होउनी भक्तांचा अंकिल
2264.
होउनी भक्तांचा अंकिला । पुरवितसे मनोरथ । ऐसी हे प्रचीत । उघड पहा ॥१॥
देव भक्ताचा अंकिला । धांवे आपण वहिला । भक्ताचिया बोला । उणें पडों नेदी ॥२॥
उपमन्यूचिया काजासाठी । क्षीरसिंधु भरुनि वाटी । लाविली त्याचे होटीं । आपुला म्हणोनी ॥३॥
वनी एकटें ध्रुवबाळ । तयासी होउनी कृपाळ । दिधले पद अढळ । आपुलिया लाजा ॥४॥
प्रल्हाद पडता सांकडीं । खांबांतुन घाली उडी । दैत्य मारी कडोविकडी । आपुलिया चाडा ॥५॥
पडता संकट पांडवासी । जाहला सारथी धुरेसी । मारविली बापुडी कैसा । कौरवें सहकुळ ॥६॥
ऐसा भक्ताचिया काजा । धांवें न धरत लाजा । एका जनार्दना दुजा । एकपणे एकटु ॥७॥
