचे गेले
2400.
वाट दावी त्याचे गेले काय । नागवला जो वारिता जाय ॥१॥
ऐसी मागे ठकली किती । सांगता खाती विषगोळा ॥धृपद॥
विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवा नव्हे नास ॥२॥
तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४००
📿 कवण देव कवण भक्त । ए
2400.
कवण देव कवण भक्त । एक दिसे दोही आंत ॥१॥
भक्त ध्यानीं जंव बैसला । पूज्य पुजक स्वये जाहला ॥२॥
ध्यानीं हारपलें मन । सरले ध्याता ध्येय ध्यान ॥३॥
एका जनार्दनी भाव । देव म्हणण्या नुरे ठाव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४०१
📿 घर सोडोनि जावे परदेश
2401.
घर सोडोनि जावे परदेशा । मजसवें देव सरिसा ॥१॥
कडे कपाटे सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरी ॥२॥
आता कोणीकडे जावे । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥
एका बैसला निरंजनी । न जाइजे जनी वनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४०२
📿 मज नष्टा माया मोह ना
2402.
मज नष्टा माया मोह नाही लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥
धिग हे शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥धृपद॥
मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥
न दिसती मज आपलेसे गुण । संचित ते कोण जाणे मागे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४०३
📿 उभ्या बाजारांत कथा ।
2403.
उभ्या बाजारांत कथा । हे तो नावडे पंढरिनाथा ॥१॥
अवघे पोटासाठी सोंग । तेथे कैचा पांडुरंग ॥धृपद॥
लावी अनुसंधान । काही देईल म्हणऊन ॥२॥
काय केले रांडलेंका । तुला राजी नाही तुका ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४०४
📿 असोत लोकांचे बोल शिर
2404.
असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई ॥१॥
आपंगिले मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥धृपद॥
वेदशास्त्रे जिसी वर्णिती पुराणे । तिचे मी पोसणे लडिवाळ ॥२॥
जिचे नाम कामधेनु कल्पतरू । तिचे मी लेंकरू तुका म्हणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४०४
📿 बोलिजे ते नव्हे । बो
2404.
बोलिजे ते नव्हे । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहता कवण आहे ॥१॥
हरि हरि हरि हरि । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरी । एकपण नाही निर्धारी ॥२॥
दृश्य तो जाला नाही । दृश्यमात्रें त्यातेंच पाही । आहे नाही ऐसे जे कांही । प्रकाशे त्याच्याच ठायी ॥३॥
एकपणे पाहे अनेक । अनेकीं आहे एक । एक ना नव्हे आणीक । एक जनार्दनीक तोचि देख ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४०५
📿 वाराणसी गया पाहिली द
2405.
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥
पंढरीसी नाही कोणा अभिमान । पाया पडे जन एकमेका ॥२॥
तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरी यम न ये ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४०५
📿 राहातें एक जाते दोनप
2405.
राहातें एक जाते दोनपणें । तेथेंचि नाही पा देखणे ॥१॥
एकचि एक बोलता रे साचे । एक नाही तेथे अनेक कैंचे ॥२॥
अनेकी एक निर्धारितां पाही । मुळी मन ठेवुनियां ठायी ॥३॥
राहातें जाते दोन्हींही वाव । एका जनार्दनी एकचि भाव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४०७
📿 दहयाचिया अंगी निघे त
2407.
दहयाचिया अंगी निघे ताक लोणी । एका मोले दोन्ही मागो नये ॥१॥
आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे । दोहींशी समान पाहो नये ॥धृपद॥
पृथ्वीचा पोटी हिरा गारगोटी । दोहोसी समसाटी करू नये ॥२॥
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजू नये ॥३॥