संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५९८
📿 हरणी सांगे कांही कर्
598.
हरणी सांगे कांही कर्मविपाकासी | ऐशा ऐशा दोषी ऐसे होती ॥१॥
ठकवूनिया आम्ही तुज जाऊ जरी| अंधतमाभीतरी वास पावो ॥२॥
गुरु स्वामी द्रोही विश्वास धातकी| तयास तो नरकी वास सदा ॥३॥
पदद्रोही परनिदेसी रतला| तो होय बावळा जन्मोजन्मी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५९९
📿 संदेह निरसे तरि रुचि
599.
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाही ॥१॥
आता नको मज खोटयाने फटवू । कोठे येऊ जाऊ वेळोवेळा ॥धृपद॥
गेला तरि काय जीवाचे साकडे । वाचउनि पुढे काय काज ॥२॥
तुका म्हणे कशी निवडा जी बरे । केली तैसी पोरे आळी पायी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५९९
📿 पापिष्टाचे जिणे काय
599.
पापिष्टाचे जिणे काय ते जियाले| गळा स्तन जाले शेळियेचे ॥१॥
येथेचि जो खोटा तेथे तो करंटा| व्यर्थ आला पोटा माउलीच्या ॥२॥
तप्त ताम्र भूमि लोळविती नरा| लोटिती अघोरा नरकामाजी ॥३॥
लोहोचंचुकाग टोचिती येवोनी| मारिताती घणी माया घाव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ५९९
📿 कैवल्याची राशी वैष्ण
599.
कैवल्याची राशी वैष्णवांचे घरी । मुक्ति भुक्ती कामारी आहे जेथे ॥१॥
तो हा विठ्ठल निधान परेपरता उभा । सांवळी ती प्रभा अंगकांती ॥२॥
मुनिजनांचे ध्येय योगियांचें उन्मन । ज्या पै माझे लीन चित्त्त जाहलें ॥३॥
जया आष्टांग योगां सांकडे साधित । ते उगडे पाहता उभे विटेवरी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ६००
📿 न करू आम्ही तैसे घेई
600.
न करू आम्ही तैसे घेई आता भाक| अंतरी निःशंक जालो सर्व ॥१॥
तुम्हा आम्हा साक्षी असे सदाशिव| येथे दुजा भाव धरू नको ॥२॥
पिऊनिया पाणी न येऊ तुजपाशीं| तरी घडे आम्हांसी सर्व पाप ॥३॥
जातीचा ब्राह्मण न करी ब्रह्मकर्म| तो जैसा अधम तैसे आम्ही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६००
📿 पूर्वी बहुतांचे धांव
600.
पूर्वी बहुतांचे धांवणे केले । श्रमोनी ठेविले कर कटी ॥१॥
भक्तांसाठीं मनमोहन धरिले जघन कर कटी ॥२॥
भाविकांची इच्छा मनी । उभा धरुनी कर कटी ॥३॥
एका जनार्दनी ध्यान । सांवळे ठेवून कर कटी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ६०१
📿 पाराधियासी जेव्हा दा
601.
पाराधियासी जेव्हा दाटला गहिवर| लोटले अपार प्रेम तेव्हा ॥१॥
जीवदान दिले जावे तुम्ही आता| न करावी चिंता कांही येथे ॥२॥
इंद्राचा मी दूत चुकलो सेवेसी| यालागी जन्माशी आलो जाणा ॥३॥
तुमचिया बोले निवाले अंतर| घात इतःपर न करी काही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६०२
📿 आम्ही बळकट झालो फिरा
602.
आम्ही बळकट झालो फिराउनी । तुमच्या वचनी तुम्हा गोऊ ॥१॥
झाले तेंव्हा झाले मागील ते मागे । आता वर्मलागे ठावे झाले ॥धृपद॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुध्द त्यासी शुद्ध बुद्ध व्हावे ॥२॥
तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तू ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ६०२
📿 सोडोनिया गळा मुक्त क
602.
सोडोनिया गळा मुक्त केले त्यासी | पिऊनि उदकासी आली मुढती ॥१॥
क्षुधेलागी फार न लावी उशीर | घेऊनिया शस्त्र हाणी वेगे |॥२॥
घर तुझे दूर वाहावेना भार| आम्ही तेथवर येत असो ॥३॥
सत्यत्व देखोनि म्हणितले पारधी | तुम्हांसी न वधी जावे आता ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६०२
📿 एकाचिया द्वारी भीकचि
602.
एकाचिया द्वारी भीकचि मागणें उभेचि राहाणे एका द्वारी ॥१॥
एकाचिया घरी उच्छिष्ट काढणें । लोणी जे चोरणें एका घरी ॥२॥
एकाचिये घरी न खाये पक्कान्न । खाय भाजी पान एका घरी ॥३॥
एकाचिये घरी व्यापुनी राहाणें । एकासी तो देणे भुक्तीमुक्ती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६०३
📿 तुम्ही साच नुपेक्षाल
603.
तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसा अधीरसे ॥१॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनिया ॥धृपद॥
सुटो नये ऐसे कळले निरुते । का घ्यावे मागुते आळवुनि ॥२॥
तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हा केवा काय आला ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ६०३
📿 हरिश्चंद्र राजा सत्व
603.
हरिश्चंद्र राजा सत्वनिष्ठ मोठा | स्त्रीपुत्र चोहाटामीजी विकी ॥१॥
तैसेंचि येथे मृगाअंगी सत्व| वोपियेला जीव पारध्यासी ॥२॥
शिबीराजा अंग कापी नेटपाटे| सत्वासी पालट होऊ नेदी ॥३॥
ताम्रध्वजा शिरी कर्वत घातला| नाही पालटला मनोधर्म ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६०३
📿 कृपाळु माउली अनाथा स
603.
कृपाळु माउली अनाथा साउली । उभा ती राहिली विटेवरी ॥१॥
भक्त करुणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनी ठेवुनी कर ॥२॥
मोक्षमुक्ति फुका वांटितो दरुशने । नाही थोर सानें तयासी तेथे ॥३॥
एका जनार्दनी एकपणे उभा । कैवल्याच गाभा पाडुरंग ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६०४
📿 तुम्हा होईल देवा पडि
604.
तुम्हा होईल देवा पडिला विसर । आह्मी ते उत्तर यत्न केले ॥१॥
पतितपावन ब्रीदे मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥धृपद॥
आहाच मी नव्हे अर्थाचे भुकेले । भलत्या एका बोले वारेन ते ॥२॥
तुका म्हणे देह देईन सांडणे । सहित अभिमाने ओवाळूनि ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ६०४
📿 आधींच कृपाळू भोळा मह
604.
आधींच कृपाळू भोळा महादेव| जाणितला भाव कुरंगीचा ॥१॥
कृपा केली देवे मांडिला सन्मान| धाडिले विमान दूता हाती |॥२॥
लखलखित टके पताका डोलती| तयामाजी होती गीत नृत्य ॥३॥
नाना सुमनांची शय्या आरुवार| करिती उपचार सिद्धि आठ ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६०४
📿 उदित तेथे परब्रह्मा
604.
उदित तेथे परब्रह्मा उभे । सह्स्त्र कोंभ शोभे विटेवरी ॥१॥
कोटी सुर्य तेज लोपले ते प्रभे । ते असे उभे पंढरीये ॥२॥
एका जनार्दनी कैवल्यपुतळा । पाहता अवलीळा मन निवे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६०६
📿 आम्ही शक्तीहीने । कै
606.
आम्ही शक्तीहीने । कैसे कराल ते नेणे । लिगाडाच्या गुणे । खोळंबला राहिलो ॥१॥
माझे मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाही करीत हेवा । काही अधीक आगळा ॥धृपद॥
नाही गळा पडलो झोंड । तुमचे तेचि माझे तोंड । चौघा चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥
नाही येत बळा । आता तुह्मासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पाया लागतो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ६०६
📿 शिवरात्री कथा धन्य ज
606.
शिवरात्री कथा धन्य जे ऐकती| इच्छिले पावती सर्व काही ॥१॥
पातकांचा नाश पुण्य वाढे फार | शेखी विश्वंभर कृपा करी ॥२॥
भोग जाय त्याचा करिति सन्मान| काळ करी चरण सेवा त्यांची ॥३॥
नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन्ही| जपावी सज्जनी वारंवार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६०७
📿 काय कृपेविण घालावे स
607.
काय कृपेविण घालावे साकडे । निश्चिंती निवाडे कोण्या एका ॥१॥
आहो तैसी पुढे असो दीनपणे । वेचूनि वचने करुणेची ॥धृपद॥
धरू भय आता काय वाहो चिंता । काय करू आता आप्तपण ॥२॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुर ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६०७
📿 असोनि न दिसे वेगळाचि
607.
असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे विटेवरी ॥१॥
कैवल्य उघडें राहिलेंसे उभे । कर्दळींचें गाभे समपदीं ॥२॥
द्वैत अद्वैत विरहित सचेतनीआ उभा । एका जनार्दनी शोभा गोजिरी ती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६०८
📿 नाही उल्लंघिले कोणाच
608.
नाही उल्लंघिले कोणाचे वचन । मज का नारायण दुरी जाला ॥१॥
आशंकिते मने करी आळवण । नाही समाधान निश्चिंतीचे ॥धृपद॥
दासांचा विसर हे तो अनुचित । असे सर्व नीत पायांपाशी ॥२॥
तुका म्हणे तुम्हा लाज येत नाही । आम्हा चिंताडोही बुडविता ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ६०८
📿 लिंगपुराणी हा बोलिला
608.
लिंगपुराणी हा बोलिला इतिहास| तोचि म्या तुम्हांस निवेदिला ॥१॥
अनेक पुराणी अनेक प्रकार| तारावया नरनारी लोक ॥२॥
मुख्य हेचि कथा शिवरात्रीची जाणा| कैलासींचा राणा तोष पावे ॥३॥
नामा म्हणे मन करोनि निश्चळ| करा गदारोळ नामघोष ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६०८
📿 अजीव शिव व्यापुनी रा
608.
अजीव शिव व्यापुनी राहिला वेगळा । परब्रह्मा पुरळा विटेवरी ॥१॥
तयाचिये पायी वेधले मन । झाले समाधान पाहता रुप ॥२॥
विश्रांती समाधि लोपोनियां ठेली । पाहता सांवळा मूर्ती देखा ॥३॥
एका जनार्दनी सर्वा वेगळा तो । बाळलीला खेळे कृष्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६०९
📿 जीव जायवरी सांडी करी
609.
जीव जायवरी सांडी करी माता । हे तो आश्चर्यता बाळकाची ॥१॥
दुर्बळ की नाही आइकत कानी । काय नारायणी न्यून जाले ॥धृपद॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥
तुका म्हणे नाही वचनासी रुचि । फलकट वेचि ते ते होय ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६०९
📿 चैतन्याचा साक्षी सर्
609.
चैतन्याचा साक्षी सर्वांसी परीक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना ॥१॥
बहुत भागले बहुत श्रमले । परी नाही लाभलें रुप ज्यांचें ॥२॥
भक्तांचेनि भावे पंढरीये उभा । आनंदाचा गाभा सांवळा तो ॥३॥
एका जनार्दनी तो सर्वव्यापक उभा असे नायक वैकुंठीचा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६१०
📿 एकपणे एक पाहता जग दि
610.
एकपणे एक पाहता जग दिसे । योगियांसि पिंसे सदा ज्यांचे ॥१॥
आनंद अद्वय नित्य निरामय । परापश्यंति वेगळा होय पंढरीये ॥२॥
व्यापक विश्वभंर भरूनि उरला । तो प्रत्यक्ष संचला कीर्तन मेळी ॥३॥
एका जनार्दनी त्रिगुणांवेगळा । पहा पहा डोळा विठ्ठल देव ॥४॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ६११
📿 सांडावे ते काय आता स
611.
सांडावे ते काय आता सर्वही सवेचि आहे ।
जावे आता कोठे सारे मायावेष्टित दिसे ।
वैराग्य घेउनी त्यजू भवासी ते तव पुढेचि भासे ।
यासी यासी काय करणे मन स्थिर नसे ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६११
📿 काय आह्मी आता पोटचि
611.
काय आह्मी आता पोटचि भरावे । जग चाळवावे भक्त ह्मुण ॥१॥
ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतो फार कासावीस ॥धृपद॥
काय कवित्वाची घालूनिया रूढी । करू जोडाजोडी अक्षरांची ॥२॥
तुका म्हणे काय गुंफोनि दुकाना । राहो नारायणा करुनी घात ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ६११
📿 साठीसहस्र विघ्नांवरी
611.
साठीसहस्र विघ्नांवरी| शिवनाम पंचाक्षरी ॥१॥
तो पर्वत राजा कै देखेन | जेथे असे मल्लिकार्जुन ॥२॥
भक्तिभावाचे अंजन| साधावया निधान ॥३॥
मन मारूनि देईन बळी| साधावया चंद्रमौळी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 तुळसी महात्म्य›
📿 अभंग क्र. ६१३
📿 तुळसीविण ज्याचे घर ।
613.
तुळसीविण ज्याचे घर । ते तंव जाणावे अघोर । तेथे वसती यम किंकर । आज्ञा आहे म्हणोनी ॥१॥
तुळसी वृंदावन ज्याचे धरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी । ते वर्जिले यमर्किकरी । आज्ञा आहे म्हणोनी ॥२॥
तुळसीवृंदावना । जे करिती प्रदक्षणा । अंत्त-काळा होता स्मरण । जन्ममरण नाही नामा ह्मणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६१३
📿 समचरणीं उभा चैतन्याच
613.
समचरणीं उभा चैतन्याचा गाभ । त्रैलाक्याची शोभ पांडुरंग ॥१॥
भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाची विधान पाडुंरग ॥२॥
मुक्ति कल्पद्रुम महाफळ उत्तम । गोपिकांचा काम पाडुंरग ॥३॥
एकाएकी विनटला । तो सदा संचला । एका जनार्दनी भेटला पांडुरंग ॥४॥